निसर्गाच्या गप्पांच्या १३ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
५ डिसेंबर २०१० ला निसर्गाच्या गप्पा हा धागा निसर्गविषयक बाबींची आवड, आकर्षण असणार्या निसर्गप्रेमींनी आपले अनुभव शेअर करण्याच्या दृष्टीने उघडला. बघता बघता निसर्गाच्या गप्पा ह्या धाग्याचे १२ भाग पूर्ण झाले. सगळ्या ऋतूंमधून हा धागा न्हाऊन जात आहे. धाग सुरू करताना अपेक्षे पेक्षा उदंड प्रतिसाद ह्या धाग्याला मिळेल ह्याची कल्पना नव्हती. ह्या धाग्यावरील प्रत्येकाला इथे शेअर केलेल्या अनुभवामुळे व त्याला मिळत असलेल्या निसर्गमय प्रतिसादांमुळे अजुनच निसर्गाशी जवळीक निर्माण झाली आहे.
निसर्गा बद्दल माहीती देण्यात कोणी सिंहाचा वाटा उचलला आहे तर अगदी एका ओळीत माहीती देऊन, फोटो शेअर करुन सगळ्याच निसर्ग प्रेमींनी निसर्गाबद्दल आपला आदर, आपल प्रेम, व्यक्त केला आहे.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय
ऐ आत्ताच इकडल्या बोटेनिकल
ऐ आत्ताच इकडल्या बोटेनिकल गार्डन ला भेट देऊन आलेय.. उद्यापर्यन्त टाकतेच फोटू.. खूप मज्जा आली.. बाहेर धो धो कोसळत होते पण आत ग्रीन हाउसेस फुल्ल होते
वर्षू, बोटॅनिकल गार्डन म्हणजे
वर्षू, बोटॅनिकल गार्डन म्हणजे माझा वीक पॉइंट आहे. वाट बघतोय.
सावली, थोडा वेगळा विचार करणार
सावली,
थोडा वेगळा विचार करणार का ?
नुसती शोभेची झाडे लावण्यापेक्षा हर्बज लावणे सहज शक्य आहे. यात फुले आणि फॉईलेज ब्यूटी दोन्ही आहेतच.
शिवाय औषधी उपयोग भरपूर. हि झाडे फार उंच वाढत नाहीत, त्यामूळे आवाक्यात राहते. परत परत लावता येतात.
१) कोरफड - पिवळी किंवा केशरी फुले येतील.
२) कारळे - सुंदर पिवळी फुले येतात
३) हळद - पांढरा-जांभळा फुलोरा
४) अढुळसा - पिवळी बोंडे
५) अळशी - निळी फुले
६) सबजा - हिरवा किंवा किरमीजी तूरा, सुगंधी पाने
७) गवती चहा - फुले नाहीत
८) आले
९) वाळा
शिवाय अनेक भाज्या लावता येतील. यांची पानेही फार सुंदर असतात
मेथी, टोमॅटो, बटाटा ( पांढरी- जांभळी फुले) हळीव ( सुंदर पाने, खाद्य असतात. ) शोभेच्या मिरच्या.
मूळा ( गुलाबी फुले ) गाजर ( पांढरी फुले ) बीट ( लाल पाने ) यांच्या फक्त वरच्या चकत्या कापून लावायच्या.
अंबाडी पिवळी फुले आणि लाल बोंडे.. पानांची भाजी आणि बोंडाचे सरबत करता येते.
मोहरी.. पिवळी फुले. पानांची भाजी होते.
चुका.. बाजारातून आणलेल्या जुडीत मूळे असलेली रोपे असल्यास ती लावता येतात.
करडई - सुंदर फुले.
वेल चढवायला भिंतीचा आधार असेल तर वाटाणा, कारले, मटकी, पॅशनफ्रुट हे सगळे वेल सुंदर पानाफुलांचे आहेत.
दिनेशदा, वाचूनच प्रसन्न
दिनेशदा, वाचूनच प्रसन्न वाटले. असा वेगळा विचार करणे खरोखरच फक्त तुम्हालाच शक्य आहे.
आभार मधु.. आपल्याकडे साप आणि
आभार मधु..
आपल्याकडे साप आणि सुगंध असा काहिसा चुकीचा संयोग जनमनात ठाम रुजलाय.
सहज विचार करता सुचले, काही झाडे सुगंध नेमका कुणासाठी तयार करत असतील ?
चंदनाचे घ्या, साधारणपणे झाडे सुगंध तयार करतात तो परागीवहनासाठी किटकांना आकर्षित करण्यासाठी.
चंदनाचा फुलांना गंध नसतो ( निदान तो तरी नसतो ) किरमीजी रंगाची अगदी बारीक फुले असतात. परागीवहन नेमके कुठले किटक करत असतील याची कल्पना नाही पण फळधारणा होते. आणि ती फळे कोकिळेसकट अनेक पक्षी खातात.
चंदनाच्या झाडात ( खोडात ) वयाच्या २५ नंतरच सुगंध निर्माण होतो. तोदेखील गाभ्यात ! म्हणजे झाडाच्या बाहेरुन कुणाला तो उपभोगता येणारच नाही.
केवडा. याचे परागीवहन होते वार्यामार्फत. वार्याला सुगंधाचे आकर्षण कसे असेल ? शिवाय केवड्यात फलधारणाही अगदी अभावानेच होते.
निशिगंध. परागीवहन होत असेलच. पण फलधारणा मी बघितली नाही.
रातराणी, अगदी अभावानेच फलधारणा होते. इतक्या वर्षात मी केवळ एकच फळ बघितले.
गुलाब. फलधारणा होते पण आपल्याकडे नाही. सुगंधी गुलाबही फार कमी असतात आणि ते बहुदा मानवी
हस्तक्षेपाने तयार झालेले असतात.
मोगरा, फलधारणा मी बघितली नाही.
सोनचाफा, हिरवा चाफा, खुरचाफा, कैलाशपति... सर्वात फलधारणा होते. म्हणजे सुगंध किटकांसाठी. मग हा अपवाद सोडला तर बाकीचे सुगंध कोणासाठी ? माणसासाठी ?
त्यापेक्षा, त्यांनी निर्माण केलेले गंध, माणसाला आवडले म्हणून माणसांनी त्या झाडांची जोपासना केली
किंवा
माणसाला आवडतील असे गंध त्या झाडांनी निर्माण केले आणि आपली प्रजा वाढवली
कुठले विधान जास्त योग्य आहे ?
दिनेश दा.. घरच्या बागेत
दिनेश दा.. घरच्या बागेत हर्ब्ज लावण्याची कल्पना अतिशय आवडली... + १०००००
सुगंध देणार्या झाडांविषयी वाचताना तुमच्या विचारपूर्वक केलेल्या निरिक्षणांच कौतुक करावं तितकं थोडंय..
,' ,'माणसाला आवडतील असे गंध त्या झाडांनी निर्माण केले आणि आपली प्रजा वाढवली.. दाट शक्यता आहे तशी!!! पण कशी??
वर्षू, मारीजुआना या नशील्या
वर्षू, मारीजुआना या नशील्या वनस्पतीबाबत तसे विधान करतात. ( माणसाच्या मेंदूतल्या रसायनांची नक्कल त्याने केलीय. )~
म्हणजे झाडांनी अनेक प्रयोग करुन बघितले आणि ज्याचा सुगंध माणसाला आवडला, त्यांचा प्रसार झाला.
माणसाला पोषक अशी प्रथिने गव्हाने निर्माण केली, जड आणि वार्याने उडून जाणार नाही असा दाणा तयार केला आणि त्याने जगावर आपले साम्राज्य पसरवले.
गुलाब. फलधारणा होते पण
गुलाब. फलधारणा होते पण आपल्याकडे नाही>>
याचे कारण काय असावे?
वॉव.. अमेझिंग!!!!!!!!!!!!
वॉव.. अमेझिंग!!!!!!!!!!!!
गमभन, अल्पाईन रोझेस, किंवा
गमभन,
अल्पाईन रोझेस, किंवा तश्याच थंड प्रदेशात म्हणजे नैरोबी मधे वाढणारे गुलाब बघितले तर आपल्याकडची गुलाबाची झाडे कुपोषित वाटतात. फळ निर्माण करायला लागणारे पोषण आपल्या मातीत आणि हवामानात नसावेच बहुदा. पण आपल्याकडच्या उष्ण हवामानातला सुगंध मात्र तिथे अभावानेच आढळतो.
ओह! गुलाब हे मुळचे भारतातले
ओह! गुलाब हे मुळचे भारतातले नाहीत ना. मला वाटते मोगलांबरोबर ते इथे आले असावेत.
दिनेशदा, धन्यवाद. हर्ब्स
दिनेशदा, धन्यवाद.
हर्ब्स नक्कीच लावता येतील. फक्त कुठे मिळतील ते आता शोधावे लागेल.
भाज्यांबद्दल जरा साशंक आहे कारण त्यांची जास्त निगराणी करावी लागेल. वाफे वगैरे बनवायचा विचार नाहीये.
वर म्हणाले तसे कॉटेज गार्डन म्हणजे येतील तसे येऊ द्यायचे असा विचार आहे.
हे कसलं झाड आहे? कलानगरच्या
हे कसलं झाड आहे? कलानगरच्या सिग्नलला जे नंदादीप उद्यान आहे त्यात मध्यभागी आहे हे झाड. फोटो स्कायवॉक वरुन काढला आहे.
हर्ब्ज जास्त दणकट असतात, अगदी
हर्ब्ज जास्त दणकट असतात, अगदी सहज वाढतात. आणि त्या मूळातच तीव्र वासाच्या असल्याने फारशी किड लागत नाही.
मुंबईत कुठल्याही चांगल्या नर्सरीत मिळायला हव्यात.
अश्विनी, तामण आहे ती. आपला
अश्विनी, तामण आहे ती. आपला राज्यवृक्ष. बी के सी आणि त्याला समांतर रस्ता, दोन्ही ठिकाणी आता फुलल्या असतील.
पिवळ्या फुलांचे वृक्ष खूप
पिवळ्या फुलांचे वृक्ष खूप बहरलेत या परिसरात. ती पण तामणच का?
राष्ट्रीय पक्षी सारखा राज्यवृक्ष पण असतो हे मला आत्ताच कळतंय
तो बहुतेक पीतमोहोर असणार.
तो बहुतेक पीतमोहोर असणार. बहाव्याचे एखादेच झाड असेल तिथे.
आणि राज्यपक्षी, हिरवे कबूतर.. आता मुंबईत तर ते दिसतच नाही.
दिनेशदा खरच खुप छान कल्पना
दिनेशदा खरच खुप छान कल्पना आहे. मलाही असा एखादा आयुर्वेदीक कोपरा करायचा आहे.
अढुळसा - पिवळी बोंडे
ह्यात पिवळाही रंग असतो का? मी सफेदच रंग पाहीला आहे अढुळशाच्या फुलांचा.
रातराणीची फळे मी दुसरीकडे बर्याचदा पाहीली आहेत पण माझ्या कडच्या रातराणीवर अजुन दिसली नाहीत.
अळशी आणि कारळ पेरली तर उगवतील का? मी आजच टाकून बघते.
गुलाबावर माझ्याकडे बर्याचदा फळे धरतात पण ती रुजत नाहीत. मागे मी फोटो पण टाकला होता.
शुभ सकाळ नि ग कर्स.
शुभ सकाळ नि ग कर्स.
अबोलीच्या भरपूर झाडे आली आहेत
अबोलीच्या भरपूर झाडे आली आहेत >> अभिनंदन
फुलं आली की इथे दाखवशीलच ना..
माझ्या शंकेश्वर / शंकासुराच्या बिया रुजून मस्त सात आठ इंच झालीत रोपं.
अळुकड्या पेरल्या त्यांनाही पानं फुटलीत.
वड दोन फुट मोठा झालाय, तोही पावसाळ्यात खुडेन वरुन.
कडीपत्ता सरळच वाढतोय आता पावसात खुडेन त्याचं टोक.
मधुमालती मात्र नुसतीच वाढतेय. फुलं नाहीयेत अजुन. शिवाय कधी कधी वाढणारं टोक तुटून / जळून जातं. ते असंच कि कबुतराने टोचल्याने काय माहित.
जागू, तुझा वनौषधींचा कोपर लावलास की कळव अपडेट्स.
दा, मस्त विचार मंथन!! मला
दा, मस्त विचार मंथन!! मला असाच प्रश्न थोडा वेगळ्या दिशेनी पडतो की काही वनस्पतींमधे फुला नंतर फळ आणि नंतर बी ही शृंखला होत नाही. उदा मोगरा, जाई, जुई, निशिगंध ..........वगैरे.... पण तरी सुद्धा त्या फुलतात. वास्तविक फुलाचं कार्य काय; तर पुनर्निर्मितीत सहाय्य; किंवा मुख्य सहभाग. पण इथे पुढची पिढी तयार करायला ती साखळीच फुलानंतर थांबते; तर मग ह्या वनस्पती फुलं निर्माण करण्याची क्रिया का करत असाव्यात? अशी कुठली इन्स्टिंक्ट त्यांना फुलं निर्माण झाल्यावरही फळ आणि बी निर्माण करायला प्रेरित करत नाही?
>>चंदनाच्या झाडात ( खोडात )
>>चंदनाच्या झाडात ( खोडात ) वयाच्या २५ नंतरच सुगंध निर्माण होतो. तोदेखील गाभ्यात !
'झाडाच्या खोडाला वयाच्या २५ वर्षांनंतर सुगंध' या विधानाचा आधार माहिती नाही. पण हे खरं नाही. चंदनाच्या खोडाचा सुगंधासाठी उपयोग करताना खोडाच्या गाभ्याचा व्हॉल्यूम, सुगंधी द्रव्यांचं कॉन्सन्ट्रेशन यावर किंमत किंवा वापर ठरतो. जसाजसा वृक्षाच्या वयानुसार गाभा वाढत जाईल, तसं या द्रव्यांचं कॉन्सन्ट्रेशन आणि क्वांटीटी पण वाढणार. तेव्हा ४ वर्षं वयाच्या वृक्षाच्या खोडापेक्षा १४ वर्षांचा वृक्ष जास्त सुगंध देईल. इथे रीसर्चमधे १५ वर्षं वयाची झाडं वापरली आहेत. आणि त्यातून व्यवस्थीत सुगंध मिळेल इतकी सुगंधी द्रव्य देखील मिळवलेली दिसतात. :
http://link.springer.com/article/10.1007%2Fs11676-013-0331-3#page-1
>>केवडा. याचे परागीवहन होते वार्यामार्फत. वार्याला सुगंधाचे आकर्षण कसे असेल ? शिवाय केवड्यात फलधारणाही अगदी अभावानेच होते.
यातलं, 'अभावानं फलधारणा' हे देखील तितकसं खरं नाही. केवडा म्हणजे Pandanus fascicularis. सुगंधासाठी केलेल्या व्यावसायिक लागवडीत मेल फ्लावर्सचा खूप वापर होत असल्यामुळे कदाचित फळं दिसत नसतील. पण याचा अर्थ फलधारणा अभावानं होते असा नाही. इथे फोटो आहेतः
http://foter.com/Pandanus-fascicularis/
>>रातराणी, अगदी अभावानेच फलधारणा होते. इतक्या वर्षात मी केवळ एकच फळ बघितले.
रातराणी : Cestrum nocturnum हे टोमॅटो-बटाट्याच्या कुळातलं झुडुप (solanacea). एकूणच सोलेनेसी कुळातल्या झाडांना फळधारणेत त्रास होत नाही. इथे फळांचा फोटो आहे:
http://www.backyardnature.net/yucatan/nitelady.htm
>>गुलाब. फलधारणा होते पण आपल्याकडे नाही.
गुलाब पेअर्स आणि सफरचंदांच्या Rosaceae कुळातला. गुलाबाला देखिल फळं येतात. पाकळ्या गळून गेल्यावर बरेचदा फळ बघायला मिळतं. आपल्याकडे (म्हणजे भारतात म्हणायचं असेल तर) गुलाबाच्या फळधारणेला अटकाव करणारं खास वेगळं असं काही नाही. इथे पहीलाच फोटो गुलाबफळाचा आहे:
http://waynesword.palomar.edu/ecoph17.htm
@जागू | 29 April, 2013 -
@जागू | 29 April, 2013 - 22:53नवीन
अबोली -
माझ्याकडील अबोलीला वर्षभर बहर येत असतात. फूल उमलल्यावरही दोन दिवस तरी अगदी ताजे तवाने दिसते. आपल्या नेहमीच्या केशरी अबोलीशिवाय, जीत लाली अधिक असते, अशीही एक जात माझ्याकडे आहे. तिचे बी मी बंगलोरहून आणले होते. अबोलीच्या बीवर पाणी पडले की त्या तडकतात आणि एका बी मधून अनेक अणकुचीदार टोक असलेल्या खर्या बिया उडुन सभोवती पडतात. त्या पाव्साळ्यात सहज रुजतात. मला शेकडो रोपे उपटून खतखड्ड्यात टाकवी लागतात. अबोली खूप तगडि असते आणि दोन तीन वर्षे तरी उत्तम फुले देते. फार्शी देखभाल न लागणारे, फार मोठे न होणारे, कुंदीत लावायला सुंदर फुलझाड!
जास्वंदी-[देशी]. माझ्या घराभोवतीच्या कंपऊंडचा निदान १५ फूट भाग इचाच आहे.तिची उंची मी छाटून साडॅचार फूत ठेवली आहे. वर्षभर बहर येत असताअत. वरील दोन्ही फुलांना सुवास मात्र नाही.
@जागू | 29 April, 2013 -
@जागू | 29 April, 2013 - 22:53नवीन
अबोली -
माझ्याकडील अबोलीला वर्षभर बहर येत असतात. फूल उमलल्यावरही दोन दिवस तरी अगदी ताजे तवाने दिसते. आपल्या नेहमीच्या केशरी अबोलीशिवाय, जीत लाली अधिक असते, अशीही एक जात माझ्याकडे आहे. तिचे बी मी बंगलोरहून आणले होते. अबोलीच्या बीवर पाणी पडले की त्या तडकतात आणि एका बी मधून अनेक अणकुचीदार टोक असलेल्या खर्या बिया उडुन सभोवती पडतात. त्या पाव्साळ्यात सहज रुजतात. मला शेकडो रोपे उपटून खतखड्ड्यात टाकवी लागतात. अबोली खूप तगडि असते आणि दोन तीन वर्षे तरी उत्तम फुले देते. फार्शी देखभाल न लागणारे, फार मोठे न होणारे, कुंदीत लावायला सुंदर फुलझाड!
जास्वंदी-[देशी]. माझ्या घराभोवतीच्या कंपऊंडचा निदान १५ फूट भाग इचाच आहे.तिची उंची मी छाटून साडॅचार फूत ठेवली आहे. वर्षभर बहर येत असताअत. वरील दोन्ही फुलांना सुवास मात्र नाही.
वॉव! एक्स्प्लोजन ऑफ
वॉव! एक्स्प्लोजन ऑफ इन्फरमेशन!
खूप मजा येतेय वाचायला.
काल पुण्याच्या घरात(आठव्या मजल्यावर) दु.१ वाजता जेवताना बाल्कनीच्या बाजूने एका पक्ष्याची गोड आवाजातली गोड चालीतली शीळ ऐकू आली. ती शीळ चांगली ७/८ वेळा ऐकल्यावर मी उठून बाल्कनीत गेले तर तिथल्या एका शोभेच्या ३/४ फुटी उंच झाडातून तो पक्षी फडफडत उडून गेला. व विजेच्या तारेवर बसून तेच गाणं गात राहिला. कॅमेरा आणेपर्यंत उडून गेला. राखाडी रंगाचा कावळ्यापेक्षा आकाराने लहान असा पक्षी असावा.
खूप चुटपुट लागली. अंदाजच आला नाही तो आपल्याच बाल्कनीतल्या झाडावर असेल. थोडा अंदाज घेऊन गेले असते तर चांगला व्हीडीओ मिळाला असता. कोण असेल हा गायक?
मानुषी.. मागे एकदा मी निग वर
मानुषी.. मागे एकदा मी निग वर एक विडियो लिंक दिली होती.. कहीं ये वो तो नही???
ही शीळ ऐकून माझी बहीण तिच्या स्टुडंट्स्ना ओरडली होती कि वर्गात कोण शिट्या वाजवतोय म्हणून.. इतका माणसाने वाजवलेल्या शिट्टी सारखा हा पक्षी आवाज काढत असतो
वर्षू ती लिन्क पुन्हा मिळेल
वर्षू ती लिन्क पुन्हा मिळेल का? अगं हे सगळं इतक्या कमी सेकंदात घडलं की आता मला तो नीट आठवतही नाही. पण शीळ खूप सुंदर होती. माझी सून म्हणाली की तो सकाळपासून ओरडत होता पण ती २/३ वेळा पहायला गेली तिला काही कुठे दिसला नाही.
दिनेशदा.. घरच्या बागेत हर्ब्ज
दिनेशदा.. घरच्या बागेत हर्ब्ज लावण्याची कल्पना अतिशय आवडली... + १०००००
सुंदर माहिती..
मी अशी कल्पना खुप वर्षापासुन करतो आहे,त्यात या पानावर आल्यापासुन तर माहितीत खुप भर पडत आहे,त्यामुळे ५-१० गुंठ्यात अशी दुर्मिळ (५-५०) सुंदर फुलांची आणि ऑषधी झाडे लावावी,त्यात दिनेशदानी सांगितलेली झाडे ही आवर्जुन (आदेश मानुन) असावीत आणि ही बाग फुलल्यावर त्यांना, निगकरांना भेटीच आमंत्रण द्याव.
यासाठी २०० मैलाच अंतर मात्र मल अजुन तरी तोडता आलेलं नाही. पण हा योग एक दिवस नक्की येणार अशी मनाला खात्री आहे.(सध्या तरी कुंडीतल्या २-४ झाडांवर समाधान मानत आहे)
सुगंध देणार्या झाडांविषयी वाचताना तुमच्या विचारपूर्वक केलेल्या निरिक्षणांच कौतुक करावं तितकं थोडंय..
दिनेशदा,
तुमच्याकडुन निसर्गप्रेमींना मिळणारी ही माहिती आणि त्यांच्या मनात निर्माण केलेल्या झाडां-पानां-फुलां विषयीच्या प्रेमामुळे भावी काळात या मातीत अनेकांकडुन अशा बागा फुलतील यात शंका नाही
हे राज्य व्हावे हि तो श्रींची
हे राज्य व्हावे हि तो श्रींची इच्छा
http://www.maayboli.com/node/42771
शुभ सकाळ नि ग कर्स!! अनिल मी
शुभ सकाळ नि ग कर्स!!
अनिल मी देखिल ह्या पानावर वाचुन वाचुन प्रेरित होते कि काहितरी करावे. नविन झाडे लावावित. पण ह्या पानावरुन गेले कि सगळे विसरते. असो, कधीतरी नक्की कहितरी करेन.
Pages