Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46
झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'
इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सीरियल असह्य होतेय खरि. पण
सीरियल असह्य होतेय खरि. पण मामान्चे अपडेट वाचायला मजा येते. ळ्लहानपणी आम्हि बहिणी एखदा पीक्चर नाहि पाहिल तर त्याचे असे अपडेट द्यायचो . त्या चीआठवन्ण झाली. आर्थत मामन्च लेखन छान आहेच. ट्त्यात वादच नाहि .
ईकडे मामना मामा कसा काय संबोधायअला लागले सगळे हे महित नहि. सगळे म्हन्णतायात म्हाणून मीहि सामील झाले. आय होप मामा तुम्हाला चालेल.
भरत.... सहस्त्रबुद्धे यांच्या
भरत....
सहस्त्रबुद्धे यांच्या घरातील तो तमाशा...त्याचा मी मुद्दाम इथे उल्लेख केला नाही.....कारण तो प्रकार असह्य असाच होता. सहस्त्रबुद्धे यांच्या शेजारीणबाई त्यांच्याकडे भांडत येतात..... का ? तर त्या बनेल मामाने त्याना "तुमच्या घरात गुप्तधन आहे....खोदायला सुरुवात करा..." असे सांगितले आहे, आणि ते मुंबईतील येडे कुटुंब म्हणे रात्रभर घर उकरीत बसले.....एक रुपयाही सापडला नाही....ती बाई ओरडत आहे आणि निर्लज्जपणे मामा आणि शशिकलाबाई त्याना सांगत आहेत "तुम्ही पूर्व दिशा धरली नाही. त्यामुळे धन सापडणार नाही..."
हे ऐकणारे सदाशिवराव डोक्याला हात मारून घेतात......आता असले गुप्तधनाचे विषय चाळीत काढून मामा जर तिथे आपले बस्तान बसविणार असतील तर मग मालिकेचे कल्याणच.
@ अदिती ~ होय....आदल्या दिवशीही अशाच प्रकारचे वातावरण गोखल्यांकडे होते...फक्त आजी घर सोडून जातात त्या अंकात.
शेवटी (सगळे गेल्यावर)
शेवटी (सगळे गेल्यावर) जान्हवीच्या वडिलांनी अशा गुप्तधन शोधून देणार्यांच्या नादी लागणार्या लोकांवरही काहीतरी कमेंट केली होती.
अरे धानी....पोरी.... अन्य
अरे धानी....पोरी.... अन्य दुनियेचे माहीत नाही, पण आपल्याकडे 'मामा' हे नाते इतके आपुलकीचे आहे की त्या एका पुकार्यामुळे कालपर्यंत अनोळखी असलेल्या नात्याचे झटदिशी ओळखीत रुपांतर करून टाकते. जरूर 'मामा' म्हणत जा....मला आवडतेच.
शेवटी (सगळे गेल्यावर)
शेवटी (सगळे गेल्यावर) जान्हवीच्या वडिलांनी अशा गुप्तधन शोधून देणार्यांच्या नादी लागणार्या लोकांवरही काहीतरी कमेंट केली होती. >>>> फसवले जाणारे लोक जगात असतात तर आपणतरी काय करणार असे काहीसे म्हणतात ते.......
शुक्रवार दि.२५ आक्टोबर २०१३ :
शुक्रवार दि.२५ आक्टोबर २०१३ : अपडेट
~ रडका भाग.... पूर्णपणे रडका. काहीही अर्थ नाही. "माझी आई आज्जी का, कुठे, कशासाठी गेली आहे ?" हा श्रीरंग गोखले यांचा सवाल... कुणाला ? तर हवेला आणि नंतर काल लग्न करून आणलेल्या जान्हवी नामक पत्नीला. ती बिचारी डोळ्यात पाणी आणून त्याला सांगत आहे....'हे सारे माझ्यामुळे झाले....मी त्यांची समजूत काढण्याअगोदरच इथे सून म्हणून आले तेच चुकले..." ~ मग परत श्रीरंगराव, "अगं असं बोलू नकोस. तुझा यात काही दोष नाही....चल आपण तिचा शोध घेऊ.....प्रथम विघ्नेश्वराच्या देवळापासून सुरुवात करू." कशाचा कशाला पत्ता नाही. दोघे देवळात आल्येत....पूजाअर्चनाही रितसर करतात. तिथले भटजी याना प्रसाद देतात आणि "भागिरथीबाई आल्या नाहीत बर्याच दिवसात इकडे. आल्या की जरूर सांगा यायला..." म्हणजे आजी देवळात नाहीत हे तर स्पष्ट झाले. मग तिथून ही जोडी ऑफिसमध्ये. तिथल्या स्टाफकडे विचारणा. नेमक्या शिवदे मॅडम गैरहजर. मग त्यांच्या कपाटातील डायरी काढून घेऊन श्री कडून संबंधितांना फोन करायला सुरुवात....सर्वांचेच नकार.
इकडे 'गोकुळ' वर पाच आयांची बैठक. त्याना माहीत आहे आजी घर सोडून गेल्यात....यांच्याही गंगायमुना वाहत आहेतच. पण बेबीआत्या आणि मोठी आई थेट जान्हवीला जबाबदार धरायचे असा आग्रह मांडत आहेत. तिच्यामुळेच आपली आई घर सोडून गेली हे अजब तर्कट त्या दोघी लावत आहेत. शरयू त्यातल्यात्यात मवाळ विरोध....तर श्री ची आई म्हणजे रडका झाडूच निव्वळ....काहीही झाले की ह्या बाई तोंडाला २४ तास पदर लावून जणू काही आत्ताच कुणीतरी 'वर' गेले असाच सूर काढीत असतात....फार बेकार वाटते हे पाहायला.
श्री आणि जान्हवी घरी आले आहेत....तो परत फोनाफोनी करीत आहे आणि ह्या पाच बायका त्याच्याकडे पाहात मख्ख उभ्या....जान्हवीला नवर्याची तगमग समजत्ये पण तीही मुकाट उभी आहे. आयांच्या चेहर्यावरील भाव पाहून श्री गोंधळात पडतो आणि काहीसे चिडूनच त्याना विचारतो, "मी जे काही विचारीत आहे ते तुम्हाला कळते ना ? कळत असेल तर बोला ना ?" मग...ताडताडपणे चालत तो मोठ्या आईकडे जातो, तिचा हात आपल्या डोक्यावर ठेवतो, म्हणतो, "तुला माहीत आहे आईआजी कुठे आहे ते. माझी शपथ घेऊन सांग..." परत शपथेचा संग्राम. आता ह्या आया सांगतात त्याला, "तू काही शोध घेऊ नकोस. आम्हाला त्या सांगूनच गेल्या आहेत....तुझी शपथ घातली होती आम्हाला म्हणून आमच्यापैकी कुणी बोलले नाही."
आता श्री महाशयांचे रडण्याचे कार्यक्रम सुरू झाले आहेत....आणि ते सारे सुन्नपणे जान्हवी त्याच्या शेजारी बसलेली आहे.
एकंदर या मालिकेतील प्राण निघून चालला आहे की काय अशी भीती वाटायला सुरुवात झाली आहे. तसे न होवो.
ह्म्म
ह्म्म
"तुमच्या घरात गुप्तधन
"तुमच्या घरात गुप्तधन आहे....खोदायला सुरुवात करा..." असे सांगितले आहे, आणि ते मुंबईतील येडे कुटुंब म्हणे रात्रभर घर उकरीत बसले<<< हाहाहा
स्वामी शोभन सरकार की जय
तुमच्या घरात गुप्तधन
तुमच्या घरात गुप्तधन आहे....खोदायला सुरुवात करा << अशी अपेक्षा करतो की ही मंडळी ग्राऊंड फ्लोरला राहत असेल...
<<तिथे तर जणू कुणीतरी
<<तिथे तर जणू कुणीतरी परलोकवासी झाले आहे असाच चेहरा करून दोन सासवा काम करीत असतात>>
एकंदर या मालिकेतील प्राण
एकंदर या मालिकेतील प्राण निघून चालला आहे की काय अशी भीती वाटायला सुरुवात झाली आहे.
>> चाललाच आहे.. ह्या आठवड्याअखेरीस स्पष्ट होईल की मालिका किती बकवास होणार ते..
अशोकमामा, उद्या मी ही मालिका
अशोकमामा, उद्या मी ही मालिका नाही बघणार, तुमचे अपडेटस वाचायला येईन, बोअर झालीय मालिका.
उद्या रात्री ८ वाजता बालिका-वधु बघेन ते इंटरेस्टिंग मोडवर आहे.
ती बेबीआत्या तर डोक्यातच
ती बेबीआत्या तर डोक्यातच जायला लागलीये फार. एकतर माहेरी येऊन बसलीये, वहिन्यांवर हुकुमत गाजवतेय, कामही काही करताना दिसत नाही.
मी ही मालीका बघणे बंद करुन
मी ही मालीका बघणे बंद करुन बरेच दिवस झाले. लग्नाचा एपिसोड बघणार होते, इथले अपडेट्स वाचुन ते पण नाही बघितले. शपथा काय, गुप्तधन काय , रडक्या बायका काय ,लेखक किती वाटोळे करु शकतो याचे उत्तम उदहरण.
"ही मालिका त्यातल्या त्यात बरि" असे कुणितरी वर लिहिलेय , म्हणजे बाकी मालिका काय असतिल असा विचार मनात येतोय.
अशोकमामा, उद्या मी ही मालिका
अशोकमामा, उद्या मी ही मालिका नाही बघणार, तुमचे अपडेटस वाचायला येईन, बोअर झालीय मालिका.
उद्या रात्री ८ वाजता बालिका-वधु बघेन ते इंटरेस्टिंग मोडवर आहे.>>>> अन्जू.. १०० टक्के अनुमोदन ग तुला.. आजच्या भागात ती गंगा चांगलीच झाडणारे त्या साचीला असं दिसतयं... होसुमीत्याघ नाही बघणार नाही बघणार !
गंड्लीय मालिका आता.. काय
गंड्लीय मालिका आता.. काय रडारड नुस्ती.. आता तर श्री पण रडायला लागला.. इम्पॉसिबल!
आईआज्जी नाही म्हट्ल्यावर कोणीतरी रिमोट आपल्या हात घ्यायचा नि सुरु करायची शोधाशोध.. हे राहीलचं बाजुला नुसत्या शपथा!
जान्हवी तर काकुबाई झालीय लगेच..
मी फक्त अपडेट्स वाचणार आता
बिचारि जानव्हि आणी श्री
बिचारि जानव्हि आणी श्री हनिमुन साजरा करायला जायचे सोडुन......आईआजिला शोधावे लागत आहे .
हो ना
हो ना
लोकांनो....खुश होउ शकतो आपण
लोकांनो....खुश होउ शकतो आपण ...मं देनी आपली प्रार्थना मान्य केली बहुतेक ...आपल्याला फार त्रास न देता आजीला परत आणतील अस वाटतं....हे बघा...
https://www.facebook.com/photo.php?v=690729227603950
अर्थात हा भाग कधि आहे देवच जाणे..पुढ्च्या आठ्वड्यात असावा अस वाट्तं....
थॆन्क्स मिरची.... हा भाग
थॆन्क्स मिरची.... हा भाग निश्चितच दिवाळीचे वातावरण नजरेसमोर ठेवून चित्रीत केला असणार. समाजात इतक्या मोठ्या प्रमाणात भाव खाऊन राहिलेल्या या मालिकेमध्ये दिवाळीच्या दिवसात रडकेपणा नको ही गोष्ट मंदे आणि मकु ने मानली असणार....अन त्याची परिणती मग आजी घरी येण्यामध्ये.
हो ना मामा....मी पण गेल्या
हो ना मामा....मी पण गेल्या आठवड्यापासून बंद्च केली ही मालिका बघण...फक्त तुमचे अपडेट्स वाचते...
आता दिवाळीत जरा आनंदी वातावरण दाखवावे त्यांनी मालीकेत हीच प्रार्थना विघ्नेश्वरा चरणी...:) आणि एक.... ती दुष्ट जोड्गोळी दाखवू नये...ही पण अपेक्षा...
रच्याकने, (सगळ्याच
रच्याकने,
(सगळ्याच मालिकांबद्दल...)
मला कंटाळा येऊ लागलाय आता मालिकेचा...तसही, प्रेम-प्रकरण संपल कि लग्न आणि अनुषंगाने सासुर्वास वगैरे दाखवत बसतात....अस वाटत कि मराठी चित्रपट सृष्टी इतक्या विविध विषयांवर भाष्य करण्याकरता प्रसिद्ध असताना, ह्या मराठी मालिका मात्र एकच विषय किती दिवस उगाळत बसतात. सगळ्या मालिकांमध्ये तेच तेच...
एखादीच मालिका वेगळी असते. पण बाकी तेच!
अश्या सगळ्या मालिकांतून त्या लोकांना काय संदेश द्यायचाय आणि काय सिद्ध करायचं न, ते कळेनास झालंय मला.
नवऱ्याला घाबरणाऱ्या बायका, सतत अहो-जाओ करत मागे फिरताना आणि नुस्त घरातील काम करत असताना दाखवल्या जातात. म्हणजे थोडक्यात, बायकांनी फक्त 'चूल-मुल' सांभाळत 'आपल चरित्र शुद्ध आहे', हे सिद्ध करत जगायला हवं.
मूर्ख पणा चालू आहे. फक्त मूर्खपणा!!
मामा तुमचे अपडेट्स ति सिरियल
मामा तुमचे अपडेट्स ति सिरियल बघण्यापेक्शा वाचायला खुप चाग्ले वाट्तात.
मिरची....मधुरा....मानसी
मिरची....मधुरा....मानसी [अरेच्या तिघीही 'म'....विशेषच]
~ धन्यवाद. मधुराच्या म्हणण्यात नक्कीच तथ्य आहे. हे सत्यच की आजकालच्या मराठी चित्रपटांनी अगदी जागतिक बाजारपेठेत स्थान मिळविण्याइतकी धडक मारल्याचे चित्र दिसत्ये जे आल्हाददायक वाटत असताना रोज सकाळ-सायंकाळ-रात्र मालिकांचा रतीब घालणार्यांनी मात्र नवराबायको-सासूसासरे-नणंद-भावजय-दीर-जावई-सून यांच्यापल्याड या दुनियेत काही नाहीच हा दृढ निश्चय केलेला दिसतो तो खरंतर डोके उठविणारा झाला आहे. मी तुम्हाला सांगितले होतेच की मी केवळ 'होणार सून....' सुरुवातीला भावली म्हणून पाह्यला लागलो आणि आता तिथून जाणे नकोसे वाटते त्याला कारण दुसरेतिसरे काही नसून या निमित्ताने इथे इतक्या भाच्या मिळाल्या....ही एक आगळी मिळकतच.
पण म्हणून या मालिकेला किती डोक्यावर घ्यायचे हाही प्रश्न आहेच. शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान यांचे फेसबुक अकौंट आहेत, त्यावर हजारोंनी लोक नोंदी टाकतात पण मला दाट शंका आहे की दोन्ही अकौंट या दोघांकडून पाह्यले जातच नसावेत....अन्यथा त्यानी लेखिका व दिग्दर्शक याना प्रेक्षकांमध्ये फिरत असलेल्या मताविषयी जागृत केले असते. वर मिरचीने झी ची एक लिंक दिली आहे, तिथे दिसत्ये की आजी परत आल्या आहेत. काय धरायचा याचा अर्थ ? ही टीम सार्या प्रेक्षकांना मूर्ख समजून चित्रण करीत आहे का ? इतका मोठा तमाशा आईआजीने केला...अगदी हिमालयात निघाल्यासारख्या त्या घरातून बाहेर पडल्या आणि येताना अशा दिसतात की साडीची साधी चुणही मोडलेली नाही....म्हणजे त्या काय वरच्या खोलीत कपाटातच बसल्या होत्या काय ?
तुमच्या घरात गुप्तधन
तुमच्या घरात गुप्तधन आहे....खोदायला सुरुवात करा << अशी अपेक्षा करतो की ही मंडळी ग्राऊंड फ्लोरला राहत असेल
ही मंडळी दुसर्या मजल्यावर रहात असतील आणी त्यांच्याखाली अंबानींचा फ्लॅट असेल तर?
एकत्र कुटुंब टिकण्यासाठी काही
एकत्र कुटुंब टिकण्यासाठी काही चांगल्या टिप्स देताहेत असं वाटतय मला..
श्री इंदूआईला समजावतो....तुला कसं तुझ्या सासूनी आधी स्वीकारलं आणि मग शिकवलं ....तुम्हीही जान्हवी साठी असंच वागलं पाहिजे....(साधारणपणे घराघरातून असं दिसतं की सासूसुनेचं घ्ररात कितीही शीतयुद्ध चालू असलं तरी मुलगा काही संबंध सुधारावेत म्हणून प्रयत्न करत नाही. गप्प बसून मानसिक त्रास सहन करतो.)
आजच्या भागात श्री एकदम सेंटी झालाय...आजी घर सोडून गेली म्हणून.....पण तो जान्हवीला समजावतोय....तिचं ही आता वय झालय आणि दुसरं बालपण सुरू झालय बहुतेक....तिचे आणि बाकी सगळ्या आयांचे तू आणि मी दोघं पालक ! ........
सर्वाना नमस्कार .. मी नवीनच
सर्वाना नमस्कार .. मी नवीनच आहे .. मालिका मी रोज पाहते पण तुमच्या सर्वांच्या मालिकेवरील चर्चा... रोज वाचत असते.. वाटल तुम्हाला जोइन करूया... सोनाली
स्वागत आहे सोनाली तुझे.....
स्वागत आहे सोनाली तुझे..... आतापर्यंत या मालिकेबद्दल इथे जितके वाचले असशील त्याच्या आधारे तू देखील चर्चेत सहभागी होत जा.... आनंदच वाटेल तुला....आणि आम्हालाही.
काय नतद्रष्ट बायका आहेत या.
काय नतद्रष्ट बायका आहेत या. एव्हढी सोन्यासारखी सून घरात आलिये या वेड्यासरखं तिच्याशी वाईट वागतयेत. ती बेबी आत्या तर डोक्यात जातेय. तिला पण जाउद्या आजींसोबत घराबाहेर. श्री-जान्हवी ला तेव्हढाच डोक्याला ताप कमी.
अशोक मामा.. मी पण अशोक मामा
अशोक मामा.. मी पण अशोक मामा बोलले तर चालेल ना,... मी तुमचे अपडेट आवर्जून वाचत असते.. खूप सुंदर लिहत तुम्ही... म्हणजे.. एखादा एपिसोड जर मिस केला तरी तुमचे अपडेट वाचले कि झाल काम..
Pages