युक्ती सुचवा युक्ती सांगा- ३

Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41

स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.

नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कपड्यांच्या नायलॉन ब्रशने घासा धुताना. किवा पाण्यात २ तास बुडवून ठेवा. माती निघून येईल. पण प्लॅस्टिकने मातीचा रंग घेतला असेल तर पुर्ववत होणे कठीण आहे.

हिरवे मुग भिजवुन मोड आणण्यासाठी मस्लीन बॅगमध्ये बांधुन ड्रॉवरमध्ये ठेवले आणि तिथेच विसरले. अलमोस्ट अडीच दिवस. आता त्याला लांबच लांब मोड आले आहेत. नवऱ्याचं म्हणणं की ते खाण्यास अयोग्य आहेत, सरळ पक्षांना टाकावेत. Sad मला वाटतं की मोडाने काय होणार आहे, सरळ डोसे करून खाऊन सम्पवावे.

लांब मोड आलेली कडधान्य खाणं अयोग्य /अपायकारक असतं का? प्लिज सांगा की शिजवु की सोडुन देऊ?

किती लांब आहेत?
आमचे असे एक दोन वेळा झालेय. बारीक करुन भाजणी थालिपीठात गेले. जर काही वास येत नसेल, हाताला टेक्सचर बुळबुळीत चिकट लागत नसेल तर नक्की वापरावेत.

जर काही वास येत नसेल, हाताला टेक्सचर बुळबुळीत चिकट लागत नसेल तर नक्की वापरावेत. >+१
ते बोटभर लांब असलेले मोड इथे फार्मर्स मार्केत मधे विकायला असतात. मी नूडल्स मधे घालते.

नको मीरा, अजीबात घेऊ नकोस. लांब मोड असलेल्या कडधान्याचे जीवन संपते, ते खाण्यायोग्य नसतात. माझ्या अ‍ॅलोपॅथीच्या डॉ ने सांगीतले आहे, त्या अ‍ॅलोपॅथीच्या असल्या तरी बाकी आयुर्वेद, वनस्पती शास्त्र, डाएट फुड इत्यादी मध्ये सुद्धा त्यांचा अभ्यास आहे.

किती लांब आहेत? >>>>> एक पेर तरी आहेतच. वास नाही, बुळबुळीत तर अजिबात नाहीत. चव अगदी नेहमीसारखी फ्रेश आहे. (पाण्यात नव्हते ना, कापडात होते त्यामुळे ताजे राहिले आहेत)

हो सोनाली, कुकरी शोजमध्ये असे लांबलचक मोड आलेली कडधान्य नेहमी दिसतात. हॉटेलमध्ये सलाड काउंटरवर पण पाहिली आहेत.

रश्मी, हेच माझ्या नवऱ्याचं पण म्हणणं आहे. पण पाव किलोपेक्षा जास्त मुग टाकुन द्यायला नको वाटतं आहे. Happy

प्लिज सांगा की शिजवु की सोडुन देऊ? >>> सोडून नका देऊ. इथे तसे नुसते मोड सॅलडमधे, स्टर फ्राय मधे वगैरे पाहिले आहेत. रादर बर्‍याच चायनीज पदार्थांमधे घालतात ते. तसं काहीतरी ट्राय करून पहा. कदाचित खिचडीत पण चांगले लागतील.

भरत, आभारी आहे.
साधनाताई, नाही तर, अजिबात कडु लागत नाहीयेत. चव अगदी नेहमीसारखी ताजी आणि चविष्ट आहे.
rmd, इथलं बहुमत आणि मला सोयीस्कर म्हणुनही Wink मी ते मुग वापरणार आहे.
सीमंतिनी, काकु क्युट आहेत आणि त्यांच्या रेसिपीज पण आवडल्या. धन्यवाद !

पनीर पराठे कोणी केले / आजमावले आहेत का? माझे पनीर पराठे खूप कोरडे झाले मागच्या आठवड्यात. मी पनीर कुस्करुन मळुन त्यात बारीक चिरलेली हिरवी मिर्ची, कोथिंबीर, मीठ व थोडा चाट मसाला घातला. पराठ्याचे कव्हर मात्र कणकेचेच होते, त्यात मैदा घातला नव्हता त्यामुळे सारण बाहेर येत होते. घरचे म्हणाले की बरे लागतायत. पण ते बटाटा किंवा इतर सारण भरुन करतो तसे खमंग झाले नाहीत. त्यात काय घालावे?

नेट वर एका कृतीत मागे पनीर कणकेतच मिक्स करुन पराठे करावे अशी कृती होती.

मी पनीर आणि बटाटा निम्मा निम्मा घेते पराठा करताना. ते छान मऊ होतात. तसं करून पहा. नुसत्या पनीरचे पराठे मी कधी केले नाहीत.

ओके वावे, धन्यवाद. घरात नेहेमीच बटाटा आणी मेथी, पालकाचे होतात म्हणून नुसत्या पनीरचे केले होते. पुढच्या वेळेस बटाटा घालेन.

आम्ही पनीर चे करतो, ते कोरडे होत नाहीत. पण हे मलई पनीर असते, त्यामुळे त्यात पाण्याचा अवशेष थोडा असतोच.
ब्रँडप्रमाणेही करायची पद्धत बदलून कोरडेपणात कमी जास्त असते. आयडीचा खूप मऊ ओलसर आणि महाग, अमूल चा थोडा कोरडा पण अगदी परवडणारा, गोकुळ चा मधला, गोवर्धन चा कोरडा असे काही.
पेशन्स आणि फॅटेसेवनेच्छा असल्यास मस्त बारीक कांदा टोमेटोवर भुर्जी सारखा परतून त्याचे पराठा सारण करता येईल. मग कोरडा नाही होणार.

ओके, थॅन्क्स अनू. फॅट चा विचार नाही करत एवढा, कारण धावपळीत लक्षात राहत नाही इतके. मलई पनीर आणुन बघते.

रश्मी, पनीर किसून घ्यायचं म्हणजे एकसारखं सारण होतं. मी अर्धा किंवा एक छोटा कांदा बारीक चिरून हळद-हिंगाच्या फोडणीत परतून त्यात किसलेलं पनीर हलक्या हातानं मिक्स करते. कांद्यामुळे अजिबातच कोरडे होत नाहीत. पराठ्याची कणिक जरा सैलसरच मळायची.

पनीर कुस्करुन मळुन त्यात बारीक चिरलेली हिरवी मिर्ची, कोथिंबीर, मीठ व पनीर कुस्करुन मळुन .... मीही असेच पराठे करते.चाट मसाला नाही घालत.कणकेचेच करते,पण सारण बाहेर येत नाही.वरून तेल लावल्यामुळे असेल किंवा गरमगरम खाल्ल्यामुळे असेल,कोरडे वाटले नाहीत.
मात्र आलू पराठे जसे मस्त लागतात तसे हे लागत नाही हे खरे.पण पनीर आवडीचा पदार्थ आहे.

पनीर मिक्सरला नीट एकजीव करून घ्यायचं. कमी तेलावर बारीक चिरलेला कांदा, आमचूर पूड, गरम मसाला, धने-जिरेपूड (ऐच्छिक), बारीक चिरून हिरव्या मिरच्या हे सगळं नीट परतून घ्यायचं. पनीर घालून मिसळून घ्यायचं. कोथिंबीर घालायची. पनीरचे फॅट्स असल्यामुळे तेल कमीच हवं. पराठा लाटताना तांदळाच्या पिठीवर लाटायचा.

पनिर बारिक किसणिने किसुन घ्यायच त्यात एक चमचा भर फ्रेश क्रिम्,थोडि कसुरी मेथि, बारिक चिरलेली हिरवी मिरची किवा तिखट्,चाट मसाला, थोडी हळद्,मिठ,कोथिबिर अस सगळ मिसळून घ्यायच या सगळ्या साहित्याच्या साधारण दिडपट कणीक मिसळुन मळून घ्यायच, हव तर थोड थोड पाणी घालायच, गोळा जमला की त्याला १-२ टेबलस्पुन तेल लावुन चान्गला मळुन घ्यायचा, तुकतुकित दिसायला हवा. थोडावेळ झाकुन ठेवायचा आणी लाटताना मैदा लावुन मध्यम आचेवर त्रिकोणी घडी घालुन लाटा घाडित आवडीप्रमाने तेल किवा तुप आणी भाजताना तुप लावल की मस्त चव येते.
फ्रेश क्रिम नसेल तर दही वापरा.

थॅन्क्स सिंडरेला, देवकी, प्रज्ञा आणी प्राजक्ता. मला कांद्याविषयी शंका होती की पराठा भाजला तरी कांदा आतुन भाजला जाईल की कचरट राहील. पण आता कांदा घालुन एक पद्धत व प्राजक्ताच्या पद्धतीने एक असे दोन्ही करुन बघते. छोल्या करता कसूरी मेथी आणली, पण ती वापरली गेलीच नाही. या निमीत्ताने कामात येईल.

मी पनीर किसून त्यात कांदा आणि कोथिंबीर खूप खूप खूप बारीक चिरून घालते. आले लसुण पण किसून घालते. हिरवी मिरची आणि थोडा गरम मसाला. पराठे मऊ होतात आणि कांदा कच्चा नाही लागत.

चकली ब्लॉग वरच्या कृतीने करून बघा. मस्त होतात. तिथे पीठ कसे असावे हे सुद्धा सांगितले आहे. तंतोतंत प्रमाण वापरा.

आवळे उकडून करतात ते लोणचं केलंय. फ्रिजमधे ठेवलं. ते बाहेर टिकतं का? फ्रिजमधे किती टिकेल?

Pages