इंग्रजी, मराठी, हिंदी अशा स्वतंत्र भाषांमधून आता आपण मिंग्रजी, हिंग्लिश वगैरे भाषांपर्यंत येऊन पोचलोय. भाषेची सर्रास मिसळ करताना मात्र एक जाणवतं, की एका भाषेतला तोच अचूक भाव दुसर्या भाषेत मात्र मांडता येत नाही. का, येईल? करायचा का प्रयत्न?
सादर करतोय एक गंमत खेळ 'चपखल'.
ह्यात दिल्या गेलेल्या इंग्रजी अथवा हिंदी वाक्यांचे दोन अनुवाद करायचे आहेत. एक शब्दश: आणि एक भावानुवाद. शब्दशः अर्थातच शब्दश: अनुवाद करायचा आहे. भावानुवादात, वाक्याच्या आशयानुसार शब्द बदलले तरी चालतील.
खरंतर नावात म्हटलं तर काहीच नाही किंवा सारं काही! एखादं पुस्तक फाऽर पूर्वी वाचलंय तरी नाव आठवत नाहीये म्हटलं की अस्वस्थ व्हायला होतं ना? किंवा फक्त नाव लक्षवेधक आहे म्हणूनही पुस्तक घ्यावंसं वाटतं.. तर मराठी भाषा दिवसानिमित्त अशाच काही पुस्तकांची नावं आठवायचा प्रयत्न करूयात.
हा खेळ तसा आपल्या सर्वांच्या ओळखीचाच! तुम्हाला करायचंय इतकंच की दिलेल्या चित्रावरुन किंवा चित्रसमूहावरुन पुस्तकाचं नाव ओळखायचं आहे. त्यात पुस्तकाच्या नावाशी किंवा विषयाशी सुसंगत चित्र असेल.काही मदत लागली तर आम्ही आहोतच...तर करायची सुरुवात?
गडबड झाली, अक्षरे घरंगळली, झालं खरं असं
गुंता सोडवा, म्हण ओळखा, जिंका गंमतीशीर बक्षीसं!