Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46
झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'
इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अन्जू + १
अन्जू + १
भाच्यांनो.... मी ही एवढीच एक
भाच्यांनो.... मी ही एवढीच एक मालिका पाहात असल्याने किमान मला तरी चुकवून चालत नाही अशीच स्थिती निर्माण झाली आहे.... सबब काही वेळा मालिकेच्या मांडणीबद्दल विरोध व्यक्त करावा लागतो, पण त्यावेळीही तो भाग पाहिल्यानंतरच.
पिंट्या झालेला कलाकार 'रोहन गुजर'.... मालिकेच्या अगदी पहिल्या भागापासून तो काम करतोय आणि या दोन्ही बहीणभावंडांनी आपण सावत्र आहोत हे नाते कधीच आणि कुठेच दाखवून दिलेले नाही ही बाब कौतुकास्पदच. काल तर त्याची "तायडे तू घरातून काय गेलीस, सारे घरच रिकामे झाले बघ माझ्यासाठी..." ही भावना बहिणीच्या डोळ्यातून चटकन पाणी काढते तो भाग सुरेखच. ताईचे आपल्या भावावर आणि भावाचे आपल्या तायडीवर प्रेम आहे....जान्हवी आपल्या भावाला नीट मार्गावर नक्कीच लावेल.
मनिषचे काम करणारा संजय देशपांडे देखील पुढे केव्हातरी अजूनी चांगल्या भूमिकेत येईल असे वाटते. यानेही लग्नात नवरी मुलगी निरोप देणे प्रसंगी छान अभिनय केला होता.
काल जान्हवीचं एक वाक्य आवडलं
काल जान्हवीचं एक वाक्य आवडलं - विश्वास कमावावा लागतो.
दोन्ही बहीणभावंडांनी आपण
दोन्ही बहीणभावंडांनी आपण सावत्र आहोत हे नाते कधीच आनि कुठेच दाखवून दिलेले नाही <<<आई वेगळी असली तरी ते भाउ बहीणी आहेत ना? की ह्या नात्याला ही सावत्रच म्हणत्तात?
आदिती, आई किंवा बाबा
आदिती, आई किंवा बाबा दोघांपैकी एकजण जरी वेगळे असले तरी सावत्र असेच म्हणतात.
हो अदिति.... अशा नात्याला
हो अदिति.... अशा नात्याला सावत्र असेच संबोधिले जाते.
[प्रत्यक्षात मला असे डावेउजवे करणे बिलकुल पसंत नाही. भाऊ हा भाऊच आणि बहीण ही बहीणच असते. त्यात सख्खी...मामे...चुलत...सावत्र असे पोटभेद करण्याचे कारणच नसले पाहिजे. मला जशा सख्ख्या आहेत तशा मावस आणि चुलत बहिणीही आहेत.... आणि या सर्वांच्या मुलामुलीना मी एकमेव मामा असल्याने त्यांचे प्रेमळ हल्ले माझ्यावर सतत होत असतातच...अशावेळी मी हा तिचा, तो हिचा, ती हिची....असला प्रकार कधीही केलेला नाही.... किंबहुना तसा प्रसंगही आलेला नाही.]
माझे तर स्पष्टच बनले आहे की नाटक, चित्रपट आणि आता सीरिअल्स ह्याच बाजाराने 'सावत्र' हा प्रकार खलगटात टाकला आहे.... पण नशीब 'होणार सून....' मध्ये किमान बहीणभावात ही भेदरेखा आखलेली नाही.
अशोकमामा, माझा नवरापण
अशोकमामा, माझा नवरापण त्याच्या सख्ख्या बहिणीप्रमाणेच(२ आहेत), मामेबहिणी(४ आहेत), त्या सर्वांना सख्ख्या बहिणीच समजतो आणि त्यांच्या मुलांनापण आणि माझे मोठे दिरपण सर्वांना सारखेच मानतात कारण मामांना मुलगा नाही, ह्या दोघांना मामांनी मुलासारखे मानले.
मला जरा सांगा यापैकी शरयू,
मला जरा सांगा यापैकी शरयू, मावशी, बेबी आत्या वै कोण ते...
आज्जी, जान्हवी माहीतेय. सिरीयल पाहण्यापेक्षा अधूनमधून इथले अपडेटस वाचणं परवडलं.
लग्नाआधीच्या काही भागात सुखद
लग्नाआधीच्या काही भागात सुखद दाखवलेले होते प्रसंग...
हल्लीच्या काही मालिकांमध्ये उदा ही आणि इ टीव्ही वरील माझे मन तुझे झाले मध्ये जुन्या नकोशा रितींना चांगल्या रितीने बदलता येते असे पॉझिटिव्ह विचार मांडले आहेत. यात अक्षता, पत्रीका यांवर खर्च आणि दुरूपयोग तसेच ई टिव्ही वर विधवा स्त्री ने नवरा नवरीच्या हळद समारंभात सामील होणे, घटस्फोटीत आईने एकटीने कन्यादान करणे... आताच्या समाजात हे विचार पॉझिटिव्हरित्या रूजताहेत पण टिव्ही मालिकांमुळे याला सकारात्मक हातभारच लागेल.
ऑनलाइन कुठे बघता येइल?
ऑनलाइन कुठे बघता येइल?
हसरी इथे बघ
हसरी इथे बघ http://www.tvforumonline.com/channel.aspx?c=marathi
dreamgirl, फोटो डावीकडून
dreamgirl, फोटो डावीकडून उजवीकडे - बेबीआत्या, शरू, आई, जानू, आईआजी, मोठी काकू, मावशी
स्निग्धा डावीकडचा फोटु राहीला
स्निग्धा डावीकडचा फोटु राहीला
धन्स स्निग्धा
धन्स स्निग्धा
सस्मित, तुझ्याकरता सोडलाय
सस्मित, तुझ्याकरता सोडलाय
सोना, Welcome. अशोक मामा,
सोना, Welcome.
अशोक मामा, +१.
मालिकेत टिपिकल सासुरवास दाखवायला सुरवात करू नये म्हणजे झाल!!
मंगळवार दि.२९ आक्टोबर २०१३ ~
मंगळवार दि.२९ आक्टोबर २०१३ ~ अपडेट
~ आज घरी श्री ची उपस्थिती नव्हती त्यामुळे "गोकुळ" वर स्त्रियांचीच सारी लगबग....स्वयंपाकघरात शरयू आणि जान्हवी यांच्यातील संसारासंदर्भातील चर्चा दोघींच्याही स्वभावाशी जुळणार्याच चालल्या होत्या. भोळी आणि विसराळू शरयू नित्याच्या स्वभावानुसार घरातील आईआजीचे वर्चस्व आणि त्यामुळे सार्यांच्याच संसारामध्ये आलेली विघ्ने यांचा पाढा वाचताना मग त्या स्त्रीच्या मताला किंमत कशी उरलेली नाही, आईआजी चूक माफ का करत नाहीत?....असे बोलत बोलत आपल्या आयुष्याविषयी सांगताना जान्हवी त्याना खालच्या आवाजात विचारते, "धाकट्या आई, कुणाबद्दल तुम्ही हे बोलत आहात ?" यावर शरयू चपापते आणि आपण आपली गुप्त गोष्ट बोलत आहोत अशा अपराधीपणाच्या नजरेने जान्हवीकडे पाहते आणि मग जेवणाचा विषय काढून तिचे लक्ष विचलित करते. तेवढ्यात श्री चा फोन येतो आणि अगदी गडबडीने जान्हवीशी तो काहीतरी बोलतो आणि सांगतो की मी रात्री उशीरा घरी येणार आहे.. ती त्याला अधिकचे काहीतरी विचारणार आहे तेवढ्यात तो फोन ठेवतो. घरातील अन्य स्त्रिया 'श्री का येणार नाही घरी ? उशीरा म्हणजे कधी ? जेवायला येणार आहे की नाही ?" इत्यादी प्रश्नांचे नित्याचे रान उठवितात.
दरम्यान सहस्त्रबुद्धेंच्या घरी मामा आणि शशीकलाबाई पिंट्याला "याला तर अजिबात कसलेही काम जमत नाही" म्हणत शिव्याची बरसात करीत आहेत. त्याने सदाशिवरावांना दवाखान्यात नेले होते; पण त्याला डॉ.नायर यांचा वॉर्डच सापडत नाही आणि विनाकारण तीनचार ठिकाणी बाबांना फिरायला लावतो, त्यात त्यांच्या पायाचे दुखणे अधिकच बळावते. शेवटी एका बाकड्यावर बसले असता खुद्द डॉक्टरच त्याना पाहतात, ओळखतात आणि तातडीने आपल्या केबिनमध्ये घेऊन जातात. त्यांची तपासणी होते, पण घरी येताना परत चालण्याचा त्रास होतो....तो त्रास होतो जादाचा शशीकलाबाईना...त्यामुळे त्या घरी आल्यावर गहजब करतात. मामा "माझा हा भाचा बिनकामाचाच नव्हे तर कुचकामाचा आहे..." असे म्हणत पिंट्याला बोल लावतो. बाप, आई, मामा या तिघांकडून शिव्या खाल्लेला हा भाऊ रडतरडत आपल्या बहिणीला तिच्या सासरी फोन लावतो.....तिला सारी कथा सांगतो आणि "तायडा तू इकडे ये घरी..." अशी विनंती करतो. जान्हवी "अरे मी आता सासरी आहे. श्री देखील घरी नाहीत....मी नाही येऊ शकत..." असे म्हणत कशीबशी त्याची समजूत काढते.
श्री ऑफिसमधून बाहेर पडतो....फोनवरून 'आश्रय' संस्थेचा पत्ता विचारतो आणि कार घेऊन त्या दिशेने निघतो. बराच वेळ प्रवास केल्यावर गावाबाहेरील एका ठिकाणी त्याला आश्रय संस्था दिसते. कार लावून तो आत जातो तर आजी विचार करीत बसलेल्या त्याला दिसतात. तो त्यांच्याजवळ जातो....पण आजी घरी येण्यास नकार देतात... मग दोघांचे तेच जुने संवाद परतपरत तोच तोच मुद्दा घेऊन आपल्यापुढे वाजविले जातात. जान्हवीच्या चरित्राविषयीची बातमी आणि गैरसमज हाच कळीचा मुद्दा दोघांच्याही समोर आहे. शेवटी श्री आजीला सांगतो, "ठीक आहे. तू घरी येऊ नकोस. उद्यापासून मी देखील इथेच राहतो....आणि इथूनच मी ऑफिसला जात राहीन.... तुझ्या डोक्यातील जो गैरसमज आहे तो इथे राहून सुटेल असे वाटत असेल तर निर्धास्त तू राहा....नाहीतर माझ्याबरोबर घरी चल..."
यावर आजी स्तब्ध.... उद्याच्या भागात त्या घरी आल्याचे दाखविले आहे.
अशोकमामा मस्त अपडेट, आज मी
अशोकमामा मस्त अपडेट, आज मी बघितलाच नाही.
अन्जू.... आजचा भाग तुला नक्की
अन्जू.... आजचा भाग तुला नक्की आवडला असता..... शरयू आणि पिंट्यांच्या अभिनयासाठी....शिवाय जान्हवीदेखील आज खूपच मोकळ्या स्थितीत होती.
अशोकमामा, शेवटी थोडे बघितले.
अशोकमामा, शेवटी थोडे बघितले. पिंट्या जिन्यावर बसून जान्हवीला फोनवर किस्सा सांगत असतो ते आणि श्री आजीला शोधून काढतो ते, पण आजचा भाग एकंदरीत चांगला होता असे तुमच्या अपडेटवरून वाटले.
पिंट्या खूपच छान काम करतोय.
पिंट्या खूपच छान काम करतोय. अगदी डोळ्यात पाणी आलं आजचे त्याचे संवाद आणि काम बघून.
पिंट्या खूपच छान काम करतोय.
पिंट्या खूपच छान काम करतोय. अगदी डोळ्यात पाणी आलं आजचे त्याचे संवाद आणि काम बघून.>>+१
पिंट्याबद्दलची मते वाचून खूप
पिंट्याबद्दलची मते वाचून खूप बरे वाटले. त्याची बहीणच इतकी गुणाची दाखविली गेली आहे की तिच्या स्वभावाचा त्याच्या कृतीवर नक्कीच परिणाम होणार. बहीणभावाचे हे नाते अतिशय सुंदररितीने हळवेपणाने प्रकट होत राहील यापुढे. गोखल्यांच्या घरी आल्यावर तो तिला हळू आवाजात विचारतोही..."ताई, मी इथे असे तुला भेटायलो आलो तरी चालेल ना ?"..... जान्हवी त्याला खात्री देते.
जानूने बाबांना फोन करायला
जानूने बाबांना फोन करायला हवाय एकदा असं सारखं वाटतंय.
जाहीर नोटीस. वादी : झी मराठी
जाहीर नोटीस.
वादी : झी मराठी आणी होसुमीयाघ चे निर्माते
प्रतिवादी : अशोकमामा.
आमचे अशीलांनी बराच खर्च करून होसुमियाघ ही मालिका बनविली आहे. परंतु गेले काही दिवस देशविदेशातील हजारो प्रेक्षक ही मालिका पहण्याऐवजी श्री अशोकमामा यांनी लिहिलेले अपडेट्स वाचत आहेत. ते मूळ मालिकेपेक्षाही चटपटीत व मनोरंजक असतात असे बर्याच प्रेक्षकांचे मत आहे. त्यामुळे आमच्या अशीलांचा टी आर पी घटत आहे. आमचे अशील गरीब असून त्यांना पैशाची गरज आहे. त्यामुळे आमचे अशिलांना तीन कोटी बत्तीस लाख रुपये व एक कोल्हापुरी चंद्रहार इतकी नुकसानभरपाई श्री अशोकमामा यांनी द्यावी अशी मेहेरबान न्यायालयाकडे मागणी केली आहे.
सबब आपल्यावर हा खटला का चलवू नये याचा खुलासा तीन सत्यांकित प्रतिलिपी आणी दंडाधिकारी यांच्या सहिशिक्क्यानिशी न्यायलयीन कामकाजाच्या वेळात कक्ष ५ मध्ये निबंधक अथवा समकक्ष अधिकारी यांच्याकडे आणून द्यावा अन्यथा कलम ७३२ ड ( परिशिष्ट ५) अन्वये कारवाई करण्यात येइल.
शुभ दिपावली.
सहीचे ही नोटीस. .
सहीचे ही नोटीस. .
sonyachya jarichi sadi
sonyachya jarichi sadi visarali....
गेले २-३ भाग नीट नाही बघितले.
गेले २-३ भाग नीट नाही बघितले. श्रीला आजी आश्रयमधे आहे हे कसे समजते?
vijaykulkarni > अशोकमामा ,
vijaykulkarni >
अशोकमामा , मस्त अपडेट्स असतात तुमचे.
घरि कलर काम चालु आहे. मला पण
घरि कलर काम चालु आहे. मला पण होसुमीयाघ बघता येत नाहि आहे.
मामांच्या अपडेट वर समाधान......
Pages