Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41
स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.
नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद. दोन-तिन आठवडे टिकली
धन्यवाद.
दोन-तिन आठवडे टिकली तरी पुरे.
शिजवण्यापेक्षा नुसती मोड आणून फ्रीझ करणं सोप्पंय. कोरडी करायची म्हणजे पेपर टॉवेल वर पसरून आणि वरून टिपून घेवून ना?
हो.
हो.
लोकहो, मी साखरांबा केला
लोकहो, मी साखरांबा केला (पहिल्यांदाच). तो कडक झालाय.
बहुतेक जास्त वेळ शिजवला. तो आता खाणेबल कसा करता येईल?
In such cases, sprouted then
In such cases, sprouted then frozen things whethere nutrition remains the same if the sprouts had been freshly made? I have same doubt about retention / preservation of nutrition in uncooked+cut+frozen/refrigerated veggies or semi cooked + frozen food items to be used at later dates. Please share the thoughts. Thanks.
>> तो आता खाणेबल कसा करता
>> तो आता खाणेबल कसा करता येईल?
कुटून.
कडकडीत पाणी घालून सैल करता यावा.
मोड आलेले कडधान्य फ्रीज केलं
मोड आलेले कडधान्य फ्रीज केलं तर किती दिवस टिकेल? >>.>> इथल्या हवामानात जास्तीतजास्त २ आठवडे राहील.नंतर बुरशी येते.
थोडा थोडा भाजीत घाला. आपोआप
थोडा थोडा भाजीत घाला. आपोआप खाल्ला जाईल.
साखरांबा थोडा वेळ गॅसवर ठेवून
साखरांबा थोडा वेळ गॅसवर ठेवून पातळ होईल. मग फ्रीजमध्ये ढकला.
मी यावेळी भारतातून आणखी एक हार्ड अॅनोडाइज्ड तवा आणलाय . अगोदरच्या तव्याला हँडल होत. हा बिन हँडलचा आणलाय. स्वच्छ करायला एकदम सोपा जातोय.
पोळ्यांसाठी लोखंडाचा तवा
पोळ्यांसाठी लोखंडाचा तवा ब्ब्येस्ट! अनो. तवा मला भावला नाही, त्यावर तेल लावले की थर साचतो आणि पोळ्या कच्च्या राहतात. कोटिंगचे भांडे वापरणे हळू हळू कमी करत आहे..
You could make panhe out of
You could make panhe out of that sakharamba.
Thanks Aashu29 & seema,पण
Thanks Aashu29 & seema,पण बिडाचा तवा कुठे मिळेल(बिडाच्या तव्यावर पदार्थ करताना तेल जास्त लागत का?)
अॅनोडाईज्ड तव्यावर उत्तम
अॅनोडाईज्ड तव्यावर उत्तम पोळ्या होतात. चिकटतात याचा अर्थ तवा पुरेसा तापलेला नाहीये.
केरळ वरुन एक लोखंडाचा तवा
केरळ वरुन एक लोखंडाचा तवा मागवला होता. पण तो गरम खुपच होतो. त्यावर डोसे कींवा अजुन काही बनविले तर करपते, वापरला नाहि कि गंज चढतो.
काय करावे.
वापरला नाहि कि गंज चढतो>>
वापरला नाहि कि गंज चढतो>> वापरुन झाल्यावर स्वच्छ करुन तेलाचा हात लावून ठेवावे. ठेवताना उलटा/ उपडा ठेवला तर खाली काहीतरी आडवा बत्ता वगैरे ठेवावा, म्ह्णजे हवा खेळती राहू शकते.
>> I have same doubt about
>> I have same doubt about retention / preservation of nutrition in uncooked+cut+frozen/refrigerated veggies or semi cooked + frozen food items to be used at later dates. Please share the thoughts. Thanks.>>
योग्य पद्धत वापरुन फ्रीज केल्यास पोषणमुल्य फारसे कमी होत नाही. गेल्याच आठवड्यात मास्टर गार्डनरच्या मिटिंगला प्रिझर्वेशनवर एका तज्ञ बाईंचे लेक्चर होते. त्यांनी सांगीतले की फ्रीझींग हे कॅनिंगपेक्षा सोपे आणि सेफ आहे. मटार, कॉर्न वगैरे काही गोष्टी ब्लांच करुन फ्रीज कराव्यात.
Canning ------ never used
Canning ------ never used canned products so as of now no doubts.
I am on fence about using frozen, pre-cut, cooked then frozen for future use, so couldn't do that also so looking for some right guidance. As of now I not using any partially processed items while cooking.
Could you please share what is right way of freezing?
मझ्याकडे चुकुन आणलेली खालील
मझ्याकडे चुकुन आणलेली खालील दोन पाकीटं आहेतः
१. शहाजिरे
२. काळे तीळ
हे कसे संपवता येतील? शहाजिरे भलतेच महाग आहेत....
घरुन येताना मक्याचे कणीस
घरुन येताना मक्याचे कणीस आणलेत.. दाणे तसेच फ्रिजमधे स्टोअर करता येतील का?
शहाजिरे - काळ्या मसाल्यात /
शहाजिरे - काळ्या मसाल्यात / गरम मसाल्यात घालता येतील.
काळे तीळ - तिखटा-मिठाच्या पुर्या, पराठे, खारी शंकरपाळी, खार्या पुर्या, मैद्याच्या पुर्या यात वापरता येतील.
पण शक्य असल्यास दोन्ही पुड्या दुकानदाराला परत करा आणि त्याबदल्यात तुमच्या रोजच्या वापरातले काही जिन्नस घ्या.
कॉन्टीटी नसेल ज्यास्त काळ्या
कॉन्टीटी नसेल ज्यास्त काळ्या तीळाची तर चटणी करु शकता... मस्त लागते.. कोरडी भाजून चटणी.
घरुन येताना मक्याचे कणीस
घरुन येताना मक्याचे कणीस आणलेत.. दाणे तसेच फ्रिजमधे स्टोअर करता येतील का?>>>मी थोडावेळ उकडून फ्रिजरमधे ठेवते. चांगले टिकतात.
फ्रीझींगसाठी -
फ्रीझींगसाठी - http://nchfp.uga.edu/how/freeze/blanching.html
माझ्याकडे १/२ किलो.
माझ्याकडे १/२ किलो. Coffee-mate coffee creamer आहे. कॉफीसाठी ते वापरले जात नाही.
त्याचे अजून काय करता येईल?
इथे रेसिपीज आहेत बघा
इथे रेसिपीज आहेत बघा कॉफीमेटच्या.
मी साखरांब्यामधे थोडे गरम
मी साखरांब्यामधे थोडे गरम पाणी घातले आणि पुन्हा मन्द आचेवर गरम केला. अगदी नीट मऊ झाला आहे.
सर्वांना धन्यवाद.
धन्यवाद स्वाती
धन्यवाद स्वाती
चवळीची उसळ करताना चवळी
चवळीची उसळ करताना चवळी शिजायला खूप वेळ लागतो, शेवटी अशीच धेडगुजरी शिजते, बाकी कढधान्य नीट शिजतात ...का? भाजी करण्या आधी तिला भिजवुन मोड (जेवढे येतील तेवढे) काढून रुम टेंपरेचरला आणुनच करते तरी असेच होते. तसच राजम्याचंही व्हायचं, म्हणुन तो खाणं बंद केलं
कुकर मध्ये शिजवतेस कि
कुकर मध्ये शिजवतेस कि बाहेर.
मी चवळी, चणे, वाटाणे सरळ कुकर मध्येच फोड्णी घालते. शिजतात ते व्यवस्थीत.
शिजवताना मीठ घालता का? मीठाने
शिजवताना मीठ घालता का? मीठाने कडधान्य दाठरतात.
कडधान्ये शिजवताना त्यात नारळाच्या करवंटीचा तुकडा घालावा. मऊ शिजतात कडधान्यं.
कुकर मध्ये शिजवते पण शिजतच
कुकर मध्ये शिजवते पण शिजतच नाही बोटचेपं शिजण्यासाठी किती शिट्या काढू?
थँक्यु प्राची , अवंतिका
Pages