निसर्गाच्या गप्पांच्या १३ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
५ डिसेंबर २०१० ला निसर्गाच्या गप्पा हा धागा निसर्गविषयक बाबींची आवड, आकर्षण असणार्या निसर्गप्रेमींनी आपले अनुभव शेअर करण्याच्या दृष्टीने उघडला. बघता बघता निसर्गाच्या गप्पा ह्या धाग्याचे १२ भाग पूर्ण झाले. सगळ्या ऋतूंमधून हा धागा न्हाऊन जात आहे. धाग सुरू करताना अपेक्षे पेक्षा उदंड प्रतिसाद ह्या धाग्याला मिळेल ह्याची कल्पना नव्हती. ह्या धाग्यावरील प्रत्येकाला इथे शेअर केलेल्या अनुभवामुळे व त्याला मिळत असलेल्या निसर्गमय प्रतिसादांमुळे अजुनच निसर्गाशी जवळीक निर्माण झाली आहे.
निसर्गा बद्दल माहीती देण्यात कोणी सिंहाचा वाटा उचलला आहे तर अगदी एका ओळीत माहीती देऊन, फोटो शेअर करुन सगळ्याच निसर्ग प्रेमींनी निसर्गाबद्दल आपला आदर, आपल प्रेम, व्यक्त केला आहे.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय
परवा बोरिवली नॅशनल पार्कच्या
परवा बोरिवली नॅशनल पार्कच्या आवारात हे बहरलेले झाड दिसले. बहुतेक तामण असावे. फोटो मोबाईलबरुन काढले असल्याने नीट नाही आलेत.
हे एक नवीन झाड पाहिले. याची
हे एक नवीन झाड पाहिले. याची फुले वेगळीच होती. याचे नाव कोणाला माहिती आहे का?
गमभन, हे दुसरे झाड कळम नावाचं
गमभन, हे दुसरे झाड कळम नावाचं आहे. याची फुलं खूपशी कदंबाच्या फुलांसारखीच दिसतात. पण एक फरक आहे की कदंबा इतकी याची फुलं भरगच्च नसतात. आणि पानंही पातळ आणि फिकट हिरव्या रंगाची असतात. पण तरी सुद्धा याला कदंबाचा भाऊच मानतात
आणि हो, पहिले तामणच आहे
आणि हो, पहिले तामणच आहे मोबाईलवरून काढलाय तरी फोटो छान आलाय
परवा बोटेनिकल गार्डन मधे ही
परवा बोटेनिकल गार्डन मधे ही मेक्सिकन निवडुंगाची खासीयत लक्ष वेधून घेत होती
यातील कित्येक प्रकार मी पहिल्यांदाच पाहीले
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८
टाईम प्लीज!! इथे सर्वांची
टाईम प्लीज!!
इथे सर्वांची बोटेनिकल नावं लिहिलेली होती.. भारतीय नावं असतील तर टाकाच इथे..
सुप्रभात. वर्षूताई खुप सुंदर
सुप्रभात.
वर्षूताई खुप सुंदर आहेत कॅकटस.
शांकलीताई, मी डकवलेल्या
शांकलीताई, मी डकवलेल्या फोटोतल्या फुलांच (झाडाचं) नाव का नाही सांगितलसं? साधनाताई, तामण असेल असं म्हणाली आहे, पण तिला मोदका सारख्या कळ्यांमुळे शंका वाटते आहे. नागपूरात ती झाड खुप ठिकाणी दिसली.
मानुषी, कदाचित तो इंडिअन
मानुषी,
कदाचित तो इंडिअन रॉबीन असेल.
दिसायला असा होता का?
http://en.wikipedia.org/wiki/Indian_Robin
त्याचे कॉल इथे ऐका.
http://www.xeno-canto.org/species/Saxicoloides-fulicatus?&view=3
आहा जागू. फुलं पाहून काय मस्त
आहा जागू. फुलं पाहून काय मस्त वाटलं.
स्निग्धा, अगं तो तामणच आहे,
स्निग्धा, अगं तो तामणच आहे, काल मी तामणाच्या कळ्या जवळुन पाहिल्या, असाच मोदकासारख्या असतात.
आधी नेहमी फुले येऊन गेल्यानंतरची गोल फळेच पाहिली होती त्यामुळे थोडे गोधळायला झाले होते.
अरे, खुप खुप धन्यवाद
अरे, खुप खुप धन्यवाद साधनाताई. आता इतक्या जवळून तामण पाहिला त्यामुळे कायम लक्षात राहील
जागू, ती फुलं पाहून खरंच
जागू, ती फुलं पाहून खरंच प्रसन्न वाटलं
स्निग्धा, तो तामणच आहे. या
स्निग्धा, तो तामणच आहे.
या http://www.maayboli.com/node/34138 लिंकवरचा प्रचि २४ गुलाबी तामण बघा. त्याच्या कळ्या मोदकासारख्याच असतात.
जागु, मस्त आहेत गं फुले.
जागु, मस्त आहेत गं फुले. मनातल्या मनात सुगंध हुंगला..
जिप्स्या, विपु बघत जा की. मी
जिप्स्या, विपु बघत जा की.
मी पण आधीच्या पानावर तामण चा मोबाईलने काढलेला फोटो टाकला होता पण ती तामण थोडी वेगळी वाटतेय का?
खरचं की जिप्सी खुप खुप
खरचं की जिप्सी खुप खुप धन्यवाद.
पान क्र. २० वरील टि.आय.एफ.आर.
पान क्र. २० वरील टि.आय.एफ.आर. मुंबई येथील झाड.... त्यावर नंतर बरीच चर्चा झाली.... गुलाबी टॅबेबुया...
या झाडाचा हा पूर्ण फोटो....
मी पण आधीच्या पानावर तामण चा
मी पण आधीच्या पानावर तामण चा मोबाईलने काढलेला फोटो टाकला होता पण ती तामण थोडी वेगळी वाटतेय का?
अगं तामणीत भरपुर रंग आहेत. शेजारीशेजारी दोन झाडे असतील तरी ती दोन्ही वेगवेगळी दिसतात रंगामुळे. काल मी एका झाडाचे फोटो काढले त्यात एकाच झाडावर जुनी फुले पांढरी झालेली आणि ताजी फुले मॉव रंगाची होती.
व्वा! व्वा! व्वा! सगळ्यांचे
व्वा! व्वा! व्वा! सगळ्यांचे फ़ोटो, माहिती मस्तच. शिट्ट्या तर अप्रतिम.
दिनेशदा कुठे भूमिगत झालेत?
मीही आत्ता तेच विचारणार होते
मीही आत्ता तेच विचारणार होते दिनेशदा कुठे गडप झाले?
काल रजा होती ना ? आणि
काल रजा होती ना ? आणि आमच्याकडे तसेही ४.३० तास उशीराच उजाडते
वर्षू, मस्त आलेत फोटो. मेहिकोत काही निवडुंग खातात पण !
गमभन, कळमाचे झाड राणीच्या बागेत गेंड्याच्या तलावाजवळ आहे, खुप बहरते ते. सिंहगडाच्या पायथ्याशी पण आहेत. अनेकांचा तो कुळवृक्ष असतो. लग्नात देवकासाठी फांदी लागते. पण कळम आणि कदंब वेगळे, हेच अनेकांना माहित नसते.
साधना, तामण आणि क्रेप या दोन्ही झाडांना अगदी गेल्या वर्षीच्या फळांचा पण मोह सुटत नाही.
तामणीत, गुलाबी, गडद गुलाबी, जांभळा, पांढरा असे रंग असतात. पिवळा मात्र खुपच दुर्मिळ आहे.
दिनेश दा.. थांकु.. कितीकिती
दिनेश दा.. थांकु..
कितीकिती छानमाहीती पुरवताय सतत..
साधना, तामण आणि क्रेप या
साधना, तामण आणि क्रेप या दोन्ही झाडांना अगदी गेल्या वर्षीच्या फळांचा पण मोह सुटत नाही.
क्रेप?? हे कोण?? मला नाही भेटले कधी?????कुठे भेटतील?? मला तर तामणच क्रेपसारखी वाटते.
वर्षू मस्त आहेत सगळे कॅक्टसचे
वर्षू मस्त आहेत सगळे कॅक्टसचे प्रकार!
स्वाती.......
मला जो काही दिसला तो ईन्डियन रॉबिन (तुझ्या लिन्कमधला) असावासं वाटतं. पण आजच सुनेचा खूप खुदुखुदु हसत फोन आला होता की.......... तो बुलबुलसारखा पक्षी असावा आणि तो चक्क आपल्या बाल्कनीत ल्या झाडात घरटं करतोय.
मी तिला म्हटलं की फोटो काढ. तर आता आमच्या घरातले निसर्गप्रेमी आणि तज्ञ(माझा लेक) हपिसातून आले की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पुढची स्टेप घेतली जाईल. कारण त्या पक्ष्याला डिस्टर्ब केलं तर तो घरटं बांधणार नाही.(असं तज्ञांनी फोनवर सांगितलं आहे.)
आणि त्याचा कॉल आत्ता ऐकता येत नाही. हपिसात आहे.
थांकु जागु,दिनेश
थांकु जागु,दिनेश दा,मानुषी..
तुमच्या व्यतिरिक्त अजून कुणाला नाही दिसलेत कॅक्टी..
अजून काही
वा वर्षूताई मस्तच. दिनेशदा
वा वर्षूताई मस्तच.
दिनेशदा आळशी आणि कारळ आईस्क्रिमच्या डब्यात पेरली तर चालतील का? किती मोठी रोप होतात त्याची? की मोठ्या कुंडीत लावू? मी जमीनीवर मुद्दाम लावत नाही. जमीनीवर आमच्या गड्याला कळले नाही की सरळ तो उपटून टाकतो. अशी कितीतरी चांगली झाड त्यानी उपटली आहेत. उदा. ब्राह्मी, पानाचा वेल.
हे तुमच आवडीच सुरणाच फुल.
कारळ आपल्याकडे भातशेतीच्या
कारळ आपल्याकडे भातशेतीच्या बांधावर लावतात. फारतर १०/१२ इंच वाढते ते. ते कुंडीत लावता येईल.
पण अळशी उंच वाढते. २/३ फूट तरी. त्याला एक तूरा येतो. त्यात मोठी निळी सुंदर फुले येतात. ते कुंपणाकडे लावता येईल.
माझ्या कॅमेराचे जास्तीचे डोळे
माझ्या कॅमेराचे जास्तीचे डोळे मिळाल्याने, असे काय काय दिसत राहते मला. या फुलांच्या पाकळ्या जेमतेम ३ मि.मी. होत्या. पण तरी किती सुंदर रचना आहे पहा.
पाठीवर मानवी मुखवट्यासारखी रचना असणारा एक किटक.
काल सकाळी मुद्दाम जंगलात शिरलो तर पॅशनफ्रुटच्या कळ्या उमलल्याच नव्हत्या. मग जरा अंधार पडल्यावर परत गेलो आणि फुल तोडून आणले. पॅसिफ्लोरा कुळाची खासियत. अशी हि रचना. अनेक रंग असतात यात.
या वेलीची फळे वरुन पिवळी आणि आतून केशरी असतात.
जागु.. सुरणाचं फूल?? काय काय
जागु.. सुरणाचं फूल?? काय काय अनोख्या गोष्टी आहेत तुझ्या अंगणात... मस्त!!
दिनेश दा.. कीटकाचा रंग/ डिझाईन ही अजब आहे
अश्याप्रकारचं फूल मलाही दिसलं, कळ्यांसकट त्या गार्डन मधे.. मोठ्या झुडपांत लपलेलं होतं याचं नाजुकसं प्लांट
Pages