मागच्या काही गटग मध्ये सायकल चालविणार्यांची चर्चा झाली होती की सगळे मायबोलीकर ( सायकल चालविण्यास उत्सूक असणारे आणि नेहमी चालविणारे) मिळून एक किमान ४०-५० किमीची राईड करूयात.
माझे परागशी नुकतेच बोलणे झाले, तो तयार आहे, हर्पेन मागच्या गटग मध्ये नेहमीच रेडी असे म्हणाला होता. बाकींनी देखील सायकल घेऊन सहभागी व्हायला हरकत नाही.
सर्वानूमते ठरलेला प्लान.
दिवस : रविवार
ता : ९ फेब.
वेळ : ठिक सकाळी साडेसहा. म्हणजे ६:२९:६० ( जो उशीर करेल त्याला इतरांच्या ब्रेकफास्टचे बिल द्यावे लागेल)
राजाराम पुलापाशी जमायचे, तिथून
राईड १ - पुल ते खडकवासला जाणे येणे अंतर साधारण २० किमी (कमीच)
राईड २ - खड्कवासल्यापासून पुढे जाणारे - सिंहगड आणि परत अंतर ४०-४२ (पुल ते पुल)
ज्यांना केवळ १५-२० किमीसाठी सोबत करायची आहे, त्यांनी पण उत्सुकतेने नाव नोंदवून तयारी करावी. खरतर पहिले १० किमी कधी आले हे तुम्हालाही कळणार नाही.
अजूनही जे द्विधा मनस्थितीत आहेत त्यांच्यासाठी - YES YOU CAN!
सर्वच सायकलस्वारांचे
सर्वच सायकलस्वारांचे मनःपूर्वक अभिनंदन.
अभिनंदन! सहीच. पहिल्यावेळिच
अभिनंदन!
सहीच.
पहिल्यावेळिच एवढे अंतर पार पाडणार्यांचे पेश्शल कौतुक.
मस्त. सगळ्यांचे अभिनंदन.
मस्त. सगळ्यांचे अभिनंदन.
अरे वा! अभिनंदन सगळ्यांचंच.
अरे वा! अभिनंदन सगळ्यांचंच.
पुणे रायडर्स, गुड जॉब, नाईस!
पुणे रायडर्स, गुड जॉब, नाईस!
Sahee! Abhinandan!!!
Sahee! Abhinandan!!!
मी पण हा बाफ वाचतेय
मी पण हा बाफ वाचतेय पहिल्यापासून . मस्त वाटतंय . अभिनंदन सगळ्यांचंच.
पण फोटो फेबु वर का? आम्ही कुठे आहोत तुमचे फ्रेंड? आम्हाला पण फोटो बघायचे आहेत
सायकलीस्ट वेल डन टना टन
सायकलीस्ट वेल डन टना टन
अभिनंदन.
अभिनंदन.
मोठ्या उत्साहाने नाव नोंदणी
मोठ्या उत्साहाने नाव नोंदणी केली तर खरी , पण कस जमणार याच टेंशन होत . त्यात सायकल शुक्रवारी दुरूस्त झाल्याने शनिवारच फक्त प्रॅक्टीसला उरला होता . पण शनिवारी सकाळीच क्रिकेट खेळताना बॉल उजव्या अंगठ्यावर बसला अन तो टम्म फुगला . दिवसभर अनेक उपाय करून शेवटी आज जायचे ठरले . पण शूज काय चप्पलही घालता येत नव्हते . मग आम्ही स्लीपर्सवर , पेनकिलर अन स्प्रे घेऊन.
त्यात अचानक डोक्यात नवा किडा वळवळला . पिंपळे गुरवहून सायकल चालवत राजाराम पुलावर जायचा . रोज २ तास व्यायामाच्या सायकलवर सराव असल्याने हे सहज जमेल असे वाटले . पण बैठी सायकल चालवणे अन रर्स्त्यावर सायकल चालवणे यात जमीन अस्मानाचा फरक असतो हे मला लगेच कळले. 5:45 ला घरून निघूनही 6:30 ला मी बालगंधर्वलाच होतो. मग केदारला फोन केल्यावर सगळे आल्याचे कळल्यावर रिक्षात घालून आणली . (6:30 चे 6:45 करणारा तो मीच हे सूज्ञांच्या लक्षात आल असेलच )
त्यात त्या रिक्षावाल्याशीही भांडण . त्यावेळी डोक्यात हा सगळा खटाटोप Worth आहे का असा विचार डोक्यात आला हे खर .
पण खर सांगतो , नंतरच्या ३-४ तासातला अनुभव अगदी अप्रतिम होता .
मी पोचताच सगळे निघालो . केदार , पराग , आशु सारखे काही अनुभवी मेंबर असले तरी सई , विरेन , हिम्सकूल , सहेली हे माझ्यासारखे पहिलटकर पाहून थोड बर वाटल . मजल दरमजल करीत आम्ही निघालो . मी आपला जमेल तशी सायकल मारत होतो . कधी जोश आला की अगदी जोरात तर कधी चालणाराही पुढे जाईल असा अनुभवी मेंबर सगळ्याना जोश देत पुढे नेत होते . सई मात्र अगदी गोष्टीतल्या कासवासारखी स्लो अन स्टेडी होती . वाटेत "जलवा ग्रुपचा १८ वा वर्धापण दिन " , सकाळी साडेसात वाजता चालू असलेला भेळेचा गाडा अन त्यावर भेळ खाणारे लोक अशी आश्चर्ये पहायला मिळत होती .
खडकवासल्याला पोचल्यावर सगळ्यांच्या उत्साहाला उधाण आले अन पुढे जाण्याचा निर्धार झाला . पुढचे ४-५ किमी फक्त चढ अन चढच . पण नंतर हाच उतार मिळ्णार आहे अशी स्वतःची समजूत घालत आम्ही तोही पार केला .
मग डोणजे येथे अल्पोपहाराचा कार्यक्रम झाला . चहा अन् पोहे चांगले होते , पण भाषिक गैरसमजातून उडीद वडा सँपल अशासारखे प्रकार घडले . मग क्रिकेट , विंटर ऑलिंपीक पासून टोल अन राज ठाकरे पर्यंत गप्पा रंगल्या .
येताना खडकवासल्यासमोर अगदी प्रोफेशनल फोटोशूट झाले . पाणी पण अगदी सुरेख दिसत होते .
परत येताना
१. वर लिहील्याप्रमाणे उतार .
२. भरलेला पोटोबा
३. परत जायचे वेध
यामुळे काहीच त्रास झाला नाही . साधारण अर्ध्या पाऊण तासातच आम्ही नांदेड सिटीला येऊन पोचलो . तिथे अनुभवी मेंबरनी नंतर करायला लागणार्या स्ट्रेचेस ची माहिती दिली . अन आम्ही वेगवेगळे झालो .
मी ३५ किमीचा सायकल प्रवास इतक्या सहज पूर्ण केला हे माझ मलाच पटत नव्हत . त्या आनंदाच्या भरात मी परत घरी सायकल चालवत आलो . मधले ब्रेक पकडून त्याला १.२५ तास लागला ही गोष्ट वेगळी .
पण खरच या गटगमुळे आपण अशाही गोष्टी करू शकतो याचा आत्मविश्वास मिळाला , बर्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या , नव्या ओळखी झाल्या . यासाठी केदार अन् सगळ्यांचे अतिशय आभार .
अरे वा सर्वांचे अभिनंदन.
अरे वा सर्वांचे अभिनंदन.
वा मस्त झालेलं दिसतंय सायकल
वा मस्त झालेलं दिसतंय सायकल गटग
साधी आणि गीअर सायकल यात
साधी आणि गीअर सायकल यात चांगली कोणती?
हे घ्या टीझर
हे घ्या टीझर
अरे वाह सही....पण भरपूर
अरे वाह सही....पण भरपूर सायकली दिसत आहेत .... दहाच जण होते ना
केदार जाधव व केदार,
केदार जाधव व केदार, हिम्सकूल... सर्वांचे अपडेट्स व वृत्तांत मस्त! जोरात झालेलं दिसतंय सायकल गटग! ये ब्बात!
सही! अभिनंदन
सही! अभिनंदन सगळ्यांचे.
केदारचे विशेष अभिनंदन हे अभिनव गटग योजल्याबद्दल. बरं, गाणी कुठली म्हटलीत? मुलींनो, मोठाल्या रिबिनी लावल्या होत्यात का?
फोटो येत आहेत. फेसबुकवर
फोटो येत आहेत. फेसबुकवर नाही तर इथेच.
साधी आणि गीअर सायकल यात चांगली कोणती? >>> गीअरची चांगली असते. (एका लाईनीत उत्तर अपेक्षित असेल तर) पण जर केवळ ५-७ किमी राईडला जायची असेल तर साधी पण चांगलीच. त्यामुळे उत्तर हे तुमच्या राईड टाईप वर डिपेंड्स. पण तुम्ही का नाही आलात? १० किमी रोज चालवता असे लिहिल्यामुळे मला वाटलं तुम्ही पण याल. (मग राहुल गांधी अन मोदीवर पण चर्चा केली असती. )
मुलींनो, मोठाल्या रिबिनी लावल्या होत्यात का? डोळा मारा >>> त्यांना भारतीय संस्कृती मान्य नाही म्हणून त्या विना रिबीन होत्या आणि सर्व धोतर ब्रिगेड विना कोंबड्याचा भांग
पण भरपूर सायकली दिसत आहेत >> गंमत तर तीच आहे. लोकांना अशी राईड आहे हे कळाले आणि ते मग सिंहगड रोडवर ६:३० वाजता वाट पाहत उभे राहिले.
जबरी. सर्व सायकलवीरांचे
जबरी. सर्व सायकलवीरांचे अभिनंदन
क्या बात है!!!! सचित्र
क्या बात है!!!!
सचित्र वृत्तांत येऊ द्या. शक्यतो हजर असलेल्या सगळ्यांनीच लिहा.
पण खरच या गटगमुळे आपण अशाही गोष्टी करू शकतो याचा आत्मविश्वास मिळाला , बर्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या , नव्या ओळखी झाल्या . यासाठी केदार अन् सगळ्यांचे अतिशय आभार .>>>>>मस्तच
खूप छान! अभिनंदन सर्वाचं!
खूप छान! अभिनंदन सर्वाचं!
झक्कास! सायकल सॉरी नाही, तर
झक्कास!
सायकल सॉरी नाही, तर डोणज्यावर स्वारी सक्सेसफुल झाल्याचे वाचून आनंद झाला.
अभिनंदन.
पण तूम्ही का आला नाहीत>>>मी
पण तूम्ही का आला नाहीत>>>मी सातार्यात असतो, पुण्यात असतो तर आलो असतो.क्षमस्व
सायकलींग गटगला मस्त मजा आली..
सायकलींग गटगला मस्त मजा आली.. मला वर अनुभवी वगैरे म्हंटलय पण माझीही पुण्यातली सगळ्यात मोठी राईड आजचीच होती... बाकी मी माझ्या घरापासून ते नळस्टॉप किंवा बावधन / बाणेस अश्या चकरा मारत असतो पण कधी गावाबाहेर गेलो नव्हतो.
मी राजाराम पुलाच्या इथे पोचलो तेव्हा केदार, सई, सहेली आणि विरेंद्र आधी पोचलेले होते आणि एक फुटीरतावादी गट पुलाच्या दुसर्या बाजूला होता, ज्यात केपी, हिम्या आणि प्राजक्ता होते, आणि शिवाय मायबोलीचा इव्हेंट असल्याचं कळल्यावर मोठ्या संख्येने ऐनवेळी उपस्थित झालेले सायकलस्वार होते. फोटो वर केपीने टाकलेलाच आहे..
आम्ही पुल ओलांडून पलिकडे गेलो आणि मग थोड्या वेळाने हिम्या आणि आशु हजर झाले आणि नंतर केदार जाधवही आला. शिवाय सगळ्यांना विश करायला स्मिता गद्रेही आली होती. जमवाजमव झाल्यावर खडकवासल्याकडे कूच केली.
बंगलोर हायवेच्या आधीच्या चढावर जर सगळे पुढे मागे झाले. मग थांबून सगळे जरा एका टप्प्यात आल्यावर निघालो. मजल दरमजल करत खडकवासला गावापर्यंत पोचलो. तिथेही चढ आहे. पण हळूहळू करत सगळे पोचले !!! सई एकदम स्लो बट स्टेडी एकाच वेगाने जात होती. तिच्याकडे बघून अजिबात वाटलं नाही की सराईत सायकलस्वार नाहीये !!! तिथपर्यंत कोणालाच काहीच श्रम झाले नाहीत आणि थंड हवेमुळे घामाचा थेंबही आला नाही. मग केदारने अजुन पुढे जायचं का म्हणून विचारलं. सगळे लगेच तयार झाले.. मग डोणजे पर्यंत जायचं ठरलम. खदकवासल्यापासून डोणजे पर्यंत चढ होता.. पण मजा आली.. सगळे चांगले वॉर्मअप झाले.. डोणजे गावात एक बरसं हॉटेल बघून ब्रेकफास्ट केला.. आशु सारखा प्रो फोटोग्राफर असल्याने फोटो सेशनही झालं.. नंतर खडकवासल्याच्या पाण्यापाशी पुन्हा फोटो सेशन ठरलं.. आशुने पुढे जाऊन फ्रेम सेट करून ठेवली आणि आम्ही सगळे मॉडेल जाऊन त्यात उभे राहिलो.. शिवाय केदारने कलात्मक फोटोग्राफी करून घेतली.. त्याच्या सायकलचा फोतो तो फेसबूक वर टाकणार आहे आणि तो सगळ्यांनी कम्पल्सरी लाईक करायचा आहे..
फोटोसेशननंतर निघून नांदेड सिटीला थांबलो.. सहेली आणि आशुचे घर राजारामपुलाआधीच असल्याने तिकडेच निरोप घेतला..
सई, सहेली, हिम्या वगैरे मंडळी पुढच्या गटगला नवीन सायकलींवर येणार आहेत
ही अशीच सायकलींग गटग नेहमी सुरु राहिली तर खरच मजा येईल.. !! पुढच्या वेळी अजून लोकांनी या नक्की..
पराग, मस्तं
पराग, मस्तं वृत्तांत!
>>फुटिरतावादी गट
सायकलस्वारांचं अभिनंदन!
बाइकमागे लावायचं बाळं आणि पेट कॅरियर मिळतं का आपल्याकडे? पुढल्यावेळी सकुसप सायकल गटग करता येईल.
धम्माल वृत्तांत सगळ्यांचे!
धम्माल वृत्तांत सगळ्यांचे! कीप इट अप.
मी ३५ किमीचा सायकल प्रवास
मी ३५ किमीचा सायकल प्रवास इतक्या सहज पूर्ण केला हे माझ मलाच पटत नव्हत>>> केदार (जाधव) एकदम बरोबर. विश्वास माझाही बसत नाहीये अजून. काल रात्रीपर्यंत मी उगीच नाव नोंदणी केली असं वाटत होतं, आणि आज मात्र भयंकर भिती वाटत असलेला पेपर एकदम सोप्पा निघाला आणि केलेल्या अभ्यासातलंच सगळं आल्यामुळे खुप मस्स्त सोडवून, वर खणखणीत पैकीच्या पैकी मार्क्सपण मिळाले अशी मनःस्थिती झालिये!
मी खरंतर काही दुखतंय खुपतंय का याचा अंदाज घेत होते, पण केदारगुरुजींच्या कृपेने अगदी फीट एन फाईन आहे... मैदान मारल्यासारखं वाटतंय.
मस्त लिहिलंय सगळ्यांनी
अरे वा, एकदम मस्त वाटले
अरे वा, एकदम मस्त वाटले वृत्तांत वाचून. लगे रहो
मी सई यांच्या प्रतिसादाची
मी सई यांच्या प्रतिसादाची अगदी उत्सुकतेने वाट पाहात होतो. त्या मूळच्या आमच्या कोल्हापूरच्या असून शाळा कॉलेजला ये-जा करण्यासाठी सायकल वापरत....पण पुण्यात आल्यावर साहजिकच त्यांच्या सवयीला ब्रेक मिळाला होता. तरीही अतिशय उत्साहाने त्यानी सायकल गटगमध्ये भाग घेतल्याचे पाहून मला आनंद झाला होता. आता त्यानीच पेपर सोप्पा गेला असे म्हटल्याने ही सहल सार्यानाच उत्साहित करणारी ठरली यात संदेह नाही.
पुढील खेपेची सायकल सहल अशी आयोजित करावी :
अरेवा! सर्व
अरेवा! सर्व स्वयंचाकीवाल्यांचे अभिनंदन!
लहानपणी व तरूणपणी अस्मादिकांनी ठाणे ते बोरीवली (राष्ट्रीयोद्यान) अशा मारलेल्या अनेक चकरांची (जाऊनयेऊन ५५ किमी) आठवण झाली. विनासराव साठेक किमी सहज पार होतात असा अनुभव आहे. पाचसहा जणांचा चमू असे. मात्र एव्हढे १०+ लोकांचे गटग घेऊन जाणे कौतुकास्पद आहे. केदार यांचे वेगळे अभिनंदन.
-गा.पै.
Pages