मागच्या काही गटग मध्ये सायकल चालविणार्यांची चर्चा झाली होती की सगळे मायबोलीकर ( सायकल चालविण्यास उत्सूक असणारे आणि नेहमी चालविणारे) मिळून एक किमान ४०-५० किमीची राईड करूयात.
माझे परागशी नुकतेच बोलणे झाले, तो तयार आहे, हर्पेन मागच्या गटग मध्ये नेहमीच रेडी असे म्हणाला होता. बाकींनी देखील सायकल घेऊन सहभागी व्हायला हरकत नाही.
सर्वानूमते ठरलेला प्लान.
दिवस : रविवार
ता : ९ फेब.
वेळ : ठिक सकाळी साडेसहा. म्हणजे ६:२९:६० ( जो उशीर करेल त्याला इतरांच्या ब्रेकफास्टचे बिल द्यावे लागेल)
राजाराम पुलापाशी जमायचे, तिथून
राईड १ - पुल ते खडकवासला जाणे येणे अंतर साधारण २० किमी (कमीच)
राईड २ - खड्कवासल्यापासून पुढे जाणारे - सिंहगड आणि परत अंतर ४०-४२ (पुल ते पुल)
ज्यांना केवळ १५-२० किमीसाठी सोबत करायची आहे, त्यांनी पण उत्सुकतेने नाव नोंदवून तयारी करावी. खरतर पहिले १० किमी कधी आले हे तुम्हालाही कळणार नाही.
अजूनही जे द्विधा मनस्थितीत आहेत त्यांच्यासाठी - YES YOU CAN!
मस्त.... माझ्या शुभेच्छा
मस्त.... माझ्या शुभेच्छा सगळ्यांना...
४०-५० किमी ??? अब्बब!!
४०-५० किमी ??? अब्बब!! फार्फार्तर २० किमी असेल तर ठिक आहे. पण इंटरेस्टींग आहे. राजाराम पुल ते खडकवासला किंवा सिंहगड पायथा हे अंतर किती असेल?
४०-५० किमी ??? अब्बब!!
४०-५० किमी ??? अब्बब!! फार्फार्तर २० किमी असेल तर ठिक आहे >. अरे ४० - ५० किमी पण कमीच आहेत असे मला वाटले.
पण खूप लोकं येणार असतील तर नक्कीच आपण २० किमीची मिनी राईड करू एका लॉजिकल टप्प्याल्या ठेवून पुढे जाणारे पुढे जाऊ शकतील.. नो प्रॉब्लेम.
आणि २०च काय १०च करू म्हणणारे असतील तरी चालेल, उद्देश किती किमीची राईड हा नसून सहभाग हा आहे. त्या निमित्ताने व्यायाम होईल.
राजाराम ते खडकवासला ८ किमी आहे आणि खडकवासला ते पायथा पुढे ११.५ किमी. ही पण मला चालेल.
शुभेच्छा. वाचूनच दम लागला.
शुभेच्छा. वाचूनच दम लागला.
शनिवारी का? जमवेन मी.
शनिवारी का? जमवेन मी. बॅडमिंटनला दांडी मारावी लागणार.
शुभेच्छा !!! त्यापलिकडे
शुभेच्छा !!! त्यापलिकडे सध्यातरी काही नाही. ४०-५० किमी म्हणजे फार नाही.... आणि ग्रूप असेल तर काहि वाटणार नाही. दुसर्या दिवशी रविवार आहेच.
मी नुकतीचं सायकल घेतली आहे -
मी नुकतीचं सायकल घेतली आहे - मागच्या आठवड्यात , जास्त चालवली नाहीये, त्यामुळे इतकं ४०-५० किमी. नाही येऊ शकणार, राजाराम ते खडकवासला चालेल - पण रस्त्यावर एकदाही चालवली नाहीये आत्तापर्यंत..........
प्राजक्ता रस्त्यावर चालविणे
प्राजक्ता रस्त्यावर चालविणे सोपे आहे. मधून नाही चालवायची अजून पूर्ण वर्किंग विक आहे, तर एक दोनदा चालवून बघा. आवडेल तुम्हाला.
केपी येणार असशील तर तिथून सुरूवात करू.
सायकल भाड्याने मिळेल का कुठे
सायकल भाड्याने मिळेल का कुठे चांगली? मी नक्की येईन सायकल मिळत असेल तर. बरेच जण गावात/कोथरुड/सिंहगड रोड/वारजे भागात राहत असतील तर राजाराम पूल हे ठिकाण अधिक सोयीचे पडेल.
सिंहगड पायथा केला तर हौशी लोक सिंहगडावर चालत पण जाउन येउ शकतील
नक्की येतो. बर्याच गटगला
नक्की येतो. बर्याच गटगला टांग दिली असल्याने यावेळे सायकलवर टांग मारुन सहभागी व्हायला आवडेल.
टण्या आमच्या सोसायटीतल्या मुलांची मिळाली तर बघु का?
shubhechchha
shubhechchha
मी सध्या सोसायटीच्या बाजूने
मी सध्या सोसायटीच्या बाजूने राऊंड मारत्ये जमेल तेव्हा आणो रस्त्यावर मी टू/फोर व्हीलरही नाही चालवत तशी त्यामुळे जरा भिती वाटत्ये, ह्या वीकेंडचा आहे का प्लॅन ?
सायकल भाड्याने मिळेल का कुठे
सायकल भाड्याने मिळेल का कुठे चांगली? >>>
सायमोर ( www.cymour.com) ला किंवा लाईफसायकल ( lifecycleonline.in/ ) ला विचार त्यांच्याकडे मिळतात. घेताना माऊंटेन नको घेऊ, हायब्रिड घे.
प्राजक्ता - आपण भल्या सकाळी जाणार असल्यामुळे (निदान सकाळचे ६ किंवा ६:३०) तशी ट्रॅफिक नसणार आणि सायकल कडेने चालवली की काही प्रॉब्लेम नाही. येते पाच दिवस प्रॅक्टीस करा. आणि सहभागी व्हा.
केपी ये मग. टांग मारून !
राजाराम पूल ते पुढे कुठेही..
राजाराम पूल ते पुढे कुठेही.. राजाराम पुल सोईचा पडेल सगळ्यांना..
वाकडहून पुढे म्हणजे गावातून वाकड ही एक मोठी राईड होइल !
पायाथ्यापर्यंत सायकलने जाऊन सिंहगडावर चढत जाऊन यायची आयड्या वाईट नाही..
पायाथ्यापर्यंत सायकलने जाऊन
पायाथ्यापर्यंत सायकलने जाऊन सिंहगडावर चढत जाऊन यायची आयड्या वाईट नाही >> आय अॅम गेम.
सध्या सोसायटीच्या बाजूने
सध्या सोसायटीच्या बाजूने राऊंड मारत्ये जमेल तेव्हा >>
त्याच कडेने रस्ता क्रॉस करुन चल मग आमच्या बरोबर. आणखी काही महिला आघाडी होते का ते पण बघु.
मी १५ वर्षांच्या गॅपनंतर
मी १५ वर्षांच्या गॅपनंतर गेल्या आठवड्यापासूनच सायकल चालवायला सुरुवात केलीये, अजून पुरती सरावले नाही, थोडा जरी चढ आला तरी हाल होतायत. सायकलही थोडी उंच आणि सेमी असल्याने पाय टेकवणं वगैरे अवघड पडतंय. नवीन सायकल घेण्याची ही पूर्वतयारी आहे. गटगला आले तर बराच हुरूप येईल, पण इतकी चालवू शकण्याचा मुळीच आत्मविश्वास नाही. मलाही रविवार आणि राजाराम ते खडकवासला बरे पडेल.
त्यामुळे गटगला यायची इच्छा आहे पण नाव नोंदवू की नको असा प्रश्न पडलाय.. कारण सगळे पुढे निघून जातील आणि मी एकटीच मागे राहीन, हाफत हाफत!
हे रे काय केदार, मी नाहीये
हे रे काय केदार, मी नाहीये ह्या विकांताला पुण्यात. ऑरोव्हील अर्ध-मॅरॅथॉन मधे भाग घेतलाय त्यामुळे तिकडे जातोय. पण तुम्ही मंडळी जाऊन या.
ट्ण्या - तुला माझी सायकलही मिळू शकेल.
कर्वे रस्त्यावरच्या सिंग सायकल मधे सायकली भाड्याने मिळतात. मला वाटते, २४ तासाचे, हेल्मेट सकट ३५० का ४०० रुपये भाडे असते. इतर इच्छुकांनी लाभ घ्यावा.
प्राजक्ता - थोड्या सरावानंतर नक्की जमेल.
ज्यांना केवळ १५-२० किमीसाठी सोबत करायची आहे, त्यांनी पण उत्सुकतेने नाव नोंदवून तयारी करावी. खरतर पहिले १० किमी कधी आले हे तुम्हालाही कळणार नाही.>> +१
शनीवार ऐवजी रवीवार केला तर मी
शनीवार ऐवजी रवीवार केला तर मी पण येईन. मी सायकल अधूनमधून चालवते. पण स्पीड कमी आहे. चालेल का?
जितकं वाटतं तितकं सोपं नाहिए
जितकं वाटतं तितकं सोपं नाहिए केदार, जवळपास ऐंशी किमी होतील .
(रोज किमान दहा किमी सायकल चालवणारा -ग्रेथि)
हर्पेन सॉरी यार मला माहिती
हर्पेन सॉरी यार मला माहिती नव्हतं की तुला तिकडे जायचंय. तू येणार असलास तर मग ८-९ ऐवजी १५-१६ ला करायचे का?
http://surendarcyclestores.com Near Ranka Jewellers, Karve Road, Pune इथेही सायकली भाड्याने मिळतात.
अनया / सई
स्पिड कमी असेल तरी चालेल, सगळेच फास्ट जाऊ शकणार नाहीत त्यामुळे सोबत मिळेलच ह्याची खात्री. शिवाय ग्रूप अॅक्टीव्हिटीज मध्ये माझी स्टॅटेजी नेहमीच, नो मॅन लेफ्ट बिहाइंड असते.
जितकं वाटतं तितकं सोपं नाहिए केदार, जवळपास ऐंशी किमी होतील . >> ग्रेथि, नवीन प्लान राजाराम पुल ते खडकवासला ( असं १८-२० किमी राउंड) ग्रुप १ साठी आणि सिझन्ड वाल्यांसाठी पुढे खडकवासला ते सिंहगडापर्यंत. म्हणजे राजाराम ते सिंहगड आणि परत असे साधारण ४०-४२ किमी.
मला १६ ला खूपवेळा चालेल, पण
मला १६ ला खूपवेळा चालेल, पण आत्ता बरेच जण येत असतील तर जा तुम्ही, मी मोडता घालत नाही मी पुढच्या वेळेस येईनच की ! आशा आहे की हे शेवटचे सायकल गट्ग असणार नाही
मला नक्की आवडले असते.. पण
मला नक्की आवडले असते.. पण सायकल नाही.. आणि चालवायचा सरावही राहिलेला नाही..
कोणे एके काळी.. सायकल वर सिंहगड पायथ्यापर्यंत जाऊन पुढे गडावर चढत जाऊन आलो होतो.. एक नंबर अनुभव होता तो.. आणि ते सुद्धा साध्या सायकल वर तेव्हा गियरची सायकल वगैरे भानगडी अवतरल्याच नव्हत्या..
काय रे हर्पेन.. केदार ८
काय रे हर्पेन..
केदार ८ तारखेचा ठरवुया. प्रथम गटग असल्याने सोप्पे २०-२५ किमी वाले ठेवु. मग एकदा सराव्/हुरुप आला की हर्पेन सारखी दिग्ग्गज मंडळी रिंगणात उतरतील.
चल रे हिम्या. अरे आमच्या सोसायटीमधल्या मुलांनी पण केले खडकवासला पर्यंत सायकलींग. सर्वात लहान मुलगा ४थी मधला होता.
एकदम अनोखे गटग शुभेच्छा
एकदम अनोखे गटग शुभेच्छा
मला कुणी डबलसीट नेत असाल तर मी पण येईन
हो चालेल. आधी लगीन
हो चालेल. आधी लगीन खडकवासल्याचे मग !
हर्पेन मग आपण लोनावळा मारूया ! १०० किमी जाणे येणे टारगेट.
चला तर मंडळी ८ तारखेला जायचे हे नक्की करून प्रयत्न करा आणि या. सायकल भाड्याने मिळेल. ती ठिकाणं मी वरच्या काही प्रतिसादात दिली आहेत.
१०० किमीला माझा पास.
१०० किमीला माझा पास.
केप्या.. अरे सायकल चालवायची
केप्या.. अरे सायकल चालवायची अजिबातच प्रॅक्टीस नाहीये.. पुढच्या चार - पाच दिवसात रोज किमान ५ किमी तरी चालवायला लागेल तेव्हा जमू शकेल..
अरे ८ तारखेला शनिवार आहे ना?
अरे ८ तारखेला शनिवार आहे ना? बर्याच जणांना जमत असेल तर ९ चा रविवार ठरवूयात...
हिम्सकूल आणि मंडळी, कृपया
हिम्सकूल आणि मंडळी, कृपया लक्षात ठेवा की वयाचे, सायकल किती वर्षापुर्वी चालवली होती, चालवायचे अंतर ई. हे केवळ आकडे असतात. सायकल सावकाश चालवत गेलो तर कुणालाही सहज जमेल खडकवासला किंवा सिंहगडापर्यंतचे अंतर.
काका मी कुठला दिग्गज वगैरे अजीबात नाही, मी स्वतः हे आऊटडोअर उद्योग केवळ ५ महिन्यांपुर्वीच चालू केलेत आणि मी करू शकतोय तर कोणीही करू शकेल
मंडळी सुरुवात करा, एक पॅडल मारा, पुढचे सगळे (मी आपोआप नक्कीच म्हणणार नाही) पण व्यवस्थित होते.
Pages