निसर्गाच्या गप्पा (भाग-१३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 20 March, 2013 - 12:06

निसर्गाच्या गप्पांच्या १३ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

५ डिसेंबर २०१० ला निसर्गाच्या गप्पा हा धागा निसर्गविषयक बाबींची आवड, आकर्षण असणार्‍या निसर्गप्रेमींनी आपले अनुभव शेअर करण्याच्या दृष्टीने उघडला. बघता बघता निसर्गाच्या गप्पा ह्या धाग्याचे १२ भाग पूर्ण झाले. सगळ्या ऋतूंमधून हा धागा न्हाऊन जात आहे. धाग सुरू करताना अपेक्षे पेक्षा उदंड प्रतिसाद ह्या धाग्याला मिळेल ह्याची कल्पना नव्हती. ह्या धाग्यावरील प्रत्येकाला इथे शेअर केलेल्या अनुभवामुळे व त्याला मिळत असलेल्या निसर्गमय प्रतिसादांमुळे अजुनच निसर्गाशी जवळीक निर्माण झाली आहे.

निसर्गा बद्दल माहीती देण्यात कोणी सिंहाचा वाटा उचलला आहे तर अगदी एका ओळीत माहीती देऊन, फोटो शेअर करुन सगळ्याच निसर्ग प्रेमींनी निसर्गाबद्दल आपला आदर, आपल प्रेम, व्यक्त केला आहे.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शोभे, काहीतरी नीट दिसतय का ?
कापलेले सफरचंद पासून प्राजक्ताच्या बीमधला गर.. एवढ्या रेंजमधे कल्पनाशक्ती फिरतेय Happy

कापलेले सफरचंद पासून प्राजक्ताच्या बीमधला गर.. एवढ्या रेंजमधे कल्पनाशक्ती फिरतेय >>>>>>>>>>>>त्यासाठीच असा फ़ोटो दाखवला ना? Proud

दिनेशदा, मागे तुम्ही तुमची चित्रकला इथे सादर केली होती. आज मी माझी चित्रकला इथे सादर करतेय. (हे निसर्गाशीच संबंधीत आहे. ) (हे माझं जरा बरं आलेल पहिलं आणि बहुतेक शेवटच चित्रं) Happy
Copy of DSCN5115.jpg

एकेकाळी आपल्याकडे भरमसाठ लागवड झालेली हि ऑस्ट्रेलियन बाभूळ. मुंबई गोवा हायवेवर तर तळेरे पासून पुढे, आणि करुळ पासून तळेरे पर्यंत तर हिच झाडे होती. ऑस्ट्रेलियात डेरेदार वाढणारी हि झाडे, आपल्याकडे
रुळलीच नाहीत. वाढतानाच त्यांची खोडे अशी कमकुवत राहतात. झाडाला नेमका आकारच नसतो आणि जरा पाऊस पडला कि उन्मळून पडतात.

पण याची एक वेगळी जात इथे दिसते. पाने मोठी आणि झाडही मजबूत. शिवाय यात पांढर्‍या आणि पिवळ्या फुलांच्या, अशा दोन जाती आहेत. फुलांना मंद सुगंधही असतो.

मला प्रा. महाजनांच्या पुस्तकात वाचल्यासारखे वाटतेय, कि खरे तर हि पाने नव्हेत, हे आहेत देठ. याची अस्सल पाने केवळ रोप लहान असतानाच दिसतात. नंतर पानांचा मागमूस रहात नाही.

मला उत्तर हवंय ! >>>>>>>>>>>>आम्ही कोण तुम्हाला उत्तर देणार? पण तुमच्या उत्तराचा उत्तरार्ध बरोबर आहे. तुमची कल्पनाशक्ती उगीच का फिरेल? Lol

शोभा, खरं कि काय.. मलाच खात्री नव्हती.
आणि चित्र खुप छान आहे. कुत्रा खुप प्रेमळ दिसतोय. डोळ्यातले भाव खासच.

दिनेशदा, खोडवाळवीसाठी कोण्ते इंजेक्शन मिळते? कुठे मिळेल? कसे द्यायचे आणि अजुन काय काळजी घ्यायची ते थोडं सविस्तर सांगाल का?
घरगुती उपाय करुन झालेत त्याचा काहीच उपयोग झाला नाही,
इतके मोठे लिंबाचे झाड वाचावं असं वाटतय

जागू, वरच्या पुस्तकांच्या यादीत गो. नी. दांडेकरांचं 'महाराष्ट्र दर्शन' हे पुस्तकही सहज बसेल. इथं त्याची झलकही वाचायला मिळेल.

चित्र खुप छान आहे>>>>>>>>>त्या दिअवशी कसं जमल काय माहित. पन आता परत जमतच नाही. Sad
तसही माझा आणि चित्रकलेचा ३६चा आकडा. शाळेत चित्रकला सांगितली की, प्रवासाचे चित्र (वळकटी, छत्री, गडू, ई.) ठरलेले असायचे. त्यापुढे मजल कधी गेलीच नाही. आता तर हत्ती काढला तर हत्ती+डुक्कर+शेळी असं चित्र तयार होत. Sad

सारीका, तूमच्याजवळ कुठले ऋषि विद्यापिठ आहे ? त्यांच्याकडे मिळायला हवे.
खोडाला भोक असल्याने कुठलाही विषारी पदार्थ आत गेला तर झाडाला त्रास होईल. जर तेवढी फांदी काढून टाकता आली तर फारच छान. मग आत कितपत पोखरलय ते कळेल.

शोभा, म्हणजे प्राजक्ताच्या बीचा गर आहे का?>>>>>>>>>बहुतेक बी आहे. झाडाखाली पडलेली सापडली. तसेच झाडावर पण होत्या बर्‍याच. दिनेशदा, ही बी आहे ना?

दिनेश, वेड्या बाभुळीची ही नवी जात इथे नव्या मुंबईतही भरपुर लावलीय. आणि ते पानाबद्दलचे बरोबर आहे. कलबागांनीही तेच सांगितले होते.

हो शोभा, प्राजक्ताची बीच आहे.
साधना,
झाडांची पण जादू ना. पानांची फुले ( सर्वच ) देठाची पाने ( सुरू ) पानांचे काटे ( नेपती ) देठाची पाने ( ही बाभूळ )
काय काय करत असतात !

दिनेशदा,
मुंबईच्या राणी बागे बद्दल आज लोकमतच्या बातामीत माहिती आली आहे, बागेत सीसीटीव्ही कैमेरे लावण्याबद्दल.

दिवसेंदिवस त्या बागेची काळजीच वाटतेय मला. प्राणी मोकळ्या जागेत ठेवण्यासाठी इतरत्र हलवून तिथे फक्त बनस्पति उद्यान असावे, असे वाटतेय. अगदी मोक्याची जागा आहे ती. अनेक बिल्डर्स त्यावर टपून बसलेले असतील.

शोभे......किती छान काढलाहेस गं कुत्रा! (मी जर चित्रं काढायचं ठरवलं तर त्याच्या खाली ते नक्की काय काढलंय ते पण लिहावं लागेल!! :फिदी:)

दा, त्याला फायलोड म्हणतात ना?

होय जिप्सी, हीच आहे रान तंबाखू. गूगलवर Lobelia nicotianaefolia या नावाने सर्च केलास तर अजून माहिती आणि फोटो मिळतील.

गजानन फॅमिलीफोटोसकट सगळे फोटो मस्त!! Happy

वॉव्..काय काय माहिती मिळतीये..
दिनेश दा.. ओहोहो.. नेवर माईंड्..पुन्हा असले हाताळायचे प्रयोग करू नका म्हंजे झालं .. (मी पण एक फु स देऊन टाकला.. Lol )

गजानन, फॅमिली क्यूट आहे .. पहिल्यांदाच पानं पाहून मला उत्तर माहीत होतं.. इतका आनंद झाला होता नं.. पण तू लगेच उत्तर देऊन ही टाकलंस, त्यामुळे मला फु भा ही खाता आला नाही.. Uhoh
Proud

भोपळा कुटुंबिय मस्तच. Happy

पहिल्यांदाच पानं पाहून मला उत्तर माहीत होतं.. इतका आनंद झाला होता नं.. पण तू लगेच उत्तर देऊन ही टाकलंस, त्यामुळे मला फु भा ही खाता आला नाही.. >>>>>>मला कळी बघून लक्षात आलं. पण येत असलेली उत्तरे कोणी द्यायला संधीच देत नाही. Sad Lol

Pages