नवीन मालिका-"होणार सून मी या घरची"

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46

Tejashree-Pradhan-Shashank-Ketkar-Honaar-Suun-Mee-Hyaa-Gharchi-Cast.jpg

झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'

इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या.... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

होय मुग्धा.... तिथे मला समजले हजर असलेल्या मुलींच्या बोलण्यावरून की तूही 'मल्टीस्पाईस' गटगला येणार होतीस. वाटही पाहात होत्या त्या.....आली असतीस तर सर्वांच्याच दंग्यात सामीलही झाली असतीस हसत हसत.

@ मधुरा.... माझी प्रकृती आता छान आहे....खाण्याच्या संदर्भात काही पथ्ये पाळणे गरजेचे आहेच तरीही....ती पाळतो.

होय भरत.... मीच देणार आहे. पण आलोय कोल्हापूरात आज दुपारी....थोडीफार घरातील कामेही होती, त्यामुळे वृत्तांत काम रखडले....ते आज रात्री पूर्ण करतो. गटगची आगळी मजाच असते हे बाकी खरेच. खूप समाधान झाले मला....माझ्या वयाच्या निम्मानेही ही मुलेमुली नव्हती.....खर्‍या अर्थाने भाचेभाच्या शोभत होती. सीनिअर आम्ही चौघेच होतो.

Lol
असो!

सोमवार दि. २ डिसेंबर २०१३ : अपडेट

~ सर्वप्रथम गेल्या तीनचार भागांचे अपडेट देणार्‍या मुग्धा रानडे, भरत मयेकर आणि सोनाली यांचे मनःपूर्वक आभार....आजच्या भागापासून मी पुन्हा ते काम सुरू करीत आहे.

आजच्या भागाचे एक चांगले वैशिष्ठ्य म्हणजे आम्हाला लग्नापूर्वीची हसरीनाचरी आणि सदैव दिलखुष दिसणारी जान्हवी दिसली आणि मन एकदम प्रसन्न होऊन गेले. आजपासून तिची नोकरी सुरू काय झाली आणि तिला जुन्या दिवसांची याद अगदी उमाळ्याने भेटली....ती आनंदित होऊन गेली. गीतासमवेत कामाबरोबरीने गप्पाही झाल्या आणि सायंकाळी नवरा बस स्टॉपवर कधी भेटतोय आणि त्याला किती सांगू असे तिला होऊन जाते.

पण त्या अगोदर श्री आपल्या ऑफिसमध्ये नोकरीवर आलेल्या नंदन शिपायाला 'तुला आईआजीने घरी का बोलाविले होते ?" असे विचारतो. नंदन बावचाळून जातो....त्याला नेमके खरे किती आणि खोटे किती सांगायचे हा प्रश्न पडतो. श्री त्याची धांदल पाहतो.....नंदन सांगत असलेली विधाने परतपरत तपासतो आणि तो काहीतरी लपवत आहे हे तो ओळखतो....पण तोही जास्त खोलात जात नाही. नंदनने आपल्या परीने त्याच्या खोटेपणावर पांघरून घातले आहे. दोघांचा संवाद 'सत्य आणि असत्य यांचे महत्व' यावर असते, त्यावर एकांतात विचार करताना श्री जाणतो की आपण जान्हवीच्या आईला दिलेल्या ५० हजार रुपयांची बातमी केव्हा ना केव्हा तरी जान्हवीला कळणारच आणि त्यावेळी होणारे संभावीत भांडण टाळायचे असेल तर तिला वेळीच ते सांगणे गरजेचे आहे असा तो निर्णय घेतो.

इकडे गोकुळ बंगल्यावर त्या बेबीआत्याचा ठरलेला आगावूपणा दाखविला गेलाच. सरस्वती मावशी देवपूजा करीत बसली आहे तर तिथे ही आत्या येते आणि "ती शरयू एक वेडी तर तूही कशी काय ?" असा विचित्र प्रश्न विचारल्यावर सरसूही कोड्यात पडते. ती "काय झाले ?" असे साधेपणाने विचारते तर बेबीआत्या 'तुम्ही दोघींनी तिला नोकरीवर जाताना का ओवाळले ?" असला चिडीचा प्रश्न विचारते. मावशी म्हणते, "अहो, आपला श्री जसा पहिल्यांदा कामावर गेला, त्यावेळीही आम्ही ओवाळलेच ना !" यावर 'ही काही पहिल्यांदा जात नव्हती. तिला ओवाळायचे का नाही हा तुमचा प्रश्न आहे....पण यातून काही चांगले निष्पण्ण होणार नाही...हे लक्षात ठेवा..." असे म्हणत फणकार्‍यात देवघरातून निघून जाते. बेबीआत्या म्हणजे सर्वार्थाने डोकेदुखी पात्र आहे.

बॅन्केत जान्हवी व गीता बोलत बसल्या आहेत. काम करता करता जान्हवी आपल्या आईवडिलांना चाळ सोडावी लागत असल्याची बातमी सांगते. त्यावर गीता आपल्या बहिणीचा फ्लॅट ज्या सोसायटीमध्ये आहे तिथे आपण जाऊ असे सांगते. बहिणीच्या नवर्‍याची बदली बंगलोरला झाली असल्याने तो फ्लॅट रिकामाच आहे. "तो मी तुझ्या आईवडिलांसाठी देऊ शकते" असे गीताने सांगताच जान्हवीला एक मोठे ओझे उरावरून कमी झाल्यासारखे वाटते व ती गीताचे आभार मानते. सायंकाळी बॅन्केतून घरी जाण्यासाठी जुन्या सवयीप्रमाणे जान्हवी बस स्टॉपवर बसची वाट पाहात उभी राहते व तिथूनच श्री ला फोन करते...फोनवर बोलताना ती खूपच उल्हसित आहे आणि 'आज सकाळपासून सार्‍या गोष्टी माझ्या मनासारख्या होत चालल्या आहेत.....याचा आनंद तर होत आहेच, पण तू कधी भेटशील असे झाले आहे. तू घरी लवकर जा, मी पाठोपाठ येतेच' असेही सांगते....पण बसेसची फ्रीक्वेन्सी कमी असल्याने बस येतच नाही याबद्दल ती नाराजही आहे. फोन बंद करते आणि तिच्यासमोरच बसस्टॉपच्या मागे श्री आपली कार थांबवतो आणि खाली उतरून तिच्यासमोर येतो.....आपल्या प्रिय नवर्‍याला पाहून जान्हवीला आश्चर्यमिश्रीत आनंद होतो व ती बर्‍याच दिवसांनी खळखळून हसते. श्री देखील तिच्या फुललेल्या आनंदात सामील होतो....इथला खेळकर संवाद दिग्दर्शकाने चांगलाच रंगविला असून लग्नापूर्वीची उत्साहाने डंवरलेली जान्हवी दिसते. मध्येच गंभीर होऊन श्री म्हणतो, "जान्हवी आता आपण घरी जाऊ....तिथे मी तुला तुझ्या घरातील लोकाविषयी काहीतरी सांगणार आहे...." यावर जान्हवीच्या चेहर्‍यावरून तो आनंद परत पुसला जातो.

सहस्त्रबुद्धे यांच्या घरात शशीकलाबाई ५० हजाराच्या नोटाचा गठ्ठा एका कागदात गुंडाळून छोट्याशा पत्र्याच्या डब्यात ठेवतात आणि तो डबा झाकून लाकडी पेटीत ठेवत असताना सदाशिवराव तिथे येतात. पण त्याना नोटा दिसत नाहीत. पतीपत्नीचा नित्याचा संवाद सुरू होतो....कलाबाई आपल्या नशिबाला दोष देत राहतात, तर सदाशिवराव भावविरहीत चेहर्‍याने घराविषयीच्या फाईल्स चाळत बसतात. पेटीतील कलाबाईच्या डब्याला सदाशिवरावांचा हात लागताच लगबगीने बाई पुढे येतात आणि तो डबा सदाशिवरावांच्या हातातून काढून घेतात व कॉटखाली लपवून ठेवतात. "मी थोडावेळ रघुअण्णांकडे जाऊन येतो...घराच्यासंदर्भात" असे सांगत ते बाहेर पडतात....तर चोरटेपणाने बाई दार लावून घेतात आणि डबा बाहेर काढून त्या नोटा मोजत बसतात आणि तोच सदाशिवराव दरवाजा ढकलून आत येतात....अंथरुणावरील हजाराच्या नोटा पाहून ते चक्रावून जातात. या गोंधळाविषयी उद्याच्या भागात.

मामा मस्तच. त्या बिचाऱ्या नंदनचे वाईट वाटते, श्रीने त्याचे खोटे नाव घेतले ते मला अजिबातच आवडले नाही, आजी करणारचना सोक्ष-मोक्ष. आज बँकेतला शॉट बघितला, तिघांनी छान काम केले आहे.

सर्वप्रथम गेल्या तीनचार भागांचे अपडेट देणार्‍या मुग्धा रानडे, भरत मयेकर आणि सोनाली यांचे मनःपूर्वक आभार....>>>>> मामा, भाची म्हणुन जवळ करता आणि आभार मानुन दूर लोटता होय? रागवेन हां मी?
जौद्या, नाही रागवत गटगचा वृत्तांत लिहा आणि जमल्यास फोटु पण डकवा हिथ.... Happy

गटगचा वृत्तांत लिहा आणि जमल्यास फोटु पण डकवा हिथ....>>> हो लवकर लिहा काय काय मज्जा केलि ते . Happy

मामा, आले... Happy
मधले वृत्तांतही भाचे-भाच्यांनी छानच दिले होते.
एकुणात मलिका बर्‍यापैकी वहातेय... कधी बादलीभर पाणी फस्सकन ओतल्यासारखी, कधी छान शिंपण केल्यासारखी आणि कधी टिपिक टिपिक गळत्या नळा सारखी.

कसलं पकवलं काल जान्हवीने.... स्पेशली ते बसस्टॉपवरती खोटं खोटं हसणं ...श्री श्री करुन लहान मुलासारखं लाडं लाडं बोलणं......
बोलताना पण कित्ती नाटकी बोलत होती..
पुर्वी ती अशी बोलायची नाही.. आताशा वाढलंय नाटकी बोलणं असं वाटत नाहीये का इथे कुणाला?

स्वप्ने तू ये गं बाई आता इथे!
सगळंच गोड गोड आहे इथे.. मालिका पुर्वीसारखी राहिली नाही... पांच्ट्ट्ट्ट्ट करुन टाकलय पार!
आपके फोडणीकी जरुरत है Proud Wink

स्वप्ने तू ये गं बाई आता इथे!
सगळंच गोड गोड आहे इथे.. मालिका पुर्वीसारखी राहिली नाही... पांच्ट्ट्ट्ट्ट करुन टाकलय पार!
आपके फोडणीकी जरुरत है >>> रिये तुने मेरे दीलकी बात छीन ली

रीया +१

आताशा खुपच नाटकी झालंय वागणं..

आणी ते "श्री.. तूपण ना../ काहीतरीच हा तुझं" असं काहीतरी बोलते ते पण डोक्यात जातं..

स्वप्नामैय्या ही मालिका बघते का?

आणी ते "श्री.. तूपण ना../ काहीतरीच हा तुझं" असं काहीतरी बोलते ते पण डोक्यात जातं..
>>
नाही तर काय.
मला हा मुद्दा पण लिहायचा होता पण कित्ती कित्ती वाईट बोलावं एखाद्या बाबत? Proud
म्हणून गप्प बसले Wink

नताशा, मैने अपने दिल की बात पण घाबरत घाबरत टाईपली Wink
न जाणो हे मामा, भाचीज् एकदम एकसाथ भडकले माझ्यावर तर Wink

मामा, आले <<< दाद घाबरले ना! मालिकेतील मामा आलेत परत असं वाटल मला Happy

अशोक मामा आले... Happy

रिया अनुमोदन तुला. बसस्टॉपवरचा तिचा अभिनय डोक्यात गेला.
कायम सोज्वळ आणि घरगुती ते सगळं चांगलं आणि मॉडर्न ते वाईट असंच दाखवण्याचा प्रयत्न असतो या सिरियलवाल्यांचा. जान्हवी ला दाखवायचं होतं मॉड. आधी आईवडिलांचं घर चालवणारी मुलगी दाखवली ती ही सोज्वळ. खरंतर अशा मुली जाम डॅशिंग असतात असं मी पाहिलेलं आहे. पण सिरियल मध्ये मात्र सगळं काकूबाई दाखवतात. Angry
मोठी हो असा आशिर्वाद दिला तरच ही मोठी होणार आहे जणू.
अ‍ॅक्चूली त्यांनी (बुद्धिने) मोठी हो असा आशिर्वाद दिला असेल. Proud

कायम सोज्वळ आणि घरगुती ते सगळं चांगलं आणि मॉडर्न ते वाईट असंच दाखवण्याचा प्रयत्न असतो या सिरियलवाल्यांचा. >> दक्षे.. अनुमोदन..

पण सिरियल मध्ये मात्र सगळं काकूबाई दाखवतात. >> इथे सिरियलमध्ये "लग्नानंतर" सगळं काकुबाई दाखवतात असं म्हणेन. राधाबावरी, मंजिरी आणि जान्हवी आपल्या डोळ्यासमोर लग्न झाल्यावर एका रात्रीत काकुबाईमध्ये कनव्हर्ट झालेल्या पाहिल्या आपण.. Sad

कायम सोज्वळ आणि घरगुती ते सगळं चांगलं आणि मॉडर्न ते वाईट असंच दाखवण्याचा प्रयत्न असतो या सिरियलवाल्यांचा. जान्हवी ला दाखवायचं होतं मॉड. आधी आईवडिलांचं घर चालवणारी मुलगी दाखवली ती ही सोज्वळ. खरंतर अशा मुली जाम डॅशिंग असतात असं मी पाहिलेलं आहे. पण सिरियल मध्ये मात्र सगळं काकूबाई दाखवतात. +११११
हि सिरीयाल आवडायची पण हि एक गोष्ट कायम खटकते. जर का एखादी मुलगी स्वतः निर्णय घेणारी, समर्थ, घराची आई वडिलांची जबाबदारी घेणारी, नोकरीत येणाऱ्या आडचणीना सामोरी जाणारी असेल तर एका दिवसात लग्न झाल्याबरोबर एकदम कशी बदलते

ज्यांच्या डोक्यात जाते त्यांनी मालिका बघू नका. मालिका बघितलीत तर इकडे लिहू नका. इकडे लिहिल्यामुळे मालिका किंवा त्यातल्या पात्रांचं तुमच्या डोक्यात जाणं थांबणार नाहीये Proud

रिया...एकदम मनातल बोललीस....मी कालचा भाग नाही बघितला , पण तीचे बोलणे खरोखर खूप नाटकी वाटते. दिसते छान पण हसते ते खोटं वाटतं.
आधी आईवडिलांचं घर चालवणारी मुलगी दाखवली ती ही सोज्वळ. खरंतर अशा मुली जाम डॅशिंग असतात असं मी पाहिलेलं आहे.> दक्षिणा, अग अस नाही, अ‍ॅक्चुअली सिरीयलवाल्यांच्या मते बावळट म्हणजे सोज्वळ असत.
अती हुशार दाखवू नका , पण निदान बेसीक कॉमन सेन्स तरी असु दे.

नवीन धागा सुरु करायचे प्रयोजन कळले नाही.

>>>
२००० पोस्टी झाल्या की नविन धागा सुरु करायचा असतो!
अ‍ॅडमिनने सांगण्याआधीच जुजा माबोकरणी सरसावल्या Proud

मामांच्या गैरहजेरीत सगळेच उत्साहाने मस्त अपडेट्स देत होते . गेले दोन दिवस बघायचं चुकलंच Happy पण अपडेट्स वाचता आले Happy

Pages