युक्ती सुचवा युक्ती सांगा- ३

Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41

स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.

नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गव्हांकुर ७ दिवसांचे झाले की वाटून किंवा मिक्सरात त्याचा रस काढायचा आणि अनोशा पोटी प्यायचा... मग पुन्हा नव्याने रोपं लावायची.

वेकाने लिंक दिलेला चिवडा ट्राइड अ‍ॅन्ड टेस्टेड आहे. फारच यम्मी लागतो. रेसिपी जिने लिहिली आहे, त्या नयनाने स्वतःच बनववुन आणलेले खाल्ले आहेत. गटगला आम्ही ज्या हॉटेलमधे बसलो होतो आणि तिथले जे काही अनंत प्रकार ऑर्डर केले होते, त्या सगळ्यापेक्षा भारी टेस्ट होती. फक्त ते गहु आहेत यावर विश्वास ठेवणं अवघड जात होते. एवढे हलके आणि क्रिस्प गहु कसे असु शकतील? मग सगळ्यांनी मिळुन त्याची परिक्षा केली. गहुच होते. पण दिसायला वेगळेच. Happy ( माझे सगळे फोटोज गहु वेचुन वेचुन खाताना आहेत. Happy )

पेरु करुन बघच ती रेसिपी.

नीधप, फोस्टर क्लर्क चे चांगले असतात.
भारतात त्यावर अ‍ॅगमार्क किंवा तत्सम मार्क असतो. तसेही आता घातक रंग वा इसेन्स, बाजारात कंपनीच्या नावाने येणार नाहीत. वेलची / केशर / जायफळ हे अर्थातच चांगले पर्याय आहेत. पण काही सुगंधासाठी इसेन्स वापरावा लागतो ( केवडा / गुलाब / लेमन / बदाम / बटरस्कॉच / व्हॅनिला / ऑरेंज )

घरी जरी वापरले नाहीत तरी बाहेरच्या तयार पदार्थात ते असतातच. परमिटेड फ्लेव्हर्स, फ्लेवर एनहान्सर वगैरे
नावाखाली ते येतात. अनेक औषधातही ते असतात.

पण जर फार वापर नसेल, तर घरात बाटली ठेवून उपयोग नसतो. अनेक दिवस पडून राहते,

काही जणांना ( म्हणजे मला हि) चहा / कॉफीच काय, पाणी पण सुगंधी लागते. वाळा आणून तो मडक्यात ठेवण्यापेक्षा, रसनाचे वाळा सरबत निम्मीच साखर वापरुन करुन, त्यातले थोडे सरबत पाण्याच्या बाटलीत
टाकले तर छान स्वाद येतो.

अश्विनीमामी यावर जास्त सविस्तर लिहू शकेल.. ( अ.मा................... हाजिर हो )

माधवी, कोणत्याही ग्रोसरी शॉप्स, मॉल्स किंवा बेकरीमधे मिळतं. मी 'Home Made' कंपनीचं वापरलं आहे. चांगलं होतं. दोराबजीमधे अजुनही ब्रँन्डस असावेत. दिसले तर सांगेन.

मला मोहोरी चढवून खारातली मिरची करायची आहे. मागल्या वेळेस झकास जमली होती..खाराचा वास घेतल्यानंतर नाक पॅरलाईज होईल अशी झणझण होती Happy पण ह्यावेळेस मोहोरी चढतच नाहीये. कोणी काही सुचवू शकेल का? मी लाल मोहोरी थोड्या पाण्यात घालून खूप वेळ मिक्सरवर वाटली पण्..अगदी साधास्सा मोहोरीचा दरवळ येतो आहे फक्त.

माझ्या शुभ्र पांढर्‍या नव्या पर्सला नव्या बांधणी ओढणीमुळे लाल रंग आला आहे. (पाऊस पडला नाही काही नाही. फक्त ज्या खांद्याला पर्स अडकवतात त्याच खांद्याला पर्स लटकवलेली असते ...मला ल़क्षात आले नाही. मी घरी आले तेव्हा हात व पर्स लालेलाल झाले होते. ड्रेस काळा असल्यामुळे लाल रंग दिसून येत नाहीये. बांधणीचे रंग कच्चे असतात त्यामुळे असा रंग लागतो असे मैत्रीणींकडून समजले) मी साबणाने पर्स खूप धुतली पण रंग पूर्ण जात नाहीये. काही उपाय आहे का?

सुमेधा, माझ्या पण ऑफव्हाईट बॅगला असा रंग लागला होता. तो काहीही करुन गेला नव्हता. ती बॅग अगदी जुनकट आणि विद्रुप दिसू लागली रंग लागल्याबरोबर.

खरंच यावर कुणाला उपाय माहित असेल तर सांगा.

रंग लागलेल्या भागातला एक छोटा भाग निवडून त्यावर हँड सॅनिटायझर घालून, खरखरीत कॉटनकापडानं पुसून काढा. (तिथला रंग निघाला, तर उरलेल्या भागावर प्रयोग.)

मृण्मयी थोडक्यात ऑल्कोहोलयुक्त सोल्यूशन वापरायचं का?
सुमेधा मग आपले वेट टिश्यूज असतात ना? त्यानेही प्रयत्न करून पहा.
सोल्यूशन मिळालं तर छानच होईल गं. Happy

वरच्या उपायांनी नाही निघत... Sad
माझ्याही पांढर्‍या पर्स ला लागलेला आहे. खुप प्रयत्न केले आहेत, इथे कपड्यांसाठी स्टेन रिमुव्हर मिळत त्याने खरतर वाटेल ते (हळदीचे, ग्रीसचे) डाग निघाले आहेत. ते पण ओतल पर्स वर पण नाही गेला रंग Sad Sad

कुठलही पर्फ्युम घेवून स्पे करून ठेवा थोडा वेळ डागावर मारून मग अलगद पुसून घ्या २-३ मिनीटात.

नेल पॉलिश रिमुव्हर कापसाच्या बोळ्यावर घेऊन थोड्या भागावर लावुन बघा (रंगासाठी... मोहरी चढण्यासाठी नोहे Wink )

घरात खूप रेझिन ब्रेड आहे. त्याचं (साध्या ब्रेडचा फोडणीचा करतो) तत्सम काही करता येईल का? चांगले कॉस्कोतून आणले ,फ्रिजात ढकलले अन हे सगळं साफ विसरून व्हीट ब्रेड आणून तो खाल्ला. मग याची आठवण आली. आता त्या दोन लोफांचे काय करावे? १५ दिवसांनी मी भारतात चालले आहे. तोवर रोज एक खाऊन संपणारही नाही व बोर होईल शिळा ब्रेड खाणे. प्लीज हेल्प!

पांढर्‍या पर्सवरच्या रंगाचा प्रश्न मी पण विचारणार होते. कॉटन इरकलचा केशरी रंग लागलाय माझ्या पर्सला. ज्या दुकानातून पर्स घेतली होती तिला विचारलं तर रंग निघणार नाही म्हणाली होती ती. Sad
लेकाच्या पांढर्‍या कॉटनच्या शर्ट्वर बर्फ का गोलाचे डाग पडलेत. ते निघतात का? पहिल्यांदाच घातल्यावर डाग पाडून घेतलेत.

हा स्वैपाकघराशी संबंधित युक्त्या आणि प्रश्नांसंबंधी आहे ना बाफ?

की बाई स्वैपाक करते म्हणून बायकांच्या ओढण्या आणि पर्स स्वैपाकघरातच? Wink

बस्के, रेझिन ब्रेड बटर पुडिंग कर किवा ब्रेड छोटे चौकोनी तुकडे करुन ओव्हन ट्रे वर पसर आणि टोस्ट कर (क्रुटॉन्स). थंड झाले की हवाबद डब्यात भरुन ठेव. असे टोस्ट केलेले तुकडे टिकतिलही भरपूर दिवस आणि चहा/कॉफी बरोबर किवा दुधात घालुन ब्रेफा म्हणून किवा नुसतेच खाता येतिल.

मोर्-आवळा करण्यासाठी आवळ्याच्या फोडी कश्या करायच्या? वाफवुन घेताना पाणी लागलेतर मोर्-आवळा टिकेल् का?

जयु, मी मोरावळयाची व आवळा सुपारी ची पाकृ.इथे लिहीली आहे.आवळे धुवुन,पुसुन फ्रीझर मधे २ दिवस ठेवावे. नंतर बाहेर काढुन ठेवावे. रूम टेम्परेचर ला आले कि ते आपोआप तडकतात व त्याच्या फोडी करायला सोपे जाते.

Pages