युक्ती सुचवा युक्ती सांगा- ३

Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41

स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.

नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्याकडे काय करता येईल ?
>>>
प्लीज. विष्टेत अतिशय घाण जीव - जंतु असतात. राजस अगदी लहान होता (वर्षाचा पण नव्हता) तेव्हा त्याला स्कीनवर खूप पुरळ यायचे. नंतर त्यातून पस यायचा. हा सगळा संसर्ग कबूतरांच्या घाणीमुळे. यक्क्स्स्स! संपूर्ण घर पेस्ट कंट्रोल करावे लागले. त्यांच्या विष्ठेवर खूप घाणेरडे कीडे व जीव जंतू पोसतात. अंडी घालतान. नकोच नकोच ती कबूतरे! Sad

ओढणी सिंथेटीक - शिफॉन किंवा तत्सम असेल तर उपयोग नाही <<<
सिंथेटीक / शिफॉन ओढण्यांमध्ये आम्ही नेहमी सुकवतो. अजूनपर्यंत तरी कबूतरांचा प्रॉब्लेम नाही झाला. Happy

मी एकदा बेडरुमच्या खिडकीतुन घरात शिरलेल्या कबुतराला सगळी दारं बंद करुन कोंडुन बदडुन काढलं होतं. पण जिवंत मात्र सोडुन दिलं. कारण मला खात्री आहे कि त्याने बाहेर जावुन इतर कबुतरांकडे माझी चांगलीच बदनामी केली असेल. ते कबुतर सोडाच पण दुसर्‍या सगळ्याच त्या एरियातल्या कबुतरांनी आमच्या घराचा धसका घेतला असेल. कबुतर पाहिलं कि माझं पक्षीप्रेम अगदी आटुन जातं. प्रचंड राग आहे माझा त्या एका पक्ष्यावर. देवदयेने ( किंवा त्या मार खाल्लेल्या कबुच्या बदनामी मुळे Happy माझ्या नविन घरी टेरेसमधे एकही कबुतर येत नाही. मी टेरेसमधे चिमण्यांसाठी धान्य आणि पाण्याचे दोन डबे ठेवले आहेत, बरेच पक्षी येतात, पण अजुनतरी कबु पाहिले नाहीत. Happy

माझी पोस्ट युक्ती सुचवा धाग्यावरच्या गप्पात मोडत नाही. ही सुचवलेली युक्तीच आहे. Proud

कबुतराला सगळी दारं बंद करुन कोंडुन बदडुन काढलं होतं.>> Biggrin
ते कबुतर हातात कसं सापडलं बदडायला? बदडतानाचा व्हिडिओ करून युट्युबवर टाकला असता तर मस्त हीट्ट झाला असता Lol

मनिमाऊ, मस्त आयडीया..

मुंबईत माझ्यासारखे बरीच वर्षे राहिलेले लोक नक्की सांगतील, कबुतरांचे प्रमाण हे अलिकडेच वाढले आहे. पुर्वी दादरचा कबुतरखाना, बाबुलनाथ आणि गेटवे जवळचे ताज या ठिकाणीच जास्त दिसायची. उपनगरात किरकोळच.

धर्माची नावे घेण्यात अर्थ नाही, पण दोन धर्मांनी त्यांचे फार लाड केलेले आहेत, म्हणूनच ती सोकावलीत.
आता एखादा नैसर्गिक शत्रूच निर्माण झाला तरच.. कुत्रांना शिकार करायला शिकवायला पाहिजे, तीपण मुंबईत भरपूर आहेत.

जरा शनिवारी - रविवारी दुपारी लवंडावे की ह्यांचे गुटरगूम सुरू!

त्यांचे पण लवंडणेच चालु असते .....;)

मागच्या दक्षी (प्रश्न फेम Wink ) च्या ओट्सच्या प्रश्नावर तिला सांगायचं राहिलं की जाड पोह्यांसारखे दिसणारे ओट्स असतात नं (बहुतेक आधीच्या धाग्यावर लाजोने फोटो टाकला होता तेही चालतील) त्याचे सरळ आपण कांदेपोहे करतो तसे कांदेओट्स करून खा..एकदम यम्मी लागतात. माझी मुलं पण खातात. फक्त हे ओट्स तेल जरा जास्त पितात नाहीतर कोरडे होऊ शकतात. नाहीतरी ती त्यात सुकामेवा घालून जाड व्हायचं म्हणतेच आहे तर तेल खाऊन सुटू देत जरा Wink

हा एक लेख दक्षीला पाठवला होता तो पण चांगला आहे....

:होपफुली कबुतरांच्या तावडीतून सुटका झाली असेल असा विचार करणारी बाहुली:

निंबुडा >>>कसले शांततेचं प्रतिक. >>> खरंच. जरा शनिवारी - रविवारी दुपारी लवंडावे की ह्यांचे गुटरगूम सुरू! <<< Biggrin मी पण तुमच्या गटात. मलाही फार्फार राग येतो त्यांचा ! भयानक घाण करतात, त्यांचा आवाज, पंखांचे फडफड... सारेच इरिटेटिंग

कबुतराला सगळी दारं बंद करुन कोंडुन बदडुन काढलं होतं.>> हे माझ्या साबांनीही माटुंग्यच्या घरी केलं होतं. मी संध्याकाळी ऑफिसमधून आले तेव्हा दार बंद आणि आतून थाड थाड आवाज. मी घाबरुन आई आई अश्या हाका मारल्या तेव्हा रणरागिणी दार उघडत्या झाल्या. हातात त्रिशूळाऐवजी धुण्याची काठी होती आणि लालबुंद घामाघूम झालेला चेहरा. नशिब त्या आवेशात चुकून ती काठी माझ्या डोक्यात नाही घातलनी. ते कबूतर मेंगळटलं होतं मार खाऊन. दार उघडताच ते पळून गेलं. कबुतराला एवढं मारलेलं पाहून मी मनोमन त्यांच्यावर भडकले होते. बर्फाची लादी डोक्यावर ठेवायची सवय उपयोगी ठरली. नंतर मला त्यांचीही बाजू लक्षात आली. त्यांना दिवसभर गॅलरीचे कठडे धुवत बसावे लागत :-P, घरातला घुटर्घुम आवाज सहन करावा लागे. मी काय ऑफिसात आरामात बसलेली असे हो! माझं काय जातंय कबुतराची बाजू घ्यायला Proud

नंतर युक्ती म्हणून आम्ही जिथे कबुतरे रहायची त्या गॅलरीच्या भागाला प्लायवूड ठोकून घेतले आणि कबुतरांचा त्रास बंद झाला.

आमच्या ईथे तर किती कबुतरांच्या पिढ्या राहतायत.. जरा ़कुठे खिड्की उघड्ली की आले! जरा फड्फड एकु आले ़की असेल तिथुन पळा न घालवा बाहेर Angry
आधीच्या फ्लॅट मधे पण एका कबुतर जोड्प्याला आत येवु दिलं नाही तर बदला घेतला खिड्की घाण करुन..काहीबाही आणुन टाकायचे तिथे .. नकोच नकोच ती कबूतरे!

बाल्कनी, खिडक्यांसाठी कबूतर प्रवेश प्रतिबंधक जाळ्या बसवून घेता येतात. रबरी जाळ्याही मिळतात. खर्च किरकोळ आहे. त्यांमुळे प्रकाश अडत नाही, पण कबुतरांना शिरकाव करायला मज्जाव होतो. पुण्यात बोहरी आळीत, रविवार पेठेत मिळतात अशा जाळ्या. आमच्या बाल्कनीला सहा - सात महिन्यांपूर्वी या जाळ्या बसवून घेतल्यावर कबुतरांचा त्रास बंद झाला.

बापरे, एवढी मोठी कबुतर चर्चा. हे पारवे वात आणतात हे मात्र खरेच Happy
आमच्या कॉलेजमधल्या मॅडमचा एक किस्सा. त्या दार उघडून घरात शिरल्या आणि आत गेल्यावर त्यांच्या लक्षात आले की घरात दोन कबुतरं शिरली आहेत. ह्यांची चाहूल लागल्यावर फडफड करत उडू लागली. नादान परिंदे ! Wink त्या इतक्या घाबरल्या की डायनिंग टेबलाच्या खालीच जाऊन बसल्या. बहुतेक पर्स खांद्याला होती आणि त्यात मोबाईल. मग भाच्याला फोन केला. त्याच्याकडच्या स्पेअर चावीने दार उघडून तो घरात आला आणि कबुतरं हुसकावली तेव्हा मॅडम टेबलाखालून बाहेर आल्या Proud

मनीमाऊ, तुझा आयडी पाहुनही कबुतरं येत नसतील Wink
बदडून काढले >> Rofl आता आत आलं कधी तर मी पण करणार. Wink
मी बाहेर असताना उंच इमारतींवर व्ही शेप मधे बोटभर उंचीच्या तारा जवळ जवळ लावलेल्या पाहिल्या आहेत. ( रेसिडेन्शीयल इमारतींना नाही. ) त्या तशा इथे लावुन घेणार होते. पण नंतर लक्षात आले की फायरब्रिगेड वगैरे रेस्क्युसाठी यावे लागले तर ते सेफ नाही.

बापरे!!! कबुतर चर्चा फारच रंगलिये इथे... Lol

आमच्या मुंबईच्या घरी देखिल कबुतरांचा सुळसुळाट आहे...बेडरूमच्याबाहेर एसी युनीट्वर बसुन कर्कश्श आवाज आणि घाण ... आमच्या वरच्या मजल्यावर एक गुजराथी आंटी रहातात त्यांनी या कबुतरांना जाम माजवुन ठेवलयं... सकाळी ७.३० वाजता कबुतरांचा ब्रेकफास्ट असतो... शेव गाठ्यांचा... आता या आंटी त्या गाठ्या टाकतात त्या आमच्या बेडरूमच्या खिडकीवर लावलेल्या छतावर... आम्ही सुट्टी म्हणुन जरा आरामात झोपावं म्हंटलं तर ही कबुतरांची फौज ब्रेफा खायला... आधी छतावर गाठ्या पडल्याचा टपक टपक आवाज आणि मग कबुतरांची धाड आली की त्याचा थाड थाड आवाज.. गुटर्र गुटर्र, पंखांची फडफड... भयाण इरिटेट होतं अगदी Sad

मग लंच पण असते आणि दुपारचा नाश्ता पण यात शेव गाठ्या, पुरी, फाफडा, शेंगदाणे, चुरमुरे, बिस्किटांचे तुकडे ......सब कुछ कबुतरों के लिये खास....

माझ्या साबांनी कित्ती वेळा त्या आंटींना सांगितलय की तुम्ही आमच्या छतावर अन्न टाकु नका.. पण ऐकतच नाहित आणि तसे आमचे चांगले घरगुती संबंध आहेत त्यामुळे साबा जास्त ताणतही नाहित...आणि ती बेडरूम एरवी आम्ही नसताना वर्षातले १०-११ महिने जास्त वापरातही नसते... त्यामुळे.. चालु आहे कबुतर'खाना'...

कबुतरे खरोखर वात् आणतात. आमच्या बेडरुमचा एसी बिघडवुन ठेवला ४ दिवसात! आता मजबुत ़जाळी बसवुन घेतलीय.

बाथरूमच्या टाईल्स चकचकित करण्याचा जालिम उपाय हवाय मला. पझेशन घेतलं तेव्हा त्या खराब होत्या थोड्या.. स्वच्छ करून देऊ असे वायदे, हे वायदेच राहिलेत. आता मलाच ते मनावर घेऊन करावं लागेल. वापरायचं पाणि हे ६०-४० बोरिंग आणि कॉर्पोरेशन असं येतं. उपाय सांगा प्लिज. बाथरून घासून सुद्धा न घासल्यासारखंच दिसतं. Sad Uhoh

दक्षे, माझ्याकडेही सेम प्रॉब्लेम होतो बोरिंगच्या पाण्यामुळे. बाथरुम/ टॉयलेट साफ करायला अ‍ॅसिड मिळतं ते एकदा वापरुन बघ. बर्‍याच साफ होतात टाईल्स. माझ्याकडे तर सिमेंट जसंच्या तसंच होतं फ्लोरिंग आणि टाईल्सवर, तसंच टॉयलेट पॉटमध्येही. खुप घाण दिसायचं ते. २-३ वेळा अ‍ॅसिड वापरलं. सगळं चकाचक. अ‍ॅसिड वापरताना एक काळजी घे. अ‍ॅसिड घातलंस की दरवाजे वगैरे उघडे ठेवुनच साफ कर. नाकातोंडाला फडकं बांध. अ‍ॅसिडचा वास नाकात जातो भयानक.

तर, आता माझं रडगाणं. काल संध्याकाळी नवर्‍याला हुक्की आली कांदेपोहे खायची. नेहमीप्रमाणे पोहे भिजत घालुन कांदा वगैरे चिरुन घेतला. फोडणीला पोहे घालताना हा गिच्च गोळा. तो गोळा फिरेनाच कढईत.
मी जास्त शहाणपणा करुन महिन्याचं सामान भरताना 'पोहे' असं लिहीलेलं चांगलं अर्धा किलो पातळ पोह्यांचं पॅकेट आणलंय. त्याचे आता कांदेपोहे करणं अशक्यच आहे. पोहे न भिजवता काही करण्यासारखं आहे का सुटसुटीत?

योडे कोणत्याही ब्रँडचं अ‍ॅसिड की असंच लोकल मेड, जे बाटलीत मिळतं ते.. (पिवळं) Uhoh

पातळ पोहे भाजून त्याचा चिवडा होऊ शकेल, कांदेपोहे अजिबात करू नकोस. किंवा भिजवून त्याची थालपिठं वगैरे करू शकशील. पण चिवडाच परवडेल करायला. Happy

योडी, अगं आपण नेहमी करतो तसे कांदे पोहे पण करता येती. असं कर पोहे भिजवू नकोस. नेहमी प्रमाणे फोडणी, त्यात कांदा वगैरे टाक अन कोरडेच पांतळ पोहे टाक त्यात. चांगलं हलवून थोडं पाणी शिंपड मग पुन्हा हलवून झाकण ठेव. त्यावर पाणी ठेव. एक वाफ काढ. नेहमीपेक्षा थोडे जास्त कुरकुरीत, पण चव नेहमी सारखीच. वरतून ओलं खोबरं वाईच जास्त घाल Happy

असंच लोकल मेड, जे बाटलीत मिळतं ते.. (पिवळं)
>>
दक्षे, लोकल वालं. किराणा सामानाच्या दुकानात मिळेल.

वीकेंडला प्रयोग होतील आता पोह्यांवर.

दक्षिणा, तुळशीबागेजवळ काळेंच्या दुकाना शेजारी एक दुकान आहे (नाव आठवत नाही आता) त्यांच्याकडे खुप प्रकारची अ‍ॅसिड्स वैगरे मिळतात. त्यांना तुझ्याईथे कसले डाग आहेत ते सांगुन त्यासाठी काय वापरायचे ते त्यांनाच विचारुन घेऊन ये. मी पुण्यात असताना तेथुन आणत होते (अ‍ॅसिड, फिनेल ई.) एकदम स्वच्छ निघतात बाथरुम वैगरे.

जनरली पातळ पोह्याचे कांदेपोहे करत नाहीत योडे.
पातळ पोह्याचे दडपे पोहे करतात.
>>>
करेक्ट! काही जण पातळ पोहे भिजवून कांदा व टोमॅटो घालून व हळदीची फोडणी घालून दडपे पोहे करतात/ ह्यात ओला नारळ घालत नाहीत. (ही माझ्या साबांची पद्धत.) काही जणांकडे पातळ पोहे भाजऊन , कुरकुरीत करून चुरतात व बिना हळदीची हिंग व मिरचीची फोडणी घालून करतात. कांदा बारीक चिरून घालतात. व ओला नारळ वरून घालून मस्त हाताने चुरडून पाट्याखाली किंवा पातेल्यात घालून व वरून वाडग्याने गच्च झाकून ठेवतात (१०-१५ मिनिटे). (ही माझ्या आईची पद्धत.)
ह्या दुसर्‍या पद्धतीचे दडपे पोहे मला जाम आवडतात.

बाथरूमच्या टाईल्स चकचकित करण्याचा जालिम उपाय हवाय मला>>>
दक्षे, मि. क्लिन अशा नावाचे एक सोलूशन मिळते (केशरी कलरची बाटली) किंवा बँग (निळ्या कलरची बाटली.) मला चांगला अनुभव आहे. ओटा, बाथरूम, नळ, गॅसची शेगडी खरच चकचकीत निघतात.

Pages