युक्ती सुचवा युक्ती सांगा- ३

Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41

स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.

नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अल्पना, पांढरा शर्ट ड्रायक्लीन केल्यावर डाग नक्की जातील. नवर्‍याच्या शर्टवर नुकताच हा प्रयोग केला तेव्हा लाँड्रीवाला म्हणे पांढर्‍या कपड्यावरचे कसलेही डाग शक्यतो निघतात . कापडाची पर्स असेल तर तिच्यावरही हा उपाय करता येइल.

चिंगे तुला ड्राय क्लिनिंगचा अनुभव चांगला आला असेल तर उत्तमच.
माझ्या एका ड्रेसला बसच्या सीट कव्हरचा निळा रंग लागला.. कोरा ड्रेस.. पहिल्यांदाच घातलेला ऑफिसला.. तो ड्रेस ड्रायक्लिन करून आणला पण रंग गेलाच नाही. Sad

त्याला तोच रंग लावायचा ना. मी माझ्या शर्टावर हा प्रयोग केला होता. चेंबूरला, शर्ट पण रंगवून मिळतात.

बस्के, लाजो ने सांगीतले तसे पुडिंग तर होईलच पण फ्रेंच टोस्टही करता येईल. तरीही राहिला तर भारत भेटीला निघालात तर बरोबर पुडिंग करुन न्यायचे, मधे खायला मस्त पोटभरु होते. नाहितरी आजकाल काहीतरी खायला घ्यावे लागतेच. मी नेते असे करुन. हा पदार्थ गरम हवा असेही नाही.

घरात तुम्ही सगळ्या जणी एकाच वेळेस किती बटाटे घेऊन ठेवता? मी घराजवळच्या लोकल बाजारातून लागतील तसे अर्धा किंवा एक किलो घ्यायला लागले आहे आजकाल. पण तसे फार महाग पडतात. पण खूप पण (भाव करून २ किलो वै.) घेतले की ठेवून ठेवून त्यांना कोंब येतात. तुम्ही काय करता?

धन्स अवल
मी आले लसुन पेस्ट करताना थोडे तेल आणि चिमुट मिठ घालते [सासुबाईंची आयड्या ] वास येत नाही सध्या म्हणून बिना फ्रिज च्या वस्तु कश्या टिकवाव्यात ते लिस्ट करत आहे

निबुं मी फार्फार तर १ ते १.५ किलो आणते
बटाट्याचे पदार्थ
ब्रेड पकोडा
स्ट्फ पोटॅटो
मागे दिनेशदांनी एक छान रेसिपि दिलेली ति
भाजी मधे आठवड्यातुन २ दा[ कारण नवर्याला आवडत नाही आलु Happy
पराठे १ दा २ आठवड्या तुन
उपवासाचे भाजी

मीपण २ किलोच आणते. पण माझ्या नव-याचे पहिले प्रेम बटाटा असल्याने फार प्रश्न येत नाही Proud
माझ्या एक ओळखीच्या मावशींकडे फ्रिजचा फार वापर नसे. त्या मग बटाटे फ्रिजमध्ये ठेवत छान रहात विदाऊट कोंब Happy

माझ्या एका बिहारी मित्राने ( त्यांचे बटाट्याचे शेत आहे ) ते कसे बटाटे टिकवतात, हे सांगितले होते. बहुतेक एकाच लेयरमधे, जमिनीपासून वर आणि पाणी लागणार नाही, असे काहीतरी सांगत होता.

मजा म्हणजे कांदे बटाटेवाल्याकडे अजिबात कोंब येत नाहीत, घरी आणले कि आलेच कोंब !

आमच्याकडे बटाट्याची पावडर मिळते, रस्सा भाजी, पराठे, कटलेट्स सगळ्यात वापरता येते. मूळात ती मॅश्ड पोटॅटोसाठी असते. उकडून फ्रिजमधे ठेवले तरी राहतात. पण आठवड्याभरात वापरले पाहिजेत.

कांदे बटाटेवाल्याकडे अजिबात कोंब येत नाहीत, घरी आणले कि आलेच कोंब !
>>>
अगदी अगदी, दिनेशदा...

प्रिभू, अगं मला बटाट्यांचे काय काय करता येईल ती यादी नकोय. भाव करून २-३ किलो वै. बटाटे आणले तर कोंब/ डोळे न येता टिकवायचे कसे ह्याचे उत्तर हवेय.

त्या मग बटाटे फ्रिजमध्ये ठेवत छान रहात विदाऊट कोंब >>> करून बघते.

शक्यतो उष्णते पासून दूर म्हणजे गॅसच्या शेगडी पासून दूर ठेवते. ती ३ मजली स्टील ची जाळी मिळते ज्याला खालून चाके असतात त्यात एका रॅक मध्ये कांदे, एकात कांदे व उरलेल्यात इतर सटर -फटर सामान असे ठेवते. व ओट्याखाली ती जाळी ठेवते.

निंबुडा, अंधारात, उबेत कोंब फुटतात. ती जाळी उजेडात, जिथे वारं आहे तिथे ठेवून बघ. फ्रिज मध्ये जागा असेल तर सर्वात बेस्ट त्येच Happy

>>ठेवून त्यांना कोंब येतात. तुम्ही काय करता?
जमिनिखाली उगवत असले तरी बटाटे म्हणजे स्टार्च (अन्न) साठवायला झाडानं केलेलं स्टेम मॉडिफिकेशन. त्यामुळे बटाट्याला सतत उजेड मिळाला की कोंब फुटतात. (अगदी घरातल्या ट्यूबलाइटच्या प्रकाशात देखिल.) तेव्हा बटाटे अंधारात, थंड जागी ठेवायचे. पेपर बॅगेत किंवा टॉवेल / फडक्यानं झाकायचे. अगदी घट्ट डब्यात किंवा हवाबंद जागेत नको, म्हणजे सडणार नाहीत.

मला एक कळत नाहीये, एका कपड्याचा एवढा आरामात निघून जाऊ शकणारा रंग दुसर्‍या कपड्याला एवढी घट्ट मिठी कशी मारून बसतो ?

एकावेळेला अर्धा किंवा एक किलो आणायचे आणि संपल्यावर परत किंवा एकदम दोन किलो आणायचे याच्यात असा किती फरक पडतो पैशाने? कोंब येऊ न देता टिकवणे याचा विनाकारण ताण घेण्याइतका पडतो?
आपण कधी काटकसर या गोष्टीचा जरा जास्तच बाऊ करतो.
आपली ताकद, आपला वेळ, आपला मेंदू ही जी सगळी उर्जा खर्च होत रहाते ती आपण धरतच नाही.

बघ विचार करून.

नीधप +१!

भाउबीज गुरुवारी आहे, ५-७० अशा वयोगटाचे लोक दिवसभर वेगवेगळ्या वेळी येणार आहेत, त्यांच्यासाठी काय करावे, शाकाहारी छान पदार्थ सुचवा ना, शक्यतो एकदम करून ठेवून दिवसभर सर्व करण्यासारखे

मी परवा आरवीची भाजी आणली. पण मी अजून त्याची कधी भाजी केली नाही. मला कुणी सांगाल का रेसिपी ? ही भाजी कशी करायची ?

इथे लॅम्थो वगैरे छान प्रकार आहेत. अरवी उपवासाला चालते. उकडून सोलून, जिरे मिरचीची फोडणी देऊन, कूट घालून उपवासाची भाजी करतात. किंवा कच्च्याच चकत्या करुन, परतून करतात. गोवन पद्धतीचे वाटण लावूनही करतात. मद्रासी सांबारातही वापरता येतात. ( प्रत्येक प्रकारासाठी साले काढायची )
या भाजीला चिंच / कोकम वापरणे आवश्यक आहे.

अळकुड्यांची भाजी असा माबो सर्च कर. आहे माबोवर.
अल्पना बर्‍याचदा करते. तिच्या विपुत विचार.

धन्स दिनेशदा, निधप. मी आत्ताच सर्च केलं आणि रेसिपी मिळाली. आता आजच करते, म्हणजे विसरायला नको. Happy

केक जेल हा काय प्रकार आहे? काल "केक अन बेक" नावाच्या दुकानात पाहिले. कुणाला प्रमाण माहीत आहे का?

Pages