नवीन मालिका-"होणार सून मी या घरची"

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46

Tejashree-Pradhan-Shashank-Ketkar-Honaar-Suun-Mee-Hyaa-Gharchi-Cast.jpg

झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'

इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या.... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिवसभर अधून-मधून मी ही सिरियल बघतच होते. पण नेमके लग्नाच्या वेळी बाहेर जावे लागले. आणि तो एपिसोड चुकला. अशोकमामांच्या अपडेटमुळे खूप बरे वाटले.
जान्हवीची मैत्रिण आपल्या गळ्यातील चेन काढून देते तो प्रसंग पण खूप सुरेख रंगवलाय. ती मैत्रिण अगदि भाव खाउन जाते. मस्त आहे. Happy

अती करतात....... खरचं.. पथेटिक Sad आत्तापर्यंतची सगळी मेहमत वाया घालवली देवस्थळींनी.. TRP मिळतो म्हणून काहीही करायचं का??

काल जेव्हा जान्हवीची आई साडी आणि हारासाठी हटुन बसते तेव्हा भागीरथीबाई तिला समजवायला येतात आणि म्हणतात "आमच्याकडे अशी पद्धत आहे की नवर्‍यामुलाला नवर्‍यामुलीची आई ओवाळुन घेते तस नाही झाल तर तो अपशकुन समजला जातो" मला वाटत ९०% मराठी लग्नात नवरा मुलगा मांडवात येताना वधुची आईच त्याला ओवाळुन आत घेते यांच्याकडे अस काय नवीन आहे या पद्धतीत??? काहिहि......
या सीनच्या आधी जेव्हा श्रीची मावशी भागीरथीबाईंना सांगते की जान्हवीची आई साडी आणि हारासाठी हटुन बसली आहे. तेव्हा मला वाटल होत की भागीरथीबाई तिला दोन चार खडे बोल सुनावतील आणि ही बया जरा सरळ येइल...पण तस नाही झाल

आता घर सोडून जायला भागीरथीबाईंना जान्हवीच्या आईने बरेचं मुद्दे - सोन्याच्या जरीची साडी, चंद्रहार - दिले आहेत - जे श्री आणि जान्हवीला माहीत नाहीत आणि माहीत असते तरी ते दोघं काही करू शकले असते की नाही माहीत नाही.....

अती करतात....... खरचं.. पथेटिक अरेरे आत्तापर्यंतची सगळी मेहमत वाया घालवली देवस्थळींनी.. TRP मिळतो म्हणून काहीही करायचं का??>>>>>>>>>>>>>>>>>>>>>.............अगदी अगदी.....

खरच मंदार देवस्थळी( मं. दे. ) अतिशय मंद्पणे वागून आतापर्यंत मिळवलेले सगळे वाया घालवत आहेत याचे वाईट वाट्ते....जानूला आतातरी कणखर दाखवावे त्यांनी...श्रीला ती आजीसारखी वाट्ते....ते आता दाखवणे गरजेचे आहे...जेणेकरुन श्रीची निवड योग्य आहे हे आयांना पटेल...

आजीसारखीच आहे. आजी लगेच टोकाचे निष्कर्ष काढते. आणि ही टोकाची सहनशील वागते. दोन्हीचाही त्रास होतो. आणि बिलकूल लॉजिकल वाटत नाही. त्यांच्या प्रतिमेला न साजणारं. अजिबात विचार करत नाहीत दोघीही असं वाटतं.

मालीका आता गंडत चालली आहे Sad

  1. मामाचा अजिबात संशय न येणे
  2. अनिल अचानक एवढा रडका / बावळट होणे
  3. भागीरथी बाईंनी दिलेल्या बांगड्यांचे काय झाले?
  4. वडलांचे ऑपरेशन फायनली कधी होणार?
  5. मामाने आणि आईने खरेदी कशी केली ह्यावर काहीच चर्चा नाही

मालीका आता गंडत चालली आहे अरेरे
मामाचा अजिबात संशय न येणे
अनिल अचानक एवढा रडका / बावळट होणे
भागीरथी बाईंनी दिलेल्या बांगड्यांचे काय झाले?
वडलांचे ऑपरेशन फायनली कधी होणार?
मामाने आणि आईने खरेदी कशी केली ह्यावर काहीच चर्चा नाही>>>>>> प्रचंड अनुमोदन

श्री-जान्हवीने लग्न रजिस्टरच करायला हवे होते, त्या शशिकला आणि मामा यांचा पचका झाला असता. काही ओवाळून घ्यायची गरज नव्हती अशा सासूकडून.

शंकर घाणेकर आणि काशिनाथ घाणेकर भाऊ-भाऊ होते ना?

होणार सुन मी या घरची..... आता ती झाली एकदाची....
आता पुढे काय?
..... सहा सासवांना लागलं काम.... त्यानी केली सुन जाम.

Tya Anil Apte la samajala nahi ka ki Janhavi cha lagna tharala aahe. Tyane Shashikalabainshi contact nahi kela ka?

खुप सुंदर मुलाखत आहे शशांक, तेजश्री आणि मंदार देवस्थळी यांची..खुप दिलखुलास बोललेत सगळे आणि खुप मस्त अनुभव सांगितलेत त्यांनी शूट दरम्यान आणि बाहेरही आलेले. पिंट्याला आलेला अनुभव तर फार टचिंग.. शेअर केल्याबद्द्ल धन्यवाद मिरची Happy

पियु परी, गाण्याची क्वालिटी चांगली आहे, पण गाणं बोअर आहे. तेजश्री चांगली दिसतेय, नाचतेय, पण गाण्याचे शब्द, संगीत किती बोअरींग आहे. मराठी हिंदी मिक्स गाणी अतिशय बंडल वाटतात आणि हे असले बार डान्सेस, आयटम सॉन्ग्ज तर मराठीत फारच बोअर असतात.. कोणाला आवडतात, काय माहिती?

हे असले बार डान्सेस, आयटम सॉन्ग्ज तर मराठीत फारच बोअर असतात.. कोणाला आवडतात, काय माहिती?>>>> अगदी अगदी. जान्हवी नाही आवडली या गाण्यात Sad

आजच्या भागात तर अजुन लग्न भोजन ,पाठवणीच दाखवलं.. मला वाट्ल कालच झालं असेल Sad
आई/मामा (बघितल नाही) कधी असं आशिर्वाद देइल .. मी आता रोजच तुझ्याकडे येणार आहे, गोखल्यांच्या किल्ल्या मिळवं!! .. कै च्या कै

लग्न भोजनातही सगळेच आधी २ घास जेवतात नि मग उखाणा घ्या .. आमच्याकडे आधी उखाणं मग घास भरवणं नंतर पंगत असते .. बहुतेक सगळीकडेच असं असावं

उद्याचा भाग भारी असावां.. रडारड नको

मालिका आता गंडत चालली आहे

>>>> खुप अनुमोदन.. आपल्याला सवय आहे म्हणा तशी.. गंडेश मालिका बघण्याची आणि पचवण्याची..
आपल्या भाबड्या काकांसाठी वाईट वाटते.. ते बघत असणारी पहिली डेली सोप म्हणुन तरी बरी चालावी मालिका असं वाटतं..पण मंदार देवस्थळींना हे कोण सांगणार?

पाठवणीचा प्रसंग खरंच डोळ्यातून पाणी काढणारा होता. स्पेशली गीता, पिंट्या आणि बाबांबरोबरचा.
माझे बाबा आठवले एकदम वधुपक्षाच्या खोलीत जाऊन रडत उभे असलेले. Sad

सोमवार दि. २१ आक्टोबर २०१३ ~ अपडेट

~ आजच्या भागात केवळ "मुलीची सासरला पाठवणी" हाच विषय असणार हे उघडच होते, त्यामुळे गंगा जमुना बरसत राहाणार हेही उघडच होते. तरीही त्यापूर्वी दिग्दर्शकांनी अजूनी लग्नासंदर्भात गुरुजींनी ज्या काही गोष्टी पूर्ण करणे गरजेचे होते त्या केल्या....लोक जोडप्याला भेटायला आले आणि तो हाव सुटलेला मामा मुलीच्या शेजारी बसून भेटीची पाकिटेही घेत होताच. नंतर सहभोजन.. त्या ठिकाणी जान्हवी श्री याना 'नाव' घेण्याचा आग्रह. इथे जान्हवीने घेतलेले नाव सुंदरच [मात्र आता या क्षणी मी ते विसरलो... सॉरी]... तर श्री ने "गेलो मी अकांउंटन्ट म्हणून..." अशी गद्यमय सुरुवात करून गाडी शेवटी जान्हवी नामावर आणली....त्यानेही टाळ्या मिळविला... सार्‍यानी स्मित केले आणि जेवणही आटोपले.

जेवणानंतर "बिदाई" चा तो हृदयस्पर्शी कार्यक्रम ! इथे मात्र तेजश्री प्रधानने 'जान्हवी' ला असे काही पेश केले की तिच्या अभिनयापुढे हा मालिकेतील प्रसंग आहे असे अजिबात न वाटता खरीखरी जान्हवी नामक मुलगीच आता आपल्या वडिलाचा, भावाचा आणि चाळीतील मित्र मैत्रिणीचा निरोप घेत आहे असे वाटत होते. पिंटू आणि मनिष यांच्याशी बोलताना तिने अभिनयाची कमालच केली....आई आणि मामा यांच्यातील रुक्षता खटकली....स्वाभाविकपणे... इथेही मामानामक वल्लीने आगावूपणा केलाच. "सासरी गेल्यागेल्या पहिल्यांदा गोखलेंच्या तिजोरीच्या किल्ल्या तुझ्या ताब्यात घे..." असे मामा भाचीला सांगतो म्हणजे किती निर्ढावलेला हा प्राणी आहे हेच समोर येते.

मात्र शेवटी जान्हवी वडिलांच्या मिठीत जाऊन जे रडते आणि त्याना काळजी घेण्यास काही सांगते त्यावरून बापलेकीतील नाते किती आत्मियतेचे होते हेच स्पष्ट झाले. सदाशिवरावही मुलीला सासरच्या लोकांसमवेत कोणत्याप्रकारे आपले वर्तन ठेवावे याचा चांगला सल्ला तर देतातच शिवाय मुलीला आजी, अन्य पाच आया आणि जावई यांच्याकडे सुपूर्द करताना हात जोडून 'आजपासून ही तुमची मुलगीच आहे असे समजा...' अशी विनंती करतात. छान रंगला हा प्रसंग.

जान्हवी आली आहे सासरी...माप ओलांडून...आणि त्याच क्षणी आईआजी आपली बॅग घेऊन बाहेर पडत आहेत. सारेच थक्क !

जान्हवीचा उखाणा:

पुण्याच्या तुळशीबागेत आहे श्रीरामाचे मंदिर
श्रीरामाच्या मंदिरात आहे रामाची मूर्ती
रामाशेजारी आहे सीतेची मूर्ती
सीतेच्या कमरेला सोन्याचा घडा
सोन्याच्या घड्यात केशराचे पाणी
तुम्हा सगळ्यांसाठी नाव घेते श्रीरंगाची राणी

आणि श्रीचा

बँकेत झाली भेट
अकांउटंट झालो प्रेमात
बसस्टॉपवर जुळले सूर
खळबळ झाली मनात
हातात हात मागितला चंद्राच्या साक्षीने
जान्हवी श्रीची झाली बाप्पाच्या आशिर्वादाने!

मला वाटलंच होते की श्रीच्या उखाण्यात नक्की bus stopचा उल्लेख असणार, एकदम रियल उखाणा घेतला श्रीने.

अरे व्वा.... अंजली.... तू तर धमालच केलीस म्हटले पाहिजे....इतका मोठा उखाणा आणि अचूकरित्या इथे तू दिलास... ग्रेट रीअली. आता पटते की श्री पेक्षाही जान्हवीच्या नावात गीत आणि लय आहे तर श्री च्या उखाण्यात सत्यपरिस्थिती असल्याने त्यात गद्यपणा आला आहे, तरीही जुळारी काम छानच.

[एक शंका..... त्या श्रीरंगाने चंद्राच्या साक्षीने कधी जान्हवीचा हात मागितला होता ? मागितला, त्यावेळी तर बागेत सायंकाळ झालीही नव्हती ना अजुनी....!]

वा अशोककाका, परफेक्ट निरीक्षण तुमचे, मानले तुम्हाला.

अंजली, खरंच दोन्ही उखाणे लक्षात ठेवणे कठीण आहे, कमाल आहे तुझी.

Pages