मायबोलीकरांचे आणि मायबोलीवर प्रथमच - सायकल राईड गटग!

Submitted by केदार on 3 February, 2014 - 00:12
ठिकाण/पत्ता: 
राजारामपुला जवळ (कोथरुड एंडला) नाहीतर पुल पार करून शोधाल.

मागच्या काही गटग मध्ये सायकल चालविणार्‍यांची चर्चा झाली होती की सगळे मायबोलीकर ( सायकल चालविण्यास उत्सूक असणारे आणि नेहमी चालविणारे) मिळून एक किमान ४०-५० किमीची राईड करूयात.

माझे परागशी नुकतेच बोलणे झाले, तो तयार आहे, हर्पेन मागच्या गटग मध्ये नेहमीच रेडी असे म्हणाला होता. बाकींनी देखील सायकल घेऊन सहभागी व्हायला हरकत नाही.

सर्वानूमते ठरलेला प्लान.

दिवस : रविवार
ता : ९ फेब.
वेळ : ठिक सकाळी साडेसहा. म्हणजे ६:२९:६० ( जो उशीर करेल त्याला इतरांच्या ब्रेकफास्टचे बिल द्यावे लागेल)

राजाराम पुलापाशी जमायचे, तिथून

राईड १ - पुल ते खडकवासला जाणे येणे अंतर साधारण २० किमी (कमीच)
राईड २ - खड्कवासल्यापासून पुढे जाणारे - सिंहगड आणि परत अंतर ४०-४२ (पुल ते पुल)

ज्यांना केवळ १५-२० किमीसाठी सोबत करायची आहे, त्यांनी पण उत्सुकतेने नाव नोंदवून तयारी करावी. खरतर पहिले १० किमी कधी आले हे तुम्हालाही कळणार नाही.

अजूनही जे द्विधा मनस्थितीत आहेत त्यांच्यासाठी - YES YOU CAN!

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, February 8, 2014 - 20:00 to 23:58
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हेल्मेटचा मुद्दा 'कळतंय पण वळत नाही' कॅटेगरीतला आहे. हजार-दोन हजाराचे हेल्मेट वापरून आपला लाखमोलाचा जीव जपला जाणार आहे, हे ज्याचे त्याला कळायला हवे. त्यामुळे " सायकल, हेल्मेट घालून चालवावी" असे विध्यर्थी विधान करून थांबतो.

रच्याकने - सायकलींची हेल्मेटं भारी डिझाईनची, आकर्षक रंगांची, वजनाला हलकी आणि आपापल्या डोक्याच्या आकारानुसार घट्ट करू शकण्याची सोय असलेली असतात.

तर मंडळी (आपापले) डोके / जीव सांभाळून, मज्जा करा Happy

सई काळजी नसावी. रविवारी चालेल असे म्हणुन कलटी देणारे असतील तर शनिवार ठेवा असे म्हणायचे होते. कुणाला दुखवायचे नव्हते. चला तर मग रविवारी Happy

जायंटने ती अ‍ॅटो एक्स्पो मध्ये लाँच केली आहे. पुण्याच्या जायंट शो रुम मध्ये अश्याच धर्तीवरच्या ७ लाखाच्या सायकली आहेत.

http://www.starkennbikes.com/home.aspx ने पुणे आरटिओ च्या बाजूला शो रूम उघडले आहे. खरच जबरी आहे.

हो चालेले की. फक्त जाताना परत न्यायची नाही ही अतिसामान्य अट आहे. Proud

हल्ली क्रेझ झाली आहे. त्यामुळे अव्वाच्या सव्वा किंमतीत काहीही विकतात. बहोत पैसा है भारतीयोंके पास. अशाच हल्ली बाईक पण विकत आहेत. लोक घेत आहेत. मधे एका ओळखिच्याने १४ लाखाची हार्ले डेव्हीडसन घेतली. त्यात म्हणे १०च लिटर पेट्रोल बसते. अ‍ॅव्हरेज ८. म्हणजे प्रेट्रोल पंप ते पेट्रोल पंप चालवायची. येडचॅपपणा आहे. त्यापेक्षे आपली सिंगल सिटर लुना भारी Proud

मामी - सीट किंवा सॅडल रुंद मुद्दामच ठेवले जात नाही. नाहीतर लांब पल्ल्यांच्या सायकल शर्यतींमध्ये सीट दोन्ही मांड्यांना घासून सालटी निघून येतील...

असेही आपण नेहमी चालवतो तसे बद्ददिशी सीटवर बसून या सायकली चालवल्याच जात नाहीत. हँडल, सीट आणि पॅडल या तीन पॉँइंटवर त्यांचे शरीराचे वजन विभागलेले असते.

नवरा मागे लागला म्हणून आम्ही हेल्मेट घेतलयं, पण घालून पुढचं मागचं नीट दिसेल का अशी मला शंका >> प्राजक्ता, सायकलचं हेल्मेट खरं मोटरसायकलच्या हेल्मेट सारखं नसतं. ते फक्त डोक्यावर घट्ट बसतं. त्यामुळे व्हिजन ब्लॉक होण्याचा प्रश्न येणार नाही असं वाटतं.
http://www.giro.com/us_en/products/women/helmets.html/
http://www.giro.com/us_en/products/men/helmets.html/

सायकलचं हेल्मेट खरं मोटरसायकलच्या हेल्मेट सारखं नसतं. ते फक्त डोक्यावर घट्ट बसतं. >>> +१ व्हिजन अजिबातच ब्लॉक होत नाही.

मी शनिवारपर्यंत नक्की करते म्हटलं होतं. त्याचं कारण म्हणजे माझ्या घरून राजाराम पुलाला जाणे आणि परतणे हेच १० एक किमी होईल. लिफ्ट मिळायची काहीही शक्यता नाही. सद्ध्या मी २ -३ किमीच्या पलिकडे सायकल चालवलेली नाही. त्यामुळे हे १० + खडकवासल्यापर्यंतचे २० असे ३० किमी एकदम जास्त होतील. त्यामुळे काय करावं हे ठरत नव्हतं. आता असं वाटतंय की सकाळी फक्त राजाराम पुलापर्यंत येऊन घरी परतायला काय हरकत आहे?

गौरी ,
आपण कुठे राहता ?
मी पिंपळे गुरवहून गाडीत सायकल ठेऊन येणार आहे . वाटेत जर तुमचे घर असेल तर तुम्हीही येऊ शकता.

सायकल ची सोय झाली तर मी सुद्धा येईनच. आज जर सायकल ची सोय झाली तर दोन दिवस प्रॅक्टीस करून रविवारी येवु शकेन

कालच बिल्डींगमधे एका मुलाची सायकल चोरीला गेली Sad तेही दुपारी १२.३० ते १ च्या दरम्यान
मागच्या ६ महिन्यात तिन सायकली चोरीला गेल्या आहेत

सिंडरेला तुमचा हेल्मेट बद्दलचा मुद्दा योग्य आहे, रस्त्यावरील वाढलेल्या वेगवान वर्दळी मुळे वापरणे गरजेचे झाले आहे.

ज्यांनी नाव नोंदनी केली आहे त्या सर्वांना मी माझा नं संपर्कातून पाठवला आहे.

शनिवारी जे लोकं प्रॅक्टिस करणार आहेत त्यांनी निदान ७-८ किमी चालवावी. पण हळू हळू चालविली तरी चालेल जोरात चालविली तर गोळे येऊ शकतात. चालवल्या नंतर स्ट्रेच करणे आवश्यक आहे अन्यथा मांड्या दुखायला लागतील. आणि प्रॅक्टीस सकाळीच करा. संध्याकाळी नको. उद्या थोडे पाय दुखले तरी परवा मात्र याच कारण दुसरे दिवशी पाय दुखत नाहीत. उतारा Happy

एक महत्वाची सुचना जर हाय बिपी असेल तर त्यांनी गोळी घेऊन यावे.

बायदवे मी माझे टोपडे घालून येणार आहे.

मला सायकल मिळाली. नाव नोंदवले आहे. हुश्श!

आता प्रॅक्टिस सुरू करते.

एक शंका - मला माझ्या घरापासून २-३ कि.मी. उलटे यावे लागेल राजाराम पुलासाठी. मी माझ्या घरापासून सामील झाले तर चालेल का?

स्वतः केदार १७ किमी लांबून येणार आहे! मग तूही थोडी मागे ये ना. सगळ्यांनी मिळून सुरुवात करण्यात मजा असते मुली...

असेही आपण नेहमी चालवतो तसे बद्ददिशी सीटवर बसून ....... >>>> Lol
अगदी डोळ्यासमोर आले! शाळेच्या वयात खूप सायकल चालवली आहे. एकदम नॉस्टॅल्जिक झाले!
तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा!! Happy
वृत्तांत इथेच लिहिणार नां?!

वृत्तांत लिहिणार ! खास त्रास करून घेणार्‍यांसाठी फोटो फेसबुकवर टाकणार.. Proud

रच्याकने, केदार वेळ १०:२८ पर्यंत का आहे ? Proud

केदार वेळ १०:२८ पर्यंत का आहे ? >> बदलाया कंटाळा. वेळ अनलिमिटेड. Happy

कॅमेरा कोण आणतंय? टाका टाका फेबु वर टाका. मी अपडेट पाहाणार नाही. Proud

एकदम नॉस्टॅल्जिक झाले! >>> ओवी मग सायकल घे अन मांड ठोक तीवर. हाकानाका? कोणती सायकल वर मी फुकटात सल्लाही देईन. Happy

मी मुंबैहून येऊ म्हणतोस?! कोणी डबलसीट घेत असेल तर येईनही!! Happy
आणि मी वृत्तांत वाचणारच नैय्येय! Wink
शुभेच्छा! मज्जा करा!! मस्त गाणी म्हणत जा!!!

नाही ह्या गटगला नाही, सायकल घे अन इकडे तिकडे भटक (नॉस्टल्जिक होण्यापेक्षा Happy ) असे म्हणतोय.

मस्त गाणी म्हणत जा!!! >> हा सल्ला चार पाच लोकांनी दिलाय. बॉलिवुडच्या जुन्या पिक्चरचा प्रचंड प्रभाव आहे आपल्या सर्वांवर Proud (मे बी रंगोलीचा Happy )

रिक्षात सायकल घालून आणायचा मी विचारच केला नव्हता. Happy
केदार, माझं घर पौड रोडवर आहे. गाडीत दोन सायकली मावतील का? (सायकल विकत घेतली तेंव्हा दुकानातून घरी आणतांना वॅगन-आरमध्ये घालून आणली होती, आणि ती बसवतांना दुकानातल्या मुलाला घाम फुटला होता ते आठवलं. Happy )

Pages