Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41
स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.
नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वैशाली (आणि प्राची) हे
वैशाली (आणि प्राची) हे वाचा
<<
हे शाब्बास.. प्राची ची पोस्ट्स तिलाच वाचायला सांगताय
Food processor works better
Food processor works better than mixer for puran >>> +१
एस शेप्ड ब्लेड लावून छान एकसारखे होते पुरण.
>> Food processor works
>> Food processor works better than mixer for puran
+१
पुरण गार होऊ द्यायचं मात्र त्यातून काढण्याआधी. तेच पुरणयंत्रातून काढणार असाल तर गरम असताना काढलेलं चांगलं.
पुरण कडा कोरड्या व्हायला लागेस्तोवर शिजवायचं/परतायचं म्हणजे अजिबात पातळ रहात नाही आणि पोळ्या छान होतात.
>> खायच्या तशाच. खूप वेळ
>> खायच्या तशाच. खूप वेळ राहतात तोंडात. सारखे खाण्याची सवय आणि इच्छा कमी होईल फिदीफिदी


इथं कुठल्याही धाग्यावर जाऊन मजा येऊ शकते.
पुरणासाठी फु प्रो मस्त आणि
पुरणासाठी फु प्रो मस्त आणि शिजवताना त्यात डाव नीट उभा राहिपर्यंत शिजवायचं म्हणजे पातळ रहात नाही असं मी आईकडून ऐकलय. मी पुरणाच्या वगैरे भानगडीत स्वतः पडत नाही. त्यामुळे फुकटचा सल्ला द्यायचा हक्क मी बजावत आहे.
धन्यवाद… करून बघते
धन्यवाद… करून बघते
आईने मला एक पुरणाची जाळी
आईने मला एक पुरणाची जाळी गिफ्ट केली आहे. त्यावर पुरण घालून स्मॅशर फिरवायचा. मस्त पुरण वाटले जाते. पुरणयंत्रापेक्षा सुटसुटीत आणि लवकर काम होते. >>> हो , हा प्रकार मी आमच्या स्वयंपाकाच्या काकींकडून ऐकला होता. आमच्याकडे साधी तारेची मोठी खोलगट जाळी आहे. गेल्या आठवड्यात साबानी त्यातच पूरण घातलं आणि वाटीने दाबून गोल फिरवत वाटलं .. पु.यंत्रापेक्शा सोप काम आहे असं म्हणाल्या .
पुरणाची डाळ जास्त पाणी घालून
पुरणाची डाळ जास्त पाणी घालून गाळ शिजवली तर पुरणयंत्राची अजिबात गरज पडत नाही. डाळ शिजल्यावर कट निथळून घ्यायचा आणी रवीने डाळ घोटून पुरण शिजवायला घ्यायचं. मी कधीच पुरणयंत्र वापरत नाही. ही टीप जुन्या माबोतली आहे.
शूम्पी
शूम्पी
पुरण 'वाटणे' माझं आवडतं काम
पुरण 'वाटणे' माझं आवडतं काम आहे. माझ्याकडे मोठं पुरण यंत्र आहे एका वेळेस ४०० ग्राम डाळ वाटायला घेवू शकतो एवढे.
अजुन एक, डाळी सोबत थोडे तांदुळ घालाच लवकर मिळून येतं पुरण अगदी पातळ झालं असेल तरीही.
मामी, त्या चिप्स घरात अगदी
मामी, त्या चिप्स घरात अगदी नाममात्र प्रमाणात ठेवून बाकीच्या प्रेमाने छोट्या-मोठ्या मंडळींना खाऊ म्हणून पास ऑन केल्या.
छोट्यांनी आवडीने कडाम्म कुडुम्म करत खाल्ल्या. मोठ्यांच्या दातांचे काय झाले ते माहीत नाही.
पण आता ही युक्ती नेक्स्ट टाईमसाठी लक्षात ठेवण्यात येईल! थँक्स!!
आईने मला एक पुरणाची जाळी
आईने मला एक पुरणाची जाळी गिफ्ट केली आहे. त्यावर पुरण घालून स्मॅशर फिरवायचा. मस्त पुरण वाटले जाते. पुरणयंत्रापेक्षा सुटसुटीत आणि लवकर काम होते. >>> हो , हा प्रकार मी आमच्या स्वयंपाकाच्या काकींकडून ऐकला होता. आमच्याकडे साधी तारेची मोठी खोलगट जाळी आहे. गेल्या आठवड्यात साबानी त्यातच पूरण घातलं आणि वाटीने दाबून गोल फिरवत वाटलं .. पु.यंत्रापेक्शा सोप काम आहे असं म्हणाल्या .
हे नक्की कस करायचे.
मी पुरण आधी फु पो मधून काढून घेते. लगेच गरम गरमच पुरण यंत्रातून काढून घेते. पुरण यंत्र तून काढल्या शिवाय चांगले होत नाही. नाही तर पुरण झाल्या झाल्या त्याच भांड्यात HAND MIXER फिरवणे & नंतर लगेच पुरण यन्त्र
.
.
मृणाल, आमच्याकडे अशी गाळणी
मृणाल, आमच्याकडे अशी गाळणी आहे .
त्यात गरमगरम पुरण घालुन वाटीने गोल फिरवत मॅश केलं . खाली पातेल्यात अगदी मऊ पूरण जमा होतं.
पुरणासाठी प्रज्ञा +१ मी
पुरणासाठी प्रज्ञा +१ मी पोटॅटो रायसर वापरते त्यासाठी. फुप्रो, मिक्सर कधीच नाही.
-- चुकून पेस्ट --
-- चुकून पेस्ट --
२ किलो बटाटे चिप्स शिल्लक
२ किलो बटाटे चिप्स शिल्लक राहिलेत
काय करू?? कुणाला चखणा म्हणून देऊही शकत नाहीये. 

दान करावे लागतील अस दिसतयं
चिप्स म्हणजे? कच्चे चिप्स
चिप्स म्हणजे? कच्चे चिप्स आहेत का?
कच्चे चिप्स भजीच्या पीठात बुडवून तळा.. मस्त लागतात.
अर्रे, सॉरी वेफर्स (तळलेले)
अर्रे, सॉरी
वेफर्स (तळलेले) , शिल्लक आहेत. ऑफिस मध्येच खपवावं असा विचार आहे.
लहान मुलांना वाटून टाका. त्या
लहान मुलांना वाटून टाका. त्या चिप्स
सावकाश खात बसा. कुडुम कुडुम
सावकाश खात बसा. कुडुम कुडुम आवाज करत मजा घ्या. वेळ ही चांगला जातो.
इतर कुठे लिहून विचारू ते कळलं
इतर कुठे लिहून विचारू ते कळलं नाही म्हणून इथे विचारतेय.
यावर काय उपाय असेल तर सांगा..
कोणतंही चप्पल घातलं/बेलिज घातले तरीही मला लागतातच. ( जुने सुद्धा) थोडे दिवस सलग घातले तर लागणं बंद होतं पण आपण रोज रोज एकच चप्पल कुठे घालतो? जरा १-२ दिवस गॅप झाला की लागलीच.
(मला माहिताय आता इथे खुप धुरळा उडणार आहे युक्त्यांचा :फिदी:)
आहारशास्त्र अन पाककृतीमधे
आहारशास्त्र अन पाककृतीमधे कशाला हा प्रश्न ? पादत्राणांचा एक बाफ आहे तिथे विचारता आला असता की ? नाहीतर माहिती हवी मधे वेगळा धागा उघडायचा. इथे लोकांनी माहिती दिली तरी पुढे कोणाला हाच प्रश्न पडला तर शोधता येईल का ?
सांडगी मिरची आणल्या आहेत ???
सांडगी मिरची आणल्या आहेत ??? पूर्ण तळून खाणे म्हणजे खूप calories ?? काही वेगळी तऱ्हेने वापरता येणार ??
सां. मिर्च्या वाळल्यानंतर
सां. मिर्च्या वाळल्यानंतर चिवट होतात, त्यामुळे शक्य असेल तर कुस्करुन कोशिंबीरीत/ आमटीत/ रश्श्यात वापरणे. तसेही तळायला एवढे तेल लागत नाही.
सांडगी मिरची तळायला एवढे तेल
सांडगी मिरची तळायला एवढे तेल लागत नाही.खाऊन खाऊन किती खाणार! १ किंवा २....कितीशा calories
वाढ्तील?
गुमो दही भातात चुरडून घालायची
गुमो दही भातात चुरडून घालायची मस्त लागते. शिवाय आमटीत सुद्धा घालू शकतेस.
फोडणीच्या पळीमध्ये अगदी अर्धा
फोडणीच्या पळीमध्ये अगदी अर्धा चमचा तेल घेवून सुद्धा २-३ सांडगी मिरच्या आरामात तळता येतात.
(No subject)
रंगासेठ, चिप्स वर चटणी,
रंगासेठ, चिप्स वर चटणी, कांदा, बटाटा, शेव, फरसाण आणि वर चाट मसाला घालुन चाट बनवु शकता. दही घातल तर पोटभरीचपण होईल.
Pages