Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41
स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.
नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
टोमॅटोच्या फोडी वाळवायच्या?
टोमॅटोच्या फोडी वाळवायच्या?
ड्राइड टोमॅटोज असतात ना
ड्राइड टोमॅटोज असतात ना इटालियन रेसिपीज मधे. छानच लागतात ते. फक्त त्या फोडी नसतात तर चेरी टोमॅटोज वाळवलेले असतात. पुण्यात दोराबजीमधे पॅकेटस मिळतात याची.
ते सनड्राइड टोमॅटो...
ते सनड्राइड टोमॅटो... मेक्सिकन रेसिपीजमधे पण असतात.
पण ते आख्खे असतात. फोडी ऐकलं नव्हतं.
मनिमाऊ, ओरीजीनल फोडीच असतात.
मनिमाऊ, ओरीजीनल फोडीच असतात. उभ्या चार फोडी करुन मीठ लावून वाळवतात.
तृष्णा, अंड्या ऐवजी त्यात अळशीची पूड, कुस्करलेले केळे, कुस्करलेला तोफू, कुस्करलेले पनीर, फेटलेले दही, बेसन... यापैकी एक वापरू शकतो. अगदी जाळीदार होणार नाहीत, पण पौष्टीक होतील शिवाय उलटायला त्रास होणार नाही.
सुकवलेली गवार / कारली / मिरची
सुकवलेली गवार / कारली / मिरची वगैरे भाज्या पुण्यात कुठे मिळतात का ?
अमूलचे स्पाईसी गार्लिक बटर
अमूलचे स्पाईसी गार्लिक बटर स्प्रेड काल घेतले आहे. काय करण्यासाठी वापरता येईल? मी तरी बटर लावून ब्रेड तव्यावर खरपूस भाजतो तसं करून चहा बरोबर खाल्ले. अजून कशात वापरता येईल?
साध्या ब्रेडवर लावूनही खाता
साध्या ब्रेडवर लावूनही खाता येईल. आमच्याकडे पोळीला लावूनही खातात.
ग्रिल्ड सँडविचही करता येईल.
पास्ता, पिझ्झा यामध्ये वापरता
पास्ता, पिझ्झा यामध्ये वापरता येईल का?
बादवे, बटर स्प्रेड की चीज
बादवे, बटर स्प्रेड की चीज स्प्रेड? मी वर चीज स्प्रेडचे वापर लिहिले आहेत.
डब्यावर अमूल बटर स्पाईसी
डब्यावर अमूल बटर स्पाईसी गार्लिक असेच लिहिले आहे. आपले नेहमीचे बटर फ्रीज मध्ये ठेवले की कडक होते. हे तसेच घट्ट क्रीम सारखे राहिले आहे.
चीझ स्प्रेडच आहे बहुदा ते.
चीझ स्प्रेडच आहे बहुदा ते. गूगल वर शोधले तर अमूल चीझ स्प्रेडचा जसा डबा दिसतोय तसाच घेतलाय मी. पण मला बटर असेच वाचल्याचे आठवतेय.

कदाचित अमूल बटर ह्या जोडशब्दाची सवय झाल्याने असेल!
हे तसेच घट्ट क्रीम सारखे
हे तसेच घट्ट क्रीम सारखे राहिले आहे.>>> मग चीज स्प्रेडच आहे.
हे घ्या गावा चीज.
हे घ्या गावा चीज.
वर्षा, मस्तच जमलय.
वर्षा, मस्तच जमलय.
दिनेशजींकडुन ही रेसेपी
दिनेशजींकडुन ही रेसेपी वाळवणातली. दिनेशजी तुम्ही म्हणता ते खरे आहे, पूर्वीचा शिवाजी फाँट काही जणांकरता दुर्लभच दिसतोय. पण ही कृती बहुतेक युनिकोडमधली दिसतेय (चुभुदेघे )
यावर्षी भारतात टोमॅटोचे वेडे पिक आलेय बहुदा. टोमॅटो सुकवुन साठवता येतात.
त्यासाठी लाल दळदार घट्ट टोमॅटो बघुन घ्यावेत. आणताना पिवळे आणले तर दोन चार दिवसात घरी पिकतात.
मग त्याच्या एक सेमी जाडीच्या चकत्या कराव्यात. बिया काढुन टाकाव्यात. त्याना एक किलो टोमॅटोला एक चहाचा चमचा या प्रमाणात मीठ लावावे. ताटात पसरुन ताट तिरके करुन जरा पाणी निथळु द्यावे.
मग एका जाड दोर्यात त्या चकत्या ओवुन घ्याव्यात. हा दोरा ऊन्हात व वार्यावर पाच सहा दिवस ठेवावा.
अगदी कडकडीत झाल्या कि मिक्सरमधुन फ़िरवुन फ़्लेक्स करावेत. दोन टोमेटोच्या जागी एक चमचा फ़्लेक्स वापरता येतात. परतत बसायचे श्रम वाचतात.
ऊनच पाहिजे असे नाही, वारे वहात असतील तरी ते वाळतात. ओव्हन वापरत असाल तर जेवण झाल्यावर या चकत्या बंद ओव्हनमधे ठेवुन द्याव्यात. लवकर वाळतील.
पित्झा, पिकल, सालसा अश्या अनेक पदार्थात हे सन ड्राईड टोमॅटो वापरता येतात.
सध्या भारतात ऑक्टोबर हीट चालु
सध्या भारतात ऑक्टोबर हीट चालु आहे. त्यामुळे ज्या सुदैवांना अंगण, टेरेस, चांगले ऊन येणारी बाल्कनी आहे त्यांना हे प्रयोग करता येतील.
आभार टुनटुन ! ते वाळलेले
आभार टुनटुन !
ते वाळलेले टोमॅटो, ऑलिव्ह ऑईल आणि काही हर्ब्ज मूरवून लोणचे करतात, ते पण छान लागते.
आमच्या येथे कबूतरांचा
आमच्या येथे कबूतरांचा सुळ्सुळाट आहे. तर मग हे वाळवणाचे प्रकार कसे करावेत?
धन्यवाद दिनेशदा.
धन्यवाद दिनेशदा.
निंबुडा, आजकालच्या हिटमधे हे
निंबुडा, आजकालच्या हिटमधे हे प्रकार घरातही करता येतील. एक दोन तास उन येणारी खिडकीजवळची जागा चालेल.
निंबुडा वर लिहीले आहेच की
निंबुडा वर लिहीले आहेच की ओव्हनमध्ये ठेऊ शकता. पण तरीही शक्य असेल तर ताटात जेव्हा ते ठेवाल तेव्हा वर चाळणी ठेऊन बघा कदाचीत कबुतर चिमण्या वगैरे ते पळवु शकणार नाही.
मागे एकदा तुरीच्या डाळीत कीडे
मागे एकदा तुरीच्या डाळीत कीडे झाले होते. तर कुणीतरी सांगितले स्टीलच्या ताटात काढून उन्हात ठेवायचे. उष्णतेमुळे कीडे निघून जातील. म्हणून तसे ठेवले तर थोड्या वेळात कबूतरांनी त्यात काय करून ठेवले हे सांगणे न लगे! नशीबाने खूप नव्हती डाळ. पण जी होती ती सगळी फेकून द्यावी लागली.
कुणाकडे सोलर कूकर अथवा सोलर
कुणाकडे सोलर कूकर अथवा सोलर ओव्हन असल्यास त्यामधे हे टोमॅटो सुकवावेत. चांगल्यारीतीने सुकतात शिवाय कावळ-धूळ वगैरेचा त्रास होत नाही.
एक दोन तास उन येणारी
एक दोन तास उन येणारी खिडकीजवळची जागा चालेल.
आमच्या एरीयात धान्यांची होलसेल दुकाने आहेत. ट्रकच्या ट्रक भरून पोती येतात. शेजारच्या गल्लीचे नावच बारदान गल्ली आहे.
>>>
तिथेही कबूतरे येतात.
टुनटुन ची चाळणीची आयडीया बरी वाटतेय, पण कडकडीत ऊन मिळणार नाही ना मग वाळवणाला.
माझ्या लहानपणी आई गच्चीत काय काय वाळवणे घालत असे तेव्हा वार्याने उडणारी धूळ त्यात पडू नये म्हणून वरतून जुना सुती पंचा, धोतराचे कापड ई. घालून चारी बाजुंनी विटा/ दगड ह्यांचे तुकडे ठेवत असे, हे त्या निमित्ताने आठवले.
इतर वेळी गच्चीत जायला उत्सुक नसलेली आम्ही मुले हळूचकन जाऊन गुपचूप अर्धवट वाळलेल्या चिकवड्या, सांडगे इ. खात असू. 
आणि माझ्याकडे मावे नाही.
आणि माझ्याकडे मावे नाही.
निंबुडा डाळ किंवा इतर काही (
निंबुडा डाळ किंवा इतर काही ( तांदुळ सोडुन )या पक्षांच्या त्रासामुळे उन्हात ठेवणे शक्य नसेल तर आणल्याबरोबर चाळुन भरावे म्हणजे किडे होत नाही, कारण पावसाळ्यात दमट हवेने आपोआप पण होतातच.
नंदिनीने चांगला सल्ला दिलाय, पण आमच्याकडे सोलर कुकर नाहीये, बघु उन्हात काही करता येते का ते.
निंबुडा ते टॉमेटो तसे वाळायला
निंबुडा ते टॉमेटो तसे वाळायला ४ -५ दिवस लागतातच, त्यामुळे चाळणी तापुन ती पण हीट मिळु शकते त्याला. आमच्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये कबुतरांनी तर चांगली ३ किलो ज्वारी एका दिवसात फस्त केली.
ओके.
ओके.
आणि कबुतरं वर पांघरलेल्या
आणि कबुतरं वर पांघरलेल्या बेडशीट सकट सर्व धान्य फस्त करू शकतात (नणंदेचा अनुभव. बिचारीने पहिल्यांदाच जास्तीचे गहू घेऊन उन्हं द्यायला गच्चीत पसरले होते
).
वा...कबुतरे सगळीकडे संचार
वा...कबुतरे सगळीकडे संचार करताहेत.... साताठ कबुतरांनी केवळ अर्ध्या तासात माझे दोन किलो गहु उडवले होते....
Pages