मागच्या काही गटग मध्ये सायकल चालविणार्यांची चर्चा झाली होती की सगळे मायबोलीकर ( सायकल चालविण्यास उत्सूक असणारे आणि नेहमी चालविणारे) मिळून एक किमान ४०-५० किमीची राईड करूयात.
माझे परागशी नुकतेच बोलणे झाले, तो तयार आहे, हर्पेन मागच्या गटग मध्ये नेहमीच रेडी असे म्हणाला होता. बाकींनी देखील सायकल घेऊन सहभागी व्हायला हरकत नाही.
सर्वानूमते ठरलेला प्लान.
दिवस : रविवार
ता : ९ फेब.
वेळ : ठिक सकाळी साडेसहा. म्हणजे ६:२९:६० ( जो उशीर करेल त्याला इतरांच्या ब्रेकफास्टचे बिल द्यावे लागेल)
राजाराम पुलापाशी जमायचे, तिथून
राईड १ - पुल ते खडकवासला जाणे येणे अंतर साधारण २० किमी (कमीच)
राईड २ - खड्कवासल्यापासून पुढे जाणारे - सिंहगड आणि परत अंतर ४०-४२ (पुल ते पुल)
ज्यांना केवळ १५-२० किमीसाठी सोबत करायची आहे, त्यांनी पण उत्सुकतेने नाव नोंदवून तयारी करावी. खरतर पहिले १० किमी कधी आले हे तुम्हालाही कळणार नाही.
अजूनही जे द्विधा मनस्थितीत आहेत त्यांच्यासाठी - YES YOU CAN!
मी शनिवार करता हात वर. रविवार
मी शनिवार करता हात वर. रविवार पण चालेल पण प्रथम क्र शनिवारचा.
मला शनि-रवि दोन्ही दिवशी
मला शनि-रवि दोन्ही दिवशी सुट्टी असते त्यामुळे कधीही चालेल, बहुमत काय आहे बघु
मस्तच आयडिया!! पण प्लीज-
मस्तच आयडिया!!
पण प्लीज- हेल्मेट मस्ट आहे! सर्वांनी हेल्मेट घातल्याखेरीज गटग चालू करू नका..
केदार आणि आशु, खुप धीर देताय
केदार आणि आशु, खुप धीर देताय तुम्ही, मला अगदी गरज आहे!
आपुन भी आ रैला है.. सायकल का
आपुन भी आ रैला है.. सायकल का काम हुयी गवा है..
शनि रवि कुठलाही दिवस चालेल..
सिंडी आणि बस्के परत परत
सिंडी आणि बस्के परत परत हेल्मेट घालाच म्हणताहेत. काहीतरी रिस्क असेल म्हणूनच घाला सांगत असाव्यात. मग कुणीच ते मनावर का घेत नाहिये? रमत गमत चालवणार, स्पर्धेसारखी जोराजोरात चालवणार नाही म्हणून का? जेन्यूईनली विचारतेय
बादवे, मी इथे कुणाही सायकलस्वाराला हेल्मेट घालून चालवताना पाहिलं नाहिये
@ अश्विनी, नवरा मागे लागला
@ अश्विनी, नवरा मागे लागला म्हणून आम्ही हेल्मेट घेतलयं, पण घालून पुढचं मागचं नीट दिसेल का अशी मला शंका , प्रयोग करुन बघेन आणि ठरवेन
पण घालून पुढचं मागचं नीट
पण घालून पुढचं मागचं नीट दिसेल का अशी मला शंका >>> आधी घरातल्या घरात ह्या खोलीतून त्या खोलीत फिरुन बघ ते टोपरं घालून
सिंडी आणि बस्के परत परत
सिंडी आणि बस्के परत परत हेल्मेट घालाच म्हणताहेत. काहीतरी रिस्क असेल म्हणूनच घाला सांगत असाव्यात. >>
अश्विनी, सायकलीवरून पडल्यावर डोक्याच्या सिक्युरिटी साठी हेल्मेट घालने आवश्यकच असते. पण ते नसले म्हणजे सायकल चालवूच नये असे नाही. (थोडा विरोधाभास वाटेल. )
अमेरिकेत पर्सनल सेफ्टीची सर्व काळजी घेतात. त्यामुळे तिथे लोकं हेल्मेटधारी दिसतात. इथे भारतात, मुळात सायकल ही प्रिफर्ड अॅक्टिव्हिटी अजून नाही, ती आताशा होते आहे ती पण केवळ काही लोकात. जागरूकता वाढेनच. येथील लोकंही हेल्मेट कधी ना कधी घेतीलच, पण त्यांनी घेईपर्यंत सायकल अजिबातच चालवू नये, असे मला वाटत नाही. (हेल्थ , सिक्युरिटी इश्यू मान्य असूनही आणि सिंडी / बस्केची काळजी योग्य असूनही.) प्रॅक्टीकल प्रॉब्लेम हा आहे की बर्याच लोकांना सायकलवर अजूनही एवढा खर्च करावा वाटत नाही तर हेल्मेटवर अजून १८०० ते ६००० कोण खर्च करणार? ( भारताबद्दल लिहितोय.) (माझ्या सायकलीच्या किमतीवरून मित्राने बाईक का नाही घेतली? हे विचारलेले, हे मी दोन वर्षापूर्वीच्या माबोच्या छंद दिवाळी अंकात लिहिले, ते आजही तेवढेच खरे आहे.)
तस्मात, हेल्मेट गटग पण करूच. ( जर लोकांना ग्रूप राईड करायच्या असतील तर) आता हे होऊन जाऊ दे.
जे सिरियस रायडर्स असतात ते सर्व घेतात. आणि ह्या राईडच्या कल्पनेचा माझा उद्देश असा आहे की अश्या ग्रूप राईड करणारे काही लोकं आपोआप सिरियस होतील, त्यांना सायकलची गोडी लागेल इ इ. पण सिरियस रायडर व्हायला अनेक राईड राईडस होणे आवश्यक असते. त्या आधी तो एवढा खर्च करत नाही.
हिम्या - वे टू गो.
केदार जाधव - तू येतो आहेस ना?
पब्लिक - पाण्याचे मात्र लक्षात ठेवाच. पाणी हवे ! इतर गोष्टी नसल्या तरी. अर्थात रस्त्यावर उपहारगृहे आहेत
केदार जाधव - तू येतो आहेस ना?
केदार जाधव - तू येतो आहेस ना? >> हो .
पण साधी सायकल चालेल ना ?
आणी मला ती गाडीत घालून आणणार आहे , कुणी हसू नका . नाही तर पिंपळे गुरव ते राजारामपूल मधेच माझी पुरेशी राईड होऊन जाईल .
केदार मला पण साधी सायकल
केदार मला पण साधी सायकल मिळाली आहे..
हेल्मेटबाबत केदारशी काही अंशी
हेल्मेटबाबत केदारशी काही अंशी सहमत....
हेल्मेट अगदी पहिल्या राईडपासून नाही घातले तरी चालू शकते..
आणि ही राईड तशी सेफ आहे....
जर घाटरस्ता किंवा हायवे असता तर मी देखील हेल्मेटशिवाय जायला साफ नकार दिला असता....
मी पुण्यातल्या पुण्यात कुठे जायचे असले तर हेल्मेट वापरतोच असे नाही पण लॉंग राईड विदाऊट हेल्मेट एकदाही नाही....
साधी सायकल आणणार्यांसाठी - साधी सायकल म्हणजे सावकाश जाणार आणि गियरवाले धपाधपा पुढे निघून जाणार हा एक गैरसमज आहे....गियर हे वेगापेक्षा जास्त कंफर्ट लेव्हल साठी असतात...किमान अॅमॅच्युअर लेव्हलला तरी...
आणि आपल्यापैकी मला वाटत नाही कुणी प्रोफेशनल आहे...
त्यामुळे निवांत गप्पाटप्पा करत राईड करूया एकत्र...
फार दमल्यासारखे वाटले तर विश्रांती घ्या....
मूळ उद्देश इतके किमी अंतर पार करणे नसून सायकल चालवणे हा आहे...
त्यामुळे रिलॅक्स....
कधी ते नक्की करा आता...
कधी ते नक्की करा आता... शनिवार की रविवार?
सायकलला पाण्याची बाटली
सायकलला पाण्याची बाटली लावायला अटॅचमेंट वेगळी मिळते का ? मला तोचं मोठा प्रश्न आहे , मी जवळपास चालवते त्यामुळे पाणी, फोन नसला तरी चालतो. माझ्या सायकलला कॅरीयर पण नाहीये
एखादी छोटी सॅक सोबत घे
एखादी छोटी सॅक सोबत घे प्राजक्ता.
१००-१२५ रुपयांमध्ये बॉटल
१००-१२५ रुपयांमध्ये बॉटल होल्डर लाऊन मिळतो कुठल्याही स्टोअरला...
आणि त्यासाठी त्यांची ३००-४०० रुपयांची बाटली घेण्याची गरज नाही..आपली साधी बिस्लेरीची एक लीटरची बाटली व्यवस्थित बसते
तेच की. मी पंण हेल्मेटविना
तेच की. मी पंण हेल्मेटविना येणार आहे. ऐकायला काहीही घ्यायची काय गरज. एवढे माबोकर सोबत असताना कानात प्लग घालुन संगित ऐकणे हे खपवुन घेतले जाणार नाही. हुक्मावर्न
बॉटल होल्डर बसवून घ्या. ती
बॉटल होल्डर बसवून घ्या. ती सगळ्यात चांगली इन्व्हेस्टमेंट आहे.
आणि आशुने गिअर - नॉन गिअर वर लिहिले आहेच. नॉन गिअर्ड ह्या २/५ च्या आसपाच्या सेटिंगला असतात. आणि अॅमॅच्युअर लोकं गिअरवाली पण २/४-५ वरच चालवतात. उतार-चढावर आणि जास्त वेगाने जाण्यासाठी मात्र गिअर उपयोगी असतात. फॉर नाऊ डोन्ट वरी!
सई / केदार, तुम्हाला शनिवार जमणार आहे का? कारण बहुतेक तुम्ही दोघांनी रविवारला पसंती दिली आहे, बाकी सर्व कोणत्याही दिवशी (पण प्रिफरेबली शनिला) तयार आहेत.
एवढे माबोकर सोबत असताना कानात
एवढे माबोकर सोबत असताना कानात प्लग घालुन संगित ऐकणे हे खपवुन घेतले जाणार नाही. >>>
तुम्हीच गाणी म्हणत जा ना, एकदम जुन्या काळच्या हीरो हिरविणींच्या काळात गेल्यासारखे वाटेल.
वरती अमांनी काही गाणी दिली आहेतच.
केदार , मला शनिवारी नाही
केदार ,
मला शनिवारी नाही जमणार
बेस्टॉफ्लक! मजा करा. मी
बेस्टॉफ्लक! मजा करा. मी मार्च्नंतर येइन सायकल गटग ला .
सायकल गटगला शुभेच्छा!!
सायकल गटगला शुभेच्छा!!
सॉरी, शनिवारी जमणार नाही. खरं
सॉरी, शनिवारी जमणार नाही.
खरं सांगू का, इतर सगळ्यांनाच जमणार असेल आणि आम्हा दोघांसाठीच रविवारी जमवणार असाल तर आम्हाला अवघडल्यासारखं होईल. केदारला कोणत्याही दिवशी / दोन्ही दिवशी चालणार आहे, बहुतेक आशुचँपलाही, पण इतर ब-याच जणांना शनिवारी जायचे आहे. पुन्हा पुन्हा तेच तेच प्रश्न दिसताहेत. तर तुम्ही सगळेच शनिवारी जा. आम्ही रविवारी जाऊ. म्हणजे कुणालाच अॅडजस्ट करायला नको.
@ केदार जाधव - आम्हाला मध्ये तुम्ही आणि मी असं गृहित धरलंय.
अरे सई डोन्ट वरी. येतील सर्व
अरे सई डोन्ट वरी. येतील सर्व रविवारी.
केपी / पराग ने परत विचारले कारण अनया फक्त रविवारीच येणार होत्या. रविवारच फायनल करू. तुम्ही दोघे पण याच. शनिवारी इतरानांही आपापल्या रेग्युलर ठिकाणी प्रॅक्टीस करता येईल.
ओके केदार, जरा वाईट वाटूनच
ओके केदार, जरा वाईट वाटूनच लिहिलं मी तसं
मस्त मी देखील आलो
मस्त मी देखील आलो असतो............पन................................................
अगं सई, रविवारी चालेल,
अगं सई, रविवारी चालेल, शनिवारी प्रॅक्टिस तरी होईल
मला दोन्ही दिवशी चालणार
मला दोन्ही दिवशी चालणार आहे....
त्यामुळे मेजॉरीटी बघा आणि ठरवा
केदार, तुम्हाला नसतील घालायची
केदार, तुम्हाला नसतील घालायची हेल्मेटं तर नका घालू. पण तुझा मुद्दा अजिबातच नाही पटला. तुम्हाला एवढी जागरुकताच आणायची आहे तर सुरक्षित सायकल राइड अशी जागरुकता आणा. सायकलचा वापर वाढवण्याबद्दल गेली अनेक वर्षं ऐकण्यात येत आहे. पण सेफ्टीबद्दल फारसं कुणी बोलताना दिसत नाही. आणि तो खर्चाचा मुद्दा पण झेपला नाही. आजकाल भारतात पैसे खर्च करण्याचं अॅपेटाइट एवढं वाढलं आहे. एक पिझ्झा खायचा झाला तर चारपाचशे रुपये कुठेच जात नाहीत. हेल्मेटसारख्या गोष्टींवर पैसे खर्च करणं गरजेचं आहे हेच लोकांच्या गळी उतरत नाही. जागरुकता आणायची गरज तिथेच आहे.
आता इथे भारत-अमेरिका सुरू व्हायच्या आधी कल्टी मारते. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना शुभेच्छा!!!
सर्वांना शुभेच्छा देते. मला
सर्वांना शुभेच्छा देते. मला सायकल चालवता येत नाही त्यामुळे तुम्हा सर्वांचे खूप कौतुक वाटतेय.
Pages