निसर्गाच्या गप्पांच्या १३ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
५ डिसेंबर २०१० ला निसर्गाच्या गप्पा हा धागा निसर्गविषयक बाबींची आवड, आकर्षण असणार्या निसर्गप्रेमींनी आपले अनुभव शेअर करण्याच्या दृष्टीने उघडला. बघता बघता निसर्गाच्या गप्पा ह्या धाग्याचे १२ भाग पूर्ण झाले. सगळ्या ऋतूंमधून हा धागा न्हाऊन जात आहे. धाग सुरू करताना अपेक्षे पेक्षा उदंड प्रतिसाद ह्या धाग्याला मिळेल ह्याची कल्पना नव्हती. ह्या धाग्यावरील प्रत्येकाला इथे शेअर केलेल्या अनुभवामुळे व त्याला मिळत असलेल्या निसर्गमय प्रतिसादांमुळे अजुनच निसर्गाशी जवळीक निर्माण झाली आहे.
निसर्गा बद्दल माहीती देण्यात कोणी सिंहाचा वाटा उचलला आहे तर अगदी एका ओळीत माहीती देऊन, फोटो शेअर करुन सगळ्याच निसर्ग प्रेमींनी निसर्गाबद्दल आपला आदर, आपल प्रेम, व्यक्त केला आहे.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय
'वावळ' हा शब्द कधी ऐकला
'वावळ' हा शब्द कधी ऐकला नव्हता म्हणून गुगलून बघितलं. जागू, त्याचा तुला जवळचा वाटू शकणारा आणखी एक अर्थ दिसला. गुगल सर्च Holoptelea integrifolia असं नाव दाखवतोय.
शोभे मस्त आहेत गं तुझी
शोभे मस्त आहेत गं तुझी सदाफुली आणी अबोली
आता नव्याने ज्या सदाफुलीच्या
आता नव्याने ज्या सदाफुलीच्या जाती येताहेत ( लाल रंगाच्याच वेगवेगळ्या छटा ) त्याला शेंगा लागलेल्या बघितल्यात का कुणी ?
मृण्मयी, तोच चिरबिल्व / पापडी / वावळ / मंकी बिस्किट ट्री !
गेल्या शनिवारी पुण्याहुन
गेल्या शनिवारी पुण्याहुन (पुणे स्टेशन) माझ्या गावी (फलटण) यात्रेसाठी जात असताना पुणे ते हडपसरच्या दरम्यान भरपूर झकरांदाची झाडे दिसली फुलोरा काहिसा कमी होता पण निळाई लपत नव्हती. काहून रोड (असंच काहिस नाव वाचल होतं. गाडी हडपसरच्या मुख्य रस्त्याला लागण्याआधी) जवळ मस्त फुललेला बहावा होता. निष्पर्ण झाडावरचे ते पिवळे झुंबर चालत्या गाडीतुनही लक्ष वेधून घेत होते. यावेळेस कॅमेरा नेला नव्हता.
पुणे ते फलटण प्रवासादरम्यान भरपूर बहावा, गुलमोहर फुललेले दिसले. निरा नदीला अपेक्षेपेक्षा बरचं पाणी होत (ते ही मे महिन्यात ). माझ्या गावातुनच निरा नदीचा उजवा कालवा जातो, तो ही अगदी काठोकाठ भरून वाहत होता, पण आमची यात्रा ज्या ठिकाणी होती (फलटणपासुन साधारण २५ किमी अंतरावर, शिखर शिंगणापूरच्या आधी १२ किमी) तेथे मात्र भीषण दुष्काळ जाणवत होता. विहिरींच्या पाण्याने केंव्हाच तळ गाठलेला. यात्रा असल्याने टँकरच्या पाण्याची सोय करण्यात आलेली, पण ती पुरेशी नव्हती. या वेळेस यात्रेलाही दरवर्षीपेक्षा गर्दी कमी होती. इतक्या वर्षात मीही पहिल्यांदाच गावात चारा छावणी पाहिली. दुपारी अगदी टळटळीत, चटका लागणारे ऊन आणि संध्याकाळी (साधारण ५ नंतर भन्नाट थंडगार वारा) असं वातावरण होते. पहाटे तर थंडीनेच जाग आली. पुन्हा सकाळी ८ नंतर कडक ऊन :(.
आता नव्याने ज्या सदाफुलीच्या
आता नव्याने ज्या सदाफुलीच्या जाती येताहेत ( लाल रंगाच्याच वेगवेगळ्या छटा ) त्याला शेंगा लागलेल्या बघितल्यात का कुणी ?>>>>>दिनेशदा, होय माझ्याकडे आहेत त्याची रोपं. त्याच शेंगातल्या बिया लावलीत. फोटो असेल बहुतेक. सापडला कि डकवतो इथे.
ओएम्जी.. जिप्स्यी विदाऊट
ओएम्जी.. जिप्स्यी विदाऊट कॅमेरा???????????
ये बात हजम नही हुई!!!!!!!!!!!!
जिप्सी म्हणजे या नव्या
जिप्सी म्हणजे या नव्या जातीनांही त्या किटकांनी आपलेसे केलेय. तूला कधी त्या फुलांवर कुठलाही किटक दिसला तर फोटो काढ.
तूला शापित गंधर्व ने टाकलेले झकरांदाचे फोटो आठवताहेत ? तो खरा झकरांदाचा फुलोरा. त्याच्यापुढे आपल्याकडचा फुलोरा म्हणजे !!!
शनि शिंगणापूरचा जो साखर कारखाना आहे त्या वसाहतीत, मायबोलीकर कूलचे घर आहे. मी त्याच्याघरी राहिलो पण आहे. त्या परीसरात एक कालवा होता. त्यामूळे तेवढा भाग हिरवागार दिसत असे.
वर्षूदी , हो ना या वेळेस
वर्षूदी :फिदी:, हो ना या वेळेस कॅमेरा न्यायला नाही जमलं
तो खरा झकरांदाचा फुलोरा. त्याच्यापुढे आपल्याकडचा फुलोरा म्हणजे !!>>>>अगदी अगदी.
शनि शिंगणापूरचा जो साखर कारखाना आहे त्या वसाहतीत>>>>>दिनेशदा, मी म्हणतोय ते "शिखर शिंगणापूर". माण (दहीवडी) तालुक्यातील. शंकराचे जागृत देवस्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत आहे "शिखर शिंगणापूर".
डेझर्ट रोझ वरुन सहज मनात
डेझर्ट रोझ वरुन सहज मनात विचार आला. >>>>>>>>>
दिनेशदा कोणत्या झाडाबद्दल बोलताय(माफ करा नाही आलं लक्षात.)
डेझर्ट रोझ वरुन सहज मनात
डेझर्ट रोझ वरुन सहज मनात विचार आला. >>>>>>>>>
दिनेशदा कोणत्या झाडाबद्दल बोलताय(माफ करा नाही आलं लक्षात.)>>>>>>मानुषी, दिनेशदा "एडेनियम" बद्दल बोलत आहेत.
एडेनियमला डेझर्ट रोझ
एडेनियमला डेझर्ट रोझ म्हणतात माहिती नव्हत हं जिप्सी.
(No subject)
सध्या एवढ्यात नारळाच्या
सध्या एवढ्यात नारळाच्या एकाच झाडाच्या हिरव्या फांद्याच तुटून पडताहेत. पाणी कमी पडत असेल का? की खत घालायची गरज आहे? मागील महिन्यात याच झाडाचे १००च्या आसपास नारळ उतरवले.
आमच्या ऑफिसच्या आवारात हे एक
आमच्या ऑफिसच्या आवारात हे एक पिंपळासारखे झाड आहे. पण याची पाने पिंपळापेक्षा वेगळी आहेत.
हे कोणते झाड असेल? पिंपळ, की पिंपळाची एखादी जात की वेगळेच कोणते तरी झाड?
याला पिंपळासारखी फळे आली आहेत. पिकल्यावर काळी होउन खाली पडलेली असतात.
हे या झाडाचे पान
सध्या एवढ्यात नारळाच्या एकाच
सध्या एवढ्यात नारळाच्या एकाच झाडाच्या हिरव्या फांद्याच तुटून पडताहेत. पाणी कमी पडत असेल का? की खत घालायची गरज आहे? मागील महिन्यात याच झाडाचे १००च्या आसपास नारळ उतरवले.
मानुषी नजर लागली ग त्याला
उंदीर लागला नाही ना झाडावर?
मृण्मयी तिथल्या माणसाने पापडी हे नावही सांगितले. गुगलवर बरिचशी झाडे नाही सापडत.
सुप्रभात. श्रावणीने झिपरीच्या
सुप्रभात.
श्रावणीने झिपरीच्या झाडावर केलेले सदाफुलीची सजावट
वॉव. मस्त आहे सजावट.
वॉव. मस्त आहे सजावट.
वा. श्रावणीने झाडाला फुले
वा. श्रावणीने झाडाला फुले आल्याचा भास करुन दिला..
व्वा! अग वेगळी फुले लावलेत
व्वा! अग वेगळी फुले लावलेत असं वाटतच नाही आहे.छानच केलेय सजावट
ऐ सो क्यूट आयडिया
ऐ सो क्यूट आयडिया
सुप्रभात..........
सुप्रभात..........
गमभन, पानं नांद्रुकीच्या
गमभन,
पानं नांद्रुकीच्या झाडासारखी असली तरी झाडाचा पसारा थोडा वेगळा वाटतोय. ही झाडे ( नांद्रुकी ) महाराष्ट्रात रस्त्याच्या कडेने बरीच आहेत.
मानुषी, या झाडाची शोभा, खर्या वाळवंटात औरच असते. नारळाला बहुतेक पाणी कमी पडतेय. खोडाला छिद्रं वगैरे नाहीत ना पडलेली ?
हो जिप्स्या, तू म्हणाला होतास मागे. त्या शनि शिंगणापूरच्या परीसरात रामकाठी बाभळीची बरीच झाडे आहेत.
आता मानुषीकडेच रामकाठी बाभळीचा फोटो मागायला हवा.
जागू,
पुर्वी झिपरी अगदी हारा गजर्यात असायचीच. घरोघरी दिसायची. याचाच एक मॅड ट्री नावाचा प्रकार असतो. त्याचे प्रत्येक पान वेगळ्या आकाराचे असते.
अबोल, खुप मस्त आहेत फुले.
अबोल, खुप मस्त आहेत फुले.
या झाडांची( कि झुडुपं?) नावं
या झाडांची( कि झुडुपं?) नावं माहीत असल्यास प्लीज शेअर करणे..
१
२
३
४
या झाडावर सिनमन ट्री लिहिलेलं होतं
५
केळफूल ,'डायन च्या चोटी' सार्खं लटकलेलं होतं
६
७
८
९
हे लिंबाचं असावं.
अबोल.. अतिशय सुंदर फुलं..
अबोल.. अतिशय सुंदर फुलं.. कसची आहेत??
मी मागे एकदा ठाण्यातल्या
मी मागे एकदा ठाण्यातल्या बीबीसी हॉटेल समोरच्या झाडा बद्दल लिहले होते.
शांकली ने ते झाड ओळखुन ते बारतोंडिचे आहे असे सांगितले होते.
या झाडाला जी फुले येतात त्याचा वास अगदि मोगर्याचा आहे.रात्री अगदि खुप बायका मोगरा माळुन आसपास वावरत आहेत असे वाटते.
सध्या ह्या झाडाला बहर आला आहे.
ह्या झाडाची चौकशी करताना एका काकांनी सांगितले की हे नोनिचे झाड आहे, ह्याच्या फळांचा रस पुरुषबल वृध्दि साठि वापरतात्.(केमिस्ट कडे पण मी हा रस पाहिला).
पण ठाण्यातल्या या झाडाला मी कधी फळ आलेले पाहिले नाहि.
मला हे झाड लावायचे आहे,ह्याचे रोप कुठे मिळेल?
हे खरच नोनि आहे कि बारतोंडि?
मी फांदि रुजुवुन पाहिली तर रुजेल का?
जाणकारांनी प्लिज मार्गदर्शन करा.
काल टिटवाळ्याचा गणपती करुन
काल टिटवाळ्याचा गणपती करुन अंबरनाथच्या शिवमंदीरात गेलो होतो. मंदीराच्या बाहेरील आवारात हे झाड दिसले. तिथल्या लोकांनी ह्याचे नाव वावळ सांगितले. ह्याचा उपयोग कोणाला माहीत आहे का?
<<< जागू, आमच्या गावात याची दोन भली मोठी झाडं होती. त्याला आमच्याकडे वाळवीचे झाड म्हणतात. (वावळ हे खरे नाव असेल तर वाळवी हा त्याचा अपभ्रंश असू शकेल. किंवा उलटप्रकारे.) आम्ही लहानपणी त्याच्या बिया खायचो.
धन्यवाद वर्षू ताई आणी दिनेशदा
धन्यवाद वर्षू ताई आणी दिनेशदा ...
मला पण माहित नाहित ... कोणती आहेत :(.. पण आता ईथे राणि च्या राज्यात समर आलाय... तर ईतकी
छान छान फुल आलित कि बघत च बसावी ..
वर्षू, त्याच बागेतली का ?
वर्षू, त्याच बागेतली का ? आपल्यापेक्षा थोडी वेगळी आहेत झाडे. सिनमन पेक्षा ते देसी तमालपत्राचे वाटतेय.
आणि लिंबापेक्षा, थाई काफिर लाईम वाटतोय तो. ( याला लिंबू लागतात पण त्यात रस नसतो. सगळा स्वाद पानातच असतो. तीच थाई जेवणात वापरतात. )
आणि मला डायनची का भिती घातली जातेय ? पण एक नक्की, आपल्याकडच्यापेक्षा तो दांडा खुपच लांब आहे. आपल्याकडे केळफुल तोडून नेतात. तूमच्याकडे खातात का ? फिलिपीन्स मधे बनाना ब्लॉसम म्हणून खातात ते.
राधा,
नोनी आणि बारतोंडी एकच. त्याचे झाड बरेच मोठे होईल त्यामूळे जरा घरापासून लांब लावायला हवे. नोनीच्या औषधी उपयोगाबद्दल मला शंका आहे.
गमभन,~
वावळचे काही औषधी उपयोग आहेत पण जास्त करुन सावलीसाठी लावतात. मुंबई पुण्यात बरीच झाडे आहेत.
अबोल, लंडनमध्ये असाल तर एकदा
अबोल,
लंडनमध्ये असाल तर एकदा हाईड पार्कात फेरी मारा. एक खास सेक्शन असतो उन्हाळ्यात फुलणार्या वनस्पतींचा. खुप छान फुले दिसतील.
Pages