नवीन मालिका-"होणार सून मी या घरची"

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46

Tejashree-Pradhan-Shashank-Ketkar-Honaar-Suun-Mee-Hyaa-Gharchi-Cast.jpg

झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'

इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या.... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामा तुम्हालाही दिपावलीच्या हार्दीक शुभेच्छा !!! Happy

मला ही मालिका आवडते पण दररोज पाहणे शक्य होत नाही. पण तुमचे अपडेट्स वाचले कि मालिका पाहिल्याचे समाधान मिळते.

सर्वांना दिपावलिच्या हार्दिक शुभच्छा !
मी पण ही एकमेव मालिका बघते. माबोवर रोज यायला मिळत नाही पण दोन चार दिवसांनी जरी ईथे आले तरी प्रथम अशोकमामांचे अपडेट्स वाचते. आत्ता सुद्धा मी चार पाने वाचून काढली.
मामा तुमच्या लिखाणातला सहजभाव च हे अपडेट्स न चुकता वाचायला भाग पाडतो.

फारच डोक्यात जाऊ लागली आहे ही सिरिअल
ढापू मामा कजाग सावत्र आई
एकदम मवाळ बाबा सदाशिव सहस्त्रबुद्धे
गैंग्स ऑफ़ वासेपुरसारखी सासु आयांचीं गैंग
त्यात गुडी गुडी वागणारे श्री व जानू

मंदार देवस्थळि ने वादळवाट सारख्या सुन्दर मालिका दिल्यात पण ह्या मालिकेत प्रेक्षकांना बाळबोध समजलं जातयं

माझा डोक्याला शॉट मोड़ ऑन

दीपावलीच्या शुभेच्छा पोहोचल्या.... धन्यवाद आणि अपडेट्स तुमच्या आवडीचे बनले आहेत, त्यामुळे त्याबद्दल इथे टंकन करणे म्हणजे मलाही एकप्रकारे तो भाग आनंदाचाच वाटतो.

शनिवार दि. २ नोव्हेम्बर २०१३ ~ अपडेट

~ आजचा भाग हा सर्वस्वी जान्हवी तत्वज्ञानाचा होता. सुरुवातीला तिने आपली आई, मामा आणि प्रसंगी वडील यांची भाऊ पिंटू याला घरात मिळत असलेल्या दुय्यम दर्जाबाबत कानउघडणी केली. पिंट्याने घरात २००० रुपये देवून स्वयंपाकाला बाई लावण्यापेक्षा मी ते काम करेन असे सांगितलेले असते; त्यावर स्वतःला इतरांपेक्षा वेगळी समजणार्‍या आईने त्याचे असा भिकारडा विचार पुरुषाने कशाला करायचा ? यावर वाद घालायला सुरुवात करताच, जान्हवी तिला "सध्याच्या जगात काम कसलेच लहान वगैरे नसते, तर मानाने जगता येत असेल तर मग ते काम काय आहे याचा विचार करू नये. आजच्या दिवसात सर्वत्र पुरुष शेफ दिसतात ते यासाठीच...." मामा "त्या मोलकरणीचे आम्हाला काय सांगतेस ?" असे म्हणताच जान्हवी त्या बाईना "ताई..." पुकारते आणि मामालाही "सगळ्यांना मानाने वागवा...." असे सांगून त्यांची गाडी वळणावर आणते.

श्री च्या घरी आजी आणि श्री यांची खाजगी अशी एक बैठक झाली. त्याला अन्य स्त्रिया हजर नव्हत्या. तर श्री बाहेर आल्यानंतर त्याला जणू कोंडीत पकडल्यासारखे करून "आत काय चर्चा चालली होती ?" याचा जाब विचारतात. जणू काही आजी दिवाळीत परत घर सोडून जाणार....बेबीआत्या जास्तच. श्री सांगतो "आजीने असा निर्णय घेतला आहे की माझ्या सांगण्यावरून ती घरी आली आहे हे खरे....पण आता या घरात ती एकटीच आपल्या खोलीत राहील...हे ती का कशासाठी करत आहे, ही प्रश्न विचारण्यात अर्थ नाही... अन्यथा आमच्या दोघांच्या वादामुळे जान्हवी परत त्रास करून घेईल, अशासाठी की तिला वाटणार हे माझ्यामुळेच घडत आहे....तेव्हा तुम्ही सार्‍यांनी शांतपणे आपापले नित्याचे व्यवहार करा आणि दिवाळीच्या कामाला लागा...." तो विषय बंद करतो आणि तितक्यात त्याला जान्हवीचा फोन येतो आणि आयांना सांगून तो तिला आणायला निघतो.

चाळीत जान्हवीला गाडीत बसलेले पाहाण्यासाठी आई आणि मामा येतात. मामाच्या तोंडाला ती गाडी पाहून पाणी सुटतेच. "अशा किती गाड्या आहेत तुमच्याकडे ?" असा निलाजरा प्रश्न मामा विचारतो. श्री म्हणतो, "असतील सहासात..." मामा घसरतोच. आई श्री ला दिवाळीसाठी तुम्ही आमच्याकडे यायचे आहे. याला उत्तर म्हणून श्री होकार देतो. पण सहज म्हणून जातो की, "मी येईनच...पण एक बदल म्हणून तुम्ही सर्वजण गोखले बंगल्याकडे आलात तरी मल चालेल..." जान्हवीला हे पसंत नाही....कारण यावर आई आणि मामा एकदम जाम खूष होऊन जातात. कसेबसे जान्हवी श्री ला गाडीत बसवते आणि बंगल्याकडे निघते. बंगल्यात मोठी आई आणि मावशी ज्यावेळी श्री आणि जान्हवी एकांतात त्यांच्या खोलीत असतात, त्याचवेळी आगाऊपणा करीत आत येतात आणि "श्री तुझे धुण्याची कपडे दे....टॉवेल दे...आणखीन कायबाय असेल ते दे..." असे करत गठ्ठा बांधत बसतात....तर मावशी त्याच्यासाठी बदाम घातलेले दूध आणते आणि दोघीही त्याच गादीवर इकडेतिकडे बसून "आमच्यासमोर दूध पिऊन टाक बघू..." असा आग्रह करतात. श्री ला गडबडीत ठसकाही लागतो....हे सारे दृष्य अगदी असह्यपणे बाजूला उभी असलेली त्याची पत्नी जान्हवी पाहात असते. तिला हे समजत नाही की या स्त्रिया मोठ्या होणार तरी कधी ? अजून किती वर्षे श्री ला त्या लहान मुलगा समजणार आहेत. त्या दोघी गेल्यानंतर जान्हवी हाच विषय थेटपणे श्री लाच विचारते.... मग दोघांत "यात काय बरोबर आणि काय चूक..." यावर एक छानपैकी तात्विक चर्चा होते. जान्हवीला नवर्‍याचे म्हणणे पटत नाही, पण ती शांतपणे सारे घेते. बॅन्केतून गीताचा फोन येतो...दोघी बोलतात. मग जान्हवी श्री ला विचारते, "मी नोकरी जॉईन केली तर चालेल श्री ? मला कर्जाचे हप्ते फेडायचे आहेत...." श्री तात्काळ होकार देतो...पण आजीला विचारून निर्णय घेऊ या असेही सांगतो.

आई आणि मामा घरी येतात आणि सदाशिवराव यांच्यासमोर जावयाच्या दिवाळसणाचा विषय छेडतात. दोघेही म्हणतात "जावयाने आपल्याला तिकडे बोलाविले आहे..." यावर सदाशिवराव संतापतात. "खबरदार, परत असल निर्लज्जपणा कराल तर.....पहिला दिवाळीसण आहे आणि जावयाने इकडे आले पाहिजे. तुम्ही तुमचा शहाणपणा गाजवू नका..." मग दोघांचाही त्रागा. दुसर्‍या दिवशी हे दोघे जान्हवीच्या घरी जातातच. तिथे श्रीची आई त्यांचे स्वागत करते....चहा फराळ घेताघेता मामा लोभी नजरेने बंगला न्याहाळत बसतो. जान्हवीला ते आल्याचे आवडलेले नसतेच पण स्वभावानुसार ती गप्प बसते. श्री शेजारी ती असते. श्री ला निमंत्रण दिल्यावर श्री परत "तुम्हीच सारे इकडे आलात तरी चालेल..." असे म्हटल्यावर तात्काळ जान्हवी त्याला थांबविते आणि म्हणते...."नको...".

सोमवारच्या कार्यक्रमात दिवाळीच्या फराळासंदर्भात चर्चा आहे....आणि आजीची त्याबाबतची भूमिकाही.

मंदार देवस्थळि ने वादळवाट सारख्या सुन्दर मालिका दिल्यात

ऐकाव ते नवलच!!!

उगाच मेलेल्याबद्दल वाईट बोलू नये त्याप्रमाणे संपलेल्या मालिकांबद्दल चांगल बोलाव अस काही आहे.

वादळ वात होती.

मंदार देवस्थळी च्या मालिका बाळबोध आणि रटाळाच असतात. त्याची पात्र साधारण ८० च्या दशकातल्या मराठी चित्रपटातून घेतल्यासारखी असतात. तो मामा पाहून अनेकाना राजा गोसावी किंवा राजशेखर आठवेल.

त्याच्या सिरीयल मधल्या बायका स्वयंपाक घरातच असतात किंवा हॉल मध्ये भाज्या निवडत असतात.
आभाळमायातली अक्का वादळवाट मध्ये कंटीन्यू झालेली. सारखे पोहे केले शिरा केला.

इथे ही गेले चार एपिसोड चहा टाकतायत, आता म्हणे फराळ करणारेत…

अश्या अनेक गोष्टी आहेत पण स्वप्नासारख मला मांडता येत नाही.

अशोक मामा, अहो,
मी असचं हसले....कारण मला धागे काढायला आवडतात!! सगळ्यांना माहितच आहे ते...

बाकी धागा हा तुमच्या अपडेटसाठीच आहे हा!!! गो ऑन!!

बाकी, सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा!! पण फटके नका रे उडवू कोणी!!! इथे फटाक्यांचा आवाज ऐकून कान किटलेत माझे!

kaal kai zala? kaalcha episode net war kuthe milel?

गोगो....

रविवारी "होणार सून मी ह्या घरची...." कार्यक्रम होत नसतो..... शनिवार नंतर आज सोमवारपासून सुरू होईल.

मधुरा...

पुण्यातील फटाक्यांचे आवाज ऐकून तुझे कान किटले असतील, तर मग आमच्या कोल्हापूरातील फटाके ऐकायला ये..... इथे 'कान फुटले' असे म्हणायची पाळी आली आहे. कुठला आणि कसा पैसा उडवितात लोक फटाक्यांवर....!! कमाल आहे खरी.

गोखल्यांची दिवाळी झाली का? श्रीला फटाके उडावतांना दाखवायला नको हे सिरीयल वाल्यांच्या ल क्षात राहायला हवं नाहीतर दाखवतील त्याला सुरसुरी घेउन. (लग्नानंतर तांदळाच माप ओलांडल तसं) Happy

सोमवार दि. ४ नोव्हेम्बर २०१३ : अपडेट

~ आजच्या भागातील सर्वात समाधानकारक आणि महत्वाची घटना म्हणजे मामा आणि शशीकलाबाईंचे बार्शीला पलायन. जावई श्री ला दिवाळी सणाचे निमंत्रण देण्याच्या बहाण्याने हे दोघे "गोकुळ" बंगल्यात आलेले दाखविले आहे. परंतु जावयाला निमंत्रण देताना श्री च एक मॅनर्स म्हणून "तुम्ही सर्व आमच्याकडेच या..." असे म्हणता क्षणी तोंडाला पाणी सुटल्याप्रमाणे मामा व शशीकलाबाई आविर्भाव करतात....मात्र जान्हवी तो विषय तिथल्या तिथे तोडते. "माझे बाबा येऊ शकणार नाहीत शिवाय सासरच्या लोकांनी निमंत्रण दिले म्हणजे रितभात सोडून माहेरच्या लोकांने ते स्वीकारू नये...." ही भूमिका स्पष्टपणे आवाज चढवून घेते. यावर श्री पत्नीसमोर काहीच बोलत नाही....आणि मुलीने जणू आपला अपमान केल्याचा आव आणून हे भाऊबहीण तिथून बाहेर पडतात व आपल्या चाळीत येताच जान्हवीच्या नावाने बोटे मोडू लागतात....'शेवटी ही पोरगी सावत्रच निघाली....' असले ठराविक टोमणे मारत राहतात त्याचवेळी मामाचा मोबाईल वाजतो. फोनवर बार्शीतील कुणी इस्टेट एजंट असतो. त्याला बिल्डिंग डेव्हलपेमेन्टसाठी जागा हवी असते आणि मामाच्या ज्या दोन खोल्या असतात ती जमीन त्याला गरजेची वाटत असते. तिचा व्यवहार करण्यासाठी मामाला बार्शीला बोलाविण्यात येते. बोलताना तो एजंट त्या घरावर आणखीन् कुणाचा हक्क आहे का याची विचारणा करतो पण त्याला उत्तर म्हणून बाजूला जाऊन मामा फोन लपवून म्हणतो, "माझी एक बहीण होती...कला नावाची. तिचा हक्क होता, पण ती आता वारली आहे..." हे बोलणे शेजारीच उभ्या असलेल्या शशीकलाबाईच्या कानी जाते आणि जिवंत असताना मेली म्हणून जाहीर करणार्‍या त्या भावाविरूद्ध रुद्रावतार दाखविते आणि "मलाही उद्याच्या उद्या बार्शीला घेऊन गेले पाहिजे' अशी धमकी देते....चरफडत असलेला मामा आपल्या बहिणीला घेऊन बार्शीला जातो.

पिंट्या फोनवरून जान्हवीला हा घटनाक्रम सांगतो आणि उद्या दिवाळीसाठी जावई घरी येतील त्यावेळी आई घरात नसणार ही वार्ता दिल्यावर जान्हवी आता हे श्री ला कसे सांगायचे हा विचार करत बसते. पण श्री समजूतदारपणे बोलूण तिचा तणाव कमी करतो...आणि तिला छानपैकी हसवितोही. घरात आता फराळाची तयारी चालू आहे. सासूबाई, मावशी आणि शरयू आता जान्हवीला माया करतात आणि तिच्या कामाची तारीफही करतात. फक्त बेबीआत्या आणि इंदूआई का कोण जाणे सतत जान्हवी म्हणजे घरावर आलेले संकट याच भूमिकेतून तिच्याकडे पाहात आहेत. पण जान्हवीने याबाबतीत श्री चे ऐकायचे ठरविले असल्याने ती शांतपणे या सार्‍या घटनांकडे पाहात आहे.

फक्त आईआजी घरच्या रोजच्या कार्यक्रमात का भाग घेत नाहीत हे कोडे जान्हवीला सुटलेले नाही...आता मंगळवारच्या भागात जान्हवी याच प्रश्नाची श्री ला विचारून तड लावणार असे दिसत्ये. श्री तिला उडवाउडवीची उत्तरे देत आहे....त्याचेही कारण समजेलच.

मामा मस्त अपडेटस. बरे झाले तो मामा आणि त्याची बहिण बार्शीला गेले, काही कारणाने दोघे तिथेच राहिले तर बरे होईल, पिंट्या आणि त्याच्या बाबांचा डोक्याचा ताप कमी होईल, नाहीतरी त्यांचा उपयोग काय आहे, साधा चहाही करायला कंटाळते ती बाई.

अन्जू.... धन्यवाद ! मी देखील सुटकेचा सुस्कारा टाकला, ती जोडी बार्शीला गेल्याचे पाहून.... खरेच तिथेच राहिली ती कायमची तरी हरकत नाही. आमच्या बिचार्‍या जान्हवीला सासरी त्या बेबीआत्या आणि इंदूआईचा वैताग आहेच अजूनी....तेवढाच पुरेसा आहे....माहेरकडून आता काही नको.

अदिति.... आशा शेलार काम चांगले करतात यात वाद नाही...त्याना परवा झी पुरस्कारही मिळाला आहे या व्यक्तीरेखेबद्दल.....आणि होय, तो बार्शीचा मामा वैगात आणतो.... त्याचे संवाद आणि शारीरिक हालचालीही संताप निर्माण करतात प्रेक्षकांत.

मामांची एक्झिट(अहो .....सीरियलमधून!) झाली तर बरं!
सहनच होत नाही तो!

मालिकेचा निषेध. हा एवढा दुष्ट मामा बार्शीचा का दाखवला? आमच्या भावना दुखावल्यात यामुळे. बार्शीमधले सगळेच मामा खूप चांगले असतात. भाचीचे (एकुलती एक असल्याने) प्रचंड हट्ट पुरवतात!!! बार्शीच्या मामी दरवर्षी न चुकता भाचीला पापडबिबड्या, हळद मसाला वगैरे आठवणीने पाठवतात.

निषेध!!!!:दिवा:

शांत राहा, शांत राहा.... बालिके नंदिनी !!!

आंबेमोहोर तांदळातसुद्धा एखादे कडू बी निघतेच....तसे निघाले म्हणून सारे पोते खराब कुणी मानत नाहीच. सबब एक बार्शीकर मामा लबाड दाखविला म्हणून एकजात तिथले सारेच मामा त्याच पंगतीतील असतात असे खुद्द देवस्थळीही मानत नसतील.....आणि तुला यंदाही तुझी मामी पापड, हळद मसाला.....लिंबू लोणचे भरभरून पाठविणारच !! सो, रीलॅक्स अ‍ॅण्ड डोन्ट वरी.

मंगळवार दि.५ नोव्हेम्बर २०१३ : अपडेट

~ आजच्या भागाचा प्रमुख विषय होता जान्हवीचा आजीच्या मौनाचा शोध घेणे...आणि त्यासाठी तिला एकमेव मार्ग दिसतो तो म्हणजे श्रीरंग गोखले. सकाळी मावशी जेवणाने भरलेले ताट परत घेऊन स्वयंपाकघरात येतात ते पाहून जान्हवी चौकशी करते तर तिला उत्तर मिळते, 'आई म्हणतात मला नको....'. मौन आहे हे ठीक पण म्हणून उपाशी राहून कसले प्रायश्चित वा शिक्षा आजी घेत आहेत ? हा प्रश्न जान्हवीला पडतो. शेवटी बेडरूममध्ये श्री आल्यानंतर ती थेटच विचारते...."दिवाळीचा सण आहे आणि आपण दोघांनी आईआजीच्या पाया पडायला त्यांच्या रूममध्ये जाऊ या का ?" याला श्री चा युक्तीवाद, "अगं, नको...त्याना कुणी पाया पडले वा नाही, त्यात काही फरक पडत नाही..." जान्हवी जास्तच आग्रह धरते तर तो उत्तर देतो, "तू शांत राहा, काही दिवस जाऊ दे....आपण ते सारे नंतर पाहू....". जान्हवी शांत राहते आणि दुसरीकडे पिंट्याशी घर कसे चालले आहे या प्रश्नावर फोनवर बोलते. घरी आता सदाशिवराव आणि पिंट्या हे दोनच सदस्य आहेत. शांताबाई नामक कामवाली बाई हजर झाली आहे. तिने सदाशिवराव याना "बाबा, तुम्हाला चहा करून देऊ का ?" असे सहजपणे विचारल्यावर त्याना व पिंट्याला चटदिशी जान्हवीची आठवण येऊन ते त्याच आठवणीत दंग होतात. स्वयंपाकीणबाई पहिल्याच दिवशी मुलीच्याच रुपाने घरी आल्याचे ते जाणतात.

"गोकुळ" मध्ये सकाळी पाडव्याच्या निमित्ताने दारात तुळशी वृंदावना भोवती रांगोळी काढण्याची पाळी शरयूची असते पण ती कुठे दिसत नसल्याचे पाहून जान्हवी स्वतःच रांगोळी काढायला बसते...काम पूर्ण होते आणि दुरून शरयू मागे पाहात पाहात लगबगीने बंगल्याकडे येताना दिसते....कुणाला तरी ती बाय-बायही करत आहे...हे सारे जान्हवी पाहाते...जान्हवीने पाहिल्याचे शरयूला समजते आणि ती ओशाळपणाने तिच्याकडे पाहात "मी देवाला गेले होते....वेळ झाला...मी रांगोळी काढणारच होते..." आदी प्रयुक्त्या करते. जान्हवी जाणत आहे की ती नेमकी कुणाला भेटायला गेली होती; पण सौजन्याचा भाग म्हणून काही बोलत नाही. तिचा विनम्रपणा पाहून शरयू तिला म्हणते, "जान्हवी खरं तर नात्याने मी तुझी धाकटी सासू आणि तू माझी सून असलीस तरी मी असे म्हणेन की आपण दोघी मैत्रिणी आहोत...." यावर जान्हवी होकारार्थी मान हलविते....शरयू हसत तिला म्हणते, 'मग मी कुठे गेले होते ते कुणाला सांगू नकोस,,," जान्हवी तिला प्रत्युत्तर करते, "जर मी मैत्रिण आहे तर मग तुमच्या संदर्भात मी किंवा तुम्ही खोटे का बोलायचे ? तुम्ही सरळसरळ घरातील सर्वांना सांगून टाका ना कुठे आणि कुणाला तुम्ही भेटला...!" शरयू सारे काही दमाने घेऊ असाच पवित्रा घेते...तोपर्यंत जान्हवीची सासू पूजेचे साहित्य घेऊन बाहेर येतात आणि रांगोळी जणू काही शरयूनेच काढली असे समजून तिचे कौतुक करतात.

नंतर तिन्ही सासवा, मावशी देवघरात जान्हवीला बोलावितात आणि हसतमुखाने तिच्या हातात एक दागिन्याचा डबा देतात व उघडायला सांगतात.... तो डबा सोन्याच्या अलंकारांनी भरलेला असतो. जान्हवी ते दागिने पाहून थक्कच होते.....सासू तिला सांगतात, "गोखल्यांच्या परंपरेनुसार दिवाळीसणाला नवीन आलेल्या सूनेला हे दागिने देण्याचा प्रघात आहे...त्यामुळे हे सारे दागिने तुझे आहेत...तू घे."

http://www.loksatta.com/manoranja-news/honar-sun-mi-shri-chya-ghar-chi-2...

"होणार सून मी या घरची' या मालिकेद्वारे घराघरांत पोहोचलेले श्री आणि जान्हवी म्हणजेच शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान प्रत्यक्षातही लग्नाचा विचार करीत आहेत. इतकेच नव्हे, तर त्यांच्या साखरपुडय़ाबद्दलची प्राथमिक बोलणीही झाल्याचे समजते."

हे too much होईल! पण मला वाटते तेजश्री प्रधानची engagement झाल्येय कोणा दुसऱ्याच मुलाबरोबर.

हो राहुल डोंगरे म्हणून कोणीतरी आहे की. मलाही खरं तसंच वाटलं त्यांची केमिस्ट्री खरंच इतकी छान जुळलीये. Happy

हो राहुल डोंगरे म्हणून कोणीतरी आहे की. मलाही खरं तसंच वाटलं त्यांची केमिस्ट्री खरंच इतकी छान जुळलीये. Happy

श्री आणि जान्हवी चे लग्न झाले (TV var) त्या दिवशी 'ABP माझा' वर त्यांची मुलाखत झाली होती. त्यातही मुलाखत काराने काही प्रश्न विचारले होते त्याचा रोख असाच होता की - खर्या आयुष्यात पण काहीतरी शिजात आहे त्यांच्या दोघात. त्यांची शिताफीने तो प्रश्न टाळला होता - तेव्हाच काहीतरी खटकले. त्या डोंगरे च्या थोपु वर बघा - status update - "My heart will never be same" तत्सम काहीतरी.

Pages