नवीन मालिका-"होणार सून मी या घरची"

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46

Tejashree-Pradhan-Shashank-Ketkar-Honaar-Suun-Mee-Hyaa-Gharchi-Cast.jpg

झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'

इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या.... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आतच फेसबुक वर पहिला.. आजीला श्री परत आणतोच.. काही नवीन पाहण्याची अपेक्षा आहे... तीच सासू सुनाची भांडण .. लावा लावी करत .. नको बाबा ... वैताग आलाय तेच तेच पाहून.. तुम्हा सर्वन बरोबर लिंक शेअर करत आहे... (function(d, s, id) { var js, fjs = d.getElementsByTagName(s)[0]; if (d.getElementById(id)) return; js = d.createElement(s); js.id = id; js.src = "//connect.facebook.net/en_US/all.js#xfbml=1"; fjs.parentNode.insertBefore(js, fjs); }(document, 'script', 'facebook-jssdk'));
Post by Zee Marathi Honaar Suun Me Hya Gharchi.

सोना....जरूर म्हण....मला तर उलटपक्षी ते संबोधन खूपच भावते.....पण या धाग्यातील चर्चेत अवश्य भाग घेत राहा. माझीच नव्हे तर अन्य सदस्यांशीही तुझी छान ओळख होऊन जाईल या निमित्ताने.

धन्यवाद .. अशोक मामा.. थोड type करायला अवघड जातंय मला.. सवय नाही ना... पण नक्कीच आवडेल तुमच्या कुटुंबात सहभाग करायला.. Happy

शनिवार दि.२६ आक्टोबर २०१३ : अपडेट

~ रडारडीचा मागील अंकावरून पुढे चालू भाग. आजतर रडण्याची टेपेची सुरुवातच श्रीरंग गोखल्यांनी केली अन् तीही जान्हवीच्या समोर....म्हणजे तिनेही त्याच्याही पेक्षा मोठा गळा काढला आणि मग दोघेही 'आईआज्जी आईआज्जी...." करीत बसले त्या गादीवर.... श्री ला तर इतका जोराचा हुंदका आला की तो लहान मुलासारख्या जानव्हीच्या कुशीत जाऊन झोपलाच ! काय करावे यांच्या लहानपणाच्या चित्राला ? मी आजीशिवाय कसा राहू म्हणणारा वीर.... एका मोठ्या उद्योग संस्थानाचा मालक आहे म्हणे.... शिवाय इंग्लंडला जाऊन ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची एम.बी.ए.ची डीग्रीदेखील घेतली आहे.... मग असा हा पूर्णत्वाला पोचलेला युवक आजी सर्वांना सांगून घराबाहेर पडल्याची बातमी माहीत असूनदेखील जगातील सर्वात मोठे संकट आपल्यावरच कोसळले आहे असे कसे दाखवित आहे ?

याची ही तर्‍हा तर घरी बेबीआत्याची दुसरीच. शरयू तिला मिनतवार्‍या करून सांगत आहे की 'जान्हवीविषयी मन कलुषीत करून घेऊ नका....आजी बाहेर पडल्या त्या श्री त्यांच्याशी भांडला म्हणून....त्यात जान्हवी बिचारीचा काय दोष ?" पण नाही, ही बेबीआत्या जान्हवीवर दात खाऊनच बोलत असते...."आपल्या घरातील कुणालाच लग्नाचे सुख नाही...निदान श्री आणि जान्हवीला तरी ते लाभू देऊ या..." असा छान युक्तीवाद शरयू मांडते, पण बेबीआत्याच्या चेहर्‍यावरील एक सुरकूतीदेखील इकडे का तिकडे होत नाही.

स्वयंपाकघरात दोन्ही सासवा गाल फुगवून बसल्या आहेत....पण श्री ने जान्हवीला यांच्याशी कसे वागावे याबदल युक्तीच्या चार गोष्टी सांगितल्या असल्याने त्या ध्यानी ठेवून जान्हवी तिथे येते आणि "मी चहा करते सार्‍यांसाठी..." असे स्मितहास्य करून म्हणते. त्या हास्याला केवळ सरस्वती मावशी हसून उत्तर देतात तर मोठी आई 'नको...मी करते चहा..." असे म्हटल्यावर मावशी चिडून त्याना म्हणते, "अहो तुम्ही चहा करणार मग जान्हवी काय विष करणार आहे का ? करू दे ना तिला..." यावर ह्या सासवा चूप होतात आणि मग जान्हवी खुश होऊन चहा करायला जाते तिला मावशी अगदी उल्हसीत चेहर्‍याने मदतही करतात.

थोड्यावेळाने टेबलवर बेबीआत्या सोडून सारे चहापानासाठी येतात....श्री देखील येतो.... चहा जान्हवीने केला आहे हे कळाल्यावर त्याला अर्थातच आनंद होतो....त्याना मोकळेपणाने बोलता यावे म्हणून शरयू अन्य स्त्रियांना तिथून युक्तीने स्वयंपाकघरात घेऊन जाते..... जान्हवी प्रथमच श्री बरोबर अगदी हसत बोलत राहते.

अशोक मामा मस्त अपडेटस..
बेबी आत्या खरोखर फार stubborn आहे. शरयू आणि मावशी या दोघीच समंजस आहेत.

अशोक मामा! अपडेट्स साठी खूप खूप धन्यवाद! तुम्ही इतक्या आवर्जून पाहता आणि सुरेख अपडेट देता म्हणूनच या मालिकेतला इंटरेस्ट टिकून राहिला आहे अजून!

जिज्ञासा..... एक गोष्ट प्रामाणिकपणे मी कबूल करतो ती ही की....मी फार मन लावून ही मालिका पाहतो, एवढ्यासाठी की वाटत असते ह्या जोडीचे भले व्हावे शेवटी....कारण गोखले घराण्याला शापच आहे लग्ने न टिकण्याचा. त्यातही तुम्ही भाच्यांनीदेखील ह्या चर्चेत मनापासून सहभाग घेतल्याचे दिसते....तीही बाजू आहेच.

शेवटी अपडेट अपडेट म्हणजे तरी काय असते ? तर पाहिलेले भाग योग्य शब्दात आणि मर्यादेत बांधणे इतकेच.

शेवटच्या भागातले काही प्रसंग आवडले.. श्री जान्हवीला समजावतो की फक्त प्रेम करायच, काय मिळतय, किती त्रास होतोय ते नाही बघायच; डायनिंग टेबलच्या बाजूचा शरऊ बरबरोबरचा आणि शरयू बेबीला सुनवते तो पण.

बाकी नुसत पाणी घालतात ते कंटाळवाण होत.. खास करुन वाक्य रिपिट करायच..
अजुनही या मालिकेला नेहमीच्या सास बहु किंवा काही वेगळ्या पध्धतीने जायला वाव.. कशी जातिये ते बघुया.

पण एक मात्र नक्की.. या एवढ्या मोठ्या घरातल्या सगळ्या सुना/मुली, जिथे सासु/आई ऑफिसच काम बघते, फक्त घरी बसुन श्री साठी चहा करा, त्याची रुम आवरा एवढच करताच ते बघायला वाईट वाटत..

मराठी कुडी ~

मुळात या सासवा काय आत्या काय किंवा ती मावशी काय.... सार्‍याच "संसारसुखा" ला पारख्या झालेल्या स्त्रिया आहेत.... कुणाचा नवरा घर सोडून गेला आहे, कोण विधवा आहे...एकीच्या नवर्‍याला व्यसनामुळे घरी प्रवेश नाही, आत्याच्या नवर्‍याने तिला टाकले आहे तर मावशी कायमस्वरूपी अविवाहित आहे.... म्हणजेच यांच्या वैयक्तिक दु:खात त्या इतक्या बुडालेल्या आहेत की त्याचमुळे त्या आपले मन घरातील कामातच गुंतवित आहेत.

शरयूच अशी एक स्त्री आहे की जिला आपल्या सार्‍यांच्या वाट्याला ज्या वेदना आल्या आहेत त्या या नवीन सून जान्हवीच्या वाट्याला येऊ नयेत असेच वाटते.

पन्नाशीच्या बायांचं पालकत्व कुणीतरी दुस र्‍याने घ्यायला लागतं हेच दुर्दै वी वाटतं मला. आजकाल तीशी ते
साठीतल्या कितीतरी केपेबल बायका फॉ र्च्युन ५०० आणि तत्सम कंपन्या रन करत आहेत. समाजकार्य, संशोधन, कला विषयात चरम अचिवमेंट्स करत आहेत आणि बायकांसमोर आपण हे आदर्श ठेवतो?

पटत नाही.

श्री लगेच ऑफिसला जायला निघाला दुसर्‍या दिवशी Sad जान्हवीची अजून सुट्टी दिसतेय Proud
कृपया तिनेही नोकरी सोडू नये म्हणजे मिळवले.

कृपया तिनेही नोकरी सोडू नये म्हणजे मिळवले.>>>
mhanaali tar aahe ki join honar ahe mhanun.... aasha aahe ki tine nokari sodlyacha dakhavnar nahit.. loan pan phedaycha aahe na tila.. te visaroon gelyasarkha hoil na mag..

अश्विनीमामी, अगदी बरोबर बोललात.
अशोकमामा (चालेल ना मामा म्हटल तर?), त्या स्त्रियांच्या आयुष्यात दु:ख आहे हे खर आणि सगळ्याच्या सगळ्या बायका फक्त श्री मध्ये सुख शोधतात हे बरोबर वाटत नाही. मुलांच्यात गुंतण ठीक आहे पण ह्यांची लेव्हल अनहेल्दी वाटते. आणि ती पण सगळ्या बायकांची एकच स्थिती.. एकीची किंवा दोघिंची अस नाही..

मराठी कुडी..... 'मामा' जरूर चालेल, आवडेलही.

लेव्हल केवळ अनहेल्दीच नव्हे तर अत्यंत बालीश वाटते. काल जान्हवी या सासवांसाठी "मी चहा करू का ?" या सरळसाध्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी एकमेकाच्याच चेहर्‍याकडे असे काही पाहतात की घरात आता जणू काही आकाशच कोसळले. आपल्या या असल्या येड्या वर्तनाने काल घरात आलेल्या सुनेला किती वेदना होत असतील याची थोडीशीही कल्पना या करू शकत नाहीत ? तरीदेखील सरस्वती मावशी म्हणते ते बरोबरच होते, "ताई, जान्हवी चहा देऊ का ? असे विचारत आहे....विष नव्हे !" तेव्हा मात्र सासू काहीशी ताळ्यावर येते.

किती रडवत आहेत त्या जान्हवीला ! आता श्री कमी पडला होता म्हणून तोही केजी मधील मुलासमान रडत आहेच. शहराचे डी.एस.पी. याच्या चांगल्या परिचयाचे आहेत....का करू नये याने त्याना एक फोन...आजीसाठी?

काल झी मराठी अवार्डस् पाहिले, कोणताहि कलाकार मनोगत व्यक्त करत नव्हता rather त्याना तस विचारलही जात नव्हत्,हे थोड खट्कल्,
श्री आणी जान्हवी चा डान्स सम्पुर्ण गंडला होता,तेजश्री छान नाचत होती पण shashank चा प्रयत्न कळत होता.दिपाली वीचारेची choreography वाईट होती...

सगळेच डान्स गंडलेले होते.
एकाही हिरोला धड नाचता येत नव्हतं.

खुप अवॉर्ड्स मिळाले या मालिकेला.. श्री आणि जान्हवी दोघेही त्यांच्या मालिकेतल्या व्यक्तिमत्वाप्रमाणेच वाटत होते...

हो श्री ला अजिबात नाचता येत नव्हते ... शाळेत लेझीम खेलतोय असे काय तरि वाटत होते...पण श्री आणि जान्हवी आवडतात ना म्हनुन बघावे लागले.

शाहिर.... ओके....सूचनेचा जरूर विचार करतो.

बाकीच्या सदस्यांसाठी ~ श्री आणि जान्हवी या दोघांना झी२४ तासच्या एका कार्यक्रमात चर्चेसाठी बोलाविले होते. तिथे त्यानी झी अवॉर्डस नृत्याबाबत आपले विचार मांडताना दर्शकांना स्पष्टच सांगून टाकले होते की त्यांच्यापासून चांगल्या नृत्याची अजिबात अपेक्षा ठेवू नका....दोघानांही त्या कलेत निष्णातपणा अद्यापि मिळवायचा आहे.

त्यामुळे एक श्रृती मराठे सोडल्यास शास्त्रीय वा क्लब डान्सची कुणाकडून आपणच अपेक्षा न ठेवलेली बरी असे वाटते.

अशोक मामा,मान्य आहे कि ती दोघेहि नृत्यकलेत निष्णात नाहित्,ते आपण एकवेळ समजु शकतो,पण दिपाली वीचारेची ला तर माहित होत ना,मग हस होइल अश्या steps द्यायला नको होत्या,गाण्याची पण निवड चुकिची होती.

शाहिरला अनुमोदन
मामा आयडी बदलाच. म्हणजे सगळेच तुम्हाला आपोआप मामा म्हणायला लागतील. Happy

अगं दक्षे..... तू म्हणतेस ना ? मग सारी दुनिया मला मामा म्हणेलच..... मग आयडी हा असला का किंवा दुसरा असला !!! कुछ फ़र्क नही पडता, लाडली बेटी.

सोमवार २८ आक्टोबर २०१३ : अपडेट

~ सुरेख. आज जवळपास एका आठवड्याच्या दीर्घ कालावधीनंतर गोखल्यांच्या घरात हास्याच्या मुद्रा दिसल्या. आजी नाहीत हे मान्य केले आणि नशीब चांगले की बेबीआत्याही नव्हत्या. त्यामुळे तीन सासवा आणि मावशी यांच्या प्रेमात आज जान्हवी भिजून चिंब झाली. श्री ने याना जिंकून कसे घ्यायचे याची युक्ती सांगितल्याने जान्हवी अगदी आपुलकीने स्वयंपाकघरात कामाला, मदतीला होती. श्री ऑफिसला जाण्यापूर्वी स्वयंपाकघरात आला, त्याच्यासाठी दोन्ही आयांनी नाष्टा चहा तर आणलाच पण त्याच दोघींनी आग्रहाने जान्हवीला देखील पोहे चहा आणला...जान्हवी खूष, श्री ही खूष; पण जान्हवी म्हणते, "मी आता नाष्टा करणार नाही, तुम्हा सर्वांच्यासमवेतच करते..." तिची ही भूमिका सर्व स्त्रियांना आवडते. अशाप्रकारे ती ही बाजू जिंकत आहे. फक्त बेबीआत्याला आपलेसे करायचे आहे तिला.

इकडे आज सहस्त्रबुद्धे यांच्या घरात.... अजून शशीकलाबाई अंगदुखीची तक्रार करीत बसल्या आहेतच तर नीळकंठमामा चकटमे फुकट कुठे आणि कसे मिळवायचे याचे बार भरत भसला आहे. पिंट्या चहा करीत आहे, तर त्याला चहासाखर सापडत नाही. शिवाय वडिलांना घेऊन दवाखान्यात जायचे आहे, तर रिक्षासाठी यांच्याकडे पैसे नाहीत. आई म्हणाणारी बाई म्हणते, माझ्याकडे नाहीत. मी काही जानूसारखी मिळवती बाई नाही. सदाशिवराव वैतगाने दवाखान्यातच जायला नको म्हणत आहेत आणि मामा सारी मजा बघत बहिणाला म्हणत आहेत, "आपण कुठेतरी फुकट आज जेवायला जाऊ या..." यावर ती महान विचाराची बहीण म्हणते, "कुठेतरी कशाला ? आज जान्हवीकडेच जाऊ, तिथे साजुक तुपातील जेवण मिळेल...". हा संवाद ऐकून सदाशिवराव चिडतात आणि परत जान्हवीचे नाव काढायचे नाही अशी सक्त ताकीद देतात. भाऊ पिंट्या मात्र एकटा बहिणीला भेटायला गोखल्यांच्या बंगल्यात येतो. त्याचे शरयू आणि मावशी चांगले स्वागत तर करतातच शिवाय जान्हवीच्या खोलीत त्याला घेऊन येतात, त्याच्या चहा फराळाचीही सोय करतात. त्या दोघांना बोलायला सोडून त्या खाली येतात. पिंट्याला ते सारे पाहून सदगदीत झाल्यासारखे होते. जान्हवीदेखील भावाला पाहून डोळ्यात पाणी काढते. [भावाबहिणींचा संवाद छान रंगविला आहे.] बहीण या तशा काहीशा भरकटलेल्या भावाला शहाणपणाच्या दोनचार गोष्टी सांगतेही. पिंट्या "मी बाबाना घेऊन दवाखान्यात चाललो आहे, पण रिक्षासाठी माझ्याकडे पैसे नाही..." असे खाली मान घालून सांगतो, त्यावर जान्हवी समजूतदारपणे उठते आणि तिजोरातून पर्स आणून पिंट्याला पैसे देते.

श्री ऑफिसमध्ये बसला आहे.....नंदन त्याला घराबद्दल विचारतो....तेवढ्यात श्री ने ज्यांच्याकडे आईआज्जीच्या चौकशीचे काम दिलेले असते त्यांच्यापैकी एकाचा फोन येतो.... श्री फोनवरून बोलताबोलता एक पत्ता लिहून घेतो....आणि लागलीच कारने त्या पत्त्यावर जाऊन पोहोचतो. त्या घराचे नाव असते "आश्रय". गेटमधून आत येतो....मुख्य दरवाजा उघडतो आणि समोरच आजी बसलेल्या त्याला दिसतात. आता उद्याच्या भागात आजी त्याच्याबरोबर "गोकुळ" ला परत येतील अशी आशा करायला जागा आहे.

पिंट्या खरंच चांगला भाऊ आहे, पण जान्हावीचे बाबा खरंच त्याच्याबाबतीत थोडा अन्याय करतायत, त्याचे थोडे कौतुक केले, त्याला प्रेम दिले आणि समजावले तर तोसुद्धा मार्गाला लागेल. पिंट्याचे काम करणारा कलाकार माझे मन तुझे झाले या मालिकेतपण नायकाचा भाऊ दाखवलाय, फुटबाल प्लेयर दाखवलाय.

मी लग्न मिस केला आणि त्यानंतर मालिका बघायचा मूड्च गेला. मामांचे आजचे अप डेट्स बघुन परत बघायला सुरुवात करावी का??

मालिका बघायचं थांबवलय कधीच...
अशोकमामांच्या अपडेट्सची चटक इथे आल्याशिवाय काही भागत नाही...

Pages