नवीन मालिका-"होणार सून मी या घरची"

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46

Tejashree-Pradhan-Shashank-Ketkar-Honaar-Suun-Mee-Hyaa-Gharchi-Cast.jpg

झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'

इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या.... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विकू Lol

रा.रा. विजयराव कुलकर्णी.... सर्वप्रथम खास कोल्हापुरी रामराम स्वीकारा आमुचा !!!

~ तुमच्या नोटीशीने माझे असलेले/नसलेले हृदय धडकलेच....आताही कसेबसे उत्तर देताना थरथर जाणवतेच. पण मी जे काही केले [अपडेट्सबाबत] त्या मागील स्फूर्ती मूर्त्या इथल्या प्रेमळ भाच्याच आहेत, ज्या अगणित तर आहेतच शिवाय त्यांच्याकडून लाईव्ह मालिका पाहणे चुकले तरी अपडेटवर त्या समाधान मानतात हे मला जाणवले आहे. एका अर्थी झी च्या सादरीकरणाचा त्या गौरवच करतात. तसेच झी कडून किमान अर्धा डझन तरी मालिकांच रतीब नित्यदिनी टीव्हीवर असतोच हे तुम्हीही जाणताच, तरीही सार्‍यांचे लक्ष 'होणार सून मी ह्या घरची..." कडेच का असते ? यातील गम्य असे की मालिकेवर सार्‍यांचे प्रेम आहे त्यामुळे टीआरपीदेखील चढत्या श्रेणीचा आहे आणि त्याला उत्साह मिळाला आहे तो इथल्या अपडेट्सचा.....माझ्या माहितीतील काही प्रेक्षक असेही आहेत की ज्याना मराठी टंकन येत नाही म्हणून मायबोलीवर सदस्य नाहीत, मात्र याच धाग्याची वाचनमात्र स्थिती ते राखून आहेत. म्हणजेच आज १५०० पेक्षा जास्त नोंदी इथे झाल्या असल्या तरी वाचकवर्ग कमालीचा जास्तीचा आहे, हे मी जाणतो....आणि ही दिशा झी च्या उत्पादन क्षमतेत वाढ करणारीच सिद्ध होते.

~ सबब राजमान्य राजश्री याना या संदर्भातील कायद्याची जी काही कलमे अस्तित्वात आहेत त्यांचा आधार घेऊन नम्रपणे निदर्शनास आणू इच्छितो की, मी अपडेट इथे देवून उलटपक्षी झी आणि त्यांच्या मालिकांचा टीआरपी वाढविण्याचेच [पवित्र असेल तर....] काम केले आहे, करीत आहे. त्या पोटी तुम्ही वा तुमच्या अशीलांनी मलाच "होणार सून मी...." टीमसमवेत कॉफीपानासाठी एक संध्याकाळ द्यावी....[दरम्यान तुम्ही वर दिलेली कोटीची भाषा प्रत्यक्षात कागदावर कशी लिहायची याची सवय करत बसतो....गणिताच्या नावाने आमचं चांगभलंच आहे म्हणा !!]

मे. जा. व्हावे....क. ही. वि.

आपला नम्र,

अशोक पाटील

[बाकी शुभ दीपावली आहेच तुम्हा सर्वांना !!]

नताशा ~

~ आजीच्या शोधार्थ श्री असतोच.... त्याने एका प्रायव्हेट डीटेक्टिव्ह एजन्सीकडे आजीचा शोध हे काम दिलेले असते [अर्थात हे सारे टेलिफोन संवादातून स्पष्ट केले गेले आहे]. एके दिवशी ऑफिसमध्ये काम चालू असतानाच त्या पार्टीचा त्याला फोन येतो....त्यांच्याकडून 'आश्रय' नामाचा उल्लेख होतो आणि मग श्री तो पत्ता चटचट कागदावर उतरून घेतो...त्यांचे आभार मानतो. मग त्याच्या गाडीतून प्रवास सुरू झालेला दाखविला गेलाय. त्या दिशेने जाताना एकदोन ठिकाणी थांबून एका धाब्यावर आणखीन् आश्रयची चौकशी करतोही.

अगं दक्षिणा... वकिल होण्यासाठी प्रमुख पात्रता लागते ती वक्तृत्वाची....त्याचाच अभाव माझ्याकडे. साध्या भाजीवालीकडे दोन रुपयाची कोथिंबीर मागताना संवाद कसा साधायचा याची प्रॅक्टिस करत करतच मी बाजारात जात असतो....मग कोर्टासमोर 'मिलॉर्ड.... ताजिराते हिंद, दफा ३०२ को हाजीरनाझीर रखते हुये मै ये बताने की कोशीश कर रहा हूं...." असे म्हणायचे तरी कसे ? त्यामुळे नोकरी केली ती चार भिंतीच्या आतीलच.... खाली मान घालून.... लाल, निळ्या आणि हिरव्या शिसपेन्सिल्स घेऊनच.

मला एक सांगा एव्ढे श्रिमंत लोक असून आजीबाईला घर सोडायचे तर जायला दुसरी प्रॉपर्टी नाही? डायरेक्ट आश्रय! किंवा कोणी अतिश्रिमंत मैत्रिण पण नाही.

अश्विनीमामी..... अजूनी त्यानी 'आश्रय' संस्था {किंवा ते मैत्रिणीचे घर आहे का?} का निवडली याची कारणमीमांसा दिली गेलेली नाही.... कदाचित ती येत्या एकदोन भागात चर्चेला आली तरच खुलासा होऊ शकेल. बाकी आश्रयची अंतर्गत सजावट एका बंगल्याचीच वाटते. मी विविध ठिकाणाचे किमान सहा 'मातोश्री वृद्धाश्रम' पाहिलेले आहेत.... तिथेही छान व्यवस्था असतेच.... अगदीच ऐषाआरामी नसली तरीही.

जाई....चनस...नियती...दक्षिणा...

अगं भाच्यांनो मी नोटीसीला दिलेले उत्तर तुम्हाला आवडले हे वाचून झीचे प्रतिनिधी श्री.विजय कुलकर्णी यांच्या अंगाचा तीळपापड उडणार ना !!! मग परत ते आगळावेगळा रंगसंगतीने भरलेला नवीन ड्राफ्ट करून मला पाठवतील.... तिकडे त्या श्री जान्हवी मृदुगंधा मंदार यांचे काय बिघडणार नाही; पण माझी झोप उडेल.

विकु, मस्त नोटीस, अशोकमामा मस्त उत्तर.

थोडे अवांतर- dreamgirl तुला अनुमोदन 'माझे मन तुझे झाले' मी बघते आणि तू उल्लेख केलेल्या दोन्ही गोष्टी मलापण खूप सकारात्मक वाटल्या. ह्या गोष्टी समाजातपण प्रकर्षाने अमलात याव्यात असे वाटते. मी स्वतः हळदी-कुंकू लावताना सधवा-विधवा असा भेदभाव करत नाही उलट समोरची बाईच संकोचते लावून घेताना, असे अनुभव येतात. ( sorry, अवांतर लिहिल्याबद्दल).

अन्जू.... बिलकुल अवांतर लिहिलेले नाहीस तू. किंबहुना समाज प्रबोधनासाठी असली माहिती खूप आवश्यक मानली गेली पाहिजे....मग त्या या धाग्यावर लिहिलेले असो वा अन्यत्र. तू इथे सांगितलेला हळदीकुंकवाचा प्रसंग एरव्ही कळालाही नसता, पण तुम्हा दोघींच्या संभाषणावरून समजला.

एकदम कडक उत्तर मामा.

बाय द वे,क्तृत्वाची....त्याचाच अभाव माझ्याकडे.
ये बा त कुछ हजम नहि हुयी.

बुधवार दि.३० आक्टोबर २०१३ ~ अपडेट

~ आज श्री घरी आलेला नाही...त्याच्या मोबाईलची बॅटरी डाऊन असल्याने त्याने केवळ जान्हवीला फोन केलेला असतो आणि फोन बंद पडल्याने जास्त बोलतही नाही. जान्हवी तेवढेच सासवांना सांगते....मग परत दोन सासवांनी डोळ्यातून नळ सोडलाच.... बेबीआत्या तर जान्हवीला फाडून खाण्याच्याच पवित्र्यात असते आणि तिला बाकी कशाचा नाही तर श्री ने जान्हवीला का फोन केला याचाच राग जास्त. जान्हवी तिला समजावून सांगण्याचा यथाशक्ती प्रयत्न करते पण बेबीआत्या बेलगामपण तिला बोलते आणि श्री ची आई असहाय्यपणे एकदा सुनेकडे तर दुसर्‍यांदा बेबीआत्याकडे पाहात पाणी काढत उभी असते. जान्हवीही हताशपणे तिथेच उभी राहते.

इकडे चाळीत जान्हवीची आई, मामा दोघेही सदाशिवरावांच्या प्रकृतीकडे नेहमीचेच रडगाणे अशा नजरेने पाहात आहेत आणि त्यांची चेष्टा मामा करीत आहे ते आई मोठ्या कौतुकाने पाहात आहे. तेवढ्यात तिथे पिंट्या येतो आणि ज्यावेळी मामा म्हणतो, "अगं कला जाऊ दे....शेवटी कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच..." त्यावर मुलाला राग येतो आणि "मामा, तू कुणाला बोलतोस ते आधी लक्षात घे" असे बजावतो....आई आपल्या भावाचीच बाजू घेते आणि पोराला बोल लावते. सदाशिवरावांना पिंट्या काहीतरी चांगले बोलला याची जाणीव होते, मात्र पिंट्याला आता बहीण घरी नाही याचे दु:ख होत आहे.

गोखल्यांच्या घरात मघाशी शरयू आणि सरस्वतीमावशी नव्हत्या....आता त्या आल्या असल्याने कोरम फुल्ल आहे. आता मात्र इतरांपेक्षा जान्हवी परिस्थितीचा तुम्ही अकारण बाऊ करू नका असे रोखठोकपणे सांगते. मोठी आई तर श्री घरी उशीरा येणार म्हणजे जणू काही आकाश कोसळले अशा आविर्भाव करीत बोलत असतात....बेबीआत्या शरयूलाही टोमणे मारते, शरयूच्या डोळ्यात पाणी पाहून जान्हवीला वाईट वाटते आणि ती "असला टोकाचा विचार करून तुम्ही काय मिळविता ? माझा श्री च्या प्रेमावर विश्वास असल्यामुळे माझे मन सांगत आहे की तो येणार ही गोष्ट पक्की..." असे बोलत असतानाच श्री सर्वाना हाक मारतो, हसत आत येतो आणि म्हणतो, "बघा, माझ्याबरोबर कोण आले आहे ?".... आजीला पाहून मग जान्हवी सोडून सार्‍या स्त्रिया आजीकडे जातात.....परत रडणे.....आणि परत शपथा.

जान्हवी सर्वांसाठी चहा करून आणते.....आणि तो घेताना बेबीआत्या सोडून बाकीच्या स्त्रिया श्री आणि आजीला "जान्हवीने आम्हाला कसा आणि किती धीर दिला..." याची कहाणी सांगतात...श्री ला खूप आनंद होतो. नंतर त्यांच्या रूममध्ये श्री जान्हवीला प्रेमाने जवळ घेऊन "तू अगदी माझ्या मनातील गोष्टी इथे करीत आहेस याचा मला खूप आनंद होत आहे...." यावर जान्हवीदेखील त्याला "तू आजीना परत घेऊन आलास यासाठी तू माझ्याकडे जे काही मागशील ते बक्षीस मी तुला देईन...' असे हसतहसत सांगते.

दिवाळीच्या मुहूर्तावर गोखल्यांची गाडी न कुरकुरता चालू लागेल अशी आशा व्यक्त करायला हरकत नाही.

त्या जान्हवीला श्रीसारखा जोडीदार मिळाला, तिचे भले होईलच, आता त्या पिंट्याकडे बघा जरा, त्याला मार्गाला लावारे नाहीतर त्याचा कॉन्फिडन्स जाईल आधीच तो जरा कमीच आहे, त्याच्याबाबतीत काहीतरी सकारात्मक श्रीच करेल असे वाटतेय पण ते लवकर होऊदे.

मालिकेवर धागा काढल्याच समाधान मिळतंय! अशोक मामांच्या अपडेट्स मुळे....मी मालिका पहिल्या नंतर सुद्धा अपडेट्स वाचते. मस्त लिहिता तुम्ही मामा!!

इथले अपडेट्स वाचुन काम भागतं. त्यामुळे रोज मालिका पहात नाही. पण काल खुप दिवसांनी मालिका पाहिली.
बेबीआत्या.. Angry

त्या सहा आयांना जरा आवर घालायला हवाय. पाणिदार अभिनयामुळे सिरियल पांचट होते सगळी. Angry

मला हेच पटत नाही की, गोखल्यांच्या सार्‍या स्त्रिया सुशिक्षित दिसतात....वावर तसाच आहे....घरचा खानदानीपणा....श्रीमंती ओतप्रोत आहे....असे असूनही जी मुलगी त्यांच्याकडे नांदायला येऊन फक्त दोनतीन दिवस झाले आहेत तिला बेबीआत्या [जिचा स्वतःचा संसार उद्ध्वस्त झाला आहे आणि जी आईच्या आश्रयाला आली आहे...] इतके अपमानास्पद आणि मोठ्या तोंडाने बोलत असताना तिच्या शेजारी उभ्या असलेल्या तीन सासवा का अडवत नसतील ? "अहो बेबीआत्या.... श्री ने जान्हवीला फोन केला यात तिची काय चूक ?" इतका साधा किरकोळ प्रश्न त्या विचारीत नाहीत....ही लेखिकेची लिखाणातील कमकुवत दृष्टी असेच मी म्हणेन.

फक्त शरयू प्रसंगी जान्हवीशी प्रेमाने वागताना दिसते हीच त्यातल्यात्यात समाधानाची बाब.

अनुमोदन अशोकराव. शिवाय प्रत्येकीस संसाराचा काही एक अनुभव आहे तरीही हे सुंदर दिवस श्री
आणि जान्वीला थो डे आरामाचे घालवता यावेत असे कोणाही स्त्रीस वाटलेले दिसत नाही. त्या दोघांचा एक क्यूट सीन होता.

बरे जरा उशीर झाला तर इतके का धीर सोडतात? तो टूरला गेला किंवा खरेच त्याला काही झाले तर ह्या काय करतील? असे वाटले. किती ते बालकांसारखे मन आहे त्या बायांचे.

बायकांनी धीर सोडला नाही तर जान्हवी त्यांना धीर कसा देणार? मग तिचे कौतुक कसे होणार? तिला बक्षीस कसे मिळणार?

होय.... जान्हवीशी विघ्नेश्वराच्या मंदिर परिसरात बोलताना स्वत:ची खरी ओळख करुन देतो तो प्रसंग तुम्हा सर्वांना आठवत असेल. तिथे ती हसतहसत "तू अकांउंट्न्ट नाहीस, प्यून नाहीस, तुला नोकरी नाही. मग मी आमच्या बोरकरसरांना तुझ्या नोकरीसाठी बोलते.....तुझे क्वालिफिकेशन सांग..." असे विचारते. यावर श्री म्हणतो, "मी एम.बी.ए. झालो आहे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतून..." शांतपणे हे उत्तर देतो....जान्हवी त्रिफळाचित होते. म्हणजेच किमान दीडदोन वर्षे तरी श्री लंडनला गेला असेल असे गृहित धरू या.... त्या काळात या सहा आया सकाळसंध्याकाळ विघ्नेश्वराला ताम्हणात बुडवून उपाशी बसत होत्या का ?

एकुलता एक नातू....मुलगा....भाचा...पुतण्या....अशा विविध भूमिकेतील तो प्रेमळ तसेच कर्तबगार युवक आता लग्न करून बायकोला घेऊन घरी आला आहे...तर त्याला वैवाहिक सुख देण्यासाठी यानीच पुढाकार घेऊन जोडीला मधुचंद्राला पाठविणे गरजेचे होते....ते राहिले बाजूलाच, उलट लग्नाच्या दिवसापासून हाच गाडी घेऊन आजीला शोधण्यासाठी बाहेर पडलाय आणि बायको बिचारी तीन तोफांच्या तोंडी !!

कठीण आहे अशी परिस्थिती स्वीकारणे.

Pages