गडबडगुंता

Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 01:29

gadbadgunta.jpg

गडबड झाली, अक्षरे घरंगळली, झालं खरं असं
गुंता सोडवा, म्हण ओळखा, जिंका गंमतीशीर बक्षीसं!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अकलेचे अमीर, सांगितल्या मिरच्या आणली कोथिंबीर.

हे वाक्य ऊलटं पण असू शकेल. मी आपलं काहीतरी अर्थ लागतोय म्हणून जुळवा जुळवी केली.

हो ना हे बक्षीस मामी, बिल्वा, सिंडरेला, स्वाती आणि चमन ह्यांनां विभागून मिळायला हवं .. संयोजक एकदम कुंती मोडमध्ये आहेत ..

ह्या खेळासाठी उत्तेजनाची खरच गरज आहे. पुढच्या म्हणीची अक्षरे देण्यापूर्वीच खरंतर सगळ्यांना चहा द्यायला हवा तर उत्साह टिकेल Happy

सिंडे, चहासाठी धन्यवाद.
(देव चहावाल्याचं कल्याण करो. त्याचं गाळणं दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट कळकट होवो. :P)

Pages