निसर्गाच्या गप्पा (भाग-१३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 20 March, 2013 - 12:06

निसर्गाच्या गप्पांच्या १३ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

५ डिसेंबर २०१० ला निसर्गाच्या गप्पा हा धागा निसर्गविषयक बाबींची आवड, आकर्षण असणार्‍या निसर्गप्रेमींनी आपले अनुभव शेअर करण्याच्या दृष्टीने उघडला. बघता बघता निसर्गाच्या गप्पा ह्या धाग्याचे १२ भाग पूर्ण झाले. सगळ्या ऋतूंमधून हा धागा न्हाऊन जात आहे. धाग सुरू करताना अपेक्षे पेक्षा उदंड प्रतिसाद ह्या धाग्याला मिळेल ह्याची कल्पना नव्हती. ह्या धाग्यावरील प्रत्येकाला इथे शेअर केलेल्या अनुभवामुळे व त्याला मिळत असलेल्या निसर्गमय प्रतिसादांमुळे अजुनच निसर्गाशी जवळीक निर्माण झाली आहे.

निसर्गा बद्दल माहीती देण्यात कोणी सिंहाचा वाटा उचलला आहे तर अगदी एका ओळीत माहीती देऊन, फोटो शेअर करुन सगळ्याच निसर्ग प्रेमींनी निसर्गाबद्दल आपला आदर, आपल प्रेम, व्यक्त केला आहे.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्षू,
निवडूंगाचे इतके प्रकार आहेत हे प्रथमच पाहायला मिळालं,सगळे फोटो छान !

जागु, गमभन,ईनमीनतीन सर्व फोटो अप्रतिम !
तामणीचा फोटो तर खासच !

दिनेशदा,
बागेचे फोटो छान आलेत, ही बाग तयार करत असताना तुमचा सल्ला त्यांनी घेतला तर ती आणखी फुलेल हे नक्की.

हे (गेल्या रविवारी) गावाकड्च्या बांधावरचे घेतलेले काही फोटो (फोटो काढणारा अजुन फोटोग्राफी शिकत आहे हे तुमच्या लक्षात येईलच.. :स्मित:)
१)
DSCN0603.JPGDSCN0604.JPGDSCN0605.JPGDSCN0611.JPG
२) ??
DSCN0606_0.JPG
३) हे भर उन्हात फुललेलं चंदनाच झाडं आणि त्याच्या बिया (चंदनबटका)
DSCN0607.JPGDSCN0608.JPGDSCN0609.JPG
४) ??
DSCN0610.JPG
५)DSCN0612.JPG
६)DSCN0613.JPG
७) ही चार्‍या बरोबरच पानमळ्याचं कुंपन मजबुत करणारी तुतीची (तुतु) झाडं,आंबट-गोड फळं,मुलांनी लगेच खिसे भरुन घेतले..
DSCN0614.JPGDSCN0616.JPGDSCN0619.JPG
८) वाघाट्याची भाजी प्रथमच (आजीला खात्रीने विचारुन) खाल्ली...थोडी कडु लागली, ही भाजी खाण्याबद्दल आजी एकादशीचा संदर्भ देत होती
DSCN0620.JPG
९) मला फक्त 'म्हातारी' हे एकच नाव लक्षात आहे.
DSCN0621.JPGDSCN0622.JPG
१०) याचा उपयोग कपड्याचा साबण तयार करण्यासाठी होतो असं ऐकलयं..
DSCN0623.JPG
११) ही चिंचेची कोवळी पाने मुलांनी खिशात घरी आणल्याने आणखी एक फोटो वाढला..
DSCN0625.JPG
१२)ही गुळवेल ना ?
DSCN0628.JPG
१३) ??
DSCN0629.JPG
१४) घरच्या मागे असलेल्या या झाडांवर रोज संध्याकाळी यांची वर्दळ असते, फोटो घेताना मात्र लगेच फडफड ..
DSCN0537_4.JPGDSCN0538_0.JPG

अनिल, अरे किती हि फळे. झाडावर लगडलेल्या कैर्‍या बघुन एक जमाना झाला. मायामित असतांना पाहिल्या होत्या. आणि गाभुळलेल्या विलायती चिंचा लहान पणी खुप खायचो. मी भारतात नेहेमी हिवाळ्यात येते, त्यामुळे ह्या फळांची मजा घेउ शकत नाही. तुझी मजा आहे.

सुप्रभात.

वा अनिल मस्त प्रकार आहेत सगळे. कुठल गाव?

वर्षूताई फुले खुप सुंदर आहेत.

मस्तच फोटो आहेत सगळे. अनिल च्या फोटोत २ रा `फर्गेट मी नॉट' च्या फुलांचा आहे का ?
तुती म्हणजेच मलबेरी ना ? फार मस्त चव अस्ते त्यांची.

अनिल च्या फोटोत २ रा `फर्गेट मी नॉट' च्या फुलांचा आहे का ? >>> चित्रक आहे ते - भलते चिकट चिकट असते ते फुल .....

वर्षू काय सुरेख रंग आहे, मी या रंगाच्या प्रेमात आहे, खुप ड्रेसेस आहेत या रंगाचे (आजही हाच रंग घातलाय)

अनिल, विलायती चिंच एकदम मस्त. मोर नारळावर बसलाय म्हणजे उडतानाचा फोटो काढायची जबाबदारी आता तुझ्यावरच आहे Happy

अनिल, आता खरंच कधी नेणार आहेस ते बोल, आम्हाला शेतावर ! आम्ही पण मुलंच कि !!

सुमंगल, हे घर अंगोला, पश्चिम आफ्रिकेत !

वर्षू, हि फुले ४२० असतात. ते पिवळे पुंकेसर दिसताहेत त्यावरचे परागकण चक्क फसवे असतात.

सुमंगल्,मानुषी,वर्षु,जागु,स्निग्धा ,रावी ,शशांक,दिनेशदा
धन्यवाद !

साधना,
धन्यवाद !
लवकरच मोराचा तसा फोटो मिळेल याची खात्री आहे ..

शशांकजी,
ती १२ नं. ची लाल फळे देखील मऊ आणि खुप चिकट होती

स्निग्धा,
या गोकर्णीचा उपयोग कशासाठी करतात ?

अनिल, आता खरंच कधी नेणार आहेस ते बोल, आम्हाला शेतावर ! आम्ही पण मुलंच कि !!
दिनेशदा,
नेहमीच स्वागत आहे, तुम्हीच दिवस, महिना ठरवा आणि मला सांगा, त्या प्रमाणे सगळी कार्यवाही होईल..

अनिल, ती लाल फळे बहुतेक रानद्राक्ष आहेत. गुळवेलीला अशी फळे येतात का याबद्दल मला शंका आहे.
( शांकलीकडच्या वेलीला फुले यायला वेळ आहे अजून Happy )
आणि सगळ्यांचे नाही जमले तर मी एकटा येईनच.

शुभ सकाळ नि ग कर्स!!

दिनेशदा, तुम्ही अफ्रिकेतच स्थाइक होणार का? मला ऊगाचच भारतात परतायचे वेध लागले आहेत. २०२० पर्यंत रिटायर होइन. त्यानंतर भारतात परतावे म्हणतोय. कितपत जमेल देव जाणे.

अनिल, मलापण शेताचा अनुभव घ्यायचा आहे. माझा नंबर लागेल ना. कधितरी समर मधे आले तर ठरवु.

सुमंगल, सध्या तरी हे ठरवलेले नाही. आता सगळेच देश प्रिय वाटतात. निवृत्त झाल्यावर मात्र भारतभर फिरायचे आहे.

अनिल, मलापण शेताचा अनुभव घ्यायचा आहे. माझा नंबर लागेल ना. कधितरी समर मधे आले तर ठरवु.
सुमंगल,
नक्की ठरवा ! भारतात आल्यानंतर शेती घ्या आणि ऑरगैनिक शेती करा, नक्कीच फायदेशीर ठरेल
शेतीत केलेली गुंतवणुक नक्कीच फायदेशीर आहे याची खात्री आहे.

अनिल, तूला मिळाले तर इंगळहाळीकरांचे पुन्हा आसमंत हे पुस्तक बघ. सिंहगडाच्या पायथ्याशी त्यांनी केलेल्या शेतीचे प्रयोग आहेत त्यात. सगळा हौसेचा मामला पण पहिली काही वर्षे सोडली तर व्यवहार आतबट्ट्याच्या ठरला नाही.

त्यांना त्यांच्या शेतातील उत्पादने खपवताना पण फार मजेशीर अनुभव आले.

"सासुबाई, नको म्हणताहेत" असे कारण सांगूनही ते धान्य घ्यायला नकार दिला गेला.

माझे वडीलही शेती करायचे तेंव्हा असेच हौशीने करायचे. दर वर्षी वेगवेगळे प्रयोग. मला आठवलेले प्रयोग म्हणजे शेंगदाणा, वाटाणा, बटाटे, उस, मका ह्याची उत्पादने आमच्याकडे कधी काढली जात नाहीत पण वडील ह्याचे प्रयोग करायचे. एखाद शेत तरी वेगळ लावायचे. बाकी भाजीचे मळे होतेच.

लिंबाच्या झाडाला बारीक लिंबू लागले आहेत पण अचानक झाडाच्या फांद्या वाळू लागल्यात, लिंबु पण सुकु लागलेत.
ही कुठल्या रोगाची लक्षणं आहेत?

सारीका, झाडावर किंवा पानामागे पांढरे किंवा काळे किडे दिसायला लागले आहेत का ? मूळाशी उंदराने बिळ केले आहे का ?
लिंबाच्या झाडाला पाण्याचा ताण सहज सहन करता येतो. त्यामूळे तो प्रॉब्लेम नसावा.

.

लोकमतच्या नाशिक पुरवणीत यंदाच्या पावसाबद्दल एक लेख आला होता, असं ऐकीवात आहे.
त्यात म्हटलं होतं की ग्रामीण ठोकताळ्यांप्रमाणे यन्दा कावळ्यांनी आता घरटी बांधायला सुर्वात केल्यामुळे पाऊस लवकर आहे.
त्यात हे ही म्हटलं होतं की कावळ्याने झाडाच्या सर्वात वरच्या भागात घरटं बांधलं तर कमी पाउस, मध्य भागात बांधलं तर मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि खाली बांधलं तर भरपुर पाऊस होईल. गंमत वाटली हे वाचुन.
पण खरच असं होतं का?

यन्दा कावळ्यांनी आता घरटी बांधायला सुर्वात केल्यामुळे पाऊस लवकर आहे. >>
असे मी पण ऐकले आहे. तसेही पशू-पक्षांना निसर्गाचे ठोकताळे बरोबर कळतात, कारण तेच निसर्गाच्या खुप जवळ असतात.

मुंग्यांची धान्याची बेगमी करतानाची घाई दिसली की पाऊस जवळ आला असे समजतात.

चितमपल्लींनी हे खुप वर्षांपुर्वी नोंदवले होते. त्यांनी बाभळी / बोरी असल्या काटेरी झाडांवरच्या घरट्यांवरून पण आडाखे बांधलेले होते. मगरीने अंडी घातली कि बरोबर २१ दिवशी नदीला पूर येतो, असे पण लिहिले आहे.

हि निसर्गाची लेकरे कायम त्याच्याच सानिध्यात असतात. पिढ्यांपिढ्यांचे आडाखे त्यांच्या जीन्समधून पुढच्या पिढीत जात असतील.

आपल्या डॉ. उज्ज्वला दळवींनी एका लेखात लिहिले होते कि डि.एन.ए. सारखे माहीती साठवण्याचे दुसरे साधन नाही. ते तंत्र जर आपल्याला वापरता आले, तर जगातली सगळी माहिती अगदी थोड्या जागेत साठवता येईल.

Pages