युक्ती सुचवा युक्ती सांगा- ३

Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41

स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.

नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुळ बारीक कसा करायचा?
<<
फार जाड झालाय का? उपासमार करा त्याची. किंवा योगा करायला लावा. यूट्यूबवर रामदेव बाबाचे व्हिडिओज दाखवा. जमेल कदाचित.

**

इडल्या भयानक म्हणजे भयानक हलक्या झाल्या तरी त्या बिघडल्या असं समजायचंका।?
<<
आपोआप उडायला लागल्यात तर कायतरी प्रॉब्लेम आहे असे समजा.
अन्यथा हेलियमपेक्षा हलक्या असणे जरा कठीण वाटते.. (उडत्या तबकड्या म्हणून ब्रँडिंग कर. या अमांच्या सल्ल्याशी सहमत)

खोबरेल तेल (केसांना लावण्याचे) कधी खराब होते का? रूम टेम्परेचरला खोबरेल तेल साधारण किती काळ टिकते? तेल खराब झाल्यास कसे ओळखावे?

खोबरेल तेल (केसांना लावण्याचे) कधी खराब होते का? रूम टेम्परेचरला खोबरेल तेल साधारण किती काळ टिकते? तेल खराब झाल्यास कसे ओळखावे?>>>> मलाही हा प्रश्न पडला आहे!
अजून पुढील प्रश्न आहेतचः

१.माझ्याकडे कॉटनच्या पिशव्या आहेत. म्हणजे जुन्या कापडाच्या असतात त्या.
फ्रीजमध्ये भाजी ठेवताना या पिशव्यांत ठेवून फ्रीजच्या व्हेजी ट्रे मध्ये ठेवल्यास चालेल का?
त्या पिशव्या अजून कशासाठी वापरता येतील?

२.उपम्यासाठी बारीक रवा चालेल का? की अगदीच गिच्च गोळा होइल? लेकीच्या हिंदी शाळेतील शिक्षिकांनी खास फरमाईश केली आहे उपम्यासाठी. म्हणून प्रश्न पडला आहे.

३. श्रीखंडासाठी चक्का करण्याचे नेहमीचे सूती कापड गायब झाले आहे. कशाप्रकारचे कापड वापरावे? दिवाळीदरम्यान श्रीखंड केले तेव्हा सिंथेटिक ओढणीत चक्का करायला लावला होता. पण थोडे पाणी राहिलेच आणि श्रीखंड नेहमीसारखे (चितळे स्टाईल) झाले नाही..

चिवा, इडल्या हलक्या झाल्या म्हणजे चांगल्या झाल्या! मला अशा मऊ लुसलुशीत इडल्या फार आवडतात.

ऊपम्यासाठी बारिक रवा चालेल, फक्त पाणि जपुन टाकावे लागेल, रवा कोरडा भा़जुन मग फोडणित परतायचा वरुन उकळिच पाणी लागेल तस टाकायच..

visavishit zalyaa ahet ka? tase astil ta bighadalya...mazya zalya hotya tashya Happy

वत्सला, भारतवारीत श्रीखंड करण्यासाठी (चक्का बांधून ठेवायला) विशिष्ट पिशवी बाजारात मिळते हल्ली, ती आठवणीने खरेदी कर! :)चीजक्लॉथ देखील उपयोगी ठरेल असे वाटते. जनरली चक्का करताना दही सुती पंच्यात किंवा जरा घट्ट विणीच्या सुती कापडात करकचून बांधून ठेवताना पाहिले आहे.

धन्स अकु! नक्की घेइन त्या पिशव्या.

जनरली चक्का करताना दही सुती पंच्यात किंवा जरा घट्ट विणीच्या सुती कापडात करकचून बांधून ठेवताना पाहिले आहे.>>>>> अगं हो माझ्याकडे एक दडस सुती पंचाच होता दही बांधण्यासाठी पण एका मैत्रीणीला दिला तो तिच्याकडेच रहिला.

सिंथेटिक ओढणीत चक्का करायला लावला होता. पण थोडे पाणी राहिलेच >> पुढच्या वेळी ती सिंथेटीक ओढणी रद्दीच्या गठ्ठ्यावर ठेवून त्यावर काहीतरी वजन ठेव. रद्दीच्या गठ्ठ्यावर टिश्यू पेपरचा गठ्ठा ठेवून त्यावर चक्का बांधलेली ओढणी ठेवलीस तर उत्तम. सिंथेटीकऐवजी कॉटनची ओढणी/ कापड मिळालं तर अधिक उत्तम. आणि कापडात बांधायच्या अगोदर सूप स्ट्रेनरमधे दही निथळून घेतलंस तर फारच अधिक उत्तम.

कापडात बांधायच्या अगोदर सूप स्ट्रेनरमधे दही निथळून घेतलंस तर फारच अधिक उत्तम.>>> चांगली आयडीया आहे ही पण. करुन बघते.

फ्रिज मध्ये भाज्या ठेवण्यासाठी काही झिप लॉक पिशव्या मिळतात असे ऐकले आहे?
कोणाला माहिती आहे काय ?
असेल तर नवी मुंबईत/मुंबईत कुठे मिळतिल?

१.माझ्याकडे कॉटनच्या पिशव्या आहेत. म्हणजे जुन्या कापडाच्या असतात त्या.
फ्रीजमध्ये भाजी ठेवताना या पिशव्यांत ठेवून फ्रीजच्या व्हेजी ट्रे मध्ये ठेवल्यास चालेल का?
त्या पिशव्या अजून कशासाठी वापरता येतील? >>> मी पालेभाज्या अश्या कापडी बॅगेत ठेवून मग फ्रिजमध्ये ठेवते नेहेमी. मेथी शेपु इ. भाज्या निवडून अश्या पिशवीत ठेवून फ्रिजमध्ये ठेवल्यावर किमान २-३ दिवसतरी छान रहातात.

वत्सला,
भाज्या बाजारातून आणल्या तरी त्यातले विकर कार्यरत असतात. त्या चक्क श्वास घेतात. त्यात काही बाष्प निर्माण होते. ते शोषले गेले नाही तर भाज्यातच जिरते व भाज्या कुजायला सुरवात होते. म्हणून कापडी पिशव्या वापरायच्या. कारण त्या बाष्प शोषतात. नायलॉनच्या जाळीदार पिशव्याही वापरता येतात. त्याने बाष्प बाहेर पडते.

बारीक रवा खमंग भाजून घेतला, तर उपमा मोकळा होतो.

आनंदी, झिप लॉक पिशव्या चेंबूरला डॉ. आंबेडकर उद्यानाजवळ एका रद्दीवाल्याकडे मिळतात. हव्या त्या साईझच्या त्याच्याकडे असतात. इतरत्रही मिळत असतील.

चक्का करताना, मालवणला नव्या विटांवर स्वच्छ कपडे अंथरून त्यावर चक्क्याची पिशवी ठेवत असत.
मी मात्र चक्का बांधून बरेच पाणी निथळले कि नायलॉनच्या मोठ्या गाळणीवर तो ठेवून, ती गाळणी एका मोठ्या भांड्यावर ठेवून फ्रीजमधे ठेवतो. फ्रिजमधे थंड होताना काही पाणी बाहेर पडतेच. ( गाळणीतूनही खाली पडते ) शिवाय चक्का जास्त आंबट होत नाही. थैली बाहेर ठेवल्यास मुंबईत त्यावर बारीक किटक ( केमरं ) जमा होतात.

खोबरेलच काय कुठलेही खाद्यतेल कालांतराने खराब होतेच. ( तेलबियाही होतात ) त्याला खवट वास यायला लागतो. चवीतही फरक पडतो. आपल्या गरजेनुसार १५ / २० दिवसात संपेल एवढेच तेल आणावे आणि त्या बाटलीचे झाकण नेहमी घट्ट लावावे.

आनंदी..
झिप लॉक पिशव्या सुपर बझार / बिगबझार/ स्टार बझार मधे मिळतात, अल्युमिनियम रॅप असते त्याच्या आजुबाजुला किचन तॉवेल इ.. बरोबर असतात. Happy

वत्सला
बारिक रव्याचा उपमा होतो छान. फक्त मंद आचेवर भाज. हळू हळू हलकेपणा जाणवतोच त्याचा. शिवाय भाजतानाच२ चमचे तुप सोड (साजूक) आणि उपमा करताना हळू हळू पाणि घाल.

आजकाल मिरच्या अजिबातच तिखट नसतात, वैताग येतो. अगदी बारिक करून, ठेचून घातल्या तरी भाज्या पाणचटच होतात. आणि भेंडी किंवा कोणत्याही पालेभाजीत तिखट वगैरे कसं घालणार? Angry

आजकाल मिरच्या अजिबातच तिखट नसतात, वैताग येतो. अगदी बारिक करून, ठेचून घातल्या तरी भाज्या पाणचटच होतात. <<
मिरच्या तिखट असल्या तरी भाज्या पाणचट होऊच शकतात की Lol

भेंडी किंवा कोणत्याही पालेभाजीत तिखट वगैरे कसं घालणार?>> न लाजता घालायचं दक्षिणा Wink
काही नाही होत.

वत्सला, तुझ्याकडील पिश्व्या कशा आहेत माहिती नाही पण माझ्याकडे जरा जाडशा आहेत व त्या खुपवेळा आम्ही भाजी आणायला नेतो. दुकानातील प्लास्टिक पिशव्यात भाजी नाही आणत.

घरात ज्वारीच पिठ आहे विकतच .. म्हणजे दळुन वगैरे आणल नाहिये...
पिठाचे पॅकेट मिळतात डि-मार्ट मध्ये तसे ..
पण त्याच्या भाकर्‍या नीट होत नाहियेत..
मग त्या पिठाच दुसर काय करु शकतो ??
काही रेसेपी आहे काय?

आनंदी ज्वारीच्या पीठाचे थालीपीठ खमंग होते, उकड पण मस्त. तरीही भाकरीसाठी म्हणून त्या पीठात चमचाभर कणिक घाल आणी पीठ गरम पाण्यात भिजव, विरी जाणार नाही, भाकरी होईल.

Pages