Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41
स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.
नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे दही वाटतंय ना>>>> अरे देवा
हे दही वाटतंय ना>>>> अरे देवा!
नाचणीच्या पिठाचा उपमा नाही पण
नाचणीच्या पिठाचा उपमा नाही पण पण त्याची ताकातली उकड केली आहे जिरं लसूण कढीलिंब वैगेरे घालून. मला आवडली पण घरात बाकीच्या कोणी रंग बघूनच हात ही लावला नव्हता.
मनीमोहर इथे रेसिपीची लिंक आहे
मनीमोहर इथे रेसिपीची लिंक आहे का?
हे दही वाटतंय ना>>>> अरे देवा
हे दही वाटतंय ना>>>> अरे देवा!
मनीमोहर इथे रेसिपीची लिंक आहे
मनीमोहर इथे रेसिपीची लिंक आहे का? लिंक अशी नाहीये पण सांगते मी कशी करते ते.
हिरव्या मिरच्या बारीक कापून,, थोडं आलं ( किसलेलं ), लसूण ठेचलेला, कढीपत्ता हे तेलात जिरं, हिंग आणि अगदी थोडी हळद घालून केलेल्या फोडणीत परतून घ्यायचं. अर्धी वाटी नाचणीच पीठ दीड वाटी आंबट ताकात कालवून घ्यायचं त्यात मीठ घालायचं आणि मग त्या फोडणीत घालायचं. जरा ढवळून गॅस बारीक करून वाफा काढायच्या . पीठ शिजल की रंग बदलतो. मला सैलसर आवडते म्हणून मी पाणी जास्त घालते. अंदाजाने पाणी घातलं वरून तरी चालत. शिजली की वरून कच्चं तेल आणि कोथिंबीर घालायची . आंब्याच्या लोणच्या बरोबर मस्त लागते. गरम गरमच छान लागते . गार नाही चांगली लागत त्यामुळे डब्यात बिग नो.
नाचणी पीठाची कढी छान होते. मी
नाचणी पीठाची कढी छान होते. मी पोस्ट नॅटल मधे प्यायले आहे.
बेसना ऐवजी नाचणी लावायची दह्याला.
मला तर कुठल्या पेशंटच्या स्कीन डिसिजचा फोटो टाकला चुकून वाटलं.... Rofl>>
जाड पीठ असेल तर उपमा होईल.
कामां , थालीपीठची आयडीया आवडली. माझा अंदाजही दहीच
जाड पीठ असेल तर उपमा होईल. ममो म्हणते तशी उकड मी पण करते. पीठ खपवायचंय का ? दोसे खूप छान कुकुरीत होतात नाचणी पीठाचे हल्ली मी तांदूळाचे करतच नाही . १ :१:३ (चमचा मेथी:१वाटी उ डाळ: ३ वाट्या ना पीठ) नोंदवून ठेवते....
वा मंजू करून बघीन नाचणीचे
वा मंजू करून बघीन नाचणीचे डोसे बरं झालं इथे लिहिलंस ते.
नाचणी पिठाचे डोसे ची डिटेल
नाचणी पिठाचे डोसे ची डिटेल रेसिपी मिळेल का ? प्रमाण दिले आहे तुम्ही . डाळ किती वेळ भिजवायची? त्यात पीठ कधी घालायचे ? अनायसे पीठ आहे घरात . करून बघेन
नाचणी डोसा मी या रेसिपीने
नाचणी डोसा मी या रेसिपीने करते.
https://youtu.be/yxUBbslZ8UY
नाचणीची धिरडीhttps://www
नाचणीची धिरडी
https://www.maayboli.com/node/80450
मस्त आहे थालीपीठ. आधी मी पपई
मस्त आहे थालीपीठ. आधी मी पपई शोधत होते, नंतर नीट बघितलं. वर लोण्याचा गोळा भारी.
मी पण मंजूताईंनी दिले आहे ते
मी पण मंजूताईंनी दिले आहे ते प्रमाण वापरुन नाचणीचे डोसे/इडल्या/उत्तपे करते.
१/३ कप उडदाची डाळ आणि पाव चमचा मेथ्या ५-६ तास भिजवून वाटून घ्यायचे. १ कप नाचणीचे पीठ जरा पाणी घालून भज्यांच्या पिठापेक्षा थोडे जाड भिजवून त्यात वाटलेली डाळ घालून वायर विस्कने फेटत एकजीव करुन घ्यायचे. फेटताना डोसे/इडली/उत्तपे जे काही करणार त्याच्या आवश्यकतेनुसार पाणी घालायचे. हे पीठ उबदार जागी ८-१२ तास ठेवायचे. आमच्याकडे थंडीत इडलीसाठी पीठ १५-१६ तास ठेवावे लागते. या प्रमाणात दोघांचे एक वेळचे जेवण होते. इडल्या छान फ्रीज होतात त्यामुळे मी नेहमी डबल बॅच करते.
ममो, नाचणीच्या उकडीच्या
ममो, नाचणीच्या उकडीच्या पाकृसाठी धन्यवाद!
दोन हजाराच्या वर झाले
दोन हजाराच्या वर झाले प्रतिसाद इथे. हा नवा धागा
https://www.maayboli.com/node/80670 - इथे विचारा आणि उत्तरे द्या यापुढे
Pages