निसर्गाच्या गप्पांच्या १३ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
५ डिसेंबर २०१० ला निसर्गाच्या गप्पा हा धागा निसर्गविषयक बाबींची आवड, आकर्षण असणार्या निसर्गप्रेमींनी आपले अनुभव शेअर करण्याच्या दृष्टीने उघडला. बघता बघता निसर्गाच्या गप्पा ह्या धाग्याचे १२ भाग पूर्ण झाले. सगळ्या ऋतूंमधून हा धागा न्हाऊन जात आहे. धाग सुरू करताना अपेक्षे पेक्षा उदंड प्रतिसाद ह्या धाग्याला मिळेल ह्याची कल्पना नव्हती. ह्या धाग्यावरील प्रत्येकाला इथे शेअर केलेल्या अनुभवामुळे व त्याला मिळत असलेल्या निसर्गमय प्रतिसादांमुळे अजुनच निसर्गाशी जवळीक निर्माण झाली आहे.
निसर्गा बद्दल माहीती देण्यात कोणी सिंहाचा वाटा उचलला आहे तर अगदी एका ओळीत माहीती देऊन, फोटो शेअर करुन सगळ्याच निसर्ग प्रेमींनी निसर्गाबद्दल आपला आदर, आपल प्रेम, व्यक्त केला आहे.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय
मागे दिनेश दा ने घरच्या घरी /
मागे दिनेश दा ने घरच्या घरी / डायनिंग टेबलावर हर्ब्ज उगवण्याबद्दल काही सांगितले होते ना??
भारतात कोणते हर्ब्ज कसे उगवता येतील???कोणतं खत्/माती /प्रमाण इ.इ.
नीड ऑल द डीटेल्स..
सुप्र निगकर्स......... हे
सुप्र निगकर्स.........
हे कडुलिंबावर वर वर चढत आहे. आणि त्याची पकडही घट्ट आहे. आधी ते फक्त लिंबाच्या आजुबाजूस होते. तर काढूनच टाकावं का? लिंबाला काही अपाय नाही ना?
माझे वेल........
टोमॅटोची मात्र २/३च रोपं जगली. बाकीच्यांनी माना टाकल्या. असं का झालं असेल?
तगर
मानुषी, ते पहिल्या फोटोतली
मानुषी, ते पहिल्या फोटोतली वेल नुसती शोभेची आहे. काढून टाकायला हवी. टोमॅटोला उंदरांचा त्रास असतो. शक्यतो झाडे लोळू द्यायची नाहीत.
वर्षू,
भारतात म्हणजे मुंबईतही सहज वाढू शकतील अशा हर्बज म्हणजे लसूण, हळीव, पुदीना, बेसिल, सबजा, तूळस.
या सगळ्या छोट्या कुंड्यातही लावता येतील.
लसणीसाठी कोंब आलेल्या पाकळ्या, हळीवसाठी हळीव ( पाने तिखट असतात पण कोथिंबीरीसारखी नाजूक दिसतात. ), पुदीना आणि बेसिल साठी बाजारातून आणलेल्या जरा जाड फांद्या लावता येतात. तुळशीसाठी जून मंजिर्या लावायच्या.
जरा मोकळी जागा असेल तर आले, हळद, लेमन ग्रास, पिंपळी, अडूळसा, माका, वाळा, ब्रम्ही असे बरेच काही लावता येईल. हळदच्या पानाचा वापर करता येतो. माका, ब्रम्ही तर जेवणात कोशिंबीरीत घेता येतात.
पुढे सांगत राहीनच.
दिनेशदा, खोड वाळवी लागली आहे
दिनेशदा, खोड वाळवी लागली आहे असे अनुपच्या मामाने सांगितले.
वोक्के दिनेश दा.. धन्स..
वोक्के दिनेश दा.. धन्स.. ऑन्लाईन धडे बडे काम के हैं..
लेमन ग्रास? हे काय असतं.
लेमन ग्रास? हे काय असतं. त्याचं काय करतात?
सारीका, त्याचे इंजेक्शन असते.
सारीका, त्याचे इंजेक्शन असते. आणि झाडाच्या आजूबाजूला पण ती पसरायच्या आत ट्रींट्मेंट घ्यायला हवी.
जो_एस, म्हणजे आपला गवती चहा. आपण चहा करतो, थाई जेवणात तो वाट्णात वगैरे वापरतात. आपण पाने वापरतो ते गाभा वापरतात.
वर्षू, आपल्या घरची हर्ब ( मग ती दोन पाने का असेनात ) वापरून केलेला पदार्थ, अप्रतिम चवीचा होतो.
साधे अंड्याचे ऑम्लेट करताना, घरच्या हिरव्या लसणाची पात वापरायची. दिसतेही छान आणि आरोग्यालाही छान.
म्हणजे आपला गवती चहा>>> मला
म्हणजे आपला गवती चहा>>> मला वाटलं काही नविन प्रकार आहे.
कढी लिंबाला खुपच फुलं आली आहेत मस्त मंद सुगंध येतो जरा रातराणी सारखा...
जागु, गाव मिरज पासुन अगदी जवळ
जागु,
गाव मिरज पासुन अगदी जवळ आहे, त्यात आम्ही गावापासुन लांब असलेल्या शेतात वाडीवर राहत असल्यामुळे आजु बाजुला फक्त शेती,झाडे,पक्षी आणि प्राणी यांच दर्शन खुप होतं
जो_एस,
ही चंदनाची फळे वाटतात, जांभुळ आणि ही फळं रंगानी तशीच दिसतात, आकारांनी ही जांभळापेक्षा लहान असतात.
शांकली,
पिंपरी, निगडी आणि एरंडवणा बद्दल रंजक माहिती बद्दल धन्यवाद !
मानुषी,
वेली छान आहेत, आता पावसाळ्यात चांगल्याच वाढतील.
टोमैटोच्या झाडाला खोडाला काठीचा आधार आणि फांद्याना ऊंच वाढण्यासाठी, फळांचे ओझे सहन करण्यासाठी तारेचा/सुतळीचा आधार दिला तर चांगली वाढते. सांगली परिसरात टोमैटो साठी शेतात अस कुंपण उभारलेलं असतं.
ह्म्म्म.. घरच्या घरी हर्ब्ज
ह्म्म्म.. घरच्या घरी हर्ब्ज ची आयडिया डोक्यात तर रुजलीये.. प्रत्यक्ष कुंडीत कधी..थोडी वाट पाहावी लागेल मला..
दिनेश दा..इथे एका थाय दुकानात थाय जेवणात वापरले जाणारे हर्ब्ज्,भाज्या फ्रेश मिळतात..
घरी आहेत आत्ता लेमन्ग्रास इ.इ.
उद्या फोटो टाकते.. हे हर्ब्ज मी इन्डोनेशियन ,थाय फूड मधे वापरते..
सगळी नावं इन्डोनेशयन भाषेतली माहीत आहेत..
दिनेशदा, ही वरची हर्बची यादी
दिनेशदा,
ही वरची हर्बची यादी वाचुन वाटलं कि आजच कुंड्या आणखी आणाव्यात आणि ही सगळी झाडं/रोपं लावुन टाकावी. लेमन ग्रासचा गड्डा (गवती चहा) आणि हळद बी गावाकडुन आणली होती, हळद अजुन लावायची आहे
त्या बियांना कोंब आलेले आहेत ..
हे देवघरातल्या कळशीत वाढलेलं झाड..हे झाड आता लवकर बाहेर लावायचं आहे
हे कुंडीत फुललेले नवीन गुलाब ..
कलींगडाच्या बिया कुंडीत टाकल्या तर वेलींची गर्दीच उगवुन आली ..
(हळदीच्या बिया कुणाला हव्या असतील तर वि.पु वर जरुर कळवा,सध्या लावणीचा काळ आहे त्यामुळे बी उपलब्ध आहे)
अनिल, तसे तूझे गाव माझ्या
अनिल, तसे तूझे गाव माझ्या वाटेवरच आहे म्हणायचे.
आणि हळदीच्या बिया हातात घेऊन, त्याचा फोटो काढ. म्हणजे नीट येईल.
आज, माधवचा वाढदिवस.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
जागू.. पुढच्या भागाच्या तयारीला लाग
प्रश्न अगदी शिशुवर्गातला आहे.
प्रश्न अगदी शिशुवर्गातला आहे. पण तरी उत्तर द्या
बहावा पिवळा असतो, पितमोहरही पिवळा असतो.
पळस लाल असतो,गुलमोहरही लाल असतो
(माझी झाडं, फुलं ओळखण्याची मजल "रंग" एवढीच आहे. )
मग त्यातला फरक कसा ओळखायचा? की ते दोन्ही (बहावा,पितमोहर आणि पळस,गुलमोहर) एकच?
माधव वाढदिवसाच्या हार्दिक
माधव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
(हळदीच्या बिया कुणाला हव्या
(हळदीच्या बिया कुणाला हव्या असतील तर वि.पु वर जरुर कळवा,सध्या लावणीचा काळ आहे त्यामुळे बी उपलब्ध आहे)>>>> कुंडीत लावायला चालत असेल तर मला आवडेल
माधव, वा.दि च्या खुप खुप शुभेच्छा
माधव यांना वाढदिवसाच्या
माधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!!!
सर्व नि.ग.प्रेमीना
सर्व नि.ग.प्रेमीना अक्षयत्ॠतीयेच्या खुप खुप शुभेछा....
अनिएल ७६ मला पण हऴदीच्या बीया हव्या आहेत. कशा देणार ???
दिनेश, किशोर आणि जिप्सी,
दिनेश, किशोर आणि जिप्सी, शुभेच्छांबद्दल धन्यवाद
माधव ,वाढदिवसाच्या हार्दिक
माधव ,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!!!!!
माधव, वाढदिवसाच्या अनेकानेक
माधव, वाढदिवसाच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा.! - नवनवीन झाडे-पाने-फुले-फळे पहाण्याचे भाग्य लाभो ....
अनिल मस्त आहेत फोटोज.. सुंदर
अनिल मस्त आहेत फोटोज.. सुंदर गुलाब, गवती चहा.. वॉव
रिया - बहावा - Cassia
रिया -
बहावा - Cassia fistula
पीतमोहोर - (हाच म्हणायचा ना तुला ) - Peltophorum pterocarpum
गुलमोहोर - Delonix regia
पळस - Butea monosperma
हे गुगलून चित्रे पहा म्हणजे फरक कळेल ....
माधव, वाढदिवसाच्या हार्दिक
माधव, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माधव, वाढदिवसाच्या खूप खूप
माधव, वाढदिवसाच्या खूप खूप खूप हार्दिक निसर्ग शुभेच्छा! स्मित:
शोभा, इथे परत आल्याचे बघून
शोभा, इथे परत आल्याचे बघून मला बरं वाटलं.
शोभा, इथे परत आल्याचे बघून
शोभा, इथे परत आल्याचे बघून मला बरं वाटलं.>>>>>>>>>>दिनेशदा, परत यायला, इथून गेलेच होते कुठे?
माधव, वाढदिवसाच्या हार्दिक
माधव,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
अनिल, तसे तूझे गाव माझ्या
अनिल, तसे तूझे गाव माझ्या वाटेवरच आहे म्हणायचे.
दिनेशदा,
पुढच्या वेळी याल तेव्हा कोल्हापुरला रेल्वेने जाताना सरळ मिरजला उतरा (कोल्हापुरच तिकीट काढलं असेल तरी) आणि सरळ आमच्या गावी या ..!
मिरज पासुन कोल्हापुर जवळ असुनही मला अद्याप महावीर उद्यान, रंकाळ्याला जायच, तिथले झाडे पाहायचं राहुन गेलं आहे,या महिन्यात जायचा बेत आहे.
प्रिति१,
कुंडीत लावण्यासाठी ४-५ बिया सध्या अशाच मिळतील...
स्निग्धा,
मोठ्या कुंडीत हळदीच्या १-२ बीयाच लावु शकाल,कारण खत मिळाल तर रोप २-४ फुट सहज वाढेल.
दिनेशदा, खोडवाळवीसाठी कोण्ते
दिनेशदा, खोडवाळवीसाठी कोण्ते इंजेक्शन मिळते? कुठे मिळेल? कसे द्यायचे आणि अजुन काय काळजी घ्यायची ते थोडं सविस्तर सांगाल का?
घरगुती उपाय करुन झालेत त्याचा काहीच उपयोग झाला नाही,
इतके मोठे लिंबाचे झाड वाचावं असं वाटतय
अनिल, आमच्या इथे ओली हळद
अनिल, आमच्या इथे ओली हळद मिळते - आल्यासारखे दिसणारे कंद असतात. तीच कुंडीत लावली तर रुजणार नाहि का ? हळदीचे बी म्हणजे काहि खास वेगळे असते का ?
Pages