Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41
स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.
नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बाल्कनीला जाळी लावुन घेणे हा
बाल्कनीला जाळी लावुन घेणे हा एकच पर्याय आहे कबुतरांपासुन वाचायला... छोट्या छोट्या रोपट्यांचा तर जीवच घेतात चोच मारुन मारुन... कपडे वाळत घातले की त्यावर ओल्या मातीतले पाय घेऊन बसतात नाहीतर आपले विधी उरकुन घेतात... स्पेशली लाईट कलरच्या कपड्यांवर...
मागे एकदा किचनच्या खिडकीत कबुतरांनी अंडी घातली तेव्हापासुन पार पिलांना उडता येईपर्यंत कब्जा घेतला होता...
>>>काळेंच्या दुकाना शेजारी एक
>>>काळेंच्या दुकाना शेजारी एक दुकान आहे -अम्बर नाव आहे दुकानाचे.
पातळ पोह्यांचे दडपे पोहे, दही
पातळ पोह्यांचे दडपे पोहे, दही पोहे, दूध-साखर/गूळ पोहे, चिवडा हे प्रकार करता येतात. नुसतेच खमंग भाजून मस्त लागतात हे पोहे. तेल-तिखट-गोडा मसाला-कच्चे दाणे-कांदा घालून खाता येतात. मेतकूट-तिखट-मीठ-कांदा घालून पण हे पोहे मस्त लागतात. ते कटलेट, पॅटिस यांसारख्या प्रकारातही दडपता येतात.
स्वातीने लिहिलेली कोळाच्या
स्वातीने लिहिलेली कोळाच्या पोह्यांची रेस्पी पण आहे इथे - ते करता येतील
कोळाचे पोहे पण जनरली जाड्या
कोळाचे पोहे पण जनरली जाड्या पोह्यांचेच करतात ना?
आयकलें, मला ओन्ली कोकण मध्ये
आयकलें, मला ओन्ली कोकण मध्ये गव्हाचे मस्त पातळ पोहे मिळालेत. आता दाणे डाळे खोबरे एकत्र आले कि त्याचा चिवडा होईल कधितरी. नाहीतर दडपून हडप.
इथे मला दिनेशजींची ही पातळ
इथे मला दिनेशजींची ही पातळ पोह्याची रेसेपी मिळाली करुन बघा, माझ्या मैत्रिणीने केली होती. धन्यवाद दिनेशजी.
खुपदा आपल्याकडे पातळ पोहे असतात. त्याचे कांदेपोहे करता येत नाहीत, कराण ते भिजवले कि त्यांचा चुरा येतो अश्या पोह्यांचा एक प्रकार.
तुपाची किंवा तेलाची हिंग मोहरी घालुन फ़ोडणी करावी. त्यावर हळद, पोह्याच्या अदमासाने तिखट व मीठ घालुन कोरडे पोहे टाकावेत. अधुन मधुन परतत ते लाल व कुरकुरीत करुन घ्यावेत. मंद आचेवर झाकण न ठेवता परतावेत. बेसनाप्रमाणे सतत ढवळत रहावे लागत नाही.
हे ऊतरुन जरा निवु द्यावेत. त्यावर वर्तमानपत्र झाकुन ठेवावे, म्हणजे कुरकुरीत राहतात. खायला घेताना, त्यात बारिक कापलेला कांदा, हिरवी मिरची, ओले खोबरे व लिंबाचा रस घालुन खावेत. हवी तर थोडी साखर घालावी.
पोहे आधी भाजुन ठेवता येतात. हवाबंद डब्यात ठेवावेत.
टुनटुन, ही अगदी दडपे
टुनटुन,
मी माझ्या आईच्या पद्धतीच्या दडपे पोह्यांचा वरील एका पोस्ट मध्ये उल्लेख केला होता, ते हेच पोहे. फक्त मी हिरवी मिरची घलून करते. व हळद वगळते.
ही अगदी दडपे पोह्यांचीच कृती आहे.
पातळ पोहे कोरडे मावे. भाजुन
पातळ पोहे कोरडे मावे. भाजुन त्यात शेव घालुनही छान लागते. प्रचंड भुक लागली आहे ,काही करायचा कंटाळा आला तर माझे हेच खाणे असते. पाहीजे तर एखादी हि.मिरची बारीक चिरुन टाकावी.
दुसरा तिखट प्रकार... मावेत भाजलेल्या पोह्यात कच्चे तेल, लाल तिखट, साखर, मिठ घालुनही मस्त लागते.
कुणी चिकन/मटण याच्या तिखट रस्श्यात पातळ पोहे टाकुन खाल्लेत का? मस्त लागतात.
दुध्+पोहे, ओलानारळ+पोहे.... कितीतरी प्रकार होतात.
अरे मी शेवटची पोस्ट घाईत
अरे मी शेवटची पोस्ट घाईत वाचली. त्यामुळे मला दिनेशजींची ही रेसेपी लक्षात होती, तीच टाकली.
अर्थात दिनेशजींना पण त्यांच्या आईकडुन ही छान, कुरकुरीत कृती मिळाली असणार असे गृहीत धरते. खरच आईच्या हातची चव आपल्याला कधी जमणार?
नाही टुनटून,,ही माझीच रेसिपी.
नाही टुनटून,,ही माझीच रेसिपी. माझ्या आईचे स्पेशल प्रकार मला अजूनही जमत नाहीत !
हो दक्षिणा, तशीच मूळ्याच्या
हो दक्षिणा, तशीच मूळ्याच्या शेंगांची पण होते.
>>
दिनेशदा मुळ्याच्या शेंगाना 'डिंगर्या' म्हणतात. डिंगर्याच्या भाजीला एक प्रकार्ची मुळ्यासारखीच पुंगाट चव असते पण चांगलीच लागते ती...
गूळ पिवळा धमक अथवा पांढरट दिसण्यासाठी त्यात रसायने घालतात अक्षरशः बॉक्सेस उपडी करतात. त्यामुले गूळ आकर्षक दिसतो पण तो कमी गोड लागतो तसेच त्यात मीठही असते. सैंद्रीय गुळात रसायने कमी असतात. उरुळीकांचनच्या आश्रमात हा गूळ विकत मिळतो सद्या ५५ रु. किलोने. तो लालसर असतो. काही दुकानदार ठेवतात . त्याला खप कमी असल्याने तो परवडत नसल्याने किमती जास्त असतात बाकी त्यात अॅडिशन काही नसते किम्मत वाढायला...
पुंगट त्या शेंगा ताज्या
पुंगट
त्या शेंगा ताज्या किंवा सुकवलेल्या, नुसत्याही खायला चांगल्या लागतात. पण अनेक लोकांना मूळ्याचा वास देखील आवडत नाही !
पुर्वी कोल्हापूरात शेतकरी बाजारात उत्तम मिळायचा, आता शेतकरी बाजारच राहिला नाही.
मला मूळ्याच्या शेंगा भयंकर
मला मूळ्याच्या शेंगा भयंकर आवडतात. आमचे शेजारी त्या वाळवून त्यात मीठ तिखट भरायचे. बाकी तळणे बिळणे काही प्रकार नाही. फक्त छतावर वाळवूनच प्रचंड कुरकुरित व्हायच्या त्या.. एकदा खाऊन पाहिली.. नंतर त्या वाळायच्या आधीच संपू लागल्या आमच्याकडून.
डिंगर्या मस्त लागतात तळून.
डिंगर्या मस्त लागतात तळून. मसाला लावलेल्या.
अहाहा डिंगर्या.. दर रविवारी
अहाहा डिंगर्या.. दर रविवारी मंडईतून बाकी भाज्यांबरोबर डिंगर्या पण यायच्या घरी.
मग ताटाच्या बाहेर डाव्या बाजूला डिंगर्यांचा एक छोटा ढीग असायचा. एकिकडे जेवायचं एकिकडे डिंगर्या फस्त करायच्या.. डिंगर्यांच्या झळ्ळ गार चवीनंतर दही ठेवायचं जिभेवर.. स्वर्ग हो स्वर्ग!!
हा छोटा ढीग कधी ताज्या ओल्या शेंगांचा व्हायचा तर कधी त्याचे रूपांतर हरभर्याच्या गड्डीत व्हायचे.
नी वर्णनाने तोंपासु..
नी वर्णनाने तोंपासु..
ओल्या हरभर्यांचे काय करता
ओल्या हरभर्यांचे काय करता येईल? उसळ किंवा तत्सम नाश्त्याची डीश सोडून ?
नुसते खाणे.. ओल्या
नुसते खाणे..

ओल्या हरभर्यांचे इतर काहीही करू नये.
अगदीच हवे तर तिखट, मीठ, चाटमसाला भुरभुरून खावे.
ओल्या हरबर्यांची आमटी भन्नाट
ओल्या हरबर्यांची आमटी भन्नाट लागते. http://www.maayboli.com/node/31558 इथे आहे.
मध्यंतरी कुठेतरी भाताची डिश पण वाचली होती ओले हरभरे घातलेली. झालंच तर सिंडरेलाने लिहिलेली वांगं + ओला हरभरा भाजी पण ( http://www.maayboli.com/node/21385) आहे.
ओल्या हरभरे कढईत घालायचे.
ओल्या हरभरे कढईत घालायचे. स्टीलची वाटी, खलबत्ता किंवा फुलपात्र इ. तत्सम भांड्याने कढईत जरा चेचायचे. थोडे तेल सोडून खरपूस परतायचे. तिखट - मीठ - हळद - चाट मसाला टाकून गट्टम करायचे. ओल्या मटार दाण्यांचाही असा प्रकार छान लागतो. किंवा मग तेल न घालता नुसतेच काळसर होईस्तोवर कढईत भाजायचे. हुरडा निखार्यावर भाजतो तसे. आणि गरम गरम खायचे.
ओले हरभरे मिक्सर मध्ये भरड
ओले हरभरे मिक्सर मध्ये भरड वाटून थालीपीठात वगैरे पण ढकलता येतील.
निंबे अनुमोदन... त्यात कांदा
निंबे अनुमोदन...
त्यात कांदा जरा बारिक चिरून टाकला तर बहारच
आम्ही कचोरी बनवतो ओल्य
आम्ही कचोरी बनवतो ओल्य हरभर्याची.. गुजराती पद्धतीने.
आम्ही कचोरी बनवतो ओल्य
आम्ही कचोरी बनवतो ओल्य हरभर्याची.. गुजराती पद्धतीने.
>>>
रेसिपी मस्ट असतंय बघा!
अवांतरः खरच आईच्या हातची चव
अवांतरः
खरच आईच्या हातची चव आपल्याला कधी जमणार?
<<<
तुम्ही आई झालात, की तुमच्या हातची चव आपोआपच आईच्या हातची चव बनते.
बरीवाईटमध्यम, चव कशीही असली तरी त्यात माया भरपूर असते, म्हणून ती तुमच्या मुलांना आवडू लागते.
अन मग मोठी झाली की तुमची मुले नॉस्टाल्जिआने म्हणतात,
छे!, 'ईच्या हाता सारखी चव कशालाच नाही...
मस्तच. हरभरे आले का
मस्तच. हरभरे आले का मार्केटमधे? हरभर्यांची कोणतीही पाककृती करणं किंवा सोललेले हरभरे आणणं हा हरभर्यांचा अपमान समजते मी. गड्डीसकट हरभर आणुन तासन तास गप्पा मारत एकेक हरभरा सोलणं म्हणजेच मज्जानु लाइफ. काय सुख असतं. ( कॉलेजमधे थंडीत कोणता तरी ऊनाचा कोपरा, पायर्या, कट्टा शोधुन हरभरे सोलत तासंतास मारलेल्या गप्पांची आठवण येते आहे. )
हरभर्यांची कोणतीही पाककृती
हरभर्यांची कोणतीही पाककृती करणं किंवा सोललेले हरभरे आणणं हा हरभर्यांचा अपमान समजते मी. गड्डीसकट हरभर आणुन तासन तास गप्पा मारत एकेक हरभरा सोलणं म्हणजेच मज्जानु लाइफ. <<<
दे ट्टाळी!!
माझ्या आजोळी, गप्पा मारत
माझ्या आजोळी, गप्पा मारत अंगणात तसेच किंवा तशीच जुडी आगीवर भाजून, घाटे खातात. माझ्या कोकणी माम्या मात्र त्याला नाक मुरडतात. पोपटासारखे काय ओले हरभरे खाता, म्हणतात !
आज संध्याकाळी असलेल्या
आज संध्याकाळी असलेल्या पार्टीसाठी स्नॅक म्हणून स्प्राउट चाट कॅनपीजमध्ये घालून द्यायची असे ठरवले होते. आता बघितले तर माझ्याकडचे कॅनपीज मेलेले आहेत.
जवळच्या दुकानात कॅनपीज मिळणे जरा अवघड आहे. दुसरी काही युक्ती आहे का? स्प्राउटचाट अजून कशी सर्व करता येईल? घरी खाकरा आहे, पापड आहेत. त्यांचा वापर करता येईल का? केळ्याचे वेफर्सपण मिळतील जवळच.
Pages