Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46
झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'
इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अन्जू आणि अशोककाका यात माझी
अन्जू आणि अशोककाका यात माझी काही कमाल नाही. मी एपिसोड नेटवर पाहते त्यामुळे रिवाईंड फॉरवर्ड ऑप्शन असतात ना?
हो काका मलाही हा मुद्दा लक्षात आला की श्रीने तिला प्रपोज दुपारी केले होते. पण म्हटले जाऊदे फारच कीस काढल्यासारखे होईल या सिरीअलचा.
[एक शंका..... त्या श्रीरंगाने
[एक शंका..... त्या श्रीरंगाने चंद्राच्या साक्षीने कधी जान्हवीचा हात मागितला होता ? मागितला, त्यावेळी तर बागेत सायंकाळ झालीही नव्हती ना अजुनी....!>>>>>मामा मला पण तीच शंका आली होती...पण कधी कधी दिवसा सुद्धा चंद्र दिसतो ना.....त्यांना दिसला असेल..अपल्याला दखवला नाही तो!
श्री जेव्हा पाय धूऊन घेण्यास नकार देतो तेव्हा आय्याजी म्हणते कि पाय मुरगळल्यावर तो मलम लावण्यासाठी सुद्धा पायाला हात लावू देत नाही.... पण पहिल्याच भागात त्याच्या पायाला इजा होते अन रक्त येतं तेव्हा याच सगळ्याजणी मलम-पट्टी करताना दाखविल्या आहेत....
अंजली उखाण्यासाठी धन्स
अंजली उखाण्यासाठी धन्स
अंजली खूप खूप धन्स ग
अंजली खूप खूप धन्स ग उखाण्यासाठी श्रीचा उखाणा तर मस्तच आहे. जान्हवीचा उखाणा आपल्यालाही घेता येईल. आता मिळाला चान्स की हाच उखाणा घेईन मी
मला श्रीचा उखाणा आवडला
मला श्रीचा उखाणा आवडला जान्हवीचा टिपिकल आणि घिसापिटा वाटला.
आईआजी घराबाहेर पडताना
आईआजी घराबाहेर पडताना दाखवल्या ख्रर्या....... पण् जाणार कुठे ? (ईतक सहज घर सोडुन जाता येत! ) जान्हवी आणी श्रीला रोमान्स सोडुन्,हाच वाद निस्तरावा लागणार बहुदा
आईआजी घराबाहेर पडताना
आईआजी घराबाहेर पडताना दाखवल्या ख्रर्या....... पण् जाणार कुठे ? (ईतक सहज घर सोडुन जाता येत! जान्हवी आणी श्रीला रोमान्स सोडुन्,हाच वाद निस्तरावा लागणार बहुदा >>>>>> हो ना बिचारे. इतक हातापाया पडुन लग्न लागल एकदाच तर आता हे निस्तराव लागणार.....
BTW,लग्नाचा episode online
BTW,लग्नाचा episode online आहे का?मी miss केल लग्न.
रानभुल...हे
रानभुल...हे घे...http://www.desitvforum.net/forum/honar-soon-me-hya-gharchi/ .....इथे सगळे जुने भाग आहेत
आईआजी प्रकरणात वेळ जाणे ठीक
आईआजी प्रकरणात वेळ जाणे ठीक आहे....पण आता मामा-आईची लुड्बुड कमी दाखवावी म्हणजे झाल....
आईआजी प्रकरणात वेळ जाणे ठीक
आईआजी प्रकरणात वेळ जाणे ठीक आहे....पण आता मामा-आईची लुड्बुड कमी दाखवावी म्हणजे झाल....>>>> अगदी खरय. काल निरोप देताना जान्हवीची आई म्हणालीच की तिला आत तर मी रोजच तुझ्या घरी येणार आहे. काय राव कैच्याकैच अगदी.. जानुने आता आईला दारात उभ सुद्धा करु नये. वडिलांची काळजी असेल ना तर सरळ श्रीला सांगाव, तो नीट करेल सगळ. अनिल आपटेचा पत्ता कसा कट केला समजल का तरी जान्हवीला? तसच बाबा आणि पिंट्याला पण नीट मार्गी लावेल तो. अगदी गुणी आहे हो आमचा श्री
अगदी गुणी आहे हो आमचा श्री
अगदी गुणी आहे हो आमचा श्री .... +१०००..
Thanks मिरचि, LINK बघीतली.
you tube वर हि सापडली
20 October http://www.youtube.com/watch?v=xbOVsaM3rpU
21 October http://www.youtube.com/watch?v=PI84cFWLuAk
(No subject)
कैच्याकैच दाखवलेत आई आणि
कैच्याकैच दाखवलेत आई आणि मामा. जनार्दन लवंगारे- बेरकी मामा चांगला वठवलाय पण तेच ते जुनाट, रटाळ सीन्स.
आई तर हपापलेलीच सगळ्यासाठी. दागिने काय साड्या काय???? इतका स्वाभिमानहीन माणूस असु शकतो?? बर कधी मिळालं नाही, नवर्याच्या राज्यात गरीबीत दिवस काढले म्हणुन काय लेकीच्या नावचे स्वतःच घालुन मिरवायचे?
इथे मला जान्हवी, तिचे बाबा किंवा दस्तुरखुद्द आईआज्जी यांनी पडताळणी करायला हवी असे वाटलेले. ११ लाखाचे दागिने महागड्या साड्या, आई आज्जीने दिलेल्या पाटल्या मुलीच्या अंगावर का नाहीत असे आईआज्जी ऐन लग्नात विचारु शकल्या असत्या?
बर इतके दिवस लंकेची पार्वती बनुन कचाकचा भांडणारी बाई इतकी सोन्यात मढलेली पाहुनही कुणाला शहानिशा करावी वाटु नये.
बाकी लग्नात चोर्या होणे हे काही नविन नाही. बरेचदा बॅगाच्या बॅगा गायब होतात. चपला पैसे हे तर क्षुल्लक आहे.
दोन वर्षापुर्वी जावेचे नविन मंगळसुत्र ऐन सिमांतपुजनाच्या दिवशी गायबले शेवटी तिच्या बाबांनी सकाळी सराफाला दुकान उघडायला लावुन मिळेल ते मंगळसुत्र आणले. जाऊ माझी मंगळसुत्र बघुन चक्रावली होती कारण तिला यातले काहीच माहिती नव्हते. तिने ते स्वतः पसंत केले होते आणि नविन तर वेगळेच होते. लग्न पार पडल्यावर आम्ही निघताना काकांनी आम्हाला सांगितले घडलेले. अर्थात त्यांच्याच खोलीतुन गेले म्हणजे कुणीतरी जवळचीच व्यक्ती असली पाहिजेत.
विषयांतराबद्दल क्षमस्व.
अगदी खरय शुभांगी
अगदी खरय शुभांगी
शुभांगी....जावेच्या
शुभांगी....जावेच्या मंगळसूत्राविषयी लिहिलेलं वाचलं आणि मला धक्काच बसला. मी अक्षरशः शेकडो लग्नांच्या जडणघडणीत मोठ्या सहभागाने सामील झालो असल्याने थेट मंगळसूत्रच चोरीला जाणे हा प्रकार कधीच नजरेला आलेला नाही. तू म्हणतेस तसा बॅगा, चपला, पर्सा, ताटातील वाट्या, पेले जाणे घडलेले पाहिले आहे....पण तो भाग किरकोळ म्हणून दुर्लक्षिला गेला जातो.
असो...चला, हे विषयांतर नाहीच....लग्न समारंभ हाच विषय इथे पटलावर आला असल्याने त्या ओघाने सत्य अनुभव इथे कथन केले जाणार हे ओघाने आलेच.
अशोकमामा.. अहो खरंच आम्ही
अशोकमामा.. अहो खरंच आम्ही लग्नघरात चपला, पैसे, दागिने इथपासुन अगदी साड्या, चांदिच्या भांड्यापर्यंत बरेच काही चोरीला जाताना पाहिले आहे.. देव करो आणि अशी वेळ कुणावरही न येवो..
म्हणून रजिस्टर मेरेज
म्हणून रजिस्टर मेरेज करावं
नवरे का चैन, सुख के अलावा काहीच चोरिला जात नाही
नवरे का चैन, सुख के अलावा
नवरे का चैन, सुख के अलावा काहीच चोरिला जात नाही>>> तेही नको असेल तर लग्नच करू नये. कोणी बळजबरी थोडीच केलेय.
पण् जाणार कुठे ? ईतक सहज घर
पण् जाणार कुठे ? ईतक सहज घर सोडुन जाता येत! >>अजून एक-दोन घरे नाहितर शेतघर(फार्महाऊस) असेल कि त्यांचे!
पण आता मामा-आईची लुड्बुड कमी दाखवावी म्हणजे झाल....>>>+१००००
मला वाटते आज श्री ऐवजी जान्हवी आजीची मनधरणी करून तिला घर सोडून जाण्यापासून परावृत्त करेल आणि त्यामुळे बाकिच्या आया +श्री तिच्यावर खूश होतिल.
होय पियु... मी तरी आता काय
होय पियु... मी तरी आता काय बोलणार या प्रकाराबद्दल ? व्यथीत झालो आहे इतकेच. विवाह हा आपल्या धर्मातील एक अत्यंत पवित्र कार्यक्रम मानला जातो [आणि तो आहेच]...अशा ठिकाणी हे शर्विलक हातसफाई करून घेतात ही किती दुर्दैवाची गोष्ट. 'होणार....' मधील चंद्रहाराची चोरी मात्र खर्या अर्थाने जीवघेणी वाटली मला....जान्हवी किती आणि कशी रडणार याची कल्पना मला आली होती....आणि ती रडलीही तशीच.
मला वाटते आज श्री ऐवजी
मला वाटते आज श्री ऐवजी जान्हवी आजीची मनधरणी करून तिला घर सोडून जाण्यापासून परावृत्त करेल आणि त्यामुळे बाकिच्या आया +श्री तिच्यावर खूश होतिल.>>>>>>>>>>>>> + ११११११११११११११११११११
खरचं असच व्हाव गं......जरा तरी बरे दिवस येतील प्रे़क्षकांना थोडा रोमान्स पहायला मिळेल...लग्न ठरल्यापासून मामा-आईच त्रास देत आहेत ....रोमान्स गायबलाच आहे...;) हनिमून नाहीतर नवीन जोडीचे थोडे छान आणि प्रसन्न क्षण तरि दाखवण्याची क्रुपा करावी मंदेनी.....
नवीन जोडीचे थोडे छान आणि
नवीन जोडीचे थोडे छान आणि प्रसन्न क्षण तरि दाखवण्याची क्रुपा करावी मंदेनी.....>>>> +१११ हो हे भांडणं, शपथा, रुसवेफुगवे भरपूर झालं आता
मंगळवार २२ आक्टोबर २०१३ ~
मंगळवार २२ आक्टोबर २०१३ ~ अपडेट
~ आजच्या भागातही मागील भागाचेच शेपूट पुढे ओढत नेले असल्याने कसलेही नाट्य उभे केले गेले नाही किंवा नूतन नवराबायकोच्या जीवनातील पहिला दिवस आनंददायी होत असल्याचे चित्रही का कोण जाणे दिग्दर्शकाने उभे केले नाही. पहिली दहा मिनिटे अजूनी त्या हॉलमध्येच सारी पात्रे त्या जडशीर कपडेलत्त्यातच अवघडून उभी होती. मग गोखलेच्या घरी मुलगी निघाली. तो पर्यंत तिच्या स्वागतासाठी चार आया लगबग करीत दिसल्या तर बेबीआत्या गाल फुगवून रुसून बसल्यागत खुर्चीवर विसावल्या होत्या....काही करत नव्हत्या...बोलत नव्हत्या...त्यावरून त्याना माहीत होते की त्यांची आई एक मोठा निर्णय घेणार आहेत. त्यांच्या मनातील ओळखून श्री ची आई आपल्या सासूच्या खोलीत गेली आणि तिथे त्याना समजले की आजी बॅग बांधून तयार आहेत आणि श्री च्या आईच्या विनवण्यांचा काही उपयोग होणार नाही.
थोड्या वेळाने श्री आणि जान्हवी दारात आले....उंबर्यार तांदूळ भरलेले मापटे ठेवले गेले. दोघानांही नव्याने उखाणे घेण्यास आयांनी भाग पाडले....जान्हवीचा उखाणा मस्तच होता, तर श्री ने देखील त्याच सूरात तिचे नाव घेतले....दोघे मापटे ओलांडून आत आले आणि समोर पाहतात तो आईआजी लाल बॅग घेऊन घराबाहेर पडण्याच्या पवित्र्यात तिथे ताठ उभ्या आहेत. श्री कावराबावरा....तर जान्हवी धक्का बसल्यागत स्थिर....इथे काय होते ते उद्या कळेल.
सहस्त्रबुद्धे कुटुंब घरी आले आहे आणि शशीकलाबाई आता आपल्यावर कामाचा डोंगर कोसळला आहे असा अवतार काढून बसल्या आहेत. दोन कप चहा केला पण आता इथून मला काही होणार नाही असे त्यानी जाहीर केले. सदाशिवराव तेथून उठून रघुअण्णाकडे गेले तर पिंट्या बाहेर. बहीण आणि तिचा रद्दी भाऊ दोघे मग गुप्तपणे जान्हवीने गोखल्याकडील तिजोरीच्या किल्ल्या आपल्याकडे कशा घेतल्या पाहिजेत यावर चर्चा करीत बसल्याचे दाखविले गेले. सारा मूर्खपणाच !!
इथे ही मालिका दिसतही नाही पण
इथे ही मालिका दिसतही नाही पण अशोकजींचे अपडेट्स वाचायला मजा येते. पाठवणीच्या प्रसंगाचे वर्णन इतके छान आहे की इथल्या महिलांना आपली पाठवणी करताना रडणारे बाबा आठवतील आणी आपली मुलगीही एक दिवस अशीच सासरी जाणार या जाणिवेने पुरुषांचेही डोळे पाणावतील.
विजयराव.... धन्यवाद. "इथे"
विजयराव.... धन्यवाद.
"इथे" म्हणजे नेमके कोणत्या देशात आहात आपण, हे समजून येत नाही. तरीही खालील लिंक चेक करून पाहा.... यावर मालिका सुरू झाल्यापासूनचे सारे भाग उपलब्ध आहेत :
http://www.dailymotion.com/video/x14qope_091520132000-chunk-3_animals?fr...
"...आपली मुलगीही एक दिवस अशीच सासरी जाणार या जाणिवेने पुरुषांचेही डोळे पाणावतील.." तुमच्या प्रतिसादातील हे वाक्य खूप टची तर आहेच पण हा प्रसंग ज्यांच्यावर आला होतो, त्यासमयी मी तिथे उभा होतो....जवळून पाहिला आहे....अगदी खरे आहे.
आज उपवन मध्ये शूटिंग सुरु
आज उपवन मध्ये शूटिंग सुरु आहे. श्री आणि जान्हवी दोघेच आहेत. बहुतेक पुढच्या आठवड्यातील प्रसंग असावा.
खरच आता आई आणि मामा प्रकरण
खरच आता आई आणि मामा प्रकरण पुरे झालं. खरंतर मामाचा स्वभाव कसा आहे आणि शशिकलाबाईला त्याच्या बोलण्याने चेव येतो हे माहित असल्यामुळे जान्हवीच्या बाबांनीच त्याला स्पष्टपणे "चले जाव" असं सांगितलं पाहिजे.
बाकी, मिरची यांनी दिलेल्या लिन्कमधील मुलाखतीत श्री बोलुन गेलाय पट्कन आईआजी कंविन्स होते तिथे रहायला की कायसं.
मला पाठवणीचा प्रसंग बघताना
मला पाठवणीचा प्रसंग बघताना माझे सासरे आठवले. अक्षरशः ओक्साबोक्षी रडले होते ते माझ्या नणंदेची पाठवणी करताना.... माझ्या आयुष्यात एखादा पुरुष असा रडलेला मी पहिल्यांदाच पहात होते. त्यांच खूप प्रेम होत तिच्यावर... अगदी आजारपणात कण्हतानासुद्धा ते कधी आई ग म्हणुन न कण्हता 'ममा' म्हणुन कण्हायचे...
रच्याकने माझ्या नणंदेच्या तान्हेपणीच्या सवयीने तिला घरात सगळे ममा अस म्हणतात रादर ही सुरुवातही बाबांनीच केली होती. (कृपया या गोष्टीचा कीस पाडु नये)
हो गोगो.श्री तस बोलून गेला
हो गोगो.श्री तस बोलून गेला आहे...सो ...आजी थांबेल अशी अपे़क्षा करायला हरकत नाही...जानूची काही दिवस पारख करावी या विचाराने थांबते आजी की काय अस वाट्त...
Pages