युक्ती सुचवा युक्ती सांगा- ३

Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41

स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.

नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक नारळ खवणला तर दोन ते अडीच ताट भरेल इतकं खोबरं.>> हेहेहेहेहेहे..
सासरी पण हाच प्रकार आहे.. पोतं भरुन नारळ पुण्याला येतात.. बाकिचे विकुन टाकतात..

रच्याकने , मला नुसतं खोबरं फस्त करायला जाम आवडत Happy

फ्रेश खोवलेलं खोबरं आणि त्यावर साखर एका वाटीत घेवुन पुस्तक वाचताना हळु हळु खात बसायचं. किती महान ते सुख !

साक्षी, या दिवाळीला ओल्या नारळाच्या करंज्या कर ना. नारळही संपतील आणि नेहमीच्या सुक्या नारळापेक्षा या करंज्या काय भारी लागतात. Happy

मंजूडी, अधिक माहितीसाठी: ही भाट्यामधल्या नारळ संशोधन केंद्राने विकसित केलेली जात आहे. जाड आणि तरीही चवीला अधिक गोड खोबरे हे याचे वैशिष्ट्य. मध्यंतरी काही कारणांमुळे या माडाची रोपटी केंद्रामधे मिळत नव्हती. सध्याचे माहित नाही.

भाट्यातला नारळ लावलाय का तुमच्याकडे? सही!!
त्या माडाला बरेच उंदिर लागतात, पत्रे ठोकावे लागतात त्यासाठी माडाला.

देऊन टाका लोकांना!
पडून राहून खराब होण्यापेक्षा लोक वापरतील.>>> अहो तेव्हाच ज्यांना हवे होते त्यांना दिलेत, तरीही एवढे उरले.
मोठा प्रश्न एवढे नारळ किसण्याचाच आहे खरं तर, आयत खोबरं असेल तर मग कसही संपवता येईल.
ओल्या नारळाच्या करंज्या मलाही भयंकर आवडतात, पण बाळाला सांभाळून करंज्यांचा खटाटोप नाही जमणार मला एक्टीला. मदतीला कोणी असतं तर जमलं असतं. चुनकापं ही होऊ शकतात पण त्याला एकदम एक्सपर्टच लागेल माझ्याने नाही होणार. वाटणं, चटण्या जमेल तसे करतेय.

मंजूडी, आमच्याकडे उंदरांचा त्रास गेल्या १० वर्षात झालेला नाही. पत्रे वगैरे पण नाही ठोकलेत. अर्थात, त्यासाठी महिन्यातून एकदा माड साफ करून घ्यावेच लागतात. उंदरांसाठी पूर्ण सोसायटीनेच मिळून मोहिम राबवलेली असते.

साक्षी, तुझं प्रोफाइल पाहिलं नाही तु कुठली आहेस. मागे माबोवरच कुठेतरी वाचलं होतं कि सहकारनगर, पुणे मधे नारळ खोवुन देतात म्हणे. Proud तु पुण्याची नसलीस तर स्वयंपाकाच्या मावशी, स्वच्छ कामवाली यांना तु पैसे देवुन काम करुन घेवु शकतेस. किंवा बेस्ट ऑप्शन, नवरा? त्याला पहिल्या नारळाचं ट्रेनिंग दे आणि उरलेले नारळ खोवेपर्यंत तो एक्सपर्ट होवुन जाइल. मग त्या अनुभवावर पुढे आयुष्यभर हा टास्क त्यालाच असाइन करुन टाक. Wink
( नवर्‍याला विळीवर विशिष्ठ पोझमधे बसायला शिकवण्यापेक्षा तुलाच सगळे नारळ करणं परवडेल. Happy )

मनिमाऊ मी मुंबईत आहे, स्वयंपाकासाठी कोणी नाहीय, कामवालीला विळीवर जमत नाही, त्यांच्यात खोबरंच वापरत नाहीत त्यामुळे तिने नकारच दिलाय. राह्ता राहिला बेस्ट ऑप्शन, तो तर खरंच बेस्ट आहे. प्रेग्नंसीत त्यानेच दिलेत नारळ किसुन पण सध्या जॉबमुळे वेळ नाहिय त्याला पण. त्याला ट्रेंनिंगची गरज पण नाय पण इतर नखरे सहन करवे लागतील मग. टिव्हीचा मोठा आवाज, त्यात मॅच असेल तर आणखीनच मोठा आवाज, किसलेल्यातल अर्ध त्याच्याच पोटात जात असतं, बाकीच नजर टीव्हीवर असल्यामुळे ताटाच्या बाहेर उडत असतं. शिवाय आधीचा (नारळ फोडलेल्याचा) आणि नंतरचा (खोबरं इकडे तिकडे पसरलेल्याचा) पसारा मलाच काढावा लागतो. Happy

साक्षीमी, कामवालीकडून नारळ फोडून घेऊन तो करवंटीपासून अलग करून घेता आला तर पहा. तसं करून मिळालं तर सोलाण्याने नारळाच्या वाटीची काळी पाठ काढून टाकून राहिलेली वाटी किसणीवर किसून घेता येईल.

हो मंजूडी, हे सोप्प वाटतंय. विळीवर बसण्यापेक्षा किसणीवर काय मी पण रोज थोडं थोडं करु शकेन आणि फोडलेले (करवंटीशिवायचे) नारळ फ्रिजमध्येही राह्तील ना बरेच दिवस?

साक्षीमी, ईडली चटणी चा व्यवसाय करणारे कोणी माहिती आहेत का बघ. त्यांच्याकडे नारळ मशीनवर खोवला जातो. त्यांच्याकडून मिळाले तर खोवून घे.

ओके.. बघते रावी. हो एकदा गावावरुन येताना संगमेश्वर्ला एका हॉटेलम्ध्ये पाहिली होती नारळ किसायची मशीन. त्यांच्याकडे नुसत्या खोबर्याचे मोदक मिळतात... एकदम तोंपासु...स्लर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्प....

फोडलेले (करवंटीशिवायचे) नारळ फ्रिजमध्येही राह्तील ना बरेच दिवस?>>> नाही Happy

मग तश्या फोडलेल्या करवंटीशिवायच्या नारळाच्या वाट्या उन्हात ठेवून सुकवून टाक. ते सुके खोबरे चिक्कार टिकेल.

>>फ्रेश खोवलेलं खोबरं आणि त्यावर साखर एका वाटीत घेवुन पुस्तक वाचताना हळु हळु खात बसायचं. किती महान ते सुख ! >><<

+ १
फेव पदार्थ!

फुप्रोची अ‍ॅटचमेंट नाही.. एक अंजली चे वेगळे नारळ खोवण्याचे मशीन मिळते.. पण ते हाताने फिरवावे लागते..त्यामुळे हात भरुन येउ शकतात..पण विळीवर खोवण्यापेक्षा सोपे आहे..

फोडलेले (करवंटीशिवायचे) नारळ फ्रिजमध्येही राह्तील ना बरेच दिवस? >> साक्षी ओलं खोबरं खोवून्/किसून एका घट्ट झाकणाच्या डब्यात घालून फ्रिजर मध्ये ठेव. बरंच टिकतं. माझ्याकडे १५ दिवस झालेत खोबरं जसंच्या तसं आहे. फ्रिजात नाही टिकत. वास येतो लग्गेच. Sad

साक्षीमी, नारळाच्या वाट्या काढुन त्या दाभणाने सुतळीमध्ये ओवायच्या आणि खिडकीत किंवा ग्रीलला जिथे ऊन येत असेल तिथे बांधुन ठेवायच्या. एक-दोन महिन्यात मस्त सुके खोबरे होते, मग त्या वाट्या फ्रिजमध्ये ठेवुन दे. Happy

साक्षीमी, अग अन्जली चे नारळ किसायचे यन्त्र ( काय म्हणू ?) चान्गले आहे . सासरी अजिबात वीळी वापरत नाहीत , मला आधी विचित्र वाटले की कसे काय हे लोक वीळीशिवाय जेवण करतात्..पण आता मी पण एक्स्पर्ट झाले. भाज्या कापायला Anjali Fantastique, नारळ किसायला Anjali COCONUT SCRAPER 'PREMIER' आणि पालेभाज्या, मासे वैगरे कापायला Fantastique आणि मासे कापायची कात्री. मला COCONUT SCRAPER वर किसायला जमत नाही पण सासू आणि नवरा दोघे एक्स्पर्ट आहेत.
आमच्याकडे जेवण करणार्या काकूनी पण त्यान्च्या घरी Anjali Fantastique cutter आणले.
आधि वीळी नाही म्हणून वैतागलेल्या.

नारळांचे काहीही करु नका.. जसे लागतील तसे फोडा... बाकीचे नीट ठेवून द्या... आपोआप सुकतील आणि गोटा तयार होईल.. गोटा झाला की फोडून ठेवा

आमच्या अंजली कोकोनट स्क्रेपरचा व्हॅक्युम बेस काम करीत नसल्याने ते यंत्र वापरायचे तर दोन माणसे लागतात. एक धरून ठेवायला, एक फिरवायला. तसेही त्याच्यापेक्षा विळीवर लवकर आणि नीट खोवले जाते.
गेल्या वर्षी ग्राहक पेठेत विजेवर चालणारे नारळ खोवण्याचे यंत्र पाहिले होते.

एवढे नारळ कसे खोवायचे याचे उत्तर मिळाल्यावर एवढ्या खोबर्‍याचे काय करायचे असा पुढचा प्रश्न येईल!

मी एकदा ओलं खोबरं असंच प्रयोग करू म्हणून सुकं करायला बाल्कनीत ठेवलं होतं. तिथे कडक ऊन येत नाही पण ते आतून काळं झालं आणि थोडा बुरशीसदृश थर ही दिसला वरती.. प्रयोग म्हणूनच केलेला आणि थोडाच होता ओला नारळ त्यामुळे वाईट नाही वाटलं. तेव्हापासून ओलं खोबरं हवं असेल तर बाहेरून फोडलेला नारळ आणते आणि सुकं सुद्धा विकत आणून किसून पौर्णिमाने सांगितल्याप्रमाणे भाजून फ्रिजर मध्ये ठेवते.. छान टिकतं.

आता खोबर्‍याचा विषय निघालाच आहे तर... माझ्याकडून असंच थोडं ओलं खोबरं न किसता वगैरे फ्रिज मध्ये ठेवलं गेलं. २ दिवसांनी त्याला किंचित वास येत होता, मी ते नळाखाली स्वच्छ धुवून, किसून मावेत २-२ मिनिटं भाजलं आणि डब्यात भरून फ्रिजर मध्ये ठेवलंय.. पण पदार्थात वापरायचं धाडस होत नाहिये. किंचित वास येतोय त्याला... काय करू? Uhoh

ओके ओके.. कळलं. ते हाताने फिरवायचं.
दक्षिणा, तसं मी ही किसलेलं खोबरं ठेवते गं फ्रिजरमध्ये. मी ते वाट्यांबद्दल विचारत होते.
वर्षा११, १-२ महिने... एवढा वेळ लागतो? दाभणच नाहीय माझाकडे
सामी, धन्स गं. बघते हे मिळतं का? Happy

बापरे मी टायपे पर्यंत एव्ढे प्रतिसाद....
एवढे नारळ कसे खोवायचे याचे उत्तर मिळाल्यावर एवढ्या खोबर्‍याचे काय करायचे असा पुढचा प्रश्न येईल!>>> हो मयेकर. ते ही आहेच!! पण आयतं असलं की आपोआप काही ना काही सुचतंच. Happy

आमच्या अंजली कोकोनट स्क्रेपरचा व्हॅक्युम बेस काम करीत नसल्याने ते यंत्र वापरायचे तर दोन माणसे लागतात. एक धरून ठेवायला, एक फिरवायला. तसेही त्याच्यापेक्षा विळीवर लवकर आणि नीट खोवले जाते. >>> मयेकर, माझ्यापण स्क्रेपरचा बेस आणल्यापासुनच फिक्स होत नाही. शिवाय सवय किंवा काहीही, पण विळीवर फास्ट आणि छान खोवलं जातं.

ते स्क्रेपर माझ्यासाठी तरी बेस्ट आहे. मी दुकानातून तीन चार स्क्रेपर बघून त्याचा व्हॅक्युम बेस चेक केला होता. मला विळीवर खोवता येत नाही.

खोबरं जर वाटपामधे वगैरे घालायचे असेल तर मी सरळ बत्त्याने वरची कवटी फोडून टाकते आणि आतल्या खोबर्‍याचे मोठे मोठे तुकडे विळीवर चिरून मिक्सरला फिरवून घेते.

Pages