Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46
झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'
इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ह्याही मालिकेचं कुत्र्याचं
ह्याही मालिकेचं कुत्र्याचं शेपूट झालेलं दिसतंय....अरेरे....
आता असं वाटतेकी ही मालिका
आता असं वाटतेकी ही मालिका बघूच नये त्यापेक्षा रात्री अशोकमामांचे अपडेटस वाचायला यावे, ते मालिकेपेक्षा जास्त चांगले असतील.
राहाते मी म्हणतांना आज्जी
राहाते मी म्हणतांना आज्जी आता राहाते अस म्हणाली होती का? थांबली असतांना सकाळी परत मेलो ड्रामा का? रो हं परवडत नाहीये का आता मालिका वाल्यांना आता ?:)
रोहिणीबाईंना मालिकेसाठी डेट्स
रोहिणीबाईंना मालिकेसाठी डेट्स देता येत नाहीत म्हणून तर चालले नाहीये ना हे ?
बाकी जानू नववधू म्हणून छान
बाकी जानू नववधू म्हणून छान वावरतेय. छोटं मंगळ्सूत्र क्यूट दिसतंय.
मला वाटते रोहिणीबाई तिथे
मला वाटते रोहिणीबाई तिथे असतील तर मामाला डाव साधता येणार नाही म्हणुन मामा आणि जान्हवीला स्कोप देण्यासाठी त्यांना दुर केले असावे. पुन्हा ते संकटात सापडल्यावर बहुतेक आणतील परत आजीला.
आता असं वाटते की ही मालिका
आता असं वाटते की ही मालिका बघूच नये त्यापेक्षा रात्री अशोकमामांचे अपडेटस वाचायला यावे, ते मालिकेपेक्षा जास्त चांगले असतील.>>>+ ११११ अगदी अगदी मला पण सेम वाटतय.. अभी हम तौ ऐसाच करेगा आजसे... कोण सहन करणार त्यांना? मामा तुमचेच अपडेट वाचणार आजापासून, ते मालिकेपेक्षा जास्त चांगले आणि वेळप्रसंगी परखडही असतात. त्या मालिकावाल्यांसारखं उगाच अती चांगल , फक्त गोड गोड नाही लिहीत तुम्ही..
मला ती बेबी थोडी खमकी आणि बुद्धीमान वाटत होती, वाटलं होतं की आजी जरी गेली ( घर सोडून) तरी ही सांभाळेल पण तीपण रडूबाई निघाली की राव!
आणि मुळात मला आजीचं घर सोडून जाणचं पटलं नाही, म्हणजे जर त्यांना जर इतकी आपल्या नातवाची काळजी आहे आणि असं वाटतयं की जान्हवी धूर्त असून श्रीचा संसार उद्ध्वस्त करेल, तर त्यावेळेला आजीबाईंनी घरी थांबून तिला रोखलं पाहिजे ना.. त्या घर सोडून गेल्यावर तिच्या हातात आयतं कोलीत मिळेल ना? कारण त्या काल घर सोडून जाताना सुनांना म्हणाल्या होत्या की, 'जान्हवीशी नीट वागा, तिला तुमचं पाणी जोखायला वेळ लागणार नाही ' ( म्हणजे त्या सगळ्यांचा भोळेपणा लक्षात आल्यावर जान्हवी त्यांना गुंडाळून ठेवेल... असाच अर्थ होता ना या वाक्याचा? ) मग आजी घरात थांबली असती तर जान्हवीला सरळ केलं असतं की त्यांनी... काही च्या काही करतता हे मालिकावाले, थोडा कॉमनसेन्स वापरा की राव...!
जान्हवीला सरळ करायला आजी घरात
जान्हवीला सरळ करायला आजी घरात थांबल्या तर त्यांचा श्रीशी संघर्ष होणार. घराण्याच्या कुणाचेही संसार धड न चालण्याच्या इतिहासाची पुनरावृत्ती झालेली पाहणे, तेही श्रीच्या बाबत, त्यांना सोसणार नाही.
धांदरट, बावळट, निर्णयक्षमता
धांदरट, बावळट, निर्णयक्षमता नसलेल्या आणि रडूबाई आयांना धडा शिकवण्यासाठी आहे हे सगळे !
जान्हवीला सरळ करायला आजी घरात
जान्हवीला सरळ करायला आजी घरात थांबल्या तर त्यांचा श्रीशी संघर्ष होणार. >>>>> पण जी मुळात सरळ आहे तिला अजुन काय सरळ करायचय? आजी दोन दिवस जरी घरात राहिल्या असत्या ना जानु बरोबर तरी समजल असत की पोर किती गुणाची आहे ते..... पण यांचा स्वतःपेक्षा इतरांवर जास्त विश्वास ना
आजीला असं वाटत असेल - आजी
आजीला असं वाटत असेल - आजी घरात नसेल तर जान्हवी मुळे हे झालं अशा विचाराने जान्हवीचं श्रीला सोडून जाईल म्हणजे आजीने परवानगी तर दिली लग्नाला पण आता जान्हवीचं सोडून गेली की श्री सुटला , मग आजी परत यायला मोकळी
खरंय मुलीनो..... किती रडूबाया
खरंय मुलीनो..... किती रडूबाया दाखवायचं ह्या पूर्ण वाढीच्या बायांना ! मला वाटते मालिका निर्मात्याचा मोठा खर्च ग्लिसरीनच्या बाटल्या खरेदीवरच होत असणार नित्यनेमाने. आता त्या रडण्याच्या कांडात जान्हवीदेखील सामील झाली आहे. तिलातर दुहेरी दुखणे....एक बापाची आठवण सलत राहाणार...त्याच्या पायाच्या ऑपरेशनबाबत....तर इकडे आजेसासू घर सोडून गेल्या आहेत ते त्या समजत असलेल्या शहाणपणाच्या निर्णयामुळे...पण त्यांची मुलगी [बेबीआत्या] जी एरव्ही कठोर स्वभावाची दाखविली आहेच...ते मानणार नाही आणि श्री उद्योगभवनाकडे गेल्यावर किचनमध्ये काम करत असलेल्या जान्हवी आणि शरयू या दोघींच्या वाढत्या मैत्रीवरून जान्हवीची शाब्दीक सालटी काढत राहाणार.... आमची जान्हवी ही नृसिंहवाडीच्या कुंद्यासारखी मऊ आणि गोड असल्यामुळे ती उलटी उत्तरे न देता मुळुमुळू रडत बसणार....परत आणा ग्लिसरीन.
बाकी वर काही प्रतिसादकांनी म्हटल्याप्रमाणे आजी नसल्याचे निमित्य काढून शशिकलाबाई आणि नीळकंठराव "गोकुळ" मध्ये चंचुप्रवेश करतीलदेखील....परत डोकेदुखीच.
बाकी वर काही प्रतिसादकांनी
बाकी वर काही प्रतिसादकांनी म्हटल्याप्रमाणे आजी नसल्याचे निमित्य काढून शशिकलाबाई आणि नीळकंठराव "गोकुळ" मध्ये चंचुप्रवेश करतीलदेखील....परत डोकेदुखीच.>>>> अगदी अगदी.... जानुवर नाही किमान तिच्या हावरट आई आणि मामावर लक्ष ठेवायला तरी आजीने घरी थांबायला हवय... पण नाही.. घर धुवुन निघाल की यांचे डोळे उघडणार....
मला पन असेच वाटत
मला पन असेच वाटत आहे..
१) आईआजिला वेळ नाहि आहे मालिकेसाठी...
२) नाहि तर जानुला जास्त महत्व देता यावे म्हनुन आजिला बाहेर काढत असतिल ...कारन आजि असेल तर ति काहिहि निर्णय घेनार नाहि...
माझ्या साबांना अस वाटत आहे की
माझ्या साबांना अस वाटत आहे की आईआज्जी घराबाहेर राहुन नजर ठेवणार असतील सगळ्यांवर..... कारण रोहं कधी चुकीचे निर्णय घेउ शकेल अस त्यांना वाटत नाही... त्या तिच्या निर्णयाच्या आणि निर्णय घेणार्या डोक्याच्या "चार दिवस सासुचे" मालिकेपासुन प्रेमात आहेत.
बाकी जानू नववधू म्हणून छान
बाकी जानू नववधू म्हणून छान वावरतेय. छोटं मंगळ्सूत्र क्यूट दिसतंय.<<<<अनुमोदन्,बाकि जान्हवि श्री च्या डोकयाला तेल लावतानाचा प्रसन्ग खुप छान घेतला आहे,तेज दिस्तेय हो मुलीच्या चेहेर्यावर लग्नाचे......:-) आपला श्री हि गोडच दिसतोय."श्री तु ना आता बोल्,मोकळा हो....",आ़़जीवर जिवापाड प्रेम असलेला श्री आजी च्या वागण्याने तो दुखावलाय,आतापर्यत सारि जबाबदारि समर्थ पणे पेललि,ती share करायला श्रीला आता हक्काच माणुस मिळालय् ...मस्तच् आणी खुपच सयमित दाखवले आहे सारे,नाहितर घरातल्या सगळयाबरोबर बघायच म्हणजे जाम विचित्र वाटत. मागे आम्हि, 'बडे अच्छे लगते हे' बघायचो,त्यात राम कपुर आणी प्रिया चा scene सुरु झाल्यावर आम्हि सरळ tv बन्द केला.आपल्या मराठित निदान ते होत नाहि हे बघुन बर वाटल.
सका़ळी आईआज्जी निघाल्या पण
सका़ळी आईआज्जी निघाल्या पण बॅग नाही.. काही नाही.. कुठे जाणार ते पण नाही सांगितल, फोन पण बंद ठेवणारेत आणि त्याच फोन करतील वेळोवेळी
मुग्धा.रानडे, मला पण असच वाटतय की त्या बाहेरुन नजर ठेवतील.. कदाचित बेबी आत्या सांगणार असतील त्यांना सगळ.
सृष्टी, जर आज्जींना वेळ नसता मालिकेसाठी तर नुसतच गावाला देवदर्शनाला पाठवल असत.. एवढ कथानक आधिपासुन वाढवल नसतं
बाकी या मालिकेत लग्नाचे सगळेच
बाकी या मालिकेत लग्नाचे सगळेच विधी दाखवले ते जरा खटकलच. पण यामुळे जान्हवीला (तेजश्री प्रधानला) तिच्या खर्या लग्नाआधी विधींची प्रॅक्टिस झालीय
मराठी कुडी..... आजी बाहेर
मराठी कुडी..... आजी बाहेर पडण्याअगोदर एक नोकर त्यांची लाल बॅग बाहेर नेताना दाखविला आहे. त्याच्यामागोमाग जात असताना बाकीच्या चार [एक गैरहजर] रडायला सुरुवात करतात. फोन बंद करणार आहे, पण मी तुम्हाला करेन...असे त्या सांगतात.
बाकी तुम्ही सारे म्हणता त्यानुसार बेबीआत्याचे काम निर्णायकही ठरू शकेल....ती कधीच रडताना दाखविले गेलेले नाही.
मुग्धा....'लग्नाच्या विधी' बाबत खुद्द तेजश्री प्रधानदेखील एबीपी माझा वरील मुलाखतीत हसतहसत हेच सांगत होती....'आठआठ दहादहा वेळा ते मंगळसूत्र घालणे, हार घालणे, आंतरपाटा आगेमागे दंगा करणे, शुभेच्छा द्यायला आलेल्या लोकांना आग्रहाने सांगणे....पुढे चला, शॉट चालू आहे, लग्न नाही..." ~ म्हणजेच तिच्या खर्या लग्नात तिला ह्या सार्या बाबी [अगदी नाव घेण्यापासूनच्या] माहीत झाल्या आहेतच.
ho mangal sohala chhan vatla
ho mangal sohala chhan vatla baghayla.. pan asa vatat hota ki kharya lagnachi casstte ch chalu aahe...
tyaat kaam karnarya kalakaranna kasa vavt asel ..?
सका़ळी आईआज्जी निघाल्या पण
सका़ळी आईआज्जी निघाल्या पण बॅग नाही.. काही नाही.. कुठे जाणार ते पण नाही सांगितल
>>
कुणी विचारले पण नाही कुठे जाणार ते? लग्नाच्या दिवशीच घर सोडून जाणे अतिच दाखवले आहे. त्यावेळी तर घरी आलेले पाव्हणे देखील निघत नाही, इथे तर घरातली ज्येष्ठ, कर्ती स्त्री घर कायमचे सोडून निघाली आहे.
आजी बाहेर रहाणार मग त्यांना
आजी बाहेर रहाणार मग त्यांना शरयू दिसेल एक दिवस नवर्याला चोरून भेटताना. मग त्यांचे डोळे उघडतील की आपण या बायांवर जबरदस्ती करून किती चूक केली ते. एखाद्या माणसाला दुसरा चान्स देणं खूप गरजेचं असतं.
अरे हां दक्षिणा हा मुद्दा
अरे हां दक्षिणा हा मुद्दा लक्षातच नाही आला...
सका़ळी आईआज्जी निघाल्या पण
सका़ळी आईआज्जी निघाल्या पण बॅग नाही.. काही नाही.. कुठे जाणार ते पण नाही सांगितल
>>>>> बॅग आधीच ड्रायव्हरने नेलेली दाखवली आहे.....
आजी बाहेर रहाणार मग त्यांना
आजी बाहेर रहाणार मग त्यांना शरयू दिसेल एक दिवस नवर्याला चोरून भेटताना. मग त्यांचे डोळे उघडतील की आपण या बायांवर जबरदस्ती करून किती चूक केली ते. एखाद्या माणसाला दुसरा चान्स देणं खूप गरजेचं असतं. >>> अनुमोदन दक्षिणा... देव (देवस्थळी ) करो आणि आजीबाई घरी लवकर येवोत... नाहीतर तो मामा आणि जानुची आई गुंडाळुन ठेवतील सगळ्यांना..
उत्साही लोकहो.. जरा बीपी
उत्साही लोकहो.. जरा बीपी नॉर्मलला राहु द्या.. देवस्थळींना पण चिंता नसेल इतकी..घालतील ते पाणी (सॉरी ग्लिसरिन)
दक्षुतै.. तुला हलचल चित्रपटावर न्यायचीय का स्टोरी
मी मिस केल वाटत ते नोकर बॅग
मी मिस केल वाटत ते नोकर बॅग नेतानाच..
गुरुवार २४ आक्टोबर २०१३ ~
गुरुवार २४ आक्टोबर २०१३ ~ अपडेट
~ आजी घर सोडून गेली आहे याची ना श्रीला ना जान्हवीला कल्पना आहे. ते दोघेही त्यांच्यासाठी राखून ठेवलेल्या रुममध्ये विवाहाची रात्र साजरी करण्यासाठी गेले आणि पहिली रात्र तरी आनंदी हसरी चेहर्याने त्यानी घालविल्याचे चित्र दिसले. सकाळी श्री स्वत:ला अंथरुणात पाहतो, पत्नी शेजारी नसते...इकडेतिकडे पाहतो तर ती स्नान आटोपून केस पुशीत बाहेर येते. श्री ला तिचा तो गाऊन मधील पेहराव पाहून चाळीतील तिचा साधेपणा आठवतो. मग श्री बाबाला बायकोची थट्टामस्करी करण्याची हुक्की येते....तिला आपल्या बाहुत घेऊन विचारतो, "कोण तुम्ही....? इथे का आला आहात ?' वगैरे खेळकरपणा...छान वाटला. जान्हवीदेखील त्याला हसतहसत तशीच उत्तरे देते....आणि तो काही जादाचा फाजीलपणा करायच्या अगोदर, "आईआज्जी..." अशी हाक देते आणि तिथून हसत पळून जाते....श्री देखील मजेत.
मात्र जान्हवी खाली स्वयंपाकघरात येते, तिथे तर जणू कुणीतरी परलोकवासी झाले आहे असाच चेहरा करून दोन सासवा काम करीत असतात. जान्हवी सख्ख्या सासूला 'माझ्याकडे ते कांदे कापायचे काम द्या..." तर सासूबाई...'नको...कांदा मला जसा हवा तसाच मी कापणार....तू दुसरे काहीतरी बघ...". त्यावर दुसर्या सासूकडे जाऊन 'मी चहा करते..." तर तिला उत्तर मिळते, "नको. चहा झालाय..." दोन्ही सासवांचा आवाज काहीतरी तोडून टाकल्यासारखाच.... चेहरेही आंबटच.
जान्हवी बिचारी कळवळते...तिला सुचत नाही काही...पण तोपर्यंत तिसरी सासू शरयू तिला हाक मारते. फक्त शरयूच तिला समजावून घेते असे दिसत्ये. तिच्याजवळ येऊन ती शांतपणे बसते. मग शरयूच तिला घरातील सार्या स्त्रियांच्या स्वभावातील तेढेमेढे पॉईन्ट सांगत बसते.....जान्हवी अभ्यास करते त्या सांगण्याचा.
वर जान्हवी काम मागायला आली हा आपला जणू काही फार अपमान झाला असे समजून इंदूआई वर श्री कडे तिच्याविरुद्ध तक्रार करतात....श्री ते ऐकून घेतो आणि उलट त्या आईलाच 'अगं ती नवीन आली आहे आपल्या घरी...ती काम करायला द्या असे म्हणणारच....तर द्या तुम्ही...' असे धडे देतो....नंदीबैलासारखी ती सासू मान डोलावते....सारा मूर्खपणाचाच कारभार.
थोड्यावेळाने श्री देखील चहा घेण्यासाठी खाली येतो....त्यावेळी शरयू आणि जान्हवी बोलत उभ्या असतात. श्री आल्याआल्या विचारतो, "हे काय....आईआजी कुठे आहे ?" यावर शरयू चूप राहते....जान्हवीदेखील. श्री धक्का बसल्यागत तिथेच थांबतो.
मामा कालच अपडेट पण असच
मामा कालच अपडेट पण असच काहीतरी होत ना?
कोण तुम्ही या प्रश्नाच्या
कोण तुम्ही या प्रश्नाच्या अनेक आवर्तनांनंतर जान्हवी 'मी जान्हवी श्रीरंग गोखले' असे उत्तर देते. त्यावर श्री तिला 'मला जान्हवी सहस्रबुद्धे चालेल.' तुला हवेच असेल तर तू नाव बदल. लग्नाआधीचे नाव कंटिन्यू करायचे तर ते कर असे सांगतो. यावर जान्हवी म्हणते की लग्नानंतर सगळेच नाव बदलतात. यावर श्री : मग मलाही माझे नाव जान्हवी श्रीरंग सहस्रबुद्धे करावे लागेल का असे विचारतो.
यानंतर लग्न झाले म्हणून तुला सतत साड्याच नेसायला हवे असे नाही. तुला ज्या कपड्यांत कम्फर्टेबल वाटेल ते घाल. जान्हवी यालाही तयार नाही. मी आईंशी बोलून बघते असे ती म्हणते.
जान्हवीच्या माहेरी तिचा भाऊ पिंट्या सुधारलेला दिसतोय. सक्काळीच उठून क्लासला जातोय.
Pages