निसर्गाच्या गप्पा (भाग-१३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 20 March, 2013 - 12:06

निसर्गाच्या गप्पांच्या १३ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

५ डिसेंबर २०१० ला निसर्गाच्या गप्पा हा धागा निसर्गविषयक बाबींची आवड, आकर्षण असणार्‍या निसर्गप्रेमींनी आपले अनुभव शेअर करण्याच्या दृष्टीने उघडला. बघता बघता निसर्गाच्या गप्पा ह्या धाग्याचे १२ भाग पूर्ण झाले. सगळ्या ऋतूंमधून हा धागा न्हाऊन जात आहे. धाग सुरू करताना अपेक्षे पेक्षा उदंड प्रतिसाद ह्या धाग्याला मिळेल ह्याची कल्पना नव्हती. ह्या धाग्यावरील प्रत्येकाला इथे शेअर केलेल्या अनुभवामुळे व त्याला मिळत असलेल्या निसर्गमय प्रतिसादांमुळे अजुनच निसर्गाशी जवळीक निर्माण झाली आहे.

निसर्गा बद्दल माहीती देण्यात कोणी सिंहाचा वाटा उचलला आहे तर अगदी एका ओळीत माहीती देऊन, फोटो शेअर करुन सगळ्याच निसर्ग प्रेमींनी निसर्गाबद्दल आपला आदर, आपल प्रेम, व्यक्त केला आहे.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जो_एस, बहुतेकवेळा भोकराला भोकरं लागली की च फुलोरा आल्याचं कळतं. कारण ही फुलं खूप बारीक असतात. पटकन नजरेस पडत नाहीत. मी अनेकदा ही फुलं बघायचा प्रयत्न केलाय, पण कधीच दिसली नाहीत. पण तुमच्यामुळे ती फोटोत का होईना पण बघायला मिळाली. Happy
बाय द वे, तुमचा कॅमेरा कोणता आहे? नाही म्हणजे अंड्यांच्या फोटोत शिरांच्या जाळीचे सूक्ष्मसे डीटेल्स पण दिसताहेत म्हणून विचारलं. फार क्लियर आलाय फोटो. त्या अंड्यांच्या वरच्या भागात आतलं फ्ल्यूईड का कायसं, एकाच बाजूला गोलाकार रिंग सारखं दिसतंय. ही अंडी मुळात गठ्ठ्याने असतात आणि खूप संख्येनं असली तरच जाणवतात. तुमच्या फोटोत मात्र संख्या कमी असून सुद्धा फोटो क्लियर आलाय. Happy

वर म्हणालात तो कदाचित पिंगळा असू शकेल.

दा, दोन्ही प्रसंग एक्दम भारीयेत!! Happy

वर्षूतै, फुलं फार सुंदर आहेतच, पण पानं.........ती पण खूप सुंदर आहेत. काय मस्त रचना आणि आकार आहेत गं!! Happy

आज ऑफिसमधून येताना बारतोंडीचं झाड नीट बघितलं, म्हटलं आता सीझन आहे... काय 'प्रगती' आहे ते बघावं..........तर पानांआडून बर्‍याच लहान मोठ्या कळ्या दिसल्या. मनात म्हटलं, चला यंदा तो स्पॉट बारतोंडीच्या सुगंधाने भरून जाणार तर!

वर्षू... माझ्या इष्टोरीत डायनच तेवढी कमी आहे ? आज रात मिलेगी शायद Happy

शांकली, सध्या भारतात फुजीफिल्मचा एक चांगला कॅमेरा आहे. तो अशा क्लोज्पस साठी चांगला आहे.
बर्‍यापैकी बजेटात आहे.

आणि ते नोनीचे खुळ आहे का अजून ? बारतोंडीचाच रस होता तो. सर्व रोगांवर म्हणे अक्सीर ईलाज होता तो.

शांकली, काही वर्षांपुर्वी नोनीचा रस म्हणून बारतोंडीच्या फळांचा रस बाटलीत विकत असत. कोकणात अनेकांनी पैसे कमावले त्यावर कारण समुद्रकिनारी लोकांच्या परसात ती झाडे भरपूर होती. सगळ्या रोगांवर एक औषध, अशी जाहीरात करत असत.

वर्षू, मस्त फोटो आहेत.
मला प्लीज त्या बागेचे विभाग कसे केले आहेत त्याची माहिती हवीय. म्हणजे पाम, कॅक्ट्स, फुलझाडे असे विभाग आहेत का ? आणि पुर्णपणे तपमान कंट्रोल केले आहे का ? सगळी बाग बंद दिसतेय.

दिनेश दा. कॅक्टस, आणी रेअर ,थंड प्रदेशातील झाडं बंदिस्त आहेत काचेच्या वेगवेगळ्या घरात. टेंपरेचर पूर्णपणे कंट्रोल केलेलंय

पूर्ण सविस्तर माहीती टाकतेच लौकर..

अर्रे...........ही तर भारंगी!! (दुसरा फोटो). वरचे पानांचे सर्व फोटो अफलातून!! जायंट लिलीचा अभ्यास एका सिव्हिल इंजिनियरने केला होता. या पानांच्या शिरांची रचना जशी आहे त्यानुसार त्याने एक आर सी सी स्ट्रक्चर तयार केलं....

पानांच्या फोटोतले १,२ आणि ५ हे प्रकार माझ्याकडे आहेत. आणि तू जी नखाएवढी फुलं दाखवलियेत त्यातली जांभळ्या रंगाची व्हरायटी पण आहे.

या झाडाचं नांव 'उपास ट्री' नांव वाचून गम्मत वाटली.
याचं बोटेनिकल नाव आहे ,' अँटिआरिस टॉक्सीकारिया'
वूडी प्लांटस मधील हे सर्वात विषारी झाड आहे. या झाडाचे साल्,फॉलिज्,फळं सवच अत्यंत विषारी आहेत. त्याचा चीक रक्तप्रवाहात भिनल्यास कार्डिक अरेस्ट होऊन मृत्यू अटळ आहे. प्राण्यांची शिकार, शत्रूवर हल्ला करण्याकरता अ‍ॅरोहेड्स या चिकात बुडवून तयार केले जात्.(इथे कधीकाळी हिंदी कॉमिक्स मधे वेताळाचे पिग्मीज ,' जहर बुझे तीर' वापरत त्याची आठवण झाली.) हा चीक डोळ्यात गेल्यास आंधळेपण येतं.
इतकं ,'डेंजर झाड असलं तरी त्याचा औषधी उपयोग हायपरटेंशन्,हृदरोग् इ. आजार बरे करण्याकरता होतो. याशिवाय साऊथ एशियन देशांत (इन्क्लुडिंग चीन) बार्क मधून मिळणार्‍या फायबर चा उपयोग ब्लँकेट्स्,कपडे ,गाद्या बनवण्याकरता केला जातो.

या झाडाला कुणी हातबीत लावायची गुस्ताखी करू नये म्हणून चांगलं भक्कम लोखंडी जाळीचं कुंपण घातलं होतं.. पण माहीती वाचल्यावर जाईल कोण कशाला हात लावायला.. Happy

शांकली माझ्याकडे ऑलींम्पस sp 800 uz कॅमेरा आहे.
वर्षुनील मस्त पानं आहेत आणि फुलं पण, कमळाची तर मोठ्या पराती सारखी दिसतायत.

वर्षू, भारंगीच्या फुलांची आणि पानाची आपल्याकडे भाजी करतात. तिकडे पण नक्कीच खात असतील.
या विषारी झाडांपासून, ज्यावेळी पहिल्यांदा औषध बनवण्याचे प्रयोग झाले असतील, त्यावेळी कितीतरी रुग्ण दगावले असतील. त्यानंतरच योग्य ती मात्रा मिळाली असेल.
आपल्याकडे पण काही वनस्पती ( चित्रक, कळलावी ) विषारी आहेत पण त्याचे औषधी उपयोग आहेतच.
अर्थात त्याचे शुद्धीकरण करावेच लागते.

त्या काळात जे प्रयोग झाले त्याचा फायदा आपल्याला आज मिळतोय.

वर्षू, काय मस्त फोटो आहेत ग. ती पान तर जेवायला घ्यावीशी वाटतायत. Happy
ते विषारी झाड आणि तरीही त्यापासून औषध. ऐकावे ते नवलच. धन्यवाद इथे फोटो आणि माहिती सांगितल्याबद्दल. Happy

मला नि.ग. खूप आवडतात वाचायला. मी मायबोलीची वाचक होते पण आता सभासद झाले. ईथे बर्‍याच जणांना किती माहिती आहे. मी मायबोलीच्या खूप जणांच्या लेखनाची चाहती आहे.

जो एस.......अंड्य्यांचा फोटो अमेझिंग आलाय.
वर्षू कॅमेर्‍याचं अगदी सार्थक केलंस बघ! मस्त पानं फुलं झाडं!
ती पान तर जेवायला घ्यावीशी वाटतायत. >>>>>>>>> शोभा माझ्याही अगदी हेच मनात आलं.
दिनेशदांचे दोन्ही किस्से गंमतशीर! पाल आणि पिंपळ.
पिंपळाचे पण नेहेमीच असे गूढ अनुभव येतात.

मानुषी, मस्त आहेत गं फुलं!! एखादं जरी फूल फुललं, तरी बाग भरून पावल्यासारखी होते. अन तुझ्याकडे इतकी सारी फुलं फुललीयेत........... Happy

काल पहिल्यापासून `नि.ग.' वाचायला सुरूवात केली आणि घराजवळचं झाड `पर्जन्यवृक्ष' आहे याचा शोध लागला !

काल टिटवाळ्याचा गणपती करुन अंबरनाथच्या शिवमंदीरात गेलो होतो. मंदीराच्या बाहेरील आवारात हे झाड दिसले. तिथल्या लोकांनी ह्याचे नाव वावळ सांगितले. ह्याचा उपयोग कोणाला माहीत आहे का?

जागू , अगं याच झाडाचं नाव मला पण हवं होतं. एका मैत्रिणीने `पापडी' असं सांगितल. त्या पडणार्‍या पापड्यांमधे चारोळी सारखी बी असते. आत्ता या पापड्यांचा सडा पडतो अगदी.

जागु हा वावळा आहे गं. खुप मोठं झाड होतं याचं. नव्या मुंबईत खुप आहेत हे वृक्ष.

याचा एक उपयोग आहे. हे झाड ज्याच्या आवारात आहे त्याच्या माळ्याला दिवसातुन दोनदा आवार झाडावे लागणार. Happy

माणसाला असणारा उपयोग मला तरी माहित नाही पण पक्षी खात असतील मधली बी. वर दिसताहेत तशा सुकलेल्या पापड्या जमिनीवर पडल्या की मुलांना त्यातली बी काढुन खाताना बघितलेय. अर्थात वेळकाढू काम आहे (मीही करते हे काम अगदी गुपचुप Happy )

मंकी बिस्किट असा पण शब्द वापरतात या झाडासाठी. बिया आपण खाल्ल्या तरी चालतात.

मानुषी,
डेझर्ट रोझ वरुन सहज मनात विचार आला. हे झाड मूळातले आपल्याकडचे नाही. पण ज्या अर्थी याला शेंगा येताहेत त्या अर्थी, या झाडाचे परागीवहन करणारे किटकही झाडासोबत आलेत किंवा इथल्या काही किटकांवर ती जबाबदारी पडलीय.

सदाफुली / अबोली बाबत तर मला जास्तच गूढ वाटतेय. या दोन्ही फुलांचे पुंकेसर फुलाच्या आत दडलेले असतात.
आणि आत जायची वाट कितीतरी लहान. या फुलांचे परागीवहन लहान सोंड असणारी फुलपाखरे किंवा पतंग किंवा अगदी लहान असणारे किटकच करत असतील. बहुतेक झाडे स्वपरागीभवन टाळतातच. म्हणजे त्या परीसरात, किमान त्या किटकाच्या उडण्याच्या कक्षेत दुसरे झाड हवे.
या दोन्ही झाडात जवळजवळ १०० टक्के फलधारणा होते. म्हणजे ते किटक आपले काम चोख बजावत आहेत.
हे झाडांचे आणि किटकांचे नाते बहुदा, एक दूजे के लिये असेच असते कारण दुसर्‍या झाडाचे परागकण आणून
उपयोग नसतो. हे परागकण अगदी चावी सारखेच काम करतात.

आता मला सांगा, सदाफुली आणि अबोलीवर आलेले किटक आपल्याला कधी दिसतात का ? या फुलांचे आयूष्य १/२ दिवसाचेच पण त्या काळातच त्यांची कुरीयर सर्व्हीस, पिक अप आणि डिलीव्हरी अशी दोन्ही कामे
आटपते. आपल्याला नकळत.

अनंताच्या बाबतीत मात्र जरा घोळ झालाय. हेही झाड मूळात आपले नाहीच. तरी आपल्याकडे त्याची लागवड
भरपूर आहे. पण कधी त्याला फळ आलेले बघितलेय ? बहुदा नाहीच. पण बंगालमधे मात्र त्याला फळे येतात.
त्या किटकांना अजून, आपल्याकडे यायला जमलेले नाही, बहुतेक.

अनंताच्या बाबतीत मात्र जरा घोळ झालाय. हेही झाड मूळात आपले नाहीच. तरी आपल्याकडे त्याची लागवड भरपूर आहे. पण कधी त्याला फळ आलेले बघितलेय ? बहुदा नाहीच.

फळाचे राहुद्या, माझ्याकडे तर फुलही येत नाहीत. हे तिसरे झाड मी वाढवतेय Sad Sad

(ती) कोकिळा पण ओरडते (आवाज करते) का ? आज मी एक कोकिळा चोच उघडून आवाज करताना (किंवा कोकिळाचा प्लेबॅक घेताना) पाहिली.

ती) कोकिळा पण ओरडते (आवाज करते) का ? आज मी एक कोकिळा चोच उघडून आवाज करताना (किंवा कोकिळाचा प्लेबॅक घेताना) पाहिली.>>>>>>>>>>>>>ओरडते. पण ते ’कुहू.. कुह” नसतं. ती चिरक्या आवाजात ओरडते. तो आवाज मला सांगता येत नाही. Uhoh

Pages