नवीन मालिका-"होणार सून मी या घरची"

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46

Tejashree-Pradhan-Shashank-Ketkar-Honaar-Suun-Mee-Hyaa-Gharchi-Cast.jpg

झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'

इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या.... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार!! मी सानिका. मला तुमच्या गप्पा फार आवडतात. म्हणून तुमच्या गप्पात सहभागी होण्यासाठी मी मायबोली ची सदस्य झाले ......मी सुद्द्धा ही मालिका रोज बघते. Happy

मी सानिका. मला तुमच्या गप्पा फार आवडतात. म्हणून तुमच्या गप्पात सहभागी होण्यासाठी मी मायबोली ची सदस्य झाले ......

>> स्वागत सानिका.. Happy

मिरचीने दिलेल्या लिंकमधे सगळेच चांगले बोललेत, अगदी भरभरुन की काय म्हणतात तस मालिकेबद्दल. मंदार देवस्थळी खुपच आश्वासक वाटले. Happy

सानिका स्वागत..... चर्चेतदेखील अवश्य भाग घेत राहा.... मजा येईल, सार्‍यांनाच.

शुभांगी....

त्या चर्चेत मंदार देवस्थळी यानी एका रेल्वे स्टेशनवर जान्हवीचा भाऊ पिंट्या ह्याला दोन स्त्रियांचा आलेला अनुभव अक्षरशः डोळ्यात पाणी काढणारा ठरला.

तो आपल्या मित्राबरोबर फोनवर बोलत होता....नेहमीच्या मोठ्या आवाजाच्या पद्धतीने....आणि त्याचे बोलणे झाल्यानंतर त्याला पाठीमागून दोन स्त्रियांनी हाक घातली....म्हणाल्या, "अरे तू होणार सून मी ह्या घरची मधील पिंट्या का ?"..... या प्रश्नाला उत्तर अर्थातच "हो..." असणार... पण ते देत असताना पिंट्या ह्या कलाकाराचे त्या स्त्रियांकडे लक्ष गेले आणि तो थक्कच झाला....कारण दोघीही आंधळ्या होत्या. पुढे त्याने विचारले, "तुम्हाला कसे कळाले मी तो पिंट्या ?" तर उत्तर मिळाले, "आम्हाला दिसत नाही, पण हे मालिका आम्ही ऐकतो..."

मालिका "ऐकणे".... म्हणजे मालिकेला मिळालेली एक आगळीच पावती.

मी सानिका. मला तुमच्या गप्पा फार आवडतात. म्हणून तुमच्या गप्पात सहभागी होण्यासाठी मी मायबोली ची सदस्य झाले ......

>> स्वागत सानिका.. Happy आमच्यापेक्षाही जबरी प्रतिसाद दे हां इथे..... स्वासुगम्मत तुझं

>>>> तू म्हणतेस तसा बॅगा, चपला, पर्सा, ताटातील वाट्या, पेले जाणे घडलेले पाहिले आहे....पण तो भाग किरकोळ म्हणून दुर्लक्षिला गेला जातो. <<<
अहो अशोकराव, त्या ब्यागा/पर्सान्मधेच मंगळसूत्र/राखिव दागदागिने ठेवलेले असले तर?

१९९९ की २००० साली, मेव्हण्याच्या लग्नाहून रात्री उशीरा परतल्यावर सगळे पुढील हॉल मधे झोपले होते, तिथेच ब्यागा वगैरे होते, अन सकाळी सहाचे सुमारास झुन्जुमुन्जु उजाडले असताना मुलाला दुध आणायला पाठवले, तो दरवाजा थोडा उघडाच ठेवून गेला, (घर रस्त्यालगतच आहे, दरवाजा, पुढे छोटे अंगण, कम्पाऊण्डचे फाटक अन लगेच रस्ता) नंतर तासाभरातच लक्षात आले की एक लाल ब्याग गायब झालीये जिच्यात लिम्बीचे सर्व सोनेनाणे होते. Sad फार मोठा फटका होता तो.
त्यानंतर गेल्या डिसेंबरात ३१ च्या सुमारास कोकणात गेलो असताना अशीच एक "लाल" ब्याग गाडीवरुन पडली, तिच्यातही लिम्बीचेच सोनेनाणे होते, हा फटकाही जबरी जिव्हारी लागला, मधल्या बारा वर्षात पुन्हा गुन्ज गुन्ज करीत जमवलेले एका झटक्यात गेले. चूक कुणाची दोष कुणाचा या बाता/चर्चा व्यर्थ आहेत.
(खास ज्योतिषांकरता, माझे कुंडलीमधे द्वितीयात मंगळराहू आहेत - मी खर्च नाही केला तरी जे गमावयास लागणार ते गमावलेच जाणार हे निश्चित. द्वितीयातील या ग्रहांचे वर्णन शास्त्रकारान्नी "माकडाचे हाति मोत्याची माळ" असे केले आहे Wink Proud )
असो, विषयांतराबद्दल क्षमस्व.

लिम्बूटिम्बू....

कृपया मला खरेच माफ करा....कारण तुम्हाला बसलेले दोन्ही दागिने चोरीचे फटके सहनशक्तीच्या पलिकडीलच असून त्याची भरपाई कोरड्या शब्दांनी कधीच होऊ शकत नाही. दोन्ही चोर्‍या सापडल्या नाहीत हे तर स्पष्टच आहे. त्यामुळे मि.चोर कोण होते वा कोण असू शकतील हा तर आता अंदाजी खेळच राहिला. माझा मुद्दा ह्या बाबी पडद्यावर दाखविताना दिग्दर्शकाने एकुलत्या एका भाचीचा एकुलता एक मामा चोर दाखविला. मी फार जवळून ओळखतो मामा-भाची या नात्याला. प्रत्यक्ष आईवडील करणार नाहीत इतके कोडकौतुक मामा आपल्या भाचीचे करत असतो. पण देवस्थळी यानी त्या पवित्र नात्याला अगदी जाळून टाकले.....त्या चंद्रहार प्रकरणात....त्याचाच संताप माझ्या मनी अगदी लसत होता.

अशोक, तो सावत्र मामा आहे. आईही सावत्र आहे. जान्हवीच्या वडिलांनी भागिरथीबाईंशी बोलताना जान्हवीला तिच्या जवळचा असा फक्त मीच हे सांगितले होते.

मला एकूणच जान्हवीच्या आईचे आणि मामाचे आश्चर्य वाटले. त्यांना एकदाही असे वाटले नाही का ह्या करामतींमुळे तिचे लग्न मोडू शकते.

म्हणजे तिच्या काळजीपोटी नाही तरी ती त्यांच्यासाठी "सोन्याची अंड देणारी कोंबडी" आहे.

खरेतर लग्न होईपर्यंत त्यांनी धूर्तपणा दाखवणे (मला) अपेक्षीत होते

भरत.... होय, तो सावत्रपणाचा मुद्दा माझ्या ध्यानी आहेच, तरीही ’मामा’ ह्या नात्यात फ़ार आपुलकी आहे ना... त्यामुळेच तो सारा प्रकार समजून घेणे कठीण जात आहे.

.... आणि ओये दक्षे.... नक्को नक्को काका.....’मामा’ च म्हण.... अगदी आपल्या कोल्हापुरी उसासारखी गोड वाटते ती हाक.

मामा सावत्र असो वा सख्खा, मामा चित्रपट किंवा मालिकेत व्हिलन म्हणून दाखवतात, मलापण हे खटकते, मला मामा नाही पण माझा सख्खा भाऊ माझ्या मुलासाठी आणि बहिणीच्या मुलीसाठी आम्हा आईवडिलांपेक्षा जास्त करतो अतिशय जिव्हाळ्याने. असा अनुभव बऱ्याच जणांना असेल, त्यामुळे अशा सर्व मामांना सलाम.

तुझे म्हणणे मला पटते....व्हिलनच्याबाबतीत. पण आज ही मालिका महाराष्ट्राच्या घराघरात गेली आहे आणि त्यांच्याकडे कुणी 'मामा' म्हणून आले तर त्या घरातील लहान मुले जर 'हा' मामा म्हणजेच 'तो' मामा असे काहीबाही बडबडू लागली तर लागली वाटच.

तुला मामा नाही असे तू म्हणतेस आणि मी आठ मुलामुलींचा सख्खा मामा....एकुलता एक... आहे. शिवाय आश्चर्य वाटेल पण खुद्द इथे मायबोलीवर मला डझनावरी भाच्या आणि भाचे भेटले आहेत [त्यात तूही आहेसच असे समज....] जे मला मामा असे आदरार्थी पुकारतात. ही नात्याची बंधने हवीहवीशी वाटतात...कसलीही देवाणघेवाण न करता....हे चित्र एकीकडे आणि ह्याच नात्याची अशी खिल्ली उडविणारी मालिका दुसरीकडे.

असो....काही गोष्टी आपल्या हाती नसतात अन्जू....!

धन्यवाद, मी आता तुम्हाला अशोकमामा म्हणेन, सख्खा मामा नसल्याने तोंडांत काका पटकन येते.

अशोक मामा, तुम्ही ते मामा च नका लाउन घेउ मनाला. ओ सिरेल आहे ती. उद्या तो मामा आणि सावत्र आई मिळुन जान्हवीचा संसार तोडायचे प्रयत्न करतात असंही दाखवतील. तेव्हा जे जे दखविले मंदे ने ते ते पहावे निमुटपणे. Happy

हो मामा.. तुम्ही खरंच मनाला नका लावुन घेऊ.. कारण वर सस्मितने म्हटलंय तसं मालिकेत पुढे या मामाचे याहून नीच रूप पाहायला लागेल आपल्याला.. प्रत्येक वेळेला इतकं मनावर घेतलं तर त्रास होईल तुम्हाला.

ओके.... माझ्या सार्‍या लाडक्या भाच्यांनो..... मला आनंद झाला की तुम्ही या मामाविषयी इतक्या आपुलकीने बोलता.....थॅक्स ! या जालीय जगतात मला मिळालेला हा मोठा आनंद होय.

अशोक मामा, ती सिरियल आहे त्यातल्या गोष्टी एवढ्या मनाला लावून घ्यायच्या नसतात. एक त्रयस्थ दृष्टीकोनातून त्यांचा आस्वाद घ्यायचा. अहो अशा अनेक सिरीयल मधून सख्ख्या आई-बाबांचं पोटच्या मुलांशी असलेले वैर, दुष्मनी दाखवतात पण याचा अर्थ यामुळे त्या मुळातल्याच नात्याच्या पावित्र्याचा भंग होतो असं थोडंच आहे? सिरियल पाहायच्या आणि सोडून द्यायच्या. त्यांचा आपल्याला मनस्ताप करून घ्यायचा नाही!

या गोखलेंचा गृहउद्योग आहे की सतरंजी उद्योग आहे? हॉलमध्ये सोफ्याखाली एक, पायपुसण्याऐवजी दरवाजात ही भली मोठी दुसरी, पॅसेजमध्ये पंगतीसाठी मांडल्यासारखी लांबलचक तिसरी!! अवघड आहे.

मला आज श्री च वागणं पटलं नाही. जान्हवीला बोलून द्यायला हवं होतं त्याने आणि आजी तर शपथ मोडत नाही ना.....मग आज कशी मोडली आजी ने श्री ची शपथ??? फार हट्टी आहे आजी...

गंडला बुवा आजचा भाग परत .. माझा या मालिकेतला इंटरेस्ट हळूहळू कमी व्हायला लागला आहे. कोणतीही माणसं एवढी कमजोर, मुळुमुळु रडणारी आणि एवढी जास्त कावेबाज, धूर्त नसतात हो. आणि जरी असलीच तरी कठीणातला कठीण प्रसंग आल्यावर येतं की त्यांच्यातही बळ ... पण इथे सगळचं उलटं.. असो करणार काय? दिग्दर्शक बोले तशी मालिका (पात्रे ) हाले.... !

या गोखलेंचा गृहउद्योग आहे की सतरंजी उद्योग आहे? हॉलमध्ये सोफ्याखाली एक, पायपुसण्याऐवजी दरवाजात ही भली मोठी दुसरी, पॅसेजमध्ये पंगतीसाठी मांडल्यासारखी लांबलचक तिसरी!! अवघड आहे. >>>> +११११ आज ही मालिका पाहताना माझा दादा पण हेच सांगत होता, बघा त्यांच्याकडे कित्ती सतरंज्या आहेत Lol

ते आजी जातानाचा सीन म्हणजे मेलो मेलो मेलो ड्रामा होता..त्या घरात श्री हा एकटाच डोकं असलेला माणूस आहे. आजीने किती हेकट असावं..बर प्रत्येक एपिसोड मध्ये कुणीना कुणी तरी कोणा ना कोणाला तरी शपथ घालत असतं. श्रीचे हाल पहावणार नाहीत म्हणून या आजीबाई जाणार..म्हणजे झाले हाल तर चालतील, पण पहाणार नाही??? कै च्या कै ए हे..

लोकहो हिंदि आणि मराठि मालिकांमधे लॉजिक नावाचा प्रकार नसतो. बर्‍याचदा मला वाटते कि हे एक तर लेखकाच्या लेखणिच्या क्षमतेचे लिमिट असते किंवा जे डिमांडमधे जे असते तेच ते नेहेमी दाखवायचा प्रयत्न करतात सगळ्या मालिकांमधुन.

अशोक मामा तो मामा मामा न दाखवता काका जरी दाखवला असता तरी तसच वागतांना दाखवला अस्ता. दोष त्या व्यक्तीत आहे नात्यात नाही. तुम्ही इतक मनाला लाउन घेउ नका. मी हल्ली बघत नाहीये ही सिरीयल (बरोबर लिंन्क सापडत नाही म्हणुन) पण अपडेट्स वाचते इथे Happy

चीकू.... अदिति.... थॅन्क्स.... मी मान्य केले आहे तो सारा खेळ पडद्यावरील आहे. पण सीरिअल मात्र अखेरपर्यंत बघणार....जान्हवी आणि श्री साठी. [ ही एकच मालिका मी पाहतोय, म्हणूनही असेल.]

बुधवार दि.२३ आक्टोबर २०१३ ~ अपडेट

~ वाटले होते प्रथमदर्शनी की आजी जरी बॅग घेऊन उंबरा ओलांडायला सिद्ध झाल्या असल्या तरी जान्हवीच्या विनंतीला त्या मान देतील. भागाची सुरुवातही अशीच आश्वासक झाली. श्री आजीपुढे जातो आणि तिला घर सोडून न जाण्याची विनंती करतो... जान्हवी त्याला म्हणते, "मी त्यांच्यासमोर जाऊन त्यांची सार्‍या कथीत चुकाबद्दल क्षमा मागते.....हात जोडते..." असे म्हणत आजीपुढे जाते वाकून नमस्कार करते आणि खरेच हात जोडून त्याना मनःपूर्वक विनंती करते. पण आजी दगडासारख्या निश्चल उभ्या. मग श्री जान्हवीला आपल्या रूममध्ये शरयू आणि सरस्वती मावशीसोबत वर पाठवितो. त्या तिघी गेल्यानंतर श्री आजीला परतपरत घर न सोडून जाण्याबद्दल विनंती करतो...बाकीच्या तीन आयांच्या डोळ्यातून धारा चालूच आहेत. आजी विचार करताना दाखविले गेले आहे...आणि त्या मग 'राहते मी...' असा होकार देतात. साहजिकच आनंदाची लहेर उमटते. जान्हवीला खाली बोलाविले जाते. गुरुजी येतात आणि नूतन पतीपत्नी घरातील जोडीने करावयाचा धार्मिक कार्यक्रमही करतात.

मात्र रात्री श्री फार अस्वस्थ दाखविला आहे. जान्हवी त्याच्याजवळ येऊन कारण विचारते. तो म्हणतो, 'मी आजीला ओळखतो. तिने आपला आग्रह अचानक का सोडला ही बाब काही पटत नाही. इतक्या सहजीसहजी आजी आपले मत मागे घेत नाही..." तरीही आता ती राहिली आहे असे जान्हवी म्हणते....श्री चे डोके दुखत आहे म्हणून त्याच्या केसाना तेल लावून शांतही करते. ह्या पठ्ठ्याला त्यातूनही परत आजी आठवते....त्याच पद्धतीने तेल लावत असलेली आजी.

सकाळी ही जोडी उठायच्या आत खाली मुख्य दिवाणखान्यात आजीचे घराबाहेर पडण्याचे नाट्य जोरात सुरू आहे. चार आया आजीला थांबविण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि आजी "आता सारे नव्या सूनेच्या ताब्यात गेले आहे....ती सांभाळेल तुम्ही तिला मदत करा...मी आता कायमची इथून निघून जात आहे..." असे निर्वाणीचे बोल सुनावते आणि उंबरठ्याबाहेर पाय टाकते. चार आया रडताना दाखविल्या गेल्या आहेत.....आजी बंगल्याबाहेर पडताना एक नजर मागे टाकते आणि नमस्कार करून गेटच्या बाहेर पडते.

दुसरीकडे श्री आणि जान्हवी उठले आहेत....त्याना खाली आजी निघून जाण्याचा कार्यक्रम झाला आहे याची काहीच कल्पना नाही. मात्र स्वयंपाकघरात आल्यावर त्याना काहीतरी घडले आहे हे कळते आणि ते शरयूआईकडे पाहात राहातात.

काहीतरीच भाग होता आजचा. तुम्ही जाणार असाल तर आम्ही पण येणार हे काय बोलणं झालं का? नवीन आलेल्या सुनेचा विचार करा की जरा.

मला वाटलं आज जान्हवीची अशी काही छाप पडलेली दाखवतील की आजींना वाटेल अरे ही तर खूप चांगली आहे आपण उगाचच गैरसमज करून घेतला हिच्याबद्दल पण लेखकाने असा काही प्रसंग लिहिला नाही.

अंजली.... अन्जू...

सारे काही खूप बालिश चालले होते. आज त्या सोन्यासारख्या सूनेचा एवढ्या मोठा घरातील पहिला प्रवेश...पहिला दिवस...घर सनई चौघड्याच्या मंगल आवाजाने निनादायला हवे होते....तिच्या स्वागताला या पाच बायका...आजुबाजूला एक नोकर नाही...चला तेही चालेल. पण ही सूनबाई आत येत आहे....तिला इथे आयुष्य काढायचे आहे म्हणजे तिची इथली स्मृती किती आनंदाची व्हायला हवी... हे न समजण्याइतपत त्या कर्तबगार आजी मूर्ख आहेत का ?....ते सारे राहिले बाजूला आणि ह्या आपली कॅरी बॅग ओढत नेत आहेत....आणि बाकीच्य पंचकन्या असा काही आवाज काढून रडत आहेत की त्रयस्थाला वाटावे इथे काही मंगलविवाह झालेला नसून कुणीतरी 'हे राम' म्हटले आहे.

बेक्कार सारा भाग.

Pages