Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41
स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.
नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कोवळी गवार न निवडता अमंळ
कोवळी गवार न निवडता अमंळ जास्त तेलावर परतून मीठ घालून खायला मस्त लागते. तोंडीलावणं म्हणून. कोवळी गवार नुसती खायला पण मजा येते.
इथे कोवळी गवार मिळत नाही. निब्बर मिळते तीपण महिन्या-दोन महिन्यातून कधीतरी.
दिनेश तुम्ही म्हणता तशी
दिनेश तुम्ही म्हणता तशी गवारीची चटणी माझी एक मैत्रिण करते. जबरी लागते. ती मिक्सरातून काढते.
हो दक्षिणा, तशीच मूळ्याच्या
हो दक्षिणा, तशीच मूळ्याच्या शेंगांची पण होते.
गवारीच्या जून शेंगात, गवारगम असतो. तो हृदयासाठी चांगला.. गवार उकडून, दह्यातली कोशिंबीर केली, तर त्याचा फायदा होतो ( अनेक बिस्किटात हा असतो. )..... तर हे सांगून घरातील सर्वांना, गवार खाणेस प्रवृत्त करावे.
माझ्या कडे एक प्लम सॉस ची ३७५
माझ्या कडे एक प्लम सॉस ची ३७५ ml ची बाटली पडून आहे. त्याचे काय करता येइल ? >> मला प्लिज कोणी मदत करता का?
तळून तिखट-मीठ-मिरीपूड
तळून तिखट-मीठ-मिरीपूड भुरभुरून खाता येईल का गवार? पण एकदम कोवळी नाहीये.
तळली जाईल का?
गवार शॅलो फ्राय करावी लागेल,
गवार शॅलो फ्राय करावी लागेल, शिजायला जरा वेळ लागेल. सुकवलेली असेल तर लगेच तळली जाते.
प्लम सॉस वापरून आईसक्रीम करता येईल. किंवा नुसतेच व्हॅनिला आईस्क्रीम आणून ते जरा नरम झाले कि त्यात प्लम सॉस अलगद मिसळायचा, ( रिपल ) मग परत गोठवायचे.
कष्टर्ड, डोनटस वर वापरता येईल. ग्लेझिंगसाठी वापरता येईल.
शिवाजी फाँट असल्याने मी ते
शिवाजी फाँट असल्याने मी ते लिखाण वाचू शकत आहे.
धन्यवाद दिनेशदा आणि टुनटुन.
मध्ये एकदा वाण्याकडे गूळ
मध्ये एकदा वाण्याकडे गूळ आणायला गेले तर त्याने "सेंद्रीय गूळ" दिलाय. "घेऊन बघा. थोडा महाग पडेल पण आहारासाठी चांगला" वै. सांगून घ्यायला लावलेन्! आमटीत/ भाजीत विशेष वेगळा फारक जाणवला नाही चवीत. पण तूप - गूळ -पोळीचा लाडू वै. बनवला की वेगळीच चव लागते. भुगा स्वरुपात असल्याने लाडूत मिळून येत नाहीये. पुढच्या वेळी घेण्यासाठी प्रीफर करावा का असला गूळ? सेंद्रीय म्हणजे नेहमीच्या गूळापेक्षा वेगळे काय आहे?
सेंद्रिय गूळ म्हणजे रसायन
सेंद्रिय गूळ म्हणजे रसायन विरहीत गूळ.
सेंद्रीय गूळ तयार करताना
सेंद्रीय गूळ तयार करताना रसायने कमी वापरतात, त्यामूळे नेहमीच्या गूळापेक्षा तो काळा दिसतो.
जर गरम मिश्रणात मिसळला तर थोडासा पाघळतो. याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे चमच्याने मोजून घेता येतो. गूळ नियमित खाल्ला जात असेल, तर अवश्य आणावा.
धागा २ वरुन -
हादग्याची फुले म्हणजे पांढर्या रंगाची मोठी मांसल फुले असतात, त्याची भाजी करतात. बहुतेक जागूने फोटोसकट रेसिपी दिलेली आहे.
नेहमीच्या गूळात रसायने असतात
नेहमीच्या गूळात रसायने असतात का मग?
आम्ही तर पहिल्या पासून आपला रेग्युलर गूळच खात आलोय.
जर पिवळा धम्मक गूळ खात असाल,
जर पिवळा धम्मक गूळ खात असाल, तर नक्कीच रसायने असतात !
निंबुडा, गवार ची भाजी काळे
निंबुडा, गवार ची भाजी काळे वाटाणे घालून छान लागते. काळे वाटाणे रात्री भिजत घालून सकाळी शिजवून घे आणि भाजीत घाल. शिजताना ओले खोबरे आणि गोडा मसाला.
गूळ नियमित खाल्ला जात असेल,
गूळ नियमित खाल्ला जात असेल, तर अवश्य आणावा.
>>>
ओके. मी तरी भाजी/ आमटीत साखरे ऐवजी गूळच प्रीफर करते.
रोजचा चहा बनवताना साखरे ऐवजी गूळ चालतो का? जमेल तिथे रोजच्या वापरात साखराला सब्स्टीट्यूट म्हणून गूळ वापरावा असे मनात आहे. तर कुठे कुठे गूळ वापरता येईल?? शिरा, खीर?
गूळ जेवढा काळा तेवढी त्यात
गूळ जेवढा काळा तेवढी त्यात रसायने कमी. पिवळ धम्मक गूळ शक्यतो खाऊ नयेच.
दिनेशदा, सेंद्रिय म्हणजे
दिनेशदा, सेंद्रिय म्हणजे ऑरगॅनिक का?
निंबुडा, कोणता ब्रँड आहे? मी 'कनक' सोडुन दुसरा कोणताच पाहिला नाहीए. कनकचा फारच कालाकलुटा आणि अनाकर्षक दिसतो. मी राजकोटहुन एक शुद्ध ( नो मीठ, नो रसायन) गुळ आणायचे तो छान पिवळा सोनेरी दिसायचा. मी तो वरणात टाकायला काढला कि एक खडा तोंडात टाकायचा मोह व्हायचा. चवही छान होती. 'कनक' असा खावासा वाटतच नाही.
सगळ्यात वापरता येईल. गूळाचा
सगळ्यात वापरता येईल. गूळाचा चहा, चवीला जरा वेगळा लागतो.
जिथे साखरेचा पांढरेपणाच आवश्यक असतो असे पदार्थ सोडले ( जिलेबी, गुलाबजाम, आईस्क्रीम, काटेरी हलवा वगैरे ) तर कुठल्याही गोड पदार्थात, अगदी गाजर हलवा, दुधी हलवा मधे पण वापरता येतो.
सामी, धन्स. करून पाहीन जर
सामी, धन्स. करून पाहीन
जर पिवळा धम्मक गूळ खात असाल, तर नक्कीच रसायने असतात ! >>
हाताला थोडा टणक लागेल असा आणते. घरी आणला की विळीवर चिरून बरणीत भरून ठवते.
अगदी पिवळा नसतो. पण काळ्सर/ लालसर असतो. आणि छोटी ढेप मिळते तसला गूळ मी कधीच आणत नाही. अगदी ठिसूळ असतो.
याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे चमच्याने मोजून घेता येतो. >> येस्स. हा फायदा झालाय खरा. यंदा चिरून ठेवण्याचा वेळ वाचलाय.
दिनेशदा, धन्स. निंबुडा,
दिनेशदा, धन्स.
निंबुडा, कोणता ब्रँड आहे? >>>
पाकिटावरचे नाव वाचलेच नाही. परत त्याच दुकानातून आणेन तेव्हा वाचून मग इकडे लिहीन.
रंग सोनेरी नाहीये आणि त्याचा. काळसरच आहे.
सेंद्रिय म्हणजे ऑरगॅनिक का? >> माझाही सेम प्रश्न!
भाजिवाल्याकडे कच्चे पपई
भाजिवाल्याकडे कच्चे पपई बघितले. आकाराने लहान होते . त्याची भाजी करतात का?
निंबुडा, मनिमाऊ आणि गुळाविषयी
निंबुडा, मनिमाऊ आणि गुळाविषयी प्रश्न पडलेल्यांनी हा लेख आवर्जून बारकाईने वाचा - http://www.maayboli.com/node/19689
हो सेंद्रीय म्हणजे
हो सेंद्रीय म्हणजे ऑर्गॅनिक.
कच्च्या पपईची भाजी करतात. त्याला खास अशी चव नसते. गुजराथी फरसाण वाल्याकडे, फरसाण बरोबर देतात, त्या काचर्यापण कच्च्या पपईच्याच असतात. थाई सलाद पण करता येते. जामनगरला आपण कच्च्या कैरीचे करतो तसे कच्च्या पपईचे लोणचे खाल्ले होते. आंबटपणासाठी लिंबू पिळला होता. ओळखता आले नाही, इतके बेमालूम जमले होते.
थँक्स मंजुडी. फारच छान लेख
थँक्स मंजुडी. फारच छान लेख आहे. एका यशस्वी स्त्रीच्या जिद्दीची, धडपडीने व्यवसाय वर आणलेल्या कष्टांची माहिती छान आहे, पण यात गुळाविषयी फारच कमी लिहिलं आहे. एक मात्र आहे कि कनक खाताना आता अभिमानच वाटेल आणि त्या गुळाच्या शुद्धतेविषयी खात्रीही.
तुला अजुनही एका कोणी माबोकराने लिहिलेल्या गुळावरच्या लेखाबद्दल माहिती आहे का? त्यांचा गुळाचा व्यवसाय आहे बहुतेक. मला तो आयडी आठवत नाहीए.
कच्च्या पपईवरुन आठवले.. ते
कच्च्या पपईवरुन आठवले.. ते टुटीफुटी कच्च्या पपईचेच असते ना
असल्यस कसे बनवत्तात ?
मला तो आयडी आठवत नाहीए. >>
मला तो आयडी आठवत नाहीए. >> चंपक असावा बहुदा
चंपकने लिहिला होता बहुतेक एक
चंपकने लिहिला होता बहुतेक एक लेख.
नंदिनी, वर्षा थँक्स. शोधते तो
नंदिनी, वर्षा थँक्स. शोधते तो लेख.
वर्षा, एकदम बरोबर. साखरेचा पाक आणि रंगामधे कच्चा पपईचे तुकडे सोक करुन टुटी फ्रुटी बनवतात. लालभडक चेरी म्हणुन जे मिळतं ते सुद्धा रंग आणि साखरेच्या पाकात मुरवलेली कच्ची करवंदं असतात. केकवर असते ते गुंइगुंए असते ती खरी चेरी, पण कडकसर, गोड मिट्ट आणि लालभडक असतात ती कच्ची करवंदं.
माहितीचा स्त्रोत - बेहेरे बंधु आंबेवाले बेहेरे आजोबा. त्यांनी छोट्या मुलांना हे पदार्थ द्यायला सख्त मना केलं होतं.
ये मनी... करवंदाबद्द्ल माहित
ये मनी... करवंदाबद्द्ल माहित होते, पण खात्री नव्हती
मनिमाऊ, ती नेहमीची नव्हेत तर
मनिमाऊ, ती नेहमीची नव्हेत तर केसात घालायची पांढरी / गुलाबी करवंद... चेरी बनायला लागल्यापासून, बायकांनी ती केसात माळणे बंद केले
केसात करवंदं? मी कोकणात
केसात करवंदं?
मी कोकणात कातकरणींना डोक्यात चित्रविचित्र गोष्टी माळताना पाहिलं आहे. करवंदं फारच गंमतीशीर दिसत असतील.
Pages