निसर्गाच्या गप्पा (भाग-१३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 20 March, 2013 - 12:06

निसर्गाच्या गप्पांच्या १३ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

५ डिसेंबर २०१० ला निसर्गाच्या गप्पा हा धागा निसर्गविषयक बाबींची आवड, आकर्षण असणार्‍या निसर्गप्रेमींनी आपले अनुभव शेअर करण्याच्या दृष्टीने उघडला. बघता बघता निसर्गाच्या गप्पा ह्या धाग्याचे १२ भाग पूर्ण झाले. सगळ्या ऋतूंमधून हा धागा न्हाऊन जात आहे. धाग सुरू करताना अपेक्षे पेक्षा उदंड प्रतिसाद ह्या धाग्याला मिळेल ह्याची कल्पना नव्हती. ह्या धाग्यावरील प्रत्येकाला इथे शेअर केलेल्या अनुभवामुळे व त्याला मिळत असलेल्या निसर्गमय प्रतिसादांमुळे अजुनच निसर्गाशी जवळीक निर्माण झाली आहे.

निसर्गा बद्दल माहीती देण्यात कोणी सिंहाचा वाटा उचलला आहे तर अगदी एका ओळीत माहीती देऊन, फोटो शेअर करुन सगळ्याच निसर्ग प्रेमींनी निसर्गाबद्दल आपला आदर, आपल प्रेम, व्यक्त केला आहे.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणी ही मनमोहक रंगांची थंड प्रदेशातील फुलं तर अक्षरशः पावसाळ्यात वेड्यासारखी उगवणार्‍या तेरड्या सारख्या भरपूर प्रमाणात उमलली होती

वर्षू, किती सुंदर आहेत गं तुझी फुले..

मला निवडूंगाचे खुप वाईट वाटते, बिचारा खुप एकाकी, दु:खी वाटतो नेहमी. वर ते काट्यांचे बोचके बाळगा नेहमी सोबतीला. कित्ती वाईट वाटत असेल त्याला मनातुन...

सुप्रभात.

वर्षूताई खुप सुंदर आहेत ग फुले. तुझ्यामुळे आम्हाला जपानची फुले इथून पहायला मिळतात.
दिनेशदा पॅशनफ्रुट्चे फुले, ते दुसरे निळे फुले आणि किटक सुंदरच.

वर्षूतै..........काय सुरेख सफर घडवलीस गं!! काय एकेक सही रंग आहेत! डोळे निवले अगदी!!

आणि दा, पॅशनफ्रूटचा वेगळा प्रकार सुंदरच आहे. आणि तो माणसाच्या चेहर्‍याशी साधर्म्य दाखवणारा किडा...अफलातून!! Happy

माझ्या घराजवळ हे एक अंदाजे ४५ फुट उंच झाड आहे त्याची पानं, फुलं, फळं अशी आहेत.
फळं पिकली की पिवळट होतात. कसले असेल हे.
be1.jpgbe2.jpgbe4.jpgbe3.jpg

जो-एस भोकराच झाड आहे ते. काल-परवाच सारीकाने त्याच्या लोणच्याची छान रेसिपी टाकली आहे. घेऊन ये आणि लोणच करुन टाक. Happy

वर्शूतै :- खुपच मस्त मस्त फुले आहेत. जागु, तुझी पण फुले खुपच सुरेख..... मदनबाणाची... फोटो बघुनच सुगंध जाणवण्यासारखी...:)

हे आम च्या ईथे एक झाड आहे....... आता ईथे समर चालु झाल आहे तर १० दिवसात झाडाच्या प्रत्येक फादी वर फुलच फुल आलीत...खुप च सुंदर दिसत.... कसल झाड आहे हे ?

जितक्या पटकन हि फुल आलीत तितक्या लव कर गळुन पण जातात... :(photo_2.JPGzad.JPG

जागू धंन्यवाद
वर्षू नील ..:) Happy Happy

मध्यंतरी मी एका कुंडित बी पडून आलेल्या झाडाचा उल्लेख केला होता त्याची पानं जरा जांभळाच्या झाडासारखी दिसतात पण पानाला अंब्याच्या पाना सारखा वास येतो.
jm5.jpg

सारीका,
सासुबाईना विचारून बघ ना, भोकराचे सरबत माहीत आहे का ? उष्णता, अल्सर यासाठी चांगले असते ते असे वाचले होते. भोकरालाच उत्तरेकडे लसोडा म्हणतात.

दिनेशदा, सरबत माहीत नाही पण उन्हाळी वाळवणात ताकात भोकरं भिजवून नंतर वाळवून ठेवतात.
सणासुदीला तळणीच्या पदार्थांमध्ये याचाही समावेश असतो.
सरबताची कृती द्याल का?

आज सकाळी दोन नवलाच्या गोष्टी घडल्या.

एका हातात बॅग आणि दुसर्‍या हातात कचर्‍याची पिशवी असे संभाळत मी लिफ्ट मधे शिरलो. आणि काही केल्या लिफ्टचे दार बंद होई ना. म्हणजे अर्धवट बंद व्हायचे आणि परत उघडायचे. लिफ्ट बिघडली असे वाटून मी दुसर्‍या लिफ्टसाठी परत बटण दाबले पण उपयोग नव्हता. एका मजल्यावर एक लिफ्ट ऑलरेडी असताना, दुसरी लिफ्ट येणार नाही, अशी योजना असणार. दोन तीन वेळा आतबाहेर केल्यावर मला दिसले कि दाराच्या सेन्सरवर अडथळा आणत एक छोटीशी पाल बसली आहे. आणि ती तिथून हलायला तयार नव्हती. तिला मारायला, हाकलायला माझ्या हातात काहीच नव्हते. शेवटी शुक शुक करुन, फूंक मारून तिला हलवले. मग लिफ्टचे दार बंद झाले.

सकाळी निघताना घरातल्या नळाला पाणी नव्हते. असे क्वचितच होते. मी खाली आलो तर गच्चीतली टाकी ओव्हरफ्लो झाली आणि पाणी खाली पडत असले कि जसा आवाज येतो तसा आवाज येत होता. आवाज फार मोठा नव्हता, म्हणून मी एक फेरी मारली. काही ठराविक ठिकाणीच हा आवाज येत होता. पण पाणी पडताना दिसत नव्हते. आणि गच्चीवरच्या टाक्या ओव्हरफ्लो होतील याची शक्यताच नाही. पण आवाज मात्र तसाच होता.
बराच वेळ शोध घेतल्यावर मला काय आढळले माहीत आहे ? सभोवार असलेल्या पिंपळाच्या पानांचा तो आवाज होता. एकमेकांवर आपटल्याने तसा आवाज येत होता आणि हि झाडे उंचीने माझ्याचएवढी असल्याने,
चांगलाच मोठा होता Happy

नाही ना माझ्याकडे. एम.पी. किंवा यू.पी. मधे करतात असे वाचले होते.
रायगड भागात जास्त पिकलेली भोकरे, कोंडा आणि गूळ वापरून एक केक करतात. हे मिश्रण रात्रभर मातीच्या तवलीत घालून मंद आचेवर ठेवतात. सकाळी याचा केक तयार होतो. मस्त लागत असणार हा प्रकार. पण नेमकी कृती आणि प्रमाण माहीत नाही. शिवाय इथे भोकरे मिळणारही नाहीत.

थांकु जागु,दिनेश दा,मानुषी..
तुमच्या व्यतिरिक्त अजून कुणाला नाही दिसलेत कॅक्टी..>>>>>>>>>>>>>>>मला दिसली. छानच आहेत.
वर्षू, तेरडा आणि सगळी फ़ुले मस्तच. मन भरून आलं ती विविधरंगी फ़ुले बघून. अगदी पावसाळ्यात कोकणात गेलेय असंच वाटलं. Happy
दिनेशदा, जागू, जो_एस, अबोल सुंदर फ़ोटो. Happy

पिंपळाच्या पानांचा तो आवाज होता.>>>>>>>>>...मी शनीवार पेठेत राहत होते. तिथे एक खूप उंच आणि डौलदार पिंपळ आहे. वारा आला की त्याची सळ्सळ इतकी छान ऐकू यायची. रात्री तर सगळीकडे शांत असताना खूप मोठा आवाज यायचा पण तो त्रासदायक नसायचा. Happy

दिनेशदा धंन्यवाद, अशी झाडं बरेचदा येतात कुंडीत, अजून उंबर, पिंपळ, निलगिरी अशीही उगवत असतात. उंबराचीतर कितीही तोडली तरी परत वाढू लागतात.

जागू बघितला का जांभळाच्या पानाचा वास? Happy

काहि दिवसांपुर्वी किड्याची हिरवी अंडी दिसली होती
eg.jpg
तसं हे परवा दिसलं
eg_0.jpg

जो_एस, कुंडीमधे पक्ष्यांची शीट पडत असते का ? या सर्व बिया त्यांच्याकडूनच येतात.
त्या अंड्यांचे रोज निरिक्षण केल्यास त्यातून अळी, कोष, किटक असे सगळेच न्याहाळता येईल. फोटो पण काढता येतील.

फोटो पण काढता येतील.>>>>>......शु्टिंग करून आम्हालाही दाखवा Happy

जो कसला सुर्रेख आलाय फोटो..

दिनेश दा.. कालच एक थी डायन पाहिला .. त्यातही पाल्,डायन्,बंद लिफ्ट हे तिन्ही फॅक्टर्स होते.. Wink

शोभा, दिनेशदा, वर्षु नील धंन्यवाद

त्या हिरव्या अंड्यांचे त्यातून किडे बाहेर यई पर्यंत फोटो काढले होते, हे पहा.
http://www.maayboli.com/node/40860
आता या नव्यातून काय येते पाहू.

दिनेशदा कुंड्या ओपन टू स्काय आहेत आणि आजू बाजूला मोठ मोठी झाडं आहेत त्यामुळे पक्ष्यांची शीट पडणे शक्य आहे.

आज पहाटे अंधूक प्रकाश असताना एक घुबडासाऱह्या चेहर्‍याचा पण छोटा साधारण पोपटा एवढा पक्षी दिसला पटकन कॅमेरा आणून फोटो काढला, टाकतो लवकरच.

Pages