Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41
स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.
नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मयेकर, माझ्यापण स्क्रेपरचा
मयेकर, माझ्यापण स्क्रेपरचा बेस आणल्यापासुनच फिक्स होत नाही. शिवाय सवय किंवा काहीही, पण विळीवर फास्ट आणि छान खोवलं जातं. >> अग बेसला पाणी लावायचे आणि मग फिट करायचे असे काहीतरी टेक्निक आहे. ओट्यापेक्शा डायनिन्ग टेबल वर चान्गले फिट होते .
लय लय कंन्फ्युज्ड अबाऊट
लय लय कंन्फ्युज्ड अबाऊट स्क्रेपर
स्क्रॅपरचा व्हॅक्यूम बेस नीट
स्क्रॅपरचा व्हॅक्यूम बेस नीट फिट होत नाही. त्यावर एक पाय दाबून ठेवून मी वापरायचो, पण पाय दुखायचा.
तो स्क्रॅपर, आणखी एक पट्टी लावून मोठ्या लाकडी पाटाला, स्क्रूने फिट करुन घेतला, तर चांगला चालतो.
मोठ्या, हॉटेलात तो विजेवर चालणारा असतो. काही ठिकाणी बघितलाय. पण तो घरगुती वापराला, खुपच मोठा आहे.
वर्षा११, १-२ महिने... एवढा
वर्षा११, १-२ महिने... एवढा वेळ लागतो? दाभणच नाहीय माझाकडे>>>> खोबरे नीट सुकले पाहिजे नाहितर ते खराब होते.
आमचे पण दोन माड आहेत दारात. नारळ उतरवुन घेतले की लागतील तसे आम्ही सोलुन घेतो. हे सोलायलापण माणसे मिळत नाहित हल्ली. मग माझे सासर्यांनी नारळ सोलायला घेतले की १०-१२ नारळ सोलुन ठेवतात तेही एवढे सफाचट की ते लगेच सुकुन त्याचे गोटे होतात, मग परत ते स्वतः हा वाट्या ओवायचा उद्योग करत बसतात. माझ्या नवर्याच्या मते ते त्यांचा वेळ घालवतात.
म्हणजे कितीतरी वेळा मासे घरात असतात, नारळही समोर असतात पण गोटे, मग काय बाहेरुन नारळ विकत आणावे लागतात. 
माझ्या पोस्टीवरची सुचवा
माझ्या पोस्टीवरची सुचवा कायतरी
मी म्हणते तो स्क्रेपर नसावा..
मी म्हणते तो स्क्रेपर नसावा.. कारण त्याला वॅक्युम बेस नाही बघितलेला मी.. लोखंडी चौकोणी बेसवर उभा दांडा अन त्याला वरती एक आडवा छोटा दांडा.. त्या दांड्याला दातेरी गोल अन तो गोल हाताने फिरवण्याकरताच तो छोटा दांडा असावा.. दक्षीण भारतीय मैत्रिणीकडे पाहिला होता.. अख्खा नारळ अवघ्या ५ मिनीटात खोवलेला तिने..
http://www.google.co.in/imgre
http://www.google.co.in/imgres?um=1&hl=en&client=firefox-a&sa=N&rls=org....
इथे बघा.. ड्रिल मशीन सारखं आहे हे. पण काळजीपुर्वक वापरावं लागेल
हे सोलायलापण माणसे मिळत नाहित
हे सोलायलापण माणसे मिळत नाहित हल्ली.>>नारळ सोलायचे मशिन मिळते ते घ्या. त्याच्याने अगदी मलासुद्धा नारळ सोलता येतात. तेपण पाच मिनिटात. आम्ही गरज पडेल तसेच सोलून घेतो.
नारळ सोलायचे मशिन मिळते ते
नारळ सोलायचे मशिन मिळते ते घ्या.>>>>> +१ ज्यांच्या घरी नारळाचं झाड आहे त्यांना हे खुपच उपयोगी आहे
दक्षे, केसांना लाव ते. खवट
दक्षे, केसांना लाव ते. खवट खोबरे खाद्यपदार्थात वाईट लागते.
चिमुरी, तोच योग्य. त्याचा
चिमुरी, तोच योग्य. त्याचा पाया भक्कम असतो. अंजलीच्या स्क्रॅपरचा भक्कम नसतो. आणि हात तेलकट झाले तर हात करवंटीवरून सटकतो.
नंदिनी, ते वर भाल्यासारखे टोक असते तेच ना? आधी तो नेमका पकडून, नेमक्या आघाताने त्यावर आपटावा लागतो, तेच ना ? त्यावर नारळ सोलायचा, म्हणजे फार सराव आणि कौशल्य लागते. मी एकदा प्रयत्न केला होता, नाही जमले.
हो तेच. पण त्याला एक दांडा
हो तेच. पण त्याला एक दांडा असतो. नारळ त्या भाल्यामधे अडकवायचा आणि दांडा वर ओढायचा. लगेच सोलला जातो. अजिबात वेळ लागत नाही. सराव वगैरे पण विशेष लागत नाही.
जागूकडे वेगळे उपकरण
जागूकडे वेगळे उपकरण बघितल्यासारखे वाटतेय. ती इथे आली, तर बरे.
मी गोव्याला बघितले होते, त्यात तो दांडा पायाने दाबावा लागत असे. म्हणजे भाल्याचे दोन भाग वेगळे होत.
आणि तेवढी साल ( सोडण ) निघत असे.
आहे आहे. नारळ सोलायचे मशीन
आहे आहे. नारळ सोलायचे मशीन आहे, त्यानेच सोलतो आम्ही नारळ, पण त्यालाही थोडाफार जोर लावावा लागतोच. आमचे नारळही मोठे आहेत.
आमच्या सोसायटीत प्रत्येकाचे दोन तीन माड आहेत, खाली रस्त्यावर पडलेले नारळ प्रत्येकजण आकारावरुन ओळखतात. आमच्या झाडाचा नारळ एकदा रस्त्यावर पडला होता, मला वाटले दुसर्या कोणाचा असेल म्हणुन मी उचलला नाही तर सासुबाई म्हणाल्या आण तो नारळ, आपलाच आहे. मी त्यांना विचारले की तुम्हाला कसे कळले तर म्हणाल्या आकारावरुन कळते कोणाच्या झाडाचा नारळ आहे तो.
नारळ त्या भाल्यामधे अडकवायचा
नारळ त्या भाल्यामधे अडकवायचा आणि दांडा वर ओढायचा. लगेच सोलला जातो. अजिबात वेळ लागत नाही. सराव वगैरे पण विशेष लागत नाही. >> +१
आम्च्या कडे ही तसच मशीन आहे
http://www.thayabi.com/coconu
http://www.thayabi.com/coconutscraper.html
सिंडरेलाने दिलेली लिंक
सिंडरेलाने दिलेली लिंक स्क्रेपरची आहे, ज्याची चर्चा मागच्या पानावर चालू होती.
मी, दिनेशदा आणि इतरजण बोलत आहेत ते हे नारळ सोलायचे मशिन.
माझ्याकडे देखील रबरी पॅड
माझ्याकडे देखील रबरी पॅड असलेल नारळखवणं होते. काम देत नव्हतं म्हणून त्याच्यापासूनच खालीलप्रमाणे दुसरे नारळखवणं तयार केलं आणि किचनकट्ट्याला ड्रिलमशीनने भोक मारून बसवले. तेव्हापासून प्रॉब्लेम सुटला. आता शेजाऱ्यांना खोबऱ्याच्या वड्या करायच्या असतील तर नारळ खवून जातात व बदल्यात खोबऱ्याची वडी देतात.
ता. क. मी नारळ सोलायचे मशीन (मशीन म्हणता येणार नाही, जुगाड म्हणावे लागेल.) देखील तयार केलेले आहे. पण ते गावाकडे असल्यामुळे त्याचा फोटो देता येत नाही. नंतर पोस्टीन.![]()
shrushti14@gmail.com नी
shrushti14@gmail.com नी सांगितल्याप्रमाणे काल मीठ घालून पातळ पोहे भाजले चिवड्यासाठी. मस्त भाजले गेले.
साक्षीमी कशी आहेस पिल्लु काय
साक्षीमी
कशी आहेस पिल्लु काय म्हणते?
ते नारळ वर कोणी तरी सांगितल्या प्रमाणे बाई कडुन फोडुन करवंटी बाजुला काढुन घे मग टीव्ही बघत छोटे छोटे तुकडे कर अन मिक्सर मधुन वाटुन काढ
भिजवून वाटलेल्या उडिद डाळीचे
भिजवून वाटलेल्या उडिद डाळीचे काय काय करता येईल?
अर्ध्या किलोपेक्शा जास्त डाळ आहे.
वडे करता येतील. किंवा इडली
वडे करता येतील. किंवा इडली रवा मिक्स करून इडल्या.
उन असेल तर त्यात हिरव्या
उन असेल तर त्यात हिरव्या मिरच्या वाटून घालून, सांडगे घालता येतील.. कधीही तळून खाता येतात.
कुठलाही एकच पदार्थ केला तर
कुठलाही एकच पदार्थ केला तर भरपूर होईल आणि घरात खाणारे अडीच.
ऊन अज्जिबात नाहीये. आत्ता बाहेर पाऊसपण चालू झालाय. ओवनमधे वाळवता येतील का? काय सेटींग लागेल?
वडे खूप तेल पिताहेत. त्यासाठीच डाळ केली होती. काय चुकले असेल? की तेल पिऊ नये म्हणून काही घातले पाहीजे?
चिऊ, फ्रीजमधे वाळतील सांडगे.
चिऊ, फ्रीजमधे वाळतील सांडगे. मिरच्या, हिंग व मीठ एवढेच घालायचे. ट्रे मधे सांडगे घालून, ट्रे फ्रीजमधे ठेवायचा.
वड्याचे पिठ फेटून घेतात. अगदी थोड्या मिश्रणात, कोरडा मैदा किंवा तांदळाचे पिठ मिसळून एखादा वडा, ट्राय करुन बघता येईल.
idaliche pith fridgemadhye
idaliche pith fridgemadhye rahil. Tyach pithache uttapa, aape, idlya, idalimadhyehi vegavegale padarth karata yetil.
प्राची, इडलीची कल्पना छान
प्राची, इडलीची कल्पना छान आहे, पण त्यात कमीत कमी दुप्पट तान्दूळ भिजवून-वाटून मिसळावे लागतील. इथे इडली रवा मिळत नाही. आणि तेवढ्या पिठाचे इडली-डोसे-उत्तपे आठवडाभर खावे लागतील.
जवळ जवळ ३ लीटरचं भांडं भरलंय.
सांडगे जमतात का बघते, नाहीतर सरळ लहान पोर्शन करून फ्रिझरमधे ढकलणार.
म्हणजे डाळ जास्त आंबली आहे.
म्हणजे डाळ जास्त आंबली आहे.
म्हणजे डाळ जास्त आंबली आहे.
म्हणजे डाळ जास्त आंबली आहे.
>> तेल पिताहेत म्हणून का? मी रात्रभर डाळ भिजवली होती आणि सकाळी वाटल्यावर साधारण २ तासानी वडे चालू केले.
चिऊ, ते पीठ आता आधी फ्रीझमधे
चिऊ, ते पीठ आता आधी फ्रीझमधे ठेव.नाहीतर अजून आंबत जाईल आणि नंतर काहीपण करणे अशक्य होइल.
Pages