नवीन मालिका-"होणार सून मी या घरची"

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46

Tejashree-Pradhan-Shashank-Ketkar-Honaar-Suun-Mee-Hyaa-Gharchi-Cast.jpg

झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'

इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या.... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या घरातलं माणूस रोजच्या ठरल्या वेळी घरी परत आलं नाही. कित्येक तास झालेत. त्याचा फोन बंद. तो ऑफिसात नाही, तिथून केव्हाच निघालाय. कुठे गेलाय ते ऑफिसात माहीत नाही. काय कराल?

भरत....कित्येक तास झालेले नाहीत.....आजीकडे तो पोचतो त्यावेळी अजूनी बाहेर उजेड आहेच...मुंबईतच उपनगरात कुठेतरी 'आश्रय' आहे असे समजले पाहिजे....म्हणजे आठनऊ वाजण्यापूर्वी तो 'गोकुळ' मध्ये परतलाय असाच अर्थ.....बरे, जान्हवीने सांगितले आहे ना की, त्याचा फोन आला होता, आणि तो काहीसा उशीरा येणार आहे. मग प्रश्नच मिटला ना.....उलट या दोन्ही आया जणू काही चोप्रा चित्रपटातील जत्रेत आपला पोरगा हरविला अशा आविर्भावात तोंडाला पदर लावून रडण्याच्या स्पर्धा खेळत राहतात तो प्रसंग चीड येणाराच आहे.

जान्हवी "तुम्ही असे धीर सोडल्यासारखे करू नका ना...." असे जे म्हणते यात काय वावगे आहे ? तर याला उत्तर म्हणून ती सासू म्हणणारी आई फटदिशी बोलते...."तू अजूनी आई झालेली नाहीस. जेव्हा होशील तेव्हा तुला वेदना कळतील..." काय म्हणावे ह्या बेअकली टोमण्याला. अहो, त्या मुलीचे लग्न होऊन दोन दिवस झाले आहेत आणि या सासूला तिच्या आई होण्याचे फिकिर लागून राहिली आहे. सारेच असंबंद्ध !

क्या यार. श्रिमंत माणसांच्या मोठ्यागाडीत मोबाइल चार्जर अस्तोच असतो. नाहीतर डायवरच्या फोन वरून तो बोलू शकतो. आजी ला पिकप केल्यावर तिच्या फोनवरून तर बोलूच शकतो. आजी घरी येते हे काय आमीनैजा टाइप सरप्राइज आहेका? पण नै कायम भिजक्या पापण्या मोडच ऑन.

अश्विनीमामी मस्त, ते सिरीयलवाले अजिबात डोकी चालवत नाहीत, त्यांना हवा तेव्हा mobile बंद पाडतात आणि गाडीतपण चार्जर लावता येतो हे प्रेक्षकांना कळते, हे विसरतात.

अमा, इथे नियमित हजेरी लावण्याचे करावे.
तुमच्या चटपटीत प्रतिसादांना १०० लाईक्स !

त्या आज्जीला बघून सगळ्या आया अशा काही धाव घेतात, ते पाहून दिवसभर बाहेर चरायला गेलेली गाय गोठ्यात परतताच तिची वासरे कशी तिच्याकडे धाव घेतात हे दृश्य आठवले...डोळे भरून आले माझे..
माझा पण भिजक्या पापण्या मोड ऑन

Are tya Anil Apte che pudhe kaay jhale? Ka tya actor cha contract sampala mhanun role cancel kela?

आशुचँप .. अगदी मनातलं लिहिलसं रे.. वेडेपणा नुस्ता!
घरी आई-बाबांना बाहेरुन आल्या आल्या चिकट्ले तर फट्के पडतील मला
माझा पण भिजक्या पापण्या मोड ऑन

शुक्रवार दि. ३१ आक्टोबर २०१३ ~ अपडेट

~ आज एकीकडे म्हणजे गोखल्यांच्या घरात उन्हाळापावसाळा यांचा खेळ तर सहस्त्रबुद्धेंच्या घरी सदाशिवरावांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून मामा आणि त्यांची बहीण भामटेगिरी करण्यासाठी बाहेर तर ज्याला कसलाच आधार नाही तो जान्हवीचा धाकटा भाऊ पिंट्या गंभीरतेने अभ्यासाला लागलेला.... तर सगळ्यात बहारीचा प्रसंग म्हणजे श्री आणि जान्हवी यांची दिलखुलास आपापसातील चेष्टामस्करी या सर्व मिश्रणामुळे आजचा भाग चांगलाच रंगला.

पण डोकेदुखीची सुरुवात केली ती बेबीआत्या हिने. कोचवर कोपर्‍यात बसून जगातील सार्‍या अडचणी जणू आपल्याच वाट्याला आल्या आहेत असा चेहरा करून ती बसली आहे आणि तशी ती बसलेली पाहून तिथून जाणारी मोठी आई तिला कारण विचारता बेबीआत्या म्हणते, "वहिनी....मला असे जाणवत आहे की आई गेल्या होत्या त्याचे वाईट वाटत होतेच पण त्या लागलीच परत आल्या त्याचेही दु:ख होत आहे. कारण आईने असा चटकन निर्णय बदलण्याचे कारण म्हणजे श्री ने केलेला आग्रह...अन् श्री ने तसे का केले तर त्याला जान्हवीची शिकवण...म्हणजेच येथून पुढे जान्हवी जे काही म्हणेल ते श्री करणार....चहा करणार, जेवण करणार, अंथरुण घालणार....आणि आपले या घरातील महत्व कमी होणार..." ~ या त्राग्यावर मोठ्या आईने बेबीआत्याला योग्य त्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला; पण त्याही मग त्या धबधब्यात वाहून जातात. विषय पुढे वाढत जाणार असतोच तोच शरयू मध्यरात्री चोरून घरात प्रवेश करते आणि ते या दोघी पाहतात. तिला जाबही विचारतात; पण शरयू नित्याप्रमाणे काहीही थाप मारून आपल्यावरील संकटाला हुलकावणी देते....जान्हवीचा विषय तिथेच थांबतो.

पिंट्याचा जान्हवीला फोन येतो...बाबाना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे आहे. जान्हवी श्री ची परवानगी मागते. श्री सहज म्हणतो, "अगं यात कसली परवानगी मागतेस ? कारण योग्य आहे, तू जा... जाताना फक्त आईला आणि आजीला सांगून जा....बस्स !".... यावर जान्हवी आजीला कसे सांगायचे मुद्द्यावर कासाविस होते. तरीही खाली आल्यावर तिला शरयू आणि आई दिसतात स्वयंपाकघरात....तर आजी समोरच्या कोचवर पेपर वाचत बसलेल्या असतात. जान्हवी आई आणि शरयूला वडिलांच्या ऑपरेशनविषयी सांगते तर चटदिशी त्या दोघीही 'जा...लागलीच' म्हणून सांगतात.....पण ही म्हणते आजीचीही परवानगी घेते....शरयू तिच्याकडे चहाचा कप देते आणि म्हणते "हा कप घेऊन जा आजीकडे...दे...आणि घे परवानगी....नाही म्हणणार नाहीत त्या..." जान्हवी कप उचलते जरूर पण परत कच खाते आणि टेबलवर कप तसाच ठेवते...तोपर्यंत ऑफिसला जायचे या तयारीत श्री खाली येतो....जान्हवीची अडचण ओळखतो आणि स्वत:च आजीकडे जाऊन जान्हवी तिच्या वडिलाकडे जाऊन येणार आहे...ती जाऊ दे..." यावर आजी केवळ "हूं..." इतकाच स्वर काढतात. श्री त्यालाच होकार समजतो आणि जान्हवीला खूण करून बाहेर पडण्यास सांगतो...बाहेर पडतानाही जान्हवी "आई आजी मी जाऊन येते..." असे खालच्या आवाजात विनम्रपणे सांगते....पण आजीचा नखरा काही कमी नाही. त्या उत्तर देत नाहीतच.

चाळीपर्य्ंत श्री कार मधून जान्हवीला घेऊन येतो...आणि मीटिंगला जायचे असल्याने सासर्‍याकडे येत नाही. पण बायकोला बाय करताना तिच्याशी बर्‍याच चेष्टामस्करीची शाब्दिक छेडछाडही करतो...तीही हसतमुखाने त्याला प्रत्युत्तर देते...आणि तिथून घरी येते....घरी केवळ बाबा असतात आणि तेही स्वयंपाकघरात कूकर लावत आहेत. जान्हवीला ते दृष्य पाहून गलबलून येते. आपल्या मागे वडिलांची जेवणाची अशी आबाळ होईल अशी तिला कल्पनाही नसते...पण सदाशिवराव सारे काही हसून "असे चालायचेच बाळा..." म्हणून तिची समजूत काढतात...जान्हवी सारे काही सुन्नपणे ऐकत तिथे उभी राहते.

उद्यापासून दोनतीन भाग केवळ दिवाळीच्या आनंदाचे असतील असे दिसत्ये.

आता अशोक मामानी जर नियमित पणे अपडेट लिहिले नाहीत तर झी वालेच मामांवर खटला भरण्याची शक्यता नाकारता येत नाही Wink Lol Proud

Lol

पोरींनो.... अपडेट वाचता ते वाचताच.... दिले तरी खटला भरण्याची धमकी मिळते....आणि नाही दिले तरीही उलटपक्षी झी वाल्यांची वकिली करत करत मला नोटीस देता हे पाहून माझे हृदय दुखावले !!!! Sad Sad Sad

बाकी....कालचा श्री आणि जान्हवी यांचा रस्त्यावरील कारशेजारील संवाद व अभिनय अगदी प्रेमात आकंठ बुडालेल्या पतीपत्नीचा होता....हे परत आठवले. कुणाचा चुकला असल्यास आज दिवसभरात होत असलेल्या रीपीट टेलिकास्टमध्ये जरूर पाहा.

माझ्या माहितीतील काही प्रेक्षक असेही आहेत की ज्याना मराठी टंकन येत नाही म्हणून मायबोलीवर सदस्य नाहीत, मात्र याच धाग्याची वाचनमात्र स्थिती ते राखून आहेत. म्हणजेच आज १५०० पेक्षा जास्त नोंदी इथे झाल्या असल्या तरी वाचकवर्ग कमालीचा जास्तीचा आहे, हे मी जाणतो....आणि ही दिशा झी च्या उत्पादन क्षमतेत वाढ करणारीच सिद्ध होते.>>>>> मलापण मराठी टंकन फास्ट करता येत नाही मामा....खुप काहि लिहायचे असते पण जमत नाही....

थोडे अवांतर- dreamgirl तुला अनुमोदन 'माझे मन तुझे झाले' मी बघते आणि तू उल्लेख केलेल्या दोन्ही गोष्टी मलापण खूप सकारात्मक वाटल्या. ह्या गोष्टी समाजातपण प्रकर्षाने अमलात याव्यात असे वाटते. मी स्वतः हळदी-कुंकू लावताना सधवा-विधवा असा भेदभाव करत नाही उलट समोरची बाईच संकोचते लावून घेताना, असे अनुभव येतात. ( sorry, अवांतर लिहिल्याबद्दल).>>>>>> प्रचंड अनुमोदन....माझे मन तुझे झाले' मी पण बघते आणि मला ती मालिका आवडतेसुद्धा.....

परन.... आता इथे तू जितके आणि जसे लिहिले आहे ते पाहता तू चांगलेच टंकन करतेस असे दिसून येते, त्यामुळे मालिकेविषयी मते जरूर मांडत जा.... शेवटी लिहिणा-यांनाही मतांचा कौल समजणे गरजेचे असते. आता तुम्ही सर्वांपैकी कुणीच जर अपडेटवर चांगलेवाईट मत प्रदर्शीत केले नसते, तर मग मीदेखील इतके टंकन करीत बसलो नसतोच. शेवटी अप्रेसिएशनही महत्वाचे असतेच, हरेक बाबतीत.

अशोकमामा नक्कीच प्रयत्न करेन टंकन करण्याचा.....तुमचे अपडेट्स वाचण्यासाठी तर मी इथे रोजच येते.....धन्यवाद.....थोडे अवांतर- मला पाच मामा आहेत....आता तुम्ही सहावे.......

पाच मामा ???? ग्रेट्ट्ट्ट्ट रीअली यू आर ! मी कल्पना करू शकतो की तू या सार्‍यांची किती लाडकी असू शकशील....आता मीही सहावा....त्यामुळे तुझ्या लाडात आणखीन् भर.

गंमत म्हणजे मला नऊ भाचेभाच्या आहेत आणि या सर्वांना मी एकटाच मामा.... त्यामुळे ही दरोडेखोर मंडळी सतत माझे घर लुटत असतात.

मामा मस्त, पण हे दरोडेखोर तुमचे लाडके असणार.

परन लकी आहेस ५+१ मामा. माझे आपले अशोकमामा.

"होणार सून मी या घरची...." मालिकेवर मनापासून प्रेम करणार्‍या सार्‍या बंधू भगिनी....भाचे भाच्यांना यंदाची दिवाळी त्यांच्या अंगणात यशाच्या लखलखीत चांदण्या बरसणारी जावो...आणि सर्वांना त्यांच्या स्वप्नपूर्तीचे फळही मिळो....याच शुभेच्छा !

शुक्रवार दि.१ नोव्हेंबर २०१३ ~ अपडेट

~ लग्न झाल्यानंतर आज प्रथमच जान्हवी माहेरी आली....आणि माहेरी आली काय आणि घर जणू काय हर्षाने उजळून निघाले वडील आणि भावासाठी....आई मामा घरी नव्हते. जान्हवी आणि वडील यांचा संवाद तर खासच. बाबासाठी लगबगीने जेवण तयारीला लागणारी जान्हवी...त्याना वाढणारी जान्हवी...आणि नंतर भावाला घेऊन स्वयंपाक घर साफ करणारी, भांडी घासून पुसून ठेवणारी जान्हवी.....ही सारी चित्रे खूप लोभसवाणी....शिवाय हे करताना तिचा हसरा चेहरा सारा भाग प्रसन्न करणारा वाटत होता. भावालाही आतापर्यंत ज्या बहिणीबरोबर आपण उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेत होतो त्याच बहिणीची किंमत ती गेल्यावर समजली आहे आणि तो तिची महती थेट शब्दात तिला तोंडावर सांगत आहे हेही दृश्य छानच वाटले. बहीण लाडक्या भावाला शुभेच्छा देते कारण तो आता बारावीची परीक्षा गांभीर्याने देणार आहे. भांडी घासत असतानाच फोन वाजतो...तो असतो चाळीतील जान्हवीच्या मित्राचा....मनिषचा....जान्हवी त्याला आपण बाहेर भेटायला येत आहे असे सांगते...पिंट्या तिला जाण्यास सांगतो....चाळीच्या बाहेर जान्हवी आणि मनिषची भेट. तो तिला सुखात असल्याचे पाहून आनंदित होतो. पण जान्हवीला माहेरच्या लोकांच्या जेवणाची जी आबाळ होत आहे त्याचे वैषम्य वाटत आहे...कारण आई स्वयंपाकघरात जाणार नाही हे तिला उमगले आहे. मनिषला सांगून ती एक स्वयंपाकीण बाई नियुक्त करण्याचे ठरवते. सायंकाळी ती कामवाली बाई घरी बोलणी करायला येते....सारे काही जान्हवी ठरवित आहे, तर मामा आणि आई ही कामवाली म्हणजे आपली गुलाम असल्याचे वर्तन करून अपमानस्पद बोलतात....ती आजच्या काळातील बाई, तडफदार उत्तर देवून...'मी जान्हवीताईंचा निरोप म्हणून आल्ये आहे...मला नाही तुमची गरज....आणि मामा तुम्ही पाहुणे इथले जावा की आता आपल्या गावाला..." असे थेटच बोलल्यावर मामा थिजूनच जातो. पण जान्हवी सांभाळून घेते...२००० रुपये पगार ठरतो; पण बाई 'मी आठेक दिवस कामाला येईल...इथली परिस्थिती पाहीन, मग ठरविणार काम करायचे की नाही...". जान्हवी आणि बाबा एकमेकाकडे पाहात राहतात.

"गोकुळ" वर मात्र दोन सासवा टेबलवर तांदुळ निवडीत, अन्य कामे करीत आहेत...आज दोघींच्याही तोंडी विषय आहे तो जान्हवीचाच. शरयू तर पहिल्यापासूनच जान्हवीच्या बाजूची आणि आता सख्खी सासू 'छान आहे गं ही मुलगी....किती विनम्रता आहे....आणि आवाज वाढवूनही बोलत नाही..." अशी कबुली देत आहे. शरयूला तर काळजी ही की नवपरिणीत दांपत्याला मधुचंद्राला केव्हा आणि कुठे पाठवायचे ? आई म्हणतात "आपण जोडीला महाबळेश्वरला पाठवून देऊ या...दिवाळीनंतर...".

शरयू खट्याळपणे म्हणते, "आपण याना मधुचंद्राला बाहेर पाठविण्याचा विचार करीत बसलो आहोत, पण यांचा तर मधुचंद्र झालाही असेल..." यावर दोघी सासवा मोठ्याने हसतात....एकूण हे बदलते वातावरण जान्हवीसाठी खूपच पोषक ठरत असल्याचे दिसत आहे. नंतर बेबीआत्या त्यांच्या बैठकीत येते... तर आजी व श्री एका खोलीत बसून कसली तरी योजना आखत आहेत....ती काय असावी ? यावर शनिवारच्या भागात खुलासा होऊ शकेल.

"होणार सून मी या घरची...." मालिकेवर मनापासून प्रेम करणार्‍या सार्‍या बंधू भगिनी....भाचे भाच्यांना यंदाची दिवाळी त्यांच्या अंगणात यशाच्या लखलखीत चांदण्या बरसणारी जावो...आणि सर्वांना त्यांच्या स्वप्नपूर्तीचे फळही मिळो....याच शुभेच्छा ! >>>> मस्त लिहिलय मामा Happy तुमची साधी सरळ वाक्यरचनाच मला भावते
समस्त मा.बो.कर आणी आपल्या लाड्क्या मालिकेतल्या कलाकार, ले़खक,तत्रन्यनाहि दिवाळीच्या शुभेच्छा!!

धन्यवाद....रानभुल ! शुभेच्छाबद्दल आभार.

...आणि मधुरा....अगं धाग्याबद्दल तुझं कौतुक केले आहे ना ? मग त्याला उत्तर म्हणून "...Ha...ha...ha!!!..." हे काय समजले नाही.... दिवाळीचा फराळ चालला आहे का तुझा, मजेत ??

Pages