मायबोलीकरांचे आणि मायबोलीवर प्रथमच - सायकल राईड गटग!

Submitted by केदार on 3 February, 2014 - 00:12
ठिकाण/पत्ता: 
राजारामपुला जवळ (कोथरुड एंडला) नाहीतर पुल पार करून शोधाल.

मागच्या काही गटग मध्ये सायकल चालविणार्‍यांची चर्चा झाली होती की सगळे मायबोलीकर ( सायकल चालविण्यास उत्सूक असणारे आणि नेहमी चालविणारे) मिळून एक किमान ४०-५० किमीची राईड करूयात.

माझे परागशी नुकतेच बोलणे झाले, तो तयार आहे, हर्पेन मागच्या गटग मध्ये नेहमीच रेडी असे म्हणाला होता. बाकींनी देखील सायकल घेऊन सहभागी व्हायला हरकत नाही.

सर्वानूमते ठरलेला प्लान.

दिवस : रविवार
ता : ९ फेब.
वेळ : ठिक सकाळी साडेसहा. म्हणजे ६:२९:६० ( जो उशीर करेल त्याला इतरांच्या ब्रेकफास्टचे बिल द्यावे लागेल)

राजाराम पुलापाशी जमायचे, तिथून

राईड १ - पुल ते खडकवासला जाणे येणे अंतर साधारण २० किमी (कमीच)
राईड २ - खड्कवासल्यापासून पुढे जाणारे - सिंहगड आणि परत अंतर ४०-४२ (पुल ते पुल)

ज्यांना केवळ १५-२० किमीसाठी सोबत करायची आहे, त्यांनी पण उत्सुकतेने नाव नोंदवून तयारी करावी. खरतर पहिले १० किमी कधी आले हे तुम्हालाही कळणार नाही.

अजूनही जे द्विधा मनस्थितीत आहेत त्यांच्यासाठी - YES YOU CAN!

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, February 8, 2014 - 20:00 to 23:58
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वा चांगली आयडिया आहे. सुरू करा अशी गटगं. आम्हीही कधीतरी येउ.

शनिवारी करायचे की रविवारी या वादाला कंटाळून केदार बहुधा शनिवार सकाळपासून सायकल चालवणे सुरू करणार व वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळे लोक त्याला येउन जॉइन करणार असे दिसते Happy

कल्पना आवडली. यायचा प्रयत्न करते. शनिवारपर्यंत नक्की होईल काय ते.
एक शंका: गटागला येणारे सगळे हेल्मेटधारी आहेत का? माझ्याकडे हेल्मेट नाही, या आठवड्यात घेता येण्याची शक्यता नाही.

गटागला येणारे सगळे हेल्मेटधारी आहेत का? >>

मी नक्कीच विना हेल्मेटधारी आहे. मी क्वचित वापरतो. इनफॅक्ट कालच तळेगाव जवळ मला एका मिल्ट्रीवाल्याने थांबवून विचारले की हेल्मेट का नाही घातले?

लोकहो, मी काल जोरात येईन अस म्हटल, पण काही घरगुती अडचणींमुळे मला नाही जमणार. सॉरी....पुढच्या वेळेस नक्की जमवेन. तोपर्यंत सराव करत राहते.

सायकल गटग....छान कल्पना आणि तितकेच उत्साही प्रतिसाद वाचून आनंद वाटत आहे.

सई "हाफत हाफत" सायकल मारत असल्याचे चित्र नजरेसमोर आले. आमच्या कोल्हापूरातील हा शब्दप्रयोग आहे. सर्वाना शुभेच्छा.

{ "साऊंड ऑफ म्युझिक" चित्रपट आठवला. ज्युली अ‍ॅन्ड्र्यूज सर्व पोरांना सायकली देते आणि त्याना घेऊन डोंगरमाथ्याची सफर करते, तो प्रसंग..}

उत्तेजनार्थ काही गाणी.
१) मैं चली मै चली.
२) डो रे मी
३) इक रासता है जिंदगी
४) मुसाफिर हुं यारों
५) गाडी बुला रही है.
६) पुकारता चला हुं मै.
७) जिंदगी का सफर है ये कैसा सफर

शनिवारी येणारे कोणी आहेत का? ज्यांना रविवारी नकोय त्यांनी शनिवारी जायचं का? केदार दोन्ही दिवस येईल बहुतेक Happy

केदार दोन्ही दिवस येईल बहुतेक स्मित >>> हो मी रोजच जातो त्यामुळे मी कधीही तयार.

टण्या तू रविवारी दुपारी जाणार आहेस ना? मग जर रविवारी ठरलंच तरी ये कारण १० पर्यंत परत घरी लै वेळा पोचलेला असशील. Happy आणि शनिवारी तयारी करून ठेव.

रविवारी येणारी मेंब्र नसतील तर शनिवारीच करायचं का ? >> मला चालेल. जे येणार आहेत त्यांनी हात वर करा. Happy

हेल्मेट खरेदी गटग - मग बहूदा कोणी येणार नाही. Happy

पहिलटकरांसाठी काही सूचना...
पहिली म्हणजे - २०किमी चे अजिबात टेन्शन घेऊ नका...सहजी शक्य होते आणि सगळेच जण बरोबर असतील. कुणी कुणाला मागे सोडून जाणार नाही...पहिलीच राईड असल्याने धमाल करत जाऊ निवांत

निघण्यापूर्वी...
थोडे वॉर्मअप आवश्यक...फार नाही पण जरा आळोखे पिळोखे, स्ट्रेचींग, जागच्या जागी उड्या वगैरे....
सायकलच्या चाकातली हवा तपासणे, ब्रेक तपासणे आणि मगच निघणे..

बरोबर घेण्यासाठी...
राईड छोटीशी असल्याने फार काही लागणार नाहीच...पण एक लिटर पाण्याची बाटली अत्यावश्यक....बरोबर थोडे खजूर, सुकामेवा किंवा चिक्की असे पटकन तोंडात टाकता येतील असे जिन्नस...
आवश्यकता वाटल्यास...ग्लुकॉन डी किंवा टँग पावडर...

तू येतो आहेस की नाही आशु?

पाण्याचे बरोबर लिहिलेस.

मी निघायच्या आधी आणि राईड झाल्यावर काही सुचना देणार आहेच. व थोडे स्ट्रेच राईड संपून परत आल्यावर करावे लागेल. म्हणजे अजून १० किमी जाऊ शकाल Happy

गाण्याचे म्हणाल तर सोबत एक हेडफोन घेऊन आले तर निवांत वाटेल. आणि उडत्या चालीची असतील तर थकवा जाणवणार नाही. राईड मध्ये माणसीचा चित्रकार तो ऐकले तर वाट लागू शकते Proud पण पप्पू कान्ट डान्स, जय हो किंवा कुन फाया कुन किंवा तत्सम ऐकले तर मजा येईल.

हो हो म्हणजे काय...सायकल राईड ती पण माबोकरांसंगे...
दुग्धशर्करा योग Happy

मी निघायच्या आधी आणि राईड झाल्यावर काही सुचना देणार आहेच.>>>>>>>

वोक्के वोक्के...मला आठवले म्हणून लिहून टाकले...

बाकी गाण्यांच्या बाबतीत माझी चॉईस
ऑल टाईम फेव - पंचमदा आणि वन अँड ओन्ली ए आर रेहमान

Pages