युक्ती सुचवा युक्ती सांगा- ३

Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41

स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.

नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद Happy ऑफिसमध्ये प्री-दिवाली स्नॅक्स म्हणून खपवले ते सगळे वेफर्स.

आमच्या टीमला sandwich बनवायचं आहे.मग मला कोणते variations करता येतील.४० लोकांसाठी करायचे आहेत.आम्हाला कोणती तयारी करावी लागेल.

हा आमच्या टीमच्या इज्जत चा सवाल आहे त्यामुळे जरा हटके व्हायला हव, म्हणजे जास्त लोकांनी ते घ्यायला हव...

कस करता येईल , कोणी सांगू शकेल का ?

पल्लवी
वेगवेगळ्या प्रकारच्या पॅटीज मनवून सँडविच मध्ये घालू शकतेस. फ्रुटस, चॉकोलेट वापरून गोड सँडाविचेस करू शकतेस. ग्रिलिंग ही करू शकतेस. पुदिना चटणी, लसूण चटणी, चक्क बटाटा भाजी ही वापरू शकतेस. प्युअर व्हेजिटेब्ल्स वापरून.. कच्च्या, थोड्या शिजवलेल्या...

पल्लवी मिंड,
ब्रेडचे तीन स्लाईस घ्यायचे.एका स्लाईसवर पुदिना चटणी लावायची.त्यावर टोमॅटो ,काकडीच्या चकत्या ठेवायच्या.
त्यावर अजून एक स्लाईस बटर आणि केचप लावून ठेवायचा.त्यावर एक आलू टिक्की आणि कांद्याच्या चकत्या ठेवायच्या.त्यावर तिसरा स्लाईस चिंगू चटणी(चिंच्+गूळ्+खजूर) लावून ठेवायचा.आता हे सगळे प्रकरण तिरके कापायचे.दिसायला आणि चवीला एकदम भारी सँन्विच तयार!

Happy

aaNi banded chaplela lavayachi...chukun payala lavshil nahitar Happy

Happy

चप्पलला नवीन असताना थोडे खोबरेल तेल लावून ठेवावे. चप्पल थोडी नरम पडते. मी स्व:त असे करते. नाही चावत चप्पल. जमल्यास ट्राय करून बघ.

>>>स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ. >>
असं लिहिलय ना वरती. जनरली मी सांगत नाही. कारण कधी कधी ते ओघात लिहिल जात.
पण स्वयंपाक घराच्या बाफवर चपलांची चर्चा जरा अगदीच "कसतरी" वाटलं , म्हणुन लिहिलं.
उपाय लिहिणार्‍यानी तरी लिहू नका.

सीमा, पण त्या स्वयंपाकघरात चपला/शूज घालत असतील. Proud
जोक्स अपार्ट, शोनूनेही सुचवला होता दुसरा बाफ खरंतर.

माझ्या कोरड्या खोबर्‍याच्या करंज्या मऊ पडल्यात Sad काही उपाय करता येईल का ?
इज्जत का सवाल आहे. मदत करा लिप्ज

नंदिनी तो शेवटचा हक्काचा उपाय आहेच Wink
आरती करून बघते. माझ्याकडे ओव्हन नाहीये. शेजारणी कडे घेऊन जावं लागेल. म्हणजे पुन्हा इज्जत का सवाल आहेच !

मी एक मँगो पल्पचा डबा आणलाय, त्याला पत्र्याचं झाकण आहे . एकदा उघडलं की पुन्हा लागणार नाही. तर हा पल्प कसा स्टोअर करु? चांगला राहिल का एकदा उघडल्यावर? त्या डब्यावर उघडल्यानंतर कसे स्टोअर करा वगैरे काही लिहिले नाही आहे आणि एकदा वापरून संपण्यासारखा नाही. एअर टाईट कंटेनरमधे ठेवावा का?

त्या पत्र्याच्या डब्यातून काढून एअर टाईट कंटेनर मध्ये घालून फ्रिज मध्ये ठेवला तर राहील चांगला. मी एकदा पल्पचा डबा तसाच फ्रिजमध्ये ठेवल्यावर आलेलं शहाणपण. Happy

ओके थॅन्कस बस्के Happy
बर्‍याच दिवसापासून वापराय्चा आहे पल्प पण कळेना की एकदाच वापरून संपवायचा की काय. बघते.

शुगोल Happy

माधवी. आंब्याचा पल्प (विकत आणलेला किंवा घरी केलेला) अगदी छान फ्रीज होतो. छोट्या डब्यांमध्ये किंवा बॅग मध्ये फ्रीज करा. म्हणजे एका रेसीपीला एका वेळेला पुरेल असा. एकदा थॉ केल्यावर परत वापरु नका. साधारण सहा महिने व्यवस्थित फ्रीज होतो.

आरती करून बघते. माझ्याकडे ओव्हन नाहीये. <<
आरती करुन कुठे करंज्या खुसखुशीत होतात का ? आता आपले ते हे ( बुप्रा वाले) येतील आणि तुम्ही त्या 'त्या (कुडमुड्या)' गटातल्या का असे विचारतील Lol

पल्प त्याच डब्यात राहिला तर तो (तो म्हणजे पल्पच, डबा पडला तरी फरक पडत नाही) काळा पडतो. तेव्हा त्यातून काढाच.

Lol

Happy

Pages