युक्ती सुचवा युक्ती सांगा- ३

Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41

स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.

नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह दिनेशदा. अगदीच सुंदर दिसताहेत ही करवंदं. ही मी पुर्वी पाहिलीच नव्हती. छान दिसत असतील ही डोक्यात माळल्यावर. आणि गजरा किंवा फुलासारखी सुकणार ही नाहीत.

पेरुची कोशिंबीर कशी करतात माहित आहे का कोणाला ?

पिकलेले पेरु कोणी खातच नाहिए. घरात नुसता घमघमाट सुटला आहे.

कच्च्या पपईचा दालमा करतात Happy

असो मी इथे वेगळेच सांगायला आले होते.
शिवाजी फाँट न दिसण्याच्या प्रॉब्लेम बद्दल.
http://utilities.webdunia.com/marathi/dataconverter.html

या लिन्क वर जा. जे टेक्स्ट वाचायचे आहे ते डाव्या बाजुला पेस्ट करा. वर शिवाजी फाँट सिलेक्ट करा आणि कन्व्हर्टचे बटन दाबा. सगळे युनिकोड मधे कन्व्हर्ट होईल.
ज्यांचे जुने लेखन असे आहे त्यांनी कन्वर्ट करुन नव्या माबोवर टाकता येईल.
temp.jpg

वर्षा, पेरू कापून त्यात चाट मसाला. दही घालून कोशिंबीर करता येते. किसून (बिया काढून ) शिकरणही छान होते. उकडून, रस गाळून, आटवून त्याच्या वड्या छान होतात. गोवन पदार्थ आहे, गावा चीज या नावाने सर्च केल्यास मिळेल.

सावली, छान लिंक. पुर्वी आम्ही मायबोलीवर शिवाजी१ व शिवाजी५ वापरत होतो.

वर्षा११
पिकलेले पेरु कोणी खातच नाहिए>>
ते पेरु किसुन, त्यातल्या बिया काढुन मग साखर, दहि, मीठ घालुन कोशिंबीर केली तर एक्दम मस्त लागते.
नाहीतर पेरुच्या बारिक फोडी करायच्या, बिया काढुन टाकायच्या. आणि नेहेमीसारखी मोहोरी, जिरे, हिंग, कढीपत्ता घालुन फोडणी करायची आणि त्यात त्या फोडी घालायच्या. जरा तिखट जास्त घालायचे आणि शिजत आल्यावर गुळ आणि मीठ घालायचे. फार छान भाजी होते. कधी संपली कळणार पण नाही. Happy

धन्यवाद दिनेशदा, माधवी. करुन बघते.
पेरुचे लोणचे करतात का? माझे दिर सांगत होते की त्यांनी खाल्ले आहे कुठेतरी, तुला येत असेल तर कर.
पण मला काहिच माहित नाहिए कसे करतात, कसे लागते ते. Happy

लोणच्यासाठी जास्त पिकलेले पेरू उपयोगाचे नाहीत. एरवी कैरीचे ताजे लोणचे करतो तसेच करायचे.
आंबटपणासाठी लिंबू पिळायचा. शिजवूनही करता येते.

आमच्याकडे ( अंगोलात ) पेरुची बिस्किटे मिळतात. पेरूचा गर आटवून घट्ट केलेल्या गराचे, फिलिंग असते. छान लागतात.

सामी,
कच्ची पपई मीट टेंडरायजर म्हणूनही वापरली जाते.

http://www.indiacurry.com/faqhints/papayatenderizemeathow.htm

थाई कच्च्या पपईचे सॅलेडही फेमस आहे.

गुजराती लोकं, पेरुची भाजी सुद्धा करतात. मस्त असते. कोणाला माहिती आहे का रेसेपी?

सावली दालमा म्हणजे काय?

Thanks स्वाती. लिन्क बघितल्यावर आठवले की आई मागे म्हणाल्या होत्या कि मट्ण शिजताना , चान्गले शिजावे म्हाणून पपई टाकतात.

दिनेशदा, गावा चीजची रेसिपी शोधली तर ही मिळाली.
http://www.salkkaaram.com/2010/11/guava-cheese.html
छान दिसतेय. आता हेच करुन बघते. आम्ही नुसते देवदर्शनापुरतेच गोवेकरी. Happy हे पदार्थ माहितच नाहित. Happy

पिकलेल्या पेरूचे लोणचे करायची माझी आई. आंब्याच्या गोड लोणच्यासारखे. मेथी, लाल मिरची, मोहरी, कढीपत्ता यांची फोडणी आणि साखर किंवा गुळ.

गावा चीज मस्तच लागते, (गोव्यात तयार मिळते ) इतके आटवले तरी पेरुचा स्वाद राहतोच.

वर्षा११, ऑल द बेस्ट. Happy
मी गावा चीज बनवताना पाहिलं आहे. तो पेरुचा पल्प उकळताना काय प्रचंड उडतो. अगदी उंच उंच थेंब उडतात. फार भाजतं करताना. कितीही चांगल्या वेसलमधे केला तरी खाली लागतोच, त्यामुळे सतत पल्प ढवळत रहायला लागतो. ढवळताना सतत त्याचे थेंब पुट पुट उडत असतात. ग्लव घालुनही काही उपयोग नाही होत. एंड प्रॉडक्ट मात्र फार टेस्टी असतं. करणार असशील तर अगदी जपुन कर.

त्यासाठी लांब कुलेर ( करवंटी आणि बाबू पासून केलेला चमचा ) वापरायचा आणि दोन्ही हाताला कापड गुंडाळायचे ! काठ आतमधे वळलेल्या भांड्यात ( म्हणजे हॉकिन्सचा कूकर असतो तसे ) केले तर फार त्रास नाही होत. तरीपण काळजी घेतलीच पाहिजे.

मी हे करताना भांड्याच्या तोंडावर जाड रुमाल गुंडाळते मध्ये जागा ठेऊन त्यातून डाव घालते. अन हलवत राहते.
भारी त्रासदायक असतं पण मनी म्हणते तसं एंड प्रोडक्ट इतकं भारी लागतं की सगळे कष्ट कारणी Happy
आहहा कित्ती दिवसात केलं, खाल्लं नाही ...

कालच्या उरलेल्या गवारी च्या शेंगांचे तुकडे मस्त तेलामध्ये डीप फ्राय करून कुरकुरीत केले आणि वरतून मिरपूड + मीठ + तिखट भुरभुरले. इतके तोंपासु झालेय की कँटीन ला जाण्याला धीर न धरता डेस्क वरच खात बसलेय. Happy

दिनेशदा, हल्ली असे लाकडी लांबलचक चमचे बरेच दिसतात, पण मी लहानपणी गामा (ग्रँडमा) करायची तेव्हा पाहिलं आहे. तेव्हा तसे लाकडी चमचे मिळत नसतील किंवा तिच्याकडे नसेल. बिचारी आम्हाला गावा चीज आवडतं म्हणुन फार हात भाजुन घ्यायची.
आरती, तुझी आयड्या पण भारीच. Happy

aashu29,
डब्यात तितके कुरकुरीत राहिले नाहीत. पण खरं म्हणजे इतके चटपटीत झाले होते की ह्या गोष्टीकडे लक्शच गेलं नाही. केल्या केल्याच तोंडात टाकून गट्टम केले असते पण सकाळी वेळ झाला नाही म्हणून डब्यात भरून आणले होते.

१२५ ग्रॅम गवारीची भाजी अडीच माणसात उरते? गंमतच आहे. आमच्याकडे बटाटा घालून वाढवलेली पाव किलोची रसभाजी दोघांच्यात फस्त होते.
गूळ, नारळ, गोडा मसाला, बटाटा असं घालून रसभाजी करून बघ बोटं चाटत खाल्ली जाईल.

गवारीच्या शेंगा तुकडे करून तिखट-मीठ-मसाला लावून वाळवून ठेवतात साठवणात आणि मग आयत्यावेळेला आपण पापड, सांडगे जसे तळतो तश्या तळून वाढायच्या. हे दह्याबरोबर फार म्हणजे फारच अप्रतिम लागते. बहुतेक मराठवाड्यातली पद्धत आहे.
सुकटाचं जे काय करतात ते शाकाहारात या वाळवलेल्या शेंगांचं करतात असं ऐकलंय.

गावा चीज बनवले, मस्तच झाले आहे. चार पेरुंचेच बनवले त्यामुळे असेल कदाचित तुम्ही सगळे म्हणताय तेवढे काही ते उड्या मारत नव्हते. पण खुपवेळ हलवत रहावे लागले. पण फायनल प्रॉडक्ट मस्तच. Happy अत्तातरी ते चॉकलेट मोल्डमध्ये घालुन ठेवले आहे, व्यवस्थित निघाले तर फोटो टाकिन. Happy

>>गावा चीज बनव>><<
वा, लकी आहात. मला खूप आवडतो पेरु पण इथे मिळत नाही ना.. Sad

नीधप, माटुंग्याला जी तामिळ दुकाने आहेत तिथे सुकवलेली गवार / कारली / मिरची वगैरे मिळतात. तळून छान लागतात. मीठात घालून सुकवलेली एका प्रकारची संत्र्याची साल पण मिळते. दहिभाताबरोबर खातात ती.

दिनेशदा, दादरला सुकविलेल्या आणि तिखट - मीठ लावलेल्या कारल्याच्या चकत्या मिळाल्या होत्या. फार भारी प्रकार होता.

आता ऑक्टोबर हिट असेल ना, घरी पण करता येतो हा प्रकार. कारल्याच्या चकत्या, टॉमॅटोच्या फोडी, दह्यातली गवार, उभा चिरलेला कांदा असे सगळे वाळवता येईल.

क्रेपे (युरोपीयन डोसा)

तृष्णा-
लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:

http://kha-re-kha.blogspot.in/search?updated-min=2010-01-01T00:00:00%2B0...
मी ही रेसिपी वाचली. झटपट डोश्याची. ही पाककला वाचुन झाली कि मला सांगा. आपण अंड सोडुन काय वापरु शकतो. जर ही शाकाहारी नसेल बनवाची तर अंड्याला ऑप्शन काय आहे...............?
क्रमवार पाककृती:

एका भांड्यात अंडे फेटुन घावे. त्यात मैदा, मीठ, साखर घालुन एकजीव करुन घ्यावं.
नंतर त्यात सोडा टाकुन साधारण डोश्याच्या पीठा पेक्षा थोड पातळ मिश्रण तयार करावं.
किमन १०-१५ मिनिटे बाजुला ठेउन द्यावं
वाढणी/प्रमाण:
२-३
अधिक टिपा:

उपाय सुचवा
माहितीचा स्रोत:
खा रे खा प्रकाश ह्यांची रेसिपी आहे ही.

Pages