Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41
स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.
नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे देवा! आता मग त्या
अरे देवा! आता मग त्या कबुतरांकरता एखादी मांजर बसवावी लागेल, नाहीतर घरच्याच कुणाला तरी ( नवरा, मुले नाहीतर साबा, साबु ) काठी घेऊन बसवावे लागेल.:फिदी:
कसल्या कसल्या युक्त्या
कसल्या कसल्या युक्त्या सांगताहेत इकडे! नवरा आणि साबा तीच काठी आपल्या पाठीत उगारतील! माबोतून काय काय शिकून आम्हाला वेठीला धरते म्हणून!
कबुतरे उडवायला माबोवरच्या
कबुतरे उडवायला माबोवरच्या छर्रेबाजांना बोलवा... त्यांची प्रॅक्टीस होईल आणि तुमची कबुतरं उडून जातील...
अवांतर : नवरा आणी साबांना
अवांतर : नवरा आणी साबांना म्हणायचे चवीच खायला हवे ना तुम्हाला मग थोडी मदत तुम्ही पण करा.:फिदी:
निंबुडा ही लिंक आहे जुन्या मायबोलीतली.
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/105404.html?1212599079
माझ्याकडे एक सा. सकाळ पण होता या युक्त्यांसाठी, पण सामानाच्या हलवाहलवीत हरवला तो. पण लेकीची परीक्षा झाल्यावर दिवाळी सुट्टीत लिहीन बरेचसे.
कबुतरांचा संचार आपल्या
कबुतरांचा संचार आपल्या गच्चीपुरता कमी करण्यासाठी खालील उपाय करुन बघा:
जुनी खराब झालेली सीडी घ्या. ती उलटी (म्हणजे चकचकीत बाजू - डोळ्यांना त्रास देणारी) धरुन तिच्यावर ऊन पडेल अशी टांगून ठेवा. पण लक्षात ठेवा त्या चकचकीत बाजूवर सतत ऊन पडलं पाहिजे.
थोडंसं असेल तर त्या पूर्वी
थोडंसं असेल तर त्या पूर्वी दुभत्याच्या अर्धगोल जाळ्या मिळायच्या त्यांनी झाकता येईल. हल्ली मिळतात का तश्या?
माझ्या लहानपणी आमच्याकडे होती एक. मग फ्रीज आला आणि ती जाळी कुठे गेली माहित नाही.
आमचे दोन कुत्रे कबुतर, उंदीर
आमचे दोन कुत्रे कबुतर, उंदीर अन काय काय घरी आत येऊच देत नाहीत. कबे खाली लेज वर बसले की हे वरून ग्रिल मधून डोके काढून भुंकतात. लै विनोदी सीन अस्तोय तो. अर्थात मुंबईत माण्सांपेक्षा डब्बल कबुतरे आहेत. आणि परिंदातला तो ग्रेट वाटलेला कबुतरांचा शॉट मुंबईत केव्हाही मिळतो हे ही लक्षात आले आहे.
कोणी कबुतरांचा विषय काढायचा
कोणी कबुतरांचा विषय काढायचा अवकाश की पब्लिक तुटूनच पडतय जणू !
कबूतरं जाम न्यूसन्स करतात पण.
कबूतरं जाम न्यूसन्स करतात पण. माझ्या घराची बाल्कनी म्हणजे त्यांच्यासाठी शिटिंग एरिया होता
नंतर मी बाल्कनीचा दरवाजा उघडा ठेवायला सुरूवात केली, वावर खूप आहे असं दाखवायला सुरूवात केली तसा त्यांचा संचार कमी झाला.
पण तरिही वाळवणं वगैरे मी नाहीच ठेवत बाहेर.
दक्षे, एखादा आरसा ठेव
दक्षे, एखादा आरसा ठेव बाल्कनीत... कबुतर आरश्यात बघुन त्यांचा 'प्रोग्रॅम' करायला लाजतिल किंवा आपलं रूपडं निरखण्यात चिसरून जातिल
लाजो
लाजो
कबूतरांच्या त्रासापासून
कबूतरांच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठीच्या युक्ती- असा बाफ झालाय सध्या हा
ओढणीला दुमडून दोन्हीबाजूंनी
ओढणीला दुमडून दोन्हीबाजूंनी शिलाई घालायची आणि वरच्या बाजूला नाडीसाठी शिलाई घालून त्यात नाडी घालावी. सुकवायच धान्य त्या ओढणीत घालून वरुन नाडी घट्ट बांधावी. ओढणी जमिनीवर पसरवून ठेवावी. वाळवण सुकल की गोळा करायची गरज भासत नाही.
नाडीची बाजू वर उचलली की सगळ धान्य गोळा होत.
आरती मस्तच आहे की आयडिया.
आरती मस्तच आहे की आयडिया.
ही कल्पना मस्त आहे खरंच!
ही कल्पना मस्त आहे खरंच! धन्यवाद आरती!
कबुतरांना ओढणीचे कुठले रंग
कबुतरांना ओढणीचे कुठले रंग आवडतात / घाबरवतात ते बघावे लागेल
काल मी एक मस्त गडबड केली.. संध्याकाळी घरी गेल्यावर मस्त दाट चहा केला, आणि भाकरीचे पिठ (मका)
मळायला घेतले. तेवढ्यात लॅपटॉपवर मस्त गाणे लागले ( आज मिलनकी रात रे, रात रे.. लता, हिंदी किचकवध.. बरोबर धुंद मधुमति चे हे हिंदी रुपांतर ) आणि त्या तंद्रीत मी गरम चहा भाकरीच्या पिठात ओतला. मग काय वाटले कुणास ठाऊक, तसेच पिठ मळले आणि त्याची भाकरी केली.... मस्त लागली.. आपापल्या जबाबदारीवर प्रयोग करा !
ओढणी सिंथेटीक - शिफॉन किंवा
ओढणी सिंथेटीक - शिफॉन किंवा तत्सम असेल तर उपयोग नाही
धान्याचा वास कबुतरांना येतोअच, चोची मारमारून कापड भोसकतात आणि त्यांना हवे ते साध्य करतात.
चोची मारमारून कापड भोसकतात
चोची मारमारून कापड भोसकतात आणि त्यांना हवे ते साध्य करतात >>
मला पण तेच म्हणायचे होते. कबूतरांवर थोडक्यात काही उपाय नाहीच!
दिनेशदा असे नवनीन पदार्थ
दिनेशदा
असे नवनीन पदार्थ सुचतात होय तुम्हाला 
कबुतरावर एक धागा होता ना?
कबुतरावर एक धागा होता ना?
गरज दिसते आहे एका वेगळ्या धाग्याची.
कसले शांततेचं प्रतिक. माझे तर शत्रु नंबर १.
कसले शांततेचं प्रतिक.>>>
कसले शांततेचं प्रतिक.>>>
कसले शांततेचं प्रतिक. माझे तर
कसले शांततेचं प्रतिक. माझे तर शत्रु नंबर १. >>
आक्षी मने... कबुतरं म्हणजे नुसता योट
चिवड्यासाठी पात़ळ पोहे
चिवड्यासाठी पात़ळ पोहे कुरकुरीत भाजण्याच्या काही टिप्स असतील तर सांगा. मागच्या वेळी पोहे आक्रसले भाजताना :(.
रावी थोडं ऊन दाखवून मग भाज
रावी थोडं ऊन दाखवून मग भाज पोहे.
हो अवल ! पोहे नेहमी थोडे का
हो अवल !
पोहे नेहमी थोडे का होईना, तेल वापरुनच भाजावे. नाहीतर आक्रसतात. याचे नेमके शास्त्रीय कारण आता आठवत नाही, पण डॉ. वर्षा जोशी यांच्या पुस्तकात वाचले होते.
अरे, खरंच की! मी दडपे पोहे
अरे, खरंच की! मी दडपे पोहे करण्यासाठी नेहेमी पातळ पोहे थोडे भाजते, तर माझेही आक्रसतात. अर्थात नंतर ते चुरडायचेच असतात, त्यामुळे मला कधी प्रॉब्लेम वाटला नाही. पण आता लक्षात येतंय की चिवडा करायचा असेल तर असे आक्रसून उपयोगी नाहीत पोहे.
गरज दिसते आहे एका वेगळ्या
गरज दिसते आहे एका वेगळ्या धाग्याची. >> काढा काढा. त्या सिड्यांनी काही होत नाही. त्यावर बसुन चोच मारतात ती!
आमच्याकडे सर्व कबुतर विरोधी उपाय थकलेत. सतत अंडी नाहीतर पिल्लं असतातच.
सतत अंडी नाहीतर पिल्लं
सतत अंडी नाहीतर पिल्लं असतातच.
>>
अगदी अगदी. आणि पिल्लोबासाठी कब्बूचे पिल्लू बघण्याचा आनंद अवर्णनीय असतो. सारखे "कब्बूचे पिल्लू दाखव" चा हट्ट. आणि आपण मारे त्याला कडेवर घेऊ घेऊ ती कबूतरीण आणि तिच्याखाली दडलेले पिल्लू दाखवत रहायचे. त्यांची पिसे, त्यांनी आणलेल्या काटक्या ह्यांचा पसारा होतो अगदी. वर कुंडीतले झाड साफ मरून जाते पाण्याअभावी ते वेगळेच. आपले लक्ष नसताना कधी पटकन अंडी घालतात कळत नाही. वर गॅलरी च्या जवळ जरी गेले तरी "मारीनच आता चोच!" असा आविर्भाव करून कबुतरिणीची मान वर.
कसले शांततेचं प्रतिक. >>>
कसले शांततेचं प्रतिक. >>> खरंच. जरा शनिवारी - रविवारी दुपारी लवंडावे की ह्यांचे गुटरगूम सुरू!
कबुतरांचा प्रॉब्लेम
कबुतरांचा प्रॉब्लेम आपल्याकडेच नाही तर अनेक देशांत आहे. दुबईमधे पण आहे. त्यांच्या विष्ठेमूळे तिथल्या सुंदर इमारतींच्या काचांची आणि लोखंडाची वाट लागते. त्यांना हुसकावण्यासाठी तिथे खास प्रशिक्षित ससाणे वापरतात.
मोरोक्को मधे मात्र त्यांच्या विष्ठेचा उपयोग, कातडी कमावण्यासाठी करतात..
आपल्याकडे काय करता येईल ?
Pages