नवीन मालिका-"होणार सून मी या घरची"

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46

Tejashree-Pradhan-Shashank-Ketkar-Honaar-Suun-Mee-Hyaa-Gharchi-Cast.jpg

झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'

इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या.... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एवढे ३-३ चंद्रहार (एक जान्हवीसाठी केलेला, तो हरवला म्हणून दुसरा, जान्हवीचा आईने मागितलेला तिसरा) सोन्याची जर असलेली पैठणी घ्यायला गोखले काय अंबानी लागून गेले की काय?

जान्हवी शशीकलाबाईंसमोर कायम दबलेली निरुपाय झालेलीच दिसली आहे.(अपवाद श्रीने तिला लग्नाबद्दल विचारले आहे इथपासून आईला ते कळते हा काळ) नाहीतर आपटेशी लग्नाला कशी तयार झाली असती?
कालच्या भागात श्रीने सासर्‍याकडून पाय धुवून घ्यायला साफ नकार दिला.
श्री-जान्हवीचा संसार/प्रेम कोणतीही विघ्ने न येता पार पडायला हवा तर मालिकेत काय दाखवणार?
मागच्या एका भागात संकटांमध्येच जे कायम राहतं तेच प्रेम...असे काही तरी डायलॉग्ज मारले होते. माझ्या अंदाजानुसार आता काही भाग शशिकला आणि मामा दोघांच्या कारवायांना भर येईल. त्यानंतर श्री परिस्थिती ताब्यात घेईल. त्या दोघांचे आतापर्यंत श्रीसमोर काहीही चाललेले नाही.
श्री मला डंबलडोरसारखा वाटायला लागलाय. समोरच्या मनातलं ओळखणारा, कोणत्याही परिस्थितीत संतुलन ढासळू न देणारा.इ.इ. इ.

श्री मला डंबलडोरसारखा वाटायला लागलाय. समोरच्या मनातलं ओळखणारा, कोणत्याही परिस्थितीत संतुलन ढासळू न देणारा.इ.इ. इ.>>>>>>>>> अगदी अगदी खरं.. १०० टक्के अनुमोदन हो Happy

कालच्या भागाने अगदीच निरशा केली. Sad सगळा फोकस दुष्ट आई आनि चोर मामावर ! आता अगतिक जानू वगैरी दाखवून पकवणार बहुदा हे लोक. चालली ही सिरयल पण त्याच जुन्या वाटेवर ....

एवढे ३-३ चंद्रहार (एक जान्हवीसाठी केलेला, तो हरवला म्हणून दुसरा, जान्हवीचा आईने मागितलेला तिसरा) सोन्याची जर असलेली पैठणी घ्यायला गोखले काय अंबानी लागून गेले की काय?>>>+१०००००.........आणखिन बरीच खरेदी केलीय या लोकानी सोन्याची........

काल जानू आणि तिच्या बाबांनी खूप ऐकून घेतले बुवा आई आणि मामाचे.......यानंतर तरी जानू ने त्या दोघांचे खरे रुप निदान श्री ला तरी सांगावे.......नाहीतर ही मालिकासुद्धा बघण्यालायक रहाणार नाही...............

सगळ्यांच्या पोस्टींना अनुमोदन. कालच्या भागात नेहमीप्रमाणे शशिकला बाई आणि त्यांचा भाउ डोक्यात गेले. कालच्या भागात श्रीने सासर्‍याकडून पाय धुवून घ्यायला साफ नकार दिला.>>>>> मी मागे एका पोस्टीत म्हणाले होते की या मालिकेतुन नवीन पिढीने खूप काही शिकण्यासारखे व आचरणात आणण्यासारखे आहे. त्यात ही गोष्टही येते. एरव्ही आधुनिकतेच्या गप्पा मारणारी आमची पिढी आणि आमच्या आधीची अर्धवट आधुनिक झालेली पिढी लग्नसमारंभात एकदम जुन्या विचारांची होउन जाते. मुलाकडच्यांकडुन सतत आपण कोणीतरी ग्रेट आहोत/मुलाला जन्म देउन आणि त्याच लग्न तुमच्या मुलीशी करुन देउन मुलीकडच्यांवर खूप उपकार करत आहोत अस दाखवल जात.(जस काही यांचा मुलगा हा जगातला शेवटचा पुत्र संतान म्हणुनच जन्माला आला आहे.) अशा लोकांनी होणार सून..... या मालिकेतुन मांडल्या गेलेल्या या विचारावर नक्की अंमलबजावणी करावी अस मला वाटत.

मुग्धा.... नाईस नोटींग अ‍ॅण्ड परफेक्ट कॉमेन्ट....

~ कालच्या माझ्या अपडेटमध्ये एक भाग उल्लेख करण्याच्या राहूनच गेला.... जो व्यक्तिगतरित्या मला फार भावला होता.....तो म्हणजे सहस्त्रबुद्धे कुटुंब आणि जान्हवीची मैत्रिण, मनिष लग्नाच्या हॉलकडे जायाला निघतात त्यावेळी घरात शेवटी जान्हवी थांबते आणि इतरांना पुढे चला असे खुणावते..... मग रिकाम्या झालेल्या घराकडे...सर्वत्र पाहात थांबते....जुन्या आठवणींना उजाळा देते, स्वयंपाकघरात जाते.... वडिलांच्या बेडकडे येते.....आणि खाली बसून अश्रूंना मोकळी वाट करून देते... हा भाग खूपच भावनीक वाटला....थोड्या वेळाने रोहन [पिंट्या] येतो बहिणीला घ्यायला....तिला रडताना पाहून त्यालाही तितकेच वाईट वाटते.....

अशाच एका लग्नात एका मुलीची ही भावना मी माझ्या डोळ्यांनी मागे एकदा पाहिली होती....त्यावेळी समजून चुकले होते की कायमचे घर सोडताना त्या मुलीला काही मिळविताना काही गमवावेही लागते याची वेदना केवळ अश्रूनेच सहन करावी लागते.

दोन तासाच्या कालच्या कार्यक्रमातील हा एवढा भाग फार हळवा झाला.

(या धाग्यातील पान क्र. ४२ वरील माझी पोस्ट आणि त्याखाली विचारलेल्या प्रश्नासंदर्भाने)
श्रीयू | 20 October, 2013 - 23:24

"'शंकर घाणेकर' ??

kaka Shankar Ghanekar kuni june nat aahet ka?" >>> शंकर घाणेकर हे जुन्या मराठी रंगभूमीवरील एक प्रसिद्ध नट होते. मी बालवयात त्यांची काही नाटके पाहिली आहेत.
घोगरा (काहीसा खरखरीतच) आवाज आणि बर्‍याचदा एकसुरी संवादफेक करण्याची विशिष्ट लकब
यामुळे ते एक लोकप्रीय अभिनेते होते. त्यांचा तो आवाज, ती लकब आणि त्यांचा अभिनय चाहत्यांना आकर्षित करीत असे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
(१) मुंबई-दादर (पश्चिम) येथे 'रवींद्र नाट्यमंदिराच्या' दिशेने जाणारा 'शंकर घाणेकर मार्ग'
(२) 'शंकर घाणेकर पारितोषिक'
हे उल्लेख गूगल केल्यानंतर सापडतात.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
या सिरीअलमधील अजिबात न पटणारा भाग म्हणजे :
दुकानात खरेदी करणे आणि, अमुक माणसाकडे याचं बिल पाठवून द्या सांगणे आणि दुकानदाराने ते मान्य करणे. पूर्णतः अतार्किक. हे म्हणजे नाक्यावरच्या पानवाल्याकडे जाऊन पैसे न देता "बच्चू भायका पान दे दो" सांगून पान घेऊन येण्यासारखे वाटले. (तो पानवाला देखील आलेला माणूस बच्चू भायचा माणूस आहे याची शहानिशा करून मगच पान देतो)

असो..... तरीही अन्य मालिकांच्या तुलनेत ही अजून तरी बरी वाटते आहे.

मुग्धा.... नाईस नोटींग अ‍ॅण्ड परफेक्ट कॉमेन्ट>>>>>> थँक्यु अशोक मामा... अहो आजच्या काळातही देणीघेणी, मानपान यावरुन लग्नात आणि लग्नानंतर तमाशे होतात आणि सिनिऑरिटीमुळे ही गोष्ट माझ्या पेक्षा तुम्हीच जास्त पाहिली असेल हो ना?

<दुकानात खरेदी करणे आणि, अमुक माणसाकडे याचं बिल पाठवून द्या सांगणे आणि दुकानदाराने ते मान्य करणे. पूर्णतः अतार्किक.>
दुकानातल्या कर्मचारी महिलेने गोखल्यांकडे फोन करून भागिरथीबाईंशी बोलून खातरजमा करून घेतली होती की.

पाय धुण्याचा प्रसंग.....
माझ्या लग्नात ही आनंदने, माझ्या आईकडुन पाय धुवुन घेण्यास नकार दिला होता. तसेच, आई ही पायाचे ऑपरेशन झाल्याने, खुर्चीवर बसली होती.
लग्न छान झाले. मी खुपच हळवी झाले होते. (against my nature)

१. आत्तापर्यंत स्वतःचा स्वाभिमान जपणारी हि ती जान्हवी नव्हेच !!!
सिरियलवाले लग्न ठरले कि एखाद्या कणखर किंवा बबली मुलीची मठ्ठाड बोरींग गाय करून टाकतात हे पाहिले आहे. "होणार.." पण त्याला अपवाद नसावी?

२. स्वतः च्या डोळ्यासमोर इतक्या चोर्‍या केलेल्या असतांना निदान पिंट्याला तरी चंद्रहार सापडला नाही तेव्हा मामाचा संशय यायला हवा होता.

३. श्रीने पाय धुवुन घ्यायला नकार दिला हे छान झाले पण रजिस्टर लग्न दाखवले असते तर अजुन छान समाजप्रबोधन झाले असते.

४. दागिन्यांचे बिल गोखलेंच्या घरी पाठवणे प्रकार अतार्किक आणि अती वाटला.

५. श्रीने जेव्हा नंदनकरवी हार मागवला तेव्हा नंदन म्हणाला "शेवटचा पीस उरला होता".. मग आज्जीने नंतर शशिकलाबाईंसाठी तसाच पीस कुठुन उत्पन्न केला?

६. लग्नाच्या आधी दोन्हीकडे गाणी म्हणायला बोलावलेल्या बायका हा नॉर्थ इंडियन "संगीत" सारखा प्रकार मला मराठी लग्नात पाहिल्याचे आठवत नाहीये. अ‍ॅटलिस्ट 'गोखले' आणि 'सहस्त्रबुद्धे' नावांच्या कुटुंबात तरी नाही.

७. सोन्याची जर असलेली पैठणी घ्यायला गोखले काय अंबानी लागून गेले की काय? +१००

८. लफंगा मामा एवढे दागिने कुठुन आणतो याविषयी कुणालाही संशय कसा येत नाही?

९. अनिल आपटे इतका खलनायक दाखवला असतांना हा मामा त्याला इतक्या सहजपणे फसवतो.. आजकालची शेंबडी मुले पण इतक्या सहजासहजी फसत नाहीत.

श्री, जान्हवी यांच्या अभिनयातली सहजता, जान्ह्वीच्या वडिलांचं काम करणार्‍या अभिनेत्याचा अगदी पटण्यासारखा सहज अभिनय या जमेच्या बाजू आहेत. परिस्थितीने दबलेला असला तरी उगाच (ए.के. हन्गल टाइप) रडवेपणा न करता मस्त भूमिका वठविली आहे. त्याची छोटी छोटी एक्स्प्रेशन्स बघण्यासारखी असतात.>>+++११११

ज्या माणसाजवळ अर्धा डझन केळी घेण्यासाठीही पैसे नाही तो माणून १२ लाखाची खरेदी कशी काय करेल ? याचा खुलासा विचारायची याना गरज भासत नाही, हे आश्चर्यच खरे तर.>>>>>>>>> अगदी अगदी. डोक्यातच गेला तो सीन. कैच्याकै वाटला. निदान आपला मामा काय लायकीचा आहे हे माहीत आहे म्हणुन तरी एवढे दागिने आणि साड्या बघुन कुणी पसे दिले असतील हा प्रश्न कुठल्याही नॉर्मल माणसाला पडायला हवा.

पियुपरी, अनेक मुद्द्यांना अनुमोदन. आणखी मला खूप खटकले ते म्हणजे, श्री तीन 'आ' ना ठामपणे नकार देतो, सासर्‍यांकडून पाय धुवून घ्यायला नकार देतो. पण त्याच श्रीला 'मोठ्या आईला सर्व विधीत वगळले जातय' या गोष्टीची जाणीव होताना दाखवली नाही.

लग्नाआधी गाण्याकरता बायका नाही बोलवत. पण 'घाणे भरताना' गाणी म्हटली जातात. त्यामुळे ते चालसे Happy

कालच्या भागात शशिकलाबाई विकत आणलेले सगळे दागिने स्वतःच घालतात. गीता त्यांना सांगते की जान्हवीचे लग्न आहे, तिला काही दागिने द्या. त्यावर शशिकला: तिला कशाला , तिच्या सहा सासवा देतील ना. यावर गीता स्वतःची चेन जान्हवीला घालते. जान्हवीच्या तोंडून 'अगं राहू दे, आईच्या बांगड्या आहेत ना माझ्याकडे' असं बोलून जाते. यावर शशिकलाबाईंचा अविर्भाव आणि डोळ्यातले भाव अगदी थरकाप उडवणारे होते. जान्हवी कशीबशी वेळ मारून नेते.

श्रीने पाय धुवुन घ्यायला नकार दिला हे छान झाले पण रजिस्टर लग्न दाखवले असते तर अजुन छान समाजप्रबोधन झाले असते.>>> तुझ पण बरोबर आहे पियु, पण कस असत सध्या बर्‍याच कुटुंबातुन एक किंवा दोनच अपत्य असतात. त्यामुळे आपल्या अपत्याची हौस करावी असे प्रत्येक पाल्याला वाटत असतेच ना. फक्त हौस करताना आणि करवुन घेताना प्रत्येकाने "अंथरुण पाहुन पाय पसरावेत" नाहीतर ऋण काढुन सण साजरा करण्यात आनंद मिळत नाही.. तसेच नोकरीव्यवसायानिमित्त परगावी अथवा परदेशी रहाणारे नातेवाईक हे लग्न या एकच अशी घटनेमुळे भेटु शकतात. तसेच अनेक वेळा लग्नसमारंभ हा दुरावलेले आणि दुखावलेले नातेसंबंध पुन्हा जुळ्ण्यासाठीही उपयोगी ठरतात (दोन्ही नात्यांच्या मनात असेल तर)

मी स्वतः ५ भाच्या आणि ४ भाचे यांचा ज्येष्ठ आणि एकमेव 'मामा' आहे.... एक अपवाद वगळता सार्‍यांची लग्ने माझ्या पुढाकाराने घडली आहेत....आणि सगळीकडून संसार सुखाचे चालले आहेत. कुठल्याही लग्नात मी जादाचा पेढाही तोंडात टाकलेला नाही....इतरांना पंगतीत दिले जाते त्या जेवणाव्यतिरिक्त.

मुद्दा असा की मी असा एकही नीळकंठरावासारखा मामा पाहिला नाही जो आपल्या भाचीच्या लग्नात तिचाच सोन्याचा हार चोरतो आणि शहाजोगपणाचा आव आणून मंडपात वावरत हिंडतो.... सोन्याहूनी मौल्यवान असलेली ती सुकुमार भाची खोलीत रडत आहे त्या दागिन्यासाठी आणि त्याच खोलीत हा नालायक माणूस जणू काही मी त्या गावचाच नाही अशा रितीने ते रडणे पाहत आहे.

मला हे मान्य की वरील प्रसंग एका टीव्ही मालिकेतील आहे; काल्पनिक असते...त्यामुळे त्यात सत्य शोधू नये. मात्र होते असे की कालच्या त्या एका एपिसोडमुळे 'मामा' नामक नात्याला सार्वत्रिक पातळीवर जे हीनत्व प्राप्त झाले आहे त्याची जबाबदारी मी निश्चित दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांच्यावर टाकेन.

फार खालच्या दर्जाचे व्यक्तीचित्रण होते ते....केवळ असह्य.

मालिकेतला इंटरेस्ट गेलाय
पुन्हा दळणच असणारेय आता नेहमीच

मला हे मान्य की वरील प्रसंग एका टीव्ही मालिकेतील आहे; काल्पनिक असते...त्यामुळे त्यात सत्य शोधू नये. मात्र होते असे की कालच्या त्या एका एपिसोडमुळे 'मामा' नामक नात्याला सार्वत्रिक पातळीवर जे हीनत्व प्राप्त झाले आहे त्याची जबाबदारी मी निश्चित दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांच्यावर टाकेन.
फार खालच्या दर्जाचे व्यक्तीचित्रण होते ते....केवळ असह्य.>>>>>> १००००००००% अनुमोदन. पण बर्‍याच वेळा मालिका/चित्रपटातुन सावत्र मामा हे पात्र अशाच पद्धतीने रंवले जाते. हे खूप चुकीच आहे

मुग्धा +१

सावत्र मामा आणि सावत्र आईसुद्धा..

प्रत्यक्षात सावत्र आई वाईट असतेच असं नाही.. इतकी तर मुळीच नाही..

लग्नात मुलाकडच्या लोकांनी , वरमाईने अडवणूक करणे हे प्रकार प्रत्यक्षात अजूनही होत असतील. (सत्यमेव जयते आठवा).इथे ते वधूच्या आईने केले. गोखलेंना आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी मान तुकवावी लागेल हे तिने बरोबर जोखले.

लग्नघरात नातलगांकडूनच हात मारला जाणे हाही अगदी जगावेगळा प्रकार नाही. प्रत्यक्षातल्या लग्नांतल्या अशा प्रकारांबद्दल ऐकलेले आहे.

लग्नघरात नातलगांकडूनच हात मारला जाणे हाही अगदी जगावेगळा प्रकार नाही. प्रत्यक्षातल्या लग्नांतल्या अशा प्रकारांबद्दल ऐकलेले आहे.

>> आमच्याकडे २ वेळा झालेले पण आहे.. Sad
पण अश्या वेळी अशी हात मारणारी व्यक्ती कोण असेल हे गेसिंग बरोबर होते आमचे..

Facebook varun sabhar...

honar sun.jpg

भरत आणि पियु....

~ हे मान्य करतो की लग्नघरात नातेवाईकाकडून हात मारण्य़ाचे प्रकार होत असतील. पण माझा मुद्दा हा की एक मामा, जिचे उद्या सकाळी लग्न आहे अशा भाचीचा तिच्या आजेसासूकडून मिळालेला सोन्याचा चंद्रहार....ज्याची किंमत नक्कीच लाखाच्या पुढे असणार....उघडउघड चोरतो.... अगोदरच जी भाची सासरकडील लोकांना पसंत नाही, तिच्यावर ह्या हारामुळे कसले दुर्धर प्रसंग कोसळतील याचा विचार करत नाही.....हे अजिबात म्हणजे अजिबात पटले नाही.

प्रत्यक्षातील शेकडो लग्नात मी कधीच सोने चोरीला गेल्याची वार्ता...ना पाहिली आहे ना ऐकली आहे.

अशोकजी,
घरातल्या घरात हार चोरणं आणि तो कोणी चोरला असेल हे कुणालाही न कळणं हे चमत्कारिकच वाटलं.

काही दिवसांपूर्वी मामाने चोरलेला मोबाईल अनवधनाने खिशातून बाहेर काढला, त्याबद्दल विचारणा झाली
तेव्हा मामा समर्पक उत्तर देऊ शकला नाही; हा प्रसंग आठवून जान्हवीच्या भावाने तरी मामावर संशय व्यक्त
करायला हवा होता. हार हरवला/चोरीला गेला याबाबत जान्हवीच्या वडिलांनी आईला दोषी धरायला हवे होते.
पण...... चालायचंच ...... सिरीअल्समधे अशा गोष्टी अनेकदा बघायला मिळतात.

त्यातून मामाच्या पात्राचं फारच बटबटीतपणे रेखाटन करायचं हे जर सिरीअलवाल्यांनी ठरवलं असेल
तर हे असले प्रकार यापुढेही सहन करावे लागतील.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

प्रत्यक्षात असे चोरीचे प्रकार लग्नाच्या हॉलमध्ये वर, वधू पक्षांना दिलेल्या खोलीमधे होऊ शकतात.
यासाठी या खोलीत कुटुंबातील एक विश्वासू व्यक्ती, जी बहुतेक सर्वांना ओळखते (विशेषकरून एखादी वयस्क बाई) बसविली जाते. ही व्यक्ती अगदी लग्न लागण्याच्या वेळेसही खोलीतून बाहेर पडत नाही. तशीच आवश्यकता भासल्यास दुसर्‍या जबाबदार व्यक्तीस तिथे (रिलीव्हर म्हणून) बसविले जाते असा माझा अनुभव आहे.

उल्हास जी....

"...यासाठी या खोलीत कुटुंबातील एक विश्वासू व्यक्ती, जी बहुतेक सर्वांना ओळखते (विशेषकरून एखादी वयस्क बाई) बसविली जाते....."

~ अगदी खरे आहे. मुंबई पुण्यातच नव्हे तर अन्य जिल्हे आणि ग्रामीण भाग इथे पार पडणार्‍या लग्नाच्या ठिकाणी हा प्रकार अंमलात आणला जातो...दोन्ही पक्षांकडून... आमच्या कोल्हापूर भागात तर सोन्याचा देवाणघेवाणीचा प्रकार तर मस्तकी तिडीक आणणारा असतो....लूटच होत असते [हा विषय तसा वेगळाच आहे], तरीही अशा वीसपंचवीस पासून ते चक्क शंभर तोळ्यांपर्यंत होत असलेल्या सोन्यापैकी एक गुंजभरदेखील सोने इकडेतिकडे होत नाही....इतपत खबरदारी घेतली जातेच.

आता या बाबी जर तुम्हालामला माहीत असतील तर मग "होणार सून..." च्या निर्माते दिग्दर्शकांनादेखील माहीत असणे अत्यावश्यक आहे..... इतका मौल्यवान चंद्रहार आपल्या नजरेसमोर चोरीला गेला आहे हे माहीत झाल्यावरही सदाशिवरावांना घाम सुटत नाही [एखाद्या वडिलाला अटॅकच आला असता, पोरीचे रडणे पाहून]... तर दुसरीकडे ती आई म्हणणारी बाई जावयाच्या आजीकडे "मला तसलाच हार पाहिजे..." असा हट्ट धरते....

काय दाखविता आहात देवस्थळी तुम्ही हे ?

"गोखलेंना आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी मान तुकवावी लागेल हे तिने बरोबर जोखले." >>>> भरत, तुमच्या मताशी मी पूर्ण सहमत.

तसेच ही बाई हावरट आहे, तिने चान्स घेतला.

Pages