मागच्या काही गटग मध्ये सायकल चालविणार्यांची चर्चा झाली होती की सगळे मायबोलीकर ( सायकल चालविण्यास उत्सूक असणारे आणि नेहमी चालविणारे) मिळून एक किमान ४०-५० किमीची राईड करूयात.
माझे परागशी नुकतेच बोलणे झाले, तो तयार आहे, हर्पेन मागच्या गटग मध्ये नेहमीच रेडी असे म्हणाला होता. बाकींनी देखील सायकल घेऊन सहभागी व्हायला हरकत नाही.
सर्वानूमते ठरलेला प्लान.
दिवस : रविवार
ता : ९ फेब.
वेळ : ठिक सकाळी साडेसहा. म्हणजे ६:२९:६० ( जो उशीर करेल त्याला इतरांच्या ब्रेकफास्टचे बिल द्यावे लागेल)
राजाराम पुलापाशी जमायचे, तिथून
राईड १ - पुल ते खडकवासला जाणे येणे अंतर साधारण २० किमी (कमीच)
राईड २ - खड्कवासल्यापासून पुढे जाणारे - सिंहगड आणि परत अंतर ४०-४२ (पुल ते पुल)
ज्यांना केवळ १५-२० किमीसाठी सोबत करायची आहे, त्यांनी पण उत्सुकतेने नाव नोंदवून तयारी करावी. खरतर पहिले १० किमी कधी आले हे तुम्हालाही कळणार नाही.
अजूनही जे द्विधा मनस्थितीत आहेत त्यांच्यासाठी - YES YOU CAN!
९ ला नाहीच जमणार का? मला ८ ला
९ ला नाहीच जमणार का? मला ८ ला नाही येता येणार. नो सुट्टी.
पराग, बरोबर आहे. प्लीज
पराग, बरोबर आहे. प्लीज रवीवारच ठरवा.
हर्पेन.. मी जमणार नाही असं
हर्पेन.. मी जमणार नाही असं म्हणतच नाहीये.... जमेल ह्यात शंकाच नाहीये.. फक्त अजिबात प्रॅक्टीस न करता एवढे अंतर गेल्यावर पाठदुखी, पायदुखी असले कार्यक्रम व्हायला नको..
चालेल ९ पण चालेल. रविवार
चालेल ९ पण चालेल. रविवार नक्की का मग? सकाळी ६:३० ला जमेला का सर्वांना?
मला खूप आवडेल अॅक्चूली पण
मला खूप आवडेल अॅक्चूली पण मला सायकल अगदी नॉमिनल ना के बराबर चालवता येते. धडपडण्याचे चान्सेस खूप जास्ती आहेत. प्रथम नीट शिकून घेऊन मग येईन
हो. रविवार, ९ फेब्रुवारी,
हो. रविवार, ९ फेब्रुवारी, सकाळी ६.३०, राजाराम पूल.
५-६ महिन्यात दिग्गज झाला
५-६ महिन्यात दिग्गज झाला आहेस.
शनिवारी ठेवा राव. पाय मोडले तर रविवारी डागडुजी तरी होईल.
भारीच आयडिया आहे की गटगची!
भारीच आयडिया आहे की गटगची! ऑल्दबेस्ट हा...
best of luck.
best of luck.
६.३० पळेल आता रोज सराव केला
६.३० पळेल आता रोज सराव केला पाहिजे!
अरे व्वा! उपक्रमाला मनःपूर्वक
अरे व्वा! उपक्रमाला मनःपूर्वक शुभेच्छा आणि आयोजकांचे अभिनंदन/आभार.
(तब्येतीमुळे व अन्य आधीच ठरविलेल्या कार्यक्रमामुळे माझे येणे अशक्य आहे, पण मनाने मी तुमच्याबरोबरच असेन याची खात्री बाळगा. नुकतेच २६ जाने ला चान्दणि चौक ते युनिव्हर्सिटी असा तब्बल ५/६ किमीचा पल्ला मी पार केलाय म्हणलं! अजुन एक पाचदहा किमी म्हणजे मला तसे अवघड नाही! पण असो. यावेळेस तरि असोच. )
केदार तारिख / वेळ अपडेट कर
केदार तारिख / वेळ अपडेट कर वर..
हिम्सकूल, विना सराव करूच नये,
हिम्सकूल, विना सराव करूच नये, आहेत की अजून ५-६ दिवस, करावा रोज थोडा सराव आणि थोडे पाय्-बिय दुखायचेच
एक फु.स. - वेळ ६ चीच ठेवा म्हणजे सगळे जमून साडेसहाला नक्की निघाल
अरे वा, मस्तच आहे कल्पना.
अरे वा, मस्तच आहे कल्पना. मज्जा करा लोकहो
हर्पेन अरे मला
हर्पेन अरे मला राजारामपुलापर्यंत सायकलवर यायला माझ्या घरापासून १७ किमी यावे लागेल. म्हणून ६:३०. पण माझ्यासाठी ६:३० म्हणजे ६:२९:६० पण इतक्या गटगच्या अनुभवाअंती असे म्हणावे लागेल तुझा सल्ला योग्य आहे.
केपी अरे २० किमीत पाय मोडणार नाही.
वेळ अपडेट करतो.
प्रथम नीट शिकून घेऊन मग येईन >> लोकांना आवडले तर अशी राईड महिन्यातून दोनदातरी ठेवायला हरकत नाही तेंव्हा ये.
तर लोकहो ज्यांना शंका आहे त्यांच्यासाठी YES YOU CAN!
वाह..... काय मस्त गटग आहे. मी
वाह..... काय मस्त गटग आहे.
मी पण कुठच्यातरी सायकलराईड गटगला येईन. तेव्हा मला कोणीतरी सायकल द्या आणि रस्ता दाखवा
गटगनंतर काहीच कार्यक्रम नाही का? म्हणजे चहा-कॉफी गटग वगैरे... काहीतरी नाश्तापाणी??
काहीतरी नाश्तापाणी?? >>> हो
काहीतरी नाश्तापाणी?? >>> हो आहे की. इत्सिप्त ठिकाणी पोचून नाश्ता करायचा, म्हणजे तेवढा वेळ सगळ्यांना विश्रांती मिळेल आणि मग परत बे एके बे करत घरी.
गटगला शुभेच्छा आणि
गटगला शुभेच्छा आणि आमच्यावतीने हे गिफ्ट.
थँक्स नंदिनी मस्तच गिफ्ट
थँक्स नंदिनी मस्तच गिफ्ट आहे!!
रविवार असेल तर मीही इन
रविवार असेल तर मीही इन
शनिवार ठेवा रे लोकांनो..
शनिवार ठेवा रे लोकांनो.. रविवारी दुपारी मुंबईला जायचय.. असो, जर बहुमत रविवार असेल तर रविवार..
सायकल मिळाली तर मी येईन
सायकल मिळाली तर मी येईन नक्की. ती मिळाली की मगच नोंदणी करते.
वॉव! मस्त आयडिया! सर्वांना
वॉव! मस्त आयडिया! सर्वांना शुभेच्छा!
व्हॉट अॅन आयडिया सरजी
व्हॉट अॅन आयडिया सरजी
सही कल्पना!! सायकल गटगला
सही कल्पना!! सायकल गटगला शुभेच्छा!!
सही कल्पना!! सायकल गटगला
सही कल्पना!! सायकल गटगला शुभेच्छा!! >> +१
अरे सही. मस्त आहे हे गटग.
अरे सही. मस्त आहे हे गटग. माझ्या शुभेच्छा. केदार डीसीला आलास की करूयात असे सायकल गटग.
भारी. शुभेच्छा सगळ्यांना.
भारी. शुभेच्छा सगळ्यांना.
हेल्मेट विसरू नका
ऑस्सम आयडिया. ह्या गटगला
ऑस्सम आयडिया. ह्या गटगला यायला मला फार आवडलं असतं.. सर्वांना शुभेच्छा!
मस्तच .....किती छान कल्पना
मस्तच .....किती छान कल्पना ...:) सर्वांना शुभेच्छा !
सायकल गटग वाचताना हया ले़खाची आठवण आली. पन्नाशीनंतर त्यांनी पहिल्यांदा सायकल चालवली आणि मग सायकलवरून ट्रेकला जाणं हा त्यांचा छंदच कसा झाला.
Pages