युक्ती सुचवा युक्ती सांगा- ३

Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41

स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.

नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुमेधा,

केक जेल किंवा केक इंप्रुव्हर हे सुपिरीअर क्वलिटी केक्स बनवण्यासाठी वापरतात.. मोस्टली प्रोफेशनल केक्स मधे वापरले जाते. हे घातल्याने केक वॉल्ह्युम वाढतो आणि केक चे टेक्श्चर (फाइन क्रंब्ज, मोअर स्पाँजिअर) चांगले होते.

मी कधी वापरुन बघितले नहिये.

दुसरी म्हणजे केक जेल्स - केक डेकोरेटिंग जेल्स... रंगित जेल्स केक डेकोरेशन्साठी वापरतात ती.

थॅंक्स लाजो. इथे ते खूप जणी घेताना दिसल्या. त्याचे प्रमाण माहितिये का कोणाला? आणि कोणी वापरून पाहिले आहे का? मी दुकानदारीणीला प्रमाण विचारले पण तिला माहीत नाहिये..

सुमेधा,

हे जेल केक बॅटर मधे घालायचे असते. आणि त्याचे प्रमाण, केक मधे वापरल्या जाणार्या मैद्याच्या वजनावर अवलंबुन असते.. पॅकेटवर इन्स्ट्रक्शन्स असतिल.

http://www.long-life-cakes.com/pentacake.asp?nodeID=339 हे पण बघ.

लाल रंगाचा तांदुळ आणलाय नवर्याने ,
नेहमीप्रमाणे वाला भाता सारखा शिजवला तर
चव तर नाही वरुन चिवड्यासारखा मोकळा शिजतोय
पिल्लु पण नको असताना खातेय
दुसरे काही छान करता यील का?

प्रिभू,
लाल तांदूळ म्हणजे हातसडीचा का? राजस लहान असताना मी ही आणला होता. नुसता भात म्हणून शिजवायला लावल्यास नीट शिजत नसे. पुढील पैकी प्रकार करून पहा.

१) रात्रभर भिजवून मग पंख्याखाली (किंवा गच्चीत कडक उन्हात) पसरून वाळत घालायचे. कडकडीत झाले की मिक्सर मधून भरड वाटून घ्यायचे. लहान मुलांसाठी/ आजारी माणसांसाठी मऊ मऊ लापशी टाईप्स खिचडी करायला उपयोगी होईल. (छोट्या कुकर मध्ये तुपावर जिरे व थोडी आले- लसणीची पेस्ट, हळद टाकून भरड परतायची. भरपूर पाणी, + मीठ + मेतकूट घालून मस्त शिट्ट्या काढायच्या. कुठल्याही लोणच्याबरोबर ही मऊ सरबरीत खिचडी तोंपासू लागते एकदम! )

२) वाळल्यानंतर कढईत मस्त भाजून त्यात भाजलेली ज्वारी घालून भाकरीचे पीठ बनवण्यासाठी दळायला द्यायचे.

प्रिती, कधी कधी तांदळाला गेरू / रंग लावून लाल तांदूळ म्हणून विकतात. आधी मूठभर तांदूळ चोळून चोळून धुवून, रंग जातोय का ते पहा.

( हा अनुभव मी स्वतः, मस्कतमधे घेतला आहे. त्या सुपरमार्केटमधे जाऊन तक्रार केली, त्यांनी लगेच तो तांदूळ शेल्फवरुन काढून टाकला. )

नारळ खोवून तो चव झीपलॉक बॅगेत घालून फ्रीज करा. खूप दिवस टिकेल. तसंच नारळाचं दूध काढूनही फ्रीज करु शकता.

नारळ खवून तो कीस आईस ट्रे मध्ये घालून क्युब्ज करा. ते क्युब्ज भाजी, आमटीत घालायला वगैरे बरे पडतील. सगळा कीस थॉ करायची गरज नाही.

साक्षीमी, मुंबईत आहात ना? नारळ न फोडता ठेवा, बरेच दिवस राहतील. लागतील तसतसे फोडून वापरा.

प्रिती, हा तांदूळ उकडा तांदू़ळ आहे. या तांदळाच्या तीनपट-चारपट पाणी घे. कूकरला गॅस बारीक करून वीसेक मिनिटे शिजव. त्यानंतर भाताचे पाणी काढून घे. त्यामधे तूप्-मीठ आणि हवं असल्यस थोडंसं लोणचं/मेतकूट घालून गरम गरम पिऊन टाक. बाळाला पण देता येइल. हे असे पाणी फार पौष्टिक असते असे मला मंगलोरमधल्या आमच्या शेजारी सांगायच्या. मी सुनिधीला जवळजवळ रोजच देत होते.

हा भात शिजवायचा मंगलोरमधे मी पाहिलेला प्रकार वेगळा होता. तिथे तांदूळ स्वच्छ धुवून घ्याय्चे. भर्पूर पाणी उकळले की त्यामधे हा भात वैरायचा. एक उकळी आली की पातेल्यावर झाकण ठेवायचे. त्याला गच्च बसणारे फडके बांधायचे. अजिबात वाफ बाहेर जाता कामा नये. मग गॅस बंद करायचा. पण पातेलं गॅसच्या धगीच्या असपास गरम राहील असे ठेवाय्चे. आतल्या वाफेवर हा भात शिजायला दोन तीन तास लागायचे. छान लागायचा असा भात.

प्रिती नंदिनी बरोबर सांगतेय. मी पण वापरलाय हा तांदूळ. चक्क इडली पण केलीय त्याची आणी दररोज पण वापरलाय. फिश करी बरोबर चांगला लागतो हा. ( असे नवरा आणी त्याचे मित्र म्हणतात, मी शाकाहारी गृप मधली )

मेधा, मला वाटतं घावन-घाटलं. बाळ नुसतं पहुडलेलं असतं म्हणून Happy मग करंजी ( कुशीवर वळतं ) आणि लाडू ( हाताच्या मुठी वळतो ) म्हणून असं असतं बहुतेक. कुठल्यातरी एका महिन्याचा वाढदिवस चोरतात.

मुंबईमधे नारळ टिकतील तसेच न फोडता.. अगदी खुपच दिवस राहिले तर आत गोटा होतो, ( नारळ हलवल्यावर त्याचा गुडगुड आवाज येतो ) तो सुके खोबरे म्हणून वापरता येतो.. अगदी क्वचित म्हणजे मुंबईत थंडी पडलीच तर नारळाला, तडे जातात.. पण त्याने नारळ खराब होत नाहीत.

काल मीपण फेण्या आणल्या. पण त्या सुतरफेणीसारख्या गोड नाहीयेत. नुसतीच साजूक तुपाची चव लागतेय.
आता त्या कश्या संपवू. दुधसाखरेत भिजवून खाता येतील का?

सगळ्यांना धन्स

निंबुने काढलेला २ वर्षांपर्यंत मुलांचा आहार वाला धागा मी मागच्या आठवड्या पासुन शोधत आहे

भाज्या घेताना चांगल्या भाज्या कशा ओळखव्यात याचे काही ठोकताळे आहेत का?
माझा नेहमी गोंधळ असतो >> माझा फन्डा . भाज्या नाहि ओळखता आल्या तरी चान्गली भाजीवालि/ भाजीवाला पकडून ठेवायचा. शक्यतो रोज त्यान्च्या कडूनच भाज्या घेतल्या तर हे लोक फसवत नाहित. सायन चा एक नेहेमिचा भाजिवाला तर 'मॅडम आज ही भाजी घेऊ नका चान्गली नाही उद्या घ्या' असे स्वताच सान्गतो.

मागे एका पानावर टुनटुनने माझ्याच एका जून्या पोस्टची लिंक दिली आहे, त्यात भाजीबद्दलचे ठोकताळे आहेत.

नारळ न फोडताच टिकवायचे आहेत, एवढे नारळ कोण खवुन ठेवेल? एवढा खोबर्‍याचा वापरही होत नाही रोज. थंडी नाहीय एवढी तरीही नारळ तडकतायत. दोन खराब झाले कालच, टाकुन दिले. तरी मी दर दोन दिवसांनी भिजवुन उभे ठेवतेय, बघु किती दिवस राहतात ते. बाकी धन्स सगळ्यांना Happy

अरे चांगले असतील तर मग नारळाच्या वड्या, लाडू, करंज्या का नाही बनवत त्यांचे? आता दिवाळी आहेच की तोंडावर. येणार्‍या जाणार्‍याला वाटा. ( तोंडाला पाणी सुटले माझ्या ) नाहीतर चटणी, वाटण घालुन भाज्या, उसळी वगैरे होतीलच की. नाहीतर फोडुन स्वतः पण खा बच्चेकंपनीला पण द्या.

आमच्याकडे आजच गौरी गणपतीसाठी आणलेल्या नारळांपैकी २ फोडले ते मस्तच राहिले होते. मी पुण्यात असते, मुंबईचे हवामान माहीत नाही.

आमच्याकडे रत्नागिरीला माडावरून उतरवलेले असोले नारळ असतील तर तीन चार महिने सहज टिकतात. सोललेले नारळ पण तेवढेच टिकतात. पण आमच्याकडे नारळाचा एवढा वापर नसल्याने (माणसे तीन, माड पाच) बहुतेकदा नारळ पडून असायचे. पूर्वी आई कुणाला हवे असतील त्यांना देऊन टाकायची. पण आम्ही राहतो त्या भागात प्रत्येक घरामधे दोन तरी माड आहेत. मग एवढे माड ठेवून तरी काय करणार? त्यातून आमच्या माडांची जात प्रताप नावाची आहे. एक एक नारळ भलामोठा. एक नारळ खवणला तर दोन ते अडीच ताट भरेल इतकं खोबरं. हल्ली आई उरलेले नारळ एका ओळखीच्या हॉटेलवाल्याला विकून टाकते. त्यांचा माणूस टेंपो घेऊन आमच्या भागात येतो आणि आजूबाजूच्या सर्वांकडून नारळ घेऊन जातो.

एक नारळ खवणला तर दोन ते अडीच ताट भरेल इतकं खोबरं.>> बापरे!! मग त्या जातीचं नाव तुम्ही बदलून 'रावण' ठेवा Wink

Pages