निसर्गाच्या गप्पांच्या १३ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
५ डिसेंबर २०१० ला निसर्गाच्या गप्पा हा धागा निसर्गविषयक बाबींची आवड, आकर्षण असणार्या निसर्गप्रेमींनी आपले अनुभव शेअर करण्याच्या दृष्टीने उघडला. बघता बघता निसर्गाच्या गप्पा ह्या धाग्याचे १२ भाग पूर्ण झाले. सगळ्या ऋतूंमधून हा धागा न्हाऊन जात आहे. धाग सुरू करताना अपेक्षे पेक्षा उदंड प्रतिसाद ह्या धाग्याला मिळेल ह्याची कल्पना नव्हती. ह्या धाग्यावरील प्रत्येकाला इथे शेअर केलेल्या अनुभवामुळे व त्याला मिळत असलेल्या निसर्गमय प्रतिसादांमुळे अजुनच निसर्गाशी जवळीक निर्माण झाली आहे.
निसर्गा बद्दल माहीती देण्यात कोणी सिंहाचा वाटा उचलला आहे तर अगदी एका ओळीत माहीती देऊन, फोटो शेअर करुन सगळ्याच निसर्ग प्रेमींनी निसर्गाबद्दल आपला आदर, आपल प्रेम, व्यक्त केला आहे.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय
हो.. त्याच बागेतली..
हो.. त्याच बागेतली..
वा धागा सुंदर माहीती आणि
वा धागा सुंदर माहीती आणि सुंदर प्रचिं सोबत धावतोय.
ही एक बोगनवेली सारखी फुले, आकाराने बो.वे.हुन बरीच छोटी.
माळ्याला फुलांचे नाव विचारले तर माधवमंत्री अस काहीस पुट्पुटुन निघुन गेला.
नितीन, आईसक्रीम क्रीपर ना ती
नितीन, आईसक्रीम क्रीपर ना ती ? माळ्याने आपले नाव सांगितले कि काय ?
शांकली - शशांक कुठे आहेत ?
लेकीचा वाढदिवस होता एवढ्यात. आम्हा सर्वांतर्फे हार्दिक शुभेच्छा !
वर्षू, अबोल सुंदर आहेत
वर्षू, अबोल सुंदर आहेत फोटो.
राधा ५-६ वर्षापुर्वी आमच्याइथे नोनीच्या औषधांच्या एजंसी घेणारी लोक होती. मधुमेहावर गुणकारी, थकवा येत नाही असे काहीबाही असायचे. काहिंना फरकही पडायचा. आता वेड कमी झालय म्हणण्यापेक्षा कोणी घेता, विकताना दिसत नाही.
नोनीच झाड मोठ असत. आमच्या ऑफिसच्या आवारात बरीच आहेत नोनीची झाडे.
गजानन
दिनेशदा माझ्याकडे सध्या तिन प्रकारची झिपरीची झाडे आहेत.
हा फुलोरा कसला आहे? ह्या झाडाची पाने छोटी आहेत. फोटोत दिसतात ती दुसर्या झाडाची आहेत.
आईसक्रीम क्रीपर.. हां हे नांव
आईसक्रीम क्रीपर.. हां हे नांव आठवलं आत्ता वाचल्यावर आणी फोटो पाहिल्यावर फूल सुद्धा
ईनमीन तीन, काय सुर्रेख रंग आहे फुलांचा
माळ्याने आपले नाव सांगितले कि
माळ्याने आपले नाव सांगितले कि काय ? >>> दा मलापण तसच वाटतय.
आमच्या ऑफिसच्या आवारात बरीच आहेत नोनीची झाडे. >> ताई हमको भी प्रचि देखनेका है
शांकली - शशांक कुठे आहेत ?
लेकीचा वाढदिवस होता एवढ्यात. आम्हा सर्वांतर्फे हार्दिक शुभेच्छा ! >>> खुप शुभेच्छा !
जागू अगदी सागाच्या
जागू अगदी सागाच्या फुलोर्यासारखा दिसतोय. पण पाने छोटी आहेत म्हणजे साग नाही.
वर्षू, ८ नंबरचे प्रचि
वर्षू, ८ नंबरचे प्रचि bromeliad आहे .
एक नंबर बहुतेक आर्टेमिसिआ असावे. आपला दवणा याच कुळातला. शिवाय (सु) प्रसिद्ध Absinthe पण याच कुळातल्या झाडापासून बनवतात.
शुभ सकाळ नि ग कर्स!! छान
शुभ सकाळ नि ग कर्स!!
छान माहिती मिळतेय.
गमभन, ते झाड पिंपरी चं आहे.
गमभन, ते झाड पिंपरी चं आहे. एक गंमत सांगते, पुण्याजवळ जे पिंपरी नावाचं गाव आहे, तिथे पूर्वी ह्या झाडांचं रान माजलेलं होतं आणि त्यावरूनच त्याला पिंपरी नाव पडलं असं जुने लोक सांगतात. तसंच निगडी या गावाचं आहे. पूर्वी तिथे निर्गुडी/निगडीचं रान होतं. तसंच एरंडवणा( हे वन आहे) इथे एरंडाची प्रचंड झाडी होती त्यावरून एरंडवन हे नाव पडलं आणि त्याचा अपभ्रंश म्हणजे आजचे एरंडवणा !!
जागू, तू टाकलेला फुलोरा फणशी या झाडाचा आहे. खूप मोठा वृक्ष असतो हा. चांगला ३०-४० फूट उंच आणि याच दिवसांत फुलतो. फिकट जांभळा रंगाची गुच्छाने फुलणारी फुलं खूप उंचावर असल्याने पटकन लक्ष नाही वेधून घेत.
दा, नितीन धन्यवाद, लेकीला सांगते शुभेच्छांबद्दल..............:स्मित:
वर्षूतै, फार सुंदर आलेत सगळे
वर्षूतै, फार सुंदर आलेत सगळे फोटो!! खूप आवडले.
अबोल, काय कॅची कलर आहे
अबोल, काय कॅची कलर आहे फुलांचा!! हापूसचा रंग चोरलाय की काय या फुलांनी?????..........:डोमा:
@ गमभन हो का.... मी नक्की
@ गमभन
हो का.... मी नक्की जाण्याचा प्रयत्न करेन
जागू, तुझी लेक तुझ्यासारखीच
जागू, तुझी लेक तुझ्यासारखीच कलाकार आहे!! मस्त दिसतिये कलाकुसर!!
शांकली, त्या झाडालाच पिंपरणी
शांकली,
त्या झाडालाच पिंपरणी असे पण म्हणतात. पिंपळाची छोटी आवृत्ती. या झाडावर गोलाकारात वाढलेली बांडगुळे पण बघितलीत आणि या झाडाने दुसर्या झाडाचा गळा घोटून स्वतःचा जम बसवलेला पण बघितल्या.
याची छोटी फळे पक्षी आवडीने खातात आणि वडा पिंपळासारखेच दुसर्या पानावर वृक्षलागवड करतात.
मग हे झाड वाढत वाढत, यजमानाचा गळा घोटते. ( प्रा. महाजन यालाच नांद्रुकी म्हणतात का ? त्यांची तिन्ही पुस्तके घरी राहिलीत बहुतेक देशी वृक्ष, भाग २ मधे आहे हे. )
गोव्याला महावीर उद्यानात आणि कोल्हापूरला रंकाळा उद्यानात अशी उदाहरणे आहेत.
धन्स शांकली फणशी नाव आहे का
धन्स शांकली फणशी नाव आहे का अग हे आमच्या कंपाउंडच्या मागेच आहे फुलोरा उंच असल्याने क्लिअर फोटो येत नाहीत शिवाय आपण खास पाहतो म्हणून तो फुलोरा दिसला मला नाहीतर पाने आणि फुलोरा एकच वाटतो लांबून.
ही आहेत नोनीची फुले
हे झाड
ह्यात खालच फळ आहे.
जागु मस्त आलाय नोनी च्या
जागु मस्त आलाय नोनी च्या फुला,झाडाचा फोटो.
आणी इतरही मस्त मस्त माहीती वाचायला मिळतीये..
हे नोनीच फळ बारतोंडी सारख
हे नोनीच फळ बारतोंडी सारख दिसतय. फुलंपण तशीच आणि जरा बुचाच्या फुलांसारखी पण वाटतायत.
हे नोनीच फळ बारतोंडी सारख
हे नोनीच फळ बारतोंडी सारख दिसतय>>>>>नोनी म्हणजेच बारतोंडी ना?
पिंपरीच नाव असावे त्या झाडाचे
पिंपरीच नाव असावे त्या झाडाचे कारण पिंपळाशी खुप साधर्म्य आहे.
सुप्रभात. हो नोनी म्हणजेच
सुप्रभात.
हो नोनी म्हणजेच बारतोंडी.
हो नोनी म्हणजेच बारतोंडी.>>अस
हो नोनी म्हणजेच बारतोंडी.>>अस आहे होय.
मस्त आलाय भारद्वाज
ते फळ पण १०/१२ फळांचे मिळून
ते फळ पण १०/१२ फळांचे मिळून बनलेले असते म्हणून बारतोंडी हे नाव.
भारद्वाजचा आवाजही मस्त असतो. कूप कूप असा आवाज काढतो पण शक्यतो थोडेच अंतर जायचे असेल तर "चालत चालत" जातो. उडायचा कंटाळा करतो.
जागू, नोनी/बारतोंडीचे फोटो
जागू, नोनी/बारतोंडीचे फोटो छान आलेत. पण ही फुलं अगदी शुभ्र पांढरी बघितलीयेत मी, ही जांभळी शिंपण असलेली नव्हती बघितली. पण ही छान दिसताहेत.
दा, नाही, नांदरूक/नांद्रूक वेगळं. नांद्रूकीच्या पारंब्या नाजुक असतात. प्रा. महाजनांच्याच पुस्तकात त्यांनी अरुंधती वर्तकांची एक ओळ कोट केलिये - "वडाच्या पारंब्या एखाद्या जटाधारी साधूसारख्या वाटतात; तर नांद्रुकाच्या एखाद्या युवतीच्या रुळणार्या बटेसारख्या दिसतात."..........:स्मित:
"चालत चालत" जातो. उडायचा कंटाळा करतो.>>>>>>>>>हे भारीये!!
कुणाला कशाची तर कुणाला
कुणाला कशाची तर कुणाला कशाची.. शांकली, मला त्या पुस्तकांची फार आठवण येते !
साधनाला तामणीच्या कळ्या आणि
साधनाला तामणीच्या कळ्या आणि बोंडे बघायची होती ना ? ही आहेत क्रेप / गुलमेंदीची पण अवतार तोच.
ही आहे आमच्या कॉलनीत ( माझ्या घरापासून केवळ ७ मिनिटात चालत जाता येईल अशा ठिकाणी ) तयार
होत असलेली बाग.
मागे दिसतेय ती माझी बिल्डींग
बराच मोठा विस्तार आहे बागेचा. तयार झाल्यावर छानच दिसेल. कदाचित बोटींग वगैरे पण असेल.
सध्या घरगंळणारी रेती संभाळत टेकड्या केल्या जात आहेत. रेती ओघळू नये म्हणून त्यावर गोणपाट टाकली आहेत आणि झाडे लावली आहेत. झाडे वाढली कि रेती टिकून राहील.
तरी सध्या अशी फुले आहेतच.
हो शांकली तु म्हणतेस तशी अगदी
हो शांकली तु म्हणतेस तशी अगदी पांढरीच फुले असतात. ह्या कळ्या असताना कदाचीत काहीतरी पडून त्यांना इजा झाली असेल म्हणून असा रंग आला असेल.
दिनेशदा, फारच छान आहे बाग !
दिनेशदा, फारच छान आहे बाग ! ह्यानंतरचे गटग तिकडेच करू.
दा, मघाशी विचारायचं
दा, मघाशी विचारायचं राह्यलंच!..........प्रा. महाजनांची ३ पुस्तकं कोणती? मला २ च माहितीयेत तिसरं नाही माहीत नाव सांगाल?
रच्याकने, बाग (होऊ घातलेली) मस्तच आहे. फुलाचा फोटो विशेष आवडला. फूल तर सुंदर आहेच्चे पण त्याच्यावर आलेल्या प्रकाशामुळे ते जसं दिस्तंय ना तो अँगल फार मस्त पकडलाय तुम्ही!
सध्या माझ्याकडेही गुळमेंदी फुललीय. असाच रंग आहे. पुण्यात राजेंद्रनगरमधे 'सचिन तेंडुलकर जॉगिंग पार्क' आहे ना तिथेही ही गुळमेंदी बागेला कुंपणासारखी लावलीये. जमिनीत लावल्याने ती चांगली २०/२५ फूट उंच वाढलिये. पानं जवळपास बोरासार्खी आणि फुलं तामणीची असं कॉम्बो मजेशीर दिसतं नै!!
शांकली फोटो टाक ना
शांकली फोटो टाक ना गुळमेहेंदीचा.
दिनेशदा छान आहे बाग.
Pages