Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41
स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.
नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ब्रिटानिया - न्युट्रीचॉइसची
ब्रिटानिया - न्युट्रीचॉइसची क्लासिक लाइट क्रॅकर बिस्किटे वापरता येतील. मोनॅकोसारखी कुरकुरीत पण खारट नसलेली.
भरत, अश्या बिस्कीटांवर चीज
भरत, अश्या बिस्कीटांवर चीज टॉपिंग्ज चांगली लागतात. पण कोरडी चाट चांगली लागेल का?
शेवपुरीच्या पुर्या असतात
शेवपुरीच्या पुर्या असतात त्याच्यावर सर्व करता येतील.
कॅनपीज मेलेत म्हणजे काय
कॅनपीज मेलेत म्हणजे काय झालंय?
पापड त्रिकोनी कापून, तळून आणि
पापड त्रिकोनी कापून, तळून आणि खाकरा त्रिकोनी कापून, त्यावर सर्व करता येईल. छान लागत.
कॅनोपीज म्हणजे काय?
कॅनोपीज म्हणजे काय?
ताईनं आवळ्याचं लोणच बनवलय...
ताईनं आवळ्याचं लोणच बनवलय... पण साखरेचा पाक कडक झालाय... पाक थोडा पातळ व्हायला काय करता येईल???...
जास्तीच तुप आहे... बेसनाचे किंवा मुगाचे लाडू बनवायचेत... पहिल्यांदाच बनवणारेय... क्रमवार कृती सांगा प्लीज...
'कॅनपीज मेलेत'>>> एक्सापायरी
'कॅनपीज मेलेत'>>> एक्सापायरी डेट उलटून गेली आहे.
नंदिनीच्या सुचनेनुसार शेवपुरीच्या पुर्या शोधायला गेले तर पुर्या मिळाल्या नाहीत, पण चक्कचक्क कॅनपीजचा डब्बा मिळाला दुकानात.
गेल्या दोन तीन वेळेला मिळाला नव्हता. 
लाडकी, आवळे ऑलरेडी पाकात आहेत
लाडकी, आवळे ऑलरेडी पाकात आहेत का ? कडक पाक मऊ व्हायला, कढत पाणी घालून परत गरम करावे लागेल, पण जर फोडी ऑलरेडी पाकात असतील, तर असे करताना फोडी आणखी कडक होतील.
तसे असेल तर खाण्यापुरते लोणचे वेगळे काढून त्यात पाणी घालून गरम करायचे. सगळ्या लोणच्यावर हा प्रयोग करायचा नाही.
बेसनाच्या लाडवांची सविस्तर कृति इथे आहेच. दिवाळीच्या पदार्थांच्या बीबीवर पण सूचना आहेत.
थँक्स दिनेशदा... आवळे पाकात
थँक्स दिनेशदा... आवळे पाकात टाकून रितसर शिजवूनही झालेत...
कढत पाण्याचा प्रयोग करुन बघते आज... लोणचं थोडचेय... तर एकदाच सगळ्यावर कढत पाणी घालुन मग लोणचं फ्रीजमधे ठेवलं तर चालेल का???...
बेसनाचे लाडू डाळ भाजण्यापासून करायची ईच्छा आहे... पण त्यात पिठ मळायचे म्हटलेय म्हणजे काय???...
कढत पाणी टाकून थोडा वेळ
कढत पाणी टाकून थोडा वेळ बाहेरच ठेवायचे. एकदोनदा हलवून जरा मऊ झाले ( तास दोन तास लागतील ) कि मग फ्रिजमधे ठेवायचे.
बेसन भाजून, थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर मिसळली, कि ते मिश्रण चपातीच्या पिठाप्रमाणे मळून घ्यायचे. असे केल्याने लाडू मऊ होतात आणि खाताना तोठरा बसत नाही.
प्राची, आधी कॅनपीज म्हणजे काय
प्राची, आधी कॅनपीज म्हणजे काय तेच नीट माहीत नसल्याने काय काय भलभलतं डोळ्यांसमोर आलं माहितीये
लोल अगो.
लोल अगो.
कॅनपीज म्हणजे काय तेच नीट
कॅनपीज म्हणजे काय तेच नीट माहीत नसल्याने काय काय भलभलतं डोळ्यांसमोर आलं माहितीये >>
सेम हीअर. मला वाटले प्रॉन्स वगैरे असे काहीतरी. किंवा खेकडे इ. काही तरी नॉन व्हेज.
अजूनही कॅनपीज म्हणजे काय ते कळलेच नाहीये पण!
दिनेशदा म्हणजे नुसतं सुकचं
दिनेशदा म्हणजे नुसतं सुकचं मिक्स करायचं ना???... तुपामुळे साखर नि बेसन एकजीव होऊन जाईल ना???...
सॉरी.... जेवण बनवण्यात अजिबातच गती नाहीये... त्यात लाडू बनवताना कधी पाहीलं नाहीये... त्यामुळे लाडू बिघडले तर परत त्या वाटेला जाणं होणार नाही...
कॅनपीज गुगलताही येइल...
हे घ्या कॅनपीज म्हणजे काय :
हे घ्या कॅनपीज म्हणजे काय : http://en.wikipedia.org/wiki/Canap%C3%A9
मोनिटा ब्रँडच्या मिळतात त्या
मोनिटा ब्रँडच्या मिळतात त्या कॅनपीज म्हणजे आईस्क्रिम कोनच्या मटेरीयलच्या खोलगट पुरीसारख्या चौकोनी आकाराच्या बास्केट असतात, साधारण अश्या दिसतात.
पण मेल्या आहेत म्हणजे? मऊ
पण मेल्या आहेत म्हणजे? मऊ पडल्यात असे का?
besan tUpaat bhaajale ki tase
besan tUpaat bhaajale ki tase olasarach hote. mag saakhar mix kelyaavar, maLaNyaaitake maoo paDate. maLalyaavar ekajeev hote.
ओके... खुप खुप धन्यवाद
ओके... खुप खुप धन्यवाद दिनेशदा...
ताईला मैत्रीणीकडे पाठवून सफल प्रयोग करेन... दोघी एकत्र केले की काहीपण धड बनत नाही... ती माझं ऐकत नाही नी मी तिचं...
निंबुडा, वर लिहीले आहे की.
निंबुडा, वर लिहीले आहे की. पॅकची एक्सपायरी डेट उलटून गेली होती. मऊ वगैरे नव्हत्या पडल्या. पण उगाच माहिती असताना एक्सपायर्ड पदार्थ कशाला वापरायचे?
दुध नासलं म्हणुन पनीर केलं पण
दुध नासलं म्हणुन पनीर केलं पण त्याला वेगळाच वास येतोय.. भुर्जी केली टेस्ट चांगली आली पण वास राहीलाच
वास कसा घालवु?
चनस, फेकून द्या ते सर्व. दुध
चनस, फेकून द्या ते सर्व. दुध नासल्यावर त्याला वास यायला लागल्यावर त्यामधे हानीकारक जीवाणू तयार झालेले असू शकतात.
पदार्थात घालायचे जे इसेन्स
पदार्थात घालायचे जे इसेन्स असतात ते कुठल्या कंपनीचे चांगले? देशात हां. किती प्रमाणात याचा वावर चांगला?
मी आजवर कधी वापरलं नाही हे प्रकरण. गोडाच्या पदार्थांच्या बाबतीत केशर किंवा इलायची वर भागलं माझं.
माझ्या कडे १ किलो गहु आहेत.
माझ्या कडे १ किलो गहु आहेत. त्याचा कोणता पदार्थ करु शकते. दलिया करायचा नाहिये आणि चीक पण नको वाटतो आहे. कोणी सुचवाल का प्लिज?
पिठ करून पोळ्या?
पिठ करून पोळ्या?
@ नीधपः मी ऑस्ट्रेलियात
@ नीधपः
मी ऑस्ट्रेलियात राहते. पीठ करणे तरी माझ्या माहिती प्रमाणे इथे शक्य नाहि. ते गहु ओटीत मिळाले होते इथे.
मग कुंडीत पेरून गव्हांकुराचा
मग कुंडीत पेरून गव्हांकुराचा रस रोज घ्यायचा हा उद्योग करता येईल.
धन्यवाद. पण गव्हांकुराचा रस
धन्यवाद. पण गव्हांकुराचा रस कसा करायचा?
नी, तुला प्रश्न विचारायचा
नी, तुला प्रश्न विचारायचा होता ना?
Pages