Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41
स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.
नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>बाजरीच्या पीठाचं 'पॉरीज'
>>बाजरीच्या पीठाचं 'पॉरीज' करून खा >>> रेसिपी प्लिज.
गोष्टीच्या पुस्तकांत वाचून
गोष्टीच्या पुस्तकांत वाचून वाचून पॉरिज हा फक्त अस्वलांनी खायचा पदार्थ आहे अशी माझी कल्पना होती. रेसिपीबद्दल फारच उत्सुकता आहे.
सिंडी अगं खीर किंवा लापशीला
सिंडी अगं खीर किंवा लापशीला "पॉरिज" म्हणावं..मग तुला अस्वलं आठवणार नाहीत आणि गोल्डीलॉक्स पण
अरेरे माझ्या विनोदाचा पार
अरेरे माझ्या विनोदाचा पार चुरा केलात. जौद्या झालं.
नाचणीच्या सत्वाचे लाडू करता
नाचणीच्या सत्वाचे लाडू करता येतात का? चांगले लागतील का केले तर?
आणि तांदळाच्या पीठाचे घावन आणि मोदक सोडून काय करता येईल.? सल्ला प्लीज.
उकड, थालिपीठ, चकली.
उकड, थालिपीठ, चकली.
अंजली - उकड, शेवया
अंजली - उकड, शेवया
भरतजी उकड फारशी नाही खाल्ली
भरतजी उकड फारशी नाही खाल्ली जात. शेवया पहाते करुन.
राजसी थालीपीठात कसे वापरायचे तांदळाचे पीठ? मऊ होतात का असे विचारायचेय
काल भाकरी करून पाहिली (फ्रीज
काल भाकरी करून पाहिली (फ्रीज मधल्या पीठाची) पण नहीं जम्या.
करताना सारखी तुटत होती.
कांदा घालुन थलिपीठ होऊ शकेल असं वाटलं, पण माझा पेशन्स संपला होता.
भाकरीचं भिजवलेलं पीठ राहतं
भाकरीचं भिजवलेलं पीठ राहतं फ्रिजमधे. पण एक किंवा फार तर दोनच दिवस... जशी भिजवलेली कणीक राहते तेवढाच काळ राहतं.
हा फक्त अस्वलांनी खायचा पदार्थ आहे >>


ते बाळंतिणअस्वलीसाठी आणि बाळअस्वलांसाठी अतिशय पौष्टीक खाणं आहे.
पाकृ खूपच सोपी आहे. लिहिली तर दोन वाक्यात संपेल. इथे लिहिली तर माझेच दात घशात जातील
इच्छुकांच्या विपूत पाकृ लिहिते.
तरला दलालच्या साईटवर पाकृ सापडेल.
तांदळाच्या पीठाच्या भाकर्या
तांदळाच्या पीठाच्या भाकर्या करता येतील . अमृताची सविस्तर रेस्पी आहे इथेच.
तांद्ळाचे पीठ , दही, मीठ, पातीचा कांदा हिरवी मिरची असे थालिपीठासारखे थापून करता येईल - अक्की रोट्टी असे शोधल्यास बरेच व्हेरियेशन्स मिळतील.
मेथी, पालक, असे पराठे करताना त्यात थोडं तांदळाचं पीठ घालता येईल,
रवा, मैदा, तांदळाचे पीठ समप्रमाणात थोड्या आंबट ताकात रात्रभर भिजवून दुसर्या दिवशी रवा डोसे करता येतील.
बांगडे, कर्ली, पापलेट यांच्या तुकड्या तळताना पण पीठ वापरता येईल
अंजली, तांद्ळाचे पीठ, जिरे,
अंजली, तांद्ळाचे पीठ, जिरे, मीठ, मिरची, को, तेल. गरम असतानाच खायला पाहिजे, कुरकुरीत लागत.
धन्यवाद राजसी नक्की करुन
धन्यवाद राजसी
नक्की करुन पाहीन. मेधाने सुचवलेली आयडीया पण छान आहे. रवा डोश्याची तर उद्याच अमलात आणतेय!
तांदळाच्या पीठाचे घावन आणि
तांदळाच्या पीठाचे घावन आणि मोदक सोडून काय करता येईल.? सल्ला प्लीज.>> धिरडी मस्त होतात. कोणत्याही भाजी-चटणीबरोबर छान लाग्तात.
के अंजली , तांदळाच्या पीठाचा
के अंजली , तांदळाच्या पीठाचा मी इन्स्टंट रवा डोसा करते. अगदी मस्त होतो. रेसीपी लिहिते.
.
.
साध्या मुगाच्या डाळीच्या
साध्या मुगाच्या डाळीच्या खिचडीत फोडणीत आधी चार लवंगा, आणि दालचिनी घालून बघा... खिचडीला छान सात्विक फणकारा येतो
@गीता भाकरी साठी जे पीठ
@गीता
भाकरी साठी जे पीठ वापरले ते जुने झाले होते का.
भाकरी करताना पीठ कोमट पाण्याने मळायचे आणि मळताना 1-2 थेंब तेल घालायचे, भाकरी चिरत नाही आणि खुप कोरडी होत नाही.
सात्विक फणकारा दाद!
सात्विक फणकारा
दाद!
सहेली सीमा थॅंक्स गं.
सहेली सीमा थॅंक्स गं. तांदळाच्या पीठात रवा घालून लगेच करायचे का डोसे इंस्टंट म्हणजे सीमा?
म्हणजे... मला इंस्टंट डोश्याची कृती हवी आहे...... आयत्यावेळेला पटकन करता येतील असे.
साधा भात करताना पण जर एखादा
साधा भात करताना पण जर एखादा दालचिनीचा तुकडा टाकला तर मस्त सुवासाचा भात होतो. खूप जुने आक्खे मसाले संपवायला मदत... उग्गा लहान लहान बाट्ल्यातून पडून असतात. अशीच लवंग, वेलदोडे, मसाला वेलची, तमालपत्र, जायपत्री वापरता येते.
विशेष प्रमाण असं नाही एखादा लहान तुकडा वाटीच्या भाताला पुरतो.
वा! चांगली टीप.
वा! चांगली टीप.
केक वरून फाटू नये म्हणून काय
केक वरून फाटू नये म्हणून काय करता येईल? माझा दर वेळेस ज्वालामुखीसारखा वरून फाटतो.
इथल्या युक्त्या वाचून सल्ले
इथल्या युक्त्या वाचून सल्ले (आपल्याला जे जे चांगले ठाव, ते ते इतरांसी सांगावे, शहाणे करुन सोडावे.... असे काहीसे एका संत सांगून गेले आणि त्याचे प्रामाणिक पालन) देण्याचा हा परिणाम (डोक्याला हात मारलेली बाहुली)
काय काय करता येईल
मंजु >>>>> वडे, धिरडे ,
मंजु >>>>> वडे, धिरडे , पुर्र्या , भाजी , पराठे
वेफर्स करा. एखाद्या मल्लुला
वेफर्स करा. एखाद्या मल्लुला गाठुन त्याला हा घड विका.:दिवा:
रश्मी, अनिश्का, पाकृ व टीकाऊ
रश्मी, अनिश्का,
पाकृ व टीकाऊ पाकृ सांगा प्लीज
पिकायच्या आधी - काप, भाजी,
पिकायच्या आधी - काप, भाजी, वेफर्स (कृती मागू नये)
पिकल्यावर - नुस्ती खाणे, प्रसादाचा शिरा (पुजा घालायची आवश्यकता नाही), केळ्याचं स्वीट(
ओलं खोबरं-बिबरं, गूळ-बीळ घालून... बिबरं नावाचा पदार्थ नाही. बीळ पदार्थात घालता येत नाही), बनाना ब्रेड, बनाना केक, बनाना मिल्क शेक, बरं लागत असेल तर बनाना आईसक्रीम - अगदी नॅचरल्स सारखं
फ्राईड बनाना विथ आईसक्रीम (कृती मागू नये)
(माझी टापा करण्याची वेळ संपली)
टीपः कृती मागू नये म्हणजे... माझ्याकडे मागू नये. सल्ला दिला तितका पुरेसा आहे)
उंधियो आणि दाबेलीच्या भाजीत
उंधियो आणि दाबेलीच्या भाजीत कच्ची केळी लागतात. तेही करून बघा .
१. वडे कच्च्या केळ्याना
१. वडे
कच्च्या केळ्याना वाफवुन त्यात कांदा, तिखट, चाट मसाला, जिरे, थोडा ओवा , थोडा गरम मसाला, कोथिम्बीर टाकुन मळा व त्याचे चपटे वडे करुन रव्यात घोळवुन वडे शेलो फ्राय करा.
( हे बाटाटा वड्यासारखे पण करता येतात )
२. कापं...
कच्च्या केळ्याना सालं काढुन तिरके काप करुन थोडी लसुण पेस्ट , मीठ , हळद, मसाला लावुन ठेवायचा १५ मिन. नंतर तांदुळाच्या पिठात थोडा रवा, मीठ , तिखट घालुन त्यात हे काप घोळवुन फिश फ्राय सारखे फ्राय करा.
खायला देताना आवडत असेल तर लिंबु पिळुन द्या.
३. पुर्र्या
केळी वाफवुन घ्यायची. ती कुस्करुन ठेवायची..आता त्यात मिठ , हिरव्या मिरचीची आणि लसुणाची पेस्ट, थोडी हळद मिक्स करायची..मग कणीक मळायला घेते वेळी ही कुस्करलेली केळी मिक्स करुन छान मळुन घ्यायचे आणि पुर्या लाटुन तळायचे
४. भाजी
केळ्याची साले काढुन तुकडे करायचे मग तेलाय कांदा, लसुण , जीरे, हिंग , हळद, मिरचीची फोडणी देउन भाजी टाकुन परतायची. लागेल तितक पाणी टाकुन भाजी शिजवायची.. पण रस भाजी नाही झाली पाहिजे..सुकीच ठेवायची. खोबरं टाकुन तयार.....
५. पराठे
हे पराठे बटाटयाच्या पराठ्याच्या क्रुती ने करायचे....
अजुन आठवले की अजुन सांगेन...
Pages