निसर्गाच्या गप्पांच्या १७ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
वरील कोलाज वर्षू नील यांच्या सौजन्याने
सध्या अनुकूल अशा वातावरणामुळे सगळीकडे रंगीबिरंगी टवटवीत फुले डुलताना दिसत आहेत. फुला,झाडांच्या प्रदर्शनांचेही सध्या हंगाम चालू आहे. निरनिराळी फुले, फळे, रोपे, बी-बियाणे आपले खास आकर्षण घेऊन ह्या प्रदर्शनांमध्ये आपले गुण, वेगळेपण दर्शविण्याच्या प्रयत्नात आहेत. आपल्या निसर्ग प्रेमींपैकी काही निसर्ग प्रेमी ह्या प्रदर्शनांना भेटीही देऊन आले आहेत. राहीलेल्या ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी अशा प्रदर्शनांना भेट देऊन ह्या निसर्ग घटकांच्या सौंदर्याचा, महतीचा लाभ घ्या. तसेच बी-बियाणे, रोपे आणून आपल्या परीसरातही त्यांना सामावून घ्या. व त्यांचे फोटो काढून नि.ग. च्या धाग्यावर सगळ्यांच्या लाभार्थी अवश्य द्या.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php
मस्त फोटोज मानुषीताई इथे
मस्त फोटोज मानुषीताई
इथे महाराष्ट्रात (विदर्भ) मुसळधार पावसाने आणि गारपीठीने थैमान घातले आहे. हाताशी आलेली पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. उजनी जलाशय परीसरात पडलेल्या गारांमुळे परदेशी पक्षी मरत आहेत. मार्च महिन्यात पाऊस.
वर्षू .......,,,गुड
वर्षू .......,,,गुड क्वेश्चन......:फिदी:
धन्यवाद गुर्जी......
विदर्भातली बातमी वाचून वाईट वाट्लं. बिचारे पक्षी.
अरे वा.. जिप्सी ला जिप्स्या
अरे वा.. जिप्सी ला जिप्स्या न म्हणता गुर्जी म्हणायचं का आता....
अय्यो दोन दिसात जिप्स्याचं परमोशन झालं वाट्टं......
वर्षू वो हमरे गुर्जीच हय.
वर्षू वो हमरे गुर्जीच हय. फुटवा पिकासामे कैसा डालनेका, उसमेसे इधर माबोमे कैसा डकवनेका सब्बी गुर्जीने अच्छी तरह समझाया हय. तब्बीसे हम उनको गुर्जी बुलाते हय.
वॉव, मस्त मानुषीताई.
वॉव, मस्त मानुषीताई.
शोभा, मानुषी मस्त फोटो.
शोभा, मानुषी मस्त फोटो. इंग्लड अमेरिकेत क्षितीज आपल्यापेक्षा उथळ, कमी खोलाई असलेलं दिसतं का?
तो प्रदेश आपल्यापेक्षा उत्तरेकडे असल्यामुळे खरचं तसं असतं की मला आपलं नुसतचं वाटत? कोणी सांगू शकेल का?
सायली, तुझे पक्ष्यांचे
सायली, तुझे पक्ष्यांचे सर्वच फोटो सुन्दर!! परत परत बघावेसे वाटणारे!!
हेमा, क्षितिजाबद्दल वेगळे
हेमा, क्षितिजाबद्दल वेगळे काही नाही.. कारण पृथ्वी सगळीकडे गोलच आहे. मी दक्षिण गोलार्धात त्यामूळ ऋतू उलटे असतात.... फ्लश केलेले पाणी उलट्या बाजूने भोवरा करते. आकाशातले ग्रह तारे जरा वेगळ्या ठिकाणी दिसतात.
>>>क्षितिजाबद्दल वेगळे काही
>>>क्षितिजाबद्दल वेगळे काही नाही.. कारण पृथ्वी सगळीकडे गोलच आहे. मी दक्षिण गोलार्धात त्यामूळ ऋतू उलटे असतात.... फ्लश केलेले पाणी उलट्या बाजूने भोवरा करते. आकाशातले ग्रह तारे जरा वेगळ्या ठिकाणी दिसतात.
Seasons occur because Earth is tilted on its axis relative to the orbital plane, the invisible, flat disc where most objects in the solar system orbit the sun.
----------
One can find both counterclockwise and clockwise flowing drains in both hemispheres.
Some people would like you to believe that the Coriolis force affects the flow of water down the drain in sinks, bathtubs, or toilet bowls. Don’t believe them! The Coriolis force is simply too weak to affect such small bodies of water.
सुप्रभात ऑफिस टाईम (
सुप्रभात
ऑफिस टाईम ( portulaca)
वर्षू नील, फोटो मस्तच.नाव पण
वर्षू नील,
फोटो मस्तच.नाव पण सांगाना.बिटुनियासारखं वाटतंय.
वर्षु नील अप्रतिम फोटो!! रंग
वर्षु नील अप्रतिम फोटो!! रंग त्ताजगीभरा!!
बर्या$$$$$$$$$$$$च दिवसांनी
बर्या$$$$$$$$$$$$च दिवसांनी माबोवर आले. निगला खूप मिस केल. फार मोठा बॅकलॉग भरुन काढायचाय आता. वाचेल सावकाश. जेवढ वाचल ती माहिती फोटो नेहमीप्रमाणेच मस्त........
हम्म्म्म!!! मलाही हे
हम्म्म्म!!! मलाही हे पेटुनियाच वाटतं य... उजू >>... हेल्प!!!!!!!!!
अजून राणी च्या बागेत पाहिलेल्या सर्व फुलांची नांव लक्षात ठेवायची आहेत...
वर्षुताई सुरेख. कलर कित्ती
वर्षुताई सुरेख. कलर कित्ती गोड आहे.
varshu, aataa photography
varshu, aataa photography mastach asate tujhee.
दिनेश... कस्चं!!कस्चं!!!
दिनेश... कस्चं!!कस्चं!!!
त्या दिवशी गुर्जी होते ना बरोबर, त्याचा परिणाम असावा
सुदुपार!! बॉटलब्रश आठ
सुदुपार!!
बॉटलब्रश
आठ दिवसांनी आले.... २५० पोस्ट वाचून झाल्या.......
गुरुवार, ०६ मार्च २०१४, दुपारी १ वाजता... ऑफिस परीसरात राखाडी धनेशाचे दर्शन झाले. एका बदामाच्या झाडावरून साळुंकी आणि धनेश एकदम उडताना पाहीले. दोघे दोन दिशांना गेले. धनेशाबद्दल शंका होती. तो गेला त्या दिशेला गेले, तर पिंपळाच्या शेंड्यावर बसला होता. निष्पर्ण पिंपळ ... त्याच्या शेंड्यावर धनेश ... त्यामुळे पूर्ण दिसला.
एका कंपाउंड वॉलला बोगनवेल लावली आहे. फुलांचे झुपके खाली लोंबत असतात. त्या झुपक्यांमधे सुर्यपक्षी आणि शिम्पी पक्षी ये-जा करताना दिसतात. २०-२५ फुटांवर जागा ठरवून ठेवली आहे. आम्ही मैत्रीणी दुपारी तिथे जाउन थांबतो. कधी कधी मागच्या वडाची लाल चुटुक फळे खायला आलेले सैनिक बुलबुल अगदी जवळून दिसतात. तांबट, दयाळ, कोकिळा, घार, खंड्या, साळुंकी, कावळे, खारुताई आहेतच साथीला...... घार फळे खायला नाही पण बसलेली पाहीली आहे. पुन्हा बागेच्या हिरवळीकडे लक्ष दिले तर दिसतात बगळे आणि हेरॉन!!
लंच नंतरची स्वीट डीश! ईथे सुर्यपक्षाचे घरटे बांधण्याचे उद्योग सुरु झालेले दिसत आहेत. पण माझ्या घरासमोर फक्त टेहळणी दिसते. नाही म्हणायला हळद्या घरच्या परिसरातच दिसतो.
पुन्हा एकदा ते उकड्लेल्या बटाट्याच्या उग्र वासाचे झाड फुलू लागले आहे.फुलोरा टिपता आला की टाकीनच.
मलाही हे पेटुनियाच
मलाही हे पेटुनियाच वाटतंय...
हे बहुतेक पोर्चुलाका आहे (९ टु ५ प्लान्ट)
पुन्हा एकदा ते उकड्लेल्या बटाट्याच्या उग्र वासाचे झाड फुलू लागले आहे
पोटॅटो ट्री असे गुग्लुन बघ. असे आहे का?
पुन्हा एकदा ते उकड्लेल्या
पुन्हा एकदा ते उकड्लेल्या बटाट्याच्या उग्र वासाचे झाड फुलू लागले आहे
पोटॅटो ट्री असे गुग्लुन बघ. असे आहे का? >>>>>
नाही नाही असे नाही. मी उद्या फोटो टाकीन, मागच्या वर्षी टाकले होते. त्यावर चर्चा झाली, नावही कळले होते. पण माझीच स्मरणशक्ती कमी!!!
मधू, बोगनवेलीच्या आडोश्यात
मधू, बोगनवेलीच्या आडोश्यात शिंपी आणि सूर्यपक्ष्यांची घरटी असणार. त्या फुलात त्यांना खाण्यासारखे काही नसते ( कुठल्याच पक्ष्याला नसते ) पण ते काटेरी गच्च झुडुप त्यांना सुरक्षित वाटत असणार. तूम्ही कोणी बघत असलात तर ते थेट झुडुपात शिरणार नाहीत. दुसरीकडे थांबतील आणि तूमची नजर नसेल तेव्हाच झुडूपात शिरतील.
झुडुपात शिरताना चोचीत काय आहे ते बघायचे. धागा, काडी, कोळ्याचे जाळे असेल तर घरटे बांधताहेत. अळी, किडा असेल तर पिल्ले आहेत असे समजायचे.
Aaj dupari aamchyakade paus
Aaj dupari aamchyakade paus padla.
आज सकाळीच घरासमोरच्या
आज सकाळीच घरासमोरच्या बिल्डींगच्य गच्चीत सभा भरली होती. खुप पक्षी - मोठे पोपट, एक नेहमीचा खंड्या (मागे फोटो आहेच त्याचा), मिस्टर साळूंकी, दयाळ आणि बुलबुल जमले होते. सगळॅ तावातावाने बोलत होते.. आपली व्यथा मांडत होते.
मेला पुरूषांचा जन्म वाईटच असे म्हणत इतकी वर्षे मुकाट या बायांपुढे आम्ही नाचलो, गोड गाणी गावुन, सुंदर घरटी बांधुन यांना पटवायचे प्रयत्न केले. पण या बाया इतक्या उद्दाम की आम्ही कष्टाने दोरी दोरी करत आणलेल्या सामानाने बांधलेली घरटी या एका कटाक्षात नापसंत करतात. एकदाचे अंडी घालायचे उपकार यांनी केले आमच्यावर की मग आम्हीच पंख तूटे पर्यंत धावाधाव करुन पोरांना खायला घालायचे. कधी कधी यांनापण.,.. किती तो त्रास.. एकदा या म्हणावे आमच्या जन्माला आनि उपसा असे कष्ट म्हणजे कळेल.
पण आता बस.. आता यापुढे अन्याय सहन करुन घेतला जाणार नाही. जागतीक महिला दिना निमित्त ठिकठिकाणी लागलेले फलक वाचुन, भाषणे ऐकुन आमचे डोळे खाडकन उघडले आहेत. आता आम्ही मुकाट बायकी ताईगीरी सहन करणार नाही., यावर्षी आम्ही घरटी बांधणार नाही. घरटी बांधण्याचे काम सरळ आऊटसोर्स करणार.... शिंपी, सुगरण या मंडळीनी बांधकामात पिएच्ड्या केल्यात. त्यांना देऊन टाकणार घरट्यांचे घाऊक कंत्राट. मेला तेवढा तरी थोडासा विसावा जीवाला. एकदा अंडी उबवली की मग आहेच धावपळ.
खुप सारी कबुतरे लांब उभी राहुन सभेची मजा बाहेरुन पाहात होती. म्हणत होती, आत्ता उघडले डोळे यांचे. आम्ही कधीच मुक्त झालोत या सगळ्या झंझटीतुन......
वार्ताहराचा कॅमेरा प्रवासाला गेल्याने सदरहु सभेचा फोटो देणे शक्य झाले नाही. इच्छुकांनी आंखो देखा हाल वाचुन स्वत:च्या डोळ्यापुढे चित्र आणावे.
साधना... मधुरा, बॉटलब्रशचा
साधना...:हहगलो:
मधुरा, बॉटलब्रशचा फोटो फार सुंदर आलाय!
वर्षूतै, साधना म्हणते ते बरोबर आहे, हे ऑफिस टाईम ( portulaca) आहे.
मेला पुरूषांचा जन्म वाईटच असे
मेला पुरूषांचा जन्म वाईटच असे म्हणत इतकी वर्षे मुकाट या बायांपुढे आम्ही नाचलो, गोड गाणी गावुन, सुंदर घरटी बांधुन यांना पटवायचे प्रयत्न केले. पण या बाया इतक्या उद्दाम की आम्ही कष्टाने दोरी दोरी करत आणलेल्या सामानाने बांधलेली घरटी या एका कटाक्षात नापसंत करतात. एकदाचे अंडी घालायचे उपकार यांनी केले आमच्यावर की मग आम्हीच पंख तूटे पर्यंत धावाधाव करुन पोरांना खायला घालायचे. कधी कधी यांनापण.,.. किती तो त्रास.. एकदा या म्हणावे आमच्या जन्माला आनि उपसा असे कष्ट म्हणजे कळेल. >>>>> साधना, किती यथायोग्य मनोगत मांडलंय समस्त पुरुषजातीचे ..... समस्त पुरुष वर्गातर्फे तुला स्टँडिंग ओवेशन (उभे राहून मानवंदना ......
रच्याकने, जिप्सी तू हे वाचू नकोस रे ..... तुझे अजून तरी नवे कोरे दिवस आहेत - त्या अज्ञानात सुख मानून घे.. (सध्यातरी.... ) नंतरचे नंतर...
साधना : वर्षू दि राणी बागेतली
साधना :
वर्षू दि राणी बागेतली सगळी फुल येउदेत आता.
सुप्रभात झेनिया
सुप्रभात
झेनिया
साधना, एक नंबर! लय भारी
साधना, एक नंबर! लय भारी !!
उजू, डेलियाचा रंग अप्रतिम !!
महाराष्ट्रात विविध ठिकाणी
महाराष्ट्रात विविध ठिकाणी मुसळधार पावसाने आणि गारपीठीने थैमान घातले आहे. हाताशी आलेली पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. >>>>> फार वाईट घटना .... काही तज्ञांच्या मते "एल निनो"ची करामत... जे जून-जुलैला होते ते आताच होत आहे ..... ख खो दे जा ....
साधना... नंबर १ ... शांकली..
साधना... नंबर १ ...
शांकली.. अगं साधनाचं नेहमीच बरोबर अस्तं.. एडिटून नाव टाकते आता बरोब्बर..
Pages