Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41
स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.
नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रसा, किडनी स्टोनचा त्रास असेल
रसा, किडनी स्टोनचा त्रास असेल तर बिया वगळाव्यात. एरवी काही कारण नाही.
मलाही हाच टोमॅटोचा प्रश्न
मलाही हाच टोमॅटोचा प्रश्न विचारायचा होता किती दिवस.
पण दिनेश टोमॅटोच्या बिया किडनी स्टोनचा त्रास नसेल तरी वाईटच ना तब्येतीला?
मी पहिल्यांदाच स्पायसी ऑलिव्ह
मी पहिल्यांदाच स्पायसी ऑलिव्ह ऑइल आणलं आहे. काल त्यात लसूण्-मोहरीची फोडणी करून बीन्सची परतून भाजी केली. तेलाचा खूपच ठसका लागत होता ब्लोअर चालू करून सुद्धा. पण भाजी एकदम ऑस्सम झाली. तेलात तिखट असल्याने भाजीत वेगळं घातलं नाही. थोडे तीळ आणि वरून कोथिंबीर घातली. लिंबाचा रस घालून पोळीबरोबर खाल्ली.
कुठून आणलंस सिंडे ? ब्रँड
कुठून आणलंस सिंडे ? ब्रँड काय?
फेअर वे. ब्रँड बघून सांगते.
फेअर वे. ब्रँड बघून सांगते. बार्बेरा बहुतेक.
<< बासुंदीत मधे मधे सायीचे
<< बासुंदीत मधे मधे सायीचे जाड तुकडे न येता प्लेन व्हावी म्हणून काय करतात ?
रावी, बासुंदी करताना दूध जाड बेस असलेल्या पातेल्यात ओतून ते पातेले हाय फ्लेमवर ठेवून ( दूध उकळत राहील पण उतू जाणार नाही असे बघा ) , सतत ढवळत राहून दूध आटवा. सतत ढवळल्याने साय तयार होतानाच तिचे तुकडे होऊन ते दुधात मिक्स होत राहतात. त्यामुळे रवाळ ( दूध आणि साय एकत्र होऊन अशा कन्सिस्टंसीची ) बासुंदी बनते.
दक्षे, त्या वाईट असे मी कुठे
दक्षे, त्या वाईट असे मी कुठे वाचलेले नाही. खुपदा फॅक्टरीमधे पल्प वगैरे करताना त्या गाळल्या जातात पण घरात तसे मुद्दाम कुणी करत असेल तरच.
रावी, सायीचे तुकडे
रावी, सायीचे तुकडे घालवण्यासाठी मी बासुंदी ब्लेंडरमधून फिरवून काढते. अगदी स्मूद होते.
link for perfect dosa batter
link for perfect dosa batter every single time
http://deepascooking.blogspot.in/2013/09/idlidosaappe-batter.html
गुलमोहोर कापलेला कांदा
गुलमोहोर कापलेला कांदा टपरवेअरच्या डब्यात फ्रिज (फ्रिजरमधे नाही) मधे ठेवला तर ३-४ दिवस उत्तम राहतो. आठवडाभराची कल्पना नाही.
एचेच, नंतर तो प्लास्टीक डबा
एचेच, नंतर तो प्लास्टीक डबा फक्त कांद्या करता म्हणुनच वापरावा लागतो कारण वास जात नाही बहुतेक. त्यापेक्षा स्टील/ग्लास डबा/कंटेनर वापरता येईल बहुतेक.
कच्चा कांदा चिरुन ठेऊ नये
कच्चा कांदा चिरुन ठेऊ नये जास्त वेळ... मध्यंतरी यावर इथे चर्चा झाली होती... जास्त वेळ चिरुन ठेवलेला कांदा खाण्यास अयोग्य असतो कारण त्यावर वातावरणामुळे काहि केमिकल रिअॅक्शन्स होतत ज्या शरीरास हानीकारक असतात असा काहिसा रिसर्च आहे. रेफरन्स महित नाही. आणि खरे का खोटे हे पण माहित नाही....पण मी ते वाचल्यापासुन कांदा आयत्या वेळेस चिरते. उगाच कशाला विषाची परिक्षा...
कांदा जास्त असेल तर कच्चा चिरून ठेवायच्या ऐवजी दिनेशदांनी सांगितले आहे तसे तेलात थोडा परतुन ठेवते.
संपदा, शुगोल धन्स. मला येत्या
संपदा, शुगोल धन्स. मला येत्या आठवड्यात करायची आहे. मी मंद आचेवर ठेवते आटवत म्हणून बहुधा माझी प्लेन होत नाही. आता अशी करून बघेन.
घरातल्या एकाला किडनी स्टोनचा
घरातल्या एकाला किडनी स्टोनचा त्रास झाला होता तेव्हा डॉने सांगितले होते की कुठल्याही एका पदार्थाने (जसे की, वर लिहिल्याप्रमाणे टोमॅटोच्या बिया) किडनी स्टोनचा त्रास वाढतो असे नसते. व्यक्तिपरत्वे ते बदलते, तेव्हा असा सरसकट नियम लावून टोमॅटो बाद करू नका.
लाजो , दिनेश दा आणि macs, HH
लाजो , दिनेश दा आणि macs, HH धन्यवाद.
तेव्हा असा सरसकट नियम लावून
तेव्हा असा सरसकट नियम लावून टोमॅटो बाद करू नका.>>>टोमॅटो नाही गं...टोमॅटोच्या बिया बाद.
ही लिंक
ही लिंक वाचा.
http://www.precisionnutrition.com/all-about-kidney-stones
यातल्या कॅल्शिअम ऑक्झॅलेटचा संबंध टोमॅटो आणि त्यातही टोमॅटो बियांशी आहे.
इथे ऑक्झॅलेट असलेल्या इतर पदार्थांची यादी आहे.
http://www.botanical-online.com/oxalatecontentoffoods.htm
लाजो +१० हाच नियम टोमॅटोसाठी
लाजो +१०
हाच नियम टोमॅटोसाठी पण आहे असं ऐकते
मोड आलेल्या मटकीला वास लागला
मोड आलेल्या मटकीला वास लागला आहे. तो कसा घालवायचा?
अगदी कडकडीत गरम पाण्यानी २-३
अगदी कडकडीत गरम पाण्यानी २-३ वे़ळेला धुवून टाका.
उकडीचे मोदक करायला घेतले होते
उकडीचे मोदक करायला घेतले होते पण पिठाला काही चिकटपणाच नाहीये. आता त्या पिठाच्या भाकरी करुन बघते पण त्याही तुटतील असे वाटते आहे. त्या पिठाचे काय करता येईल?
वर्षा११, निवगर्या
वर्षा११, निवगर्या
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/116382.html?1158251941
आज माझाही किंचित पचका झाला. मोदक घडेनात.. पीठ जुनं होतं बहुतेक. मग पातोळे केले आणि उरलेल्या पीठाच्या निवगर्या.
धन्यवाद दाद.
धन्यवाद दाद.
बर्याच वेळा किडनी स्टोन
बर्याच वेळा किडनी स्टोन ऑक्जॅलेटचे असतीलच असे नाही.
वेगवेगळ्या प्रकारचे असतात.
त्याप्रमाणे वेगेवेगळी पथ्ये असतात.
मोड आलेल्या मटकीला वास लागला
मोड आलेल्या मटकीला वास लागला आहे. तो कसा घालवायचा?>>>> १ - २ दा पाण्याने स्वच्छ धुवुन, निथळवुन मग थोडेसे तव्यावर भाजुन घ्या, मग उसळ, भाजी करा.
पातोळे करायला केळीची किंवा
पातोळे करायला केळीची किंवा हळदीची पानं नसतिल तर...

तर बेकिंगपेपर वापरायचा.. त्याला बटरपेपरही म्हणतात.
पोळ्यासाठि Hard Anodized Tawa
पोळ्यासाठि Hard Anodized Tawa घ्यावा का?मागे एकदा वापरुन पहिला,पोळ्या चिटकुन बसायच्या, एकतर कच्या व्हायच्या नहितर जळायच्या.Non stick तव्याचे coating लवकर निघते.(बाई पोळ्याना तव्यावर तेल लावतात).बीडाचा तवा पुण्यात कुठे मिळेल.(डोसा,घावन साठि)
मोड आलेले कडधान्य फ्रीज केलं
मोड आलेले कडधान्य फ्रीज केलं तर किती दिवस टिकेल? करता येईल का?
नेहेमीच्या दुपट्ट मटकी भिजवली गेलीये. मी एरवीसुद्धा दोन वेळा उसळ आणि एखाद्या वेळेला सॅलाडसाठी पुरेल इतक्या कडधान्याला मोड आणते. दरवेळी नुसतीच फ्रिझमध्ये ठेवते. आठवडाभर व्यवस्थित रहाते.
मटकीची उसळ, आमटी, बिरडं, जे
मटकीची उसळ, आमटी, बिरडं, जे काय करायचं ते करून, गार झाल्यावर लागलीच फ्रीज केलं तर २ महिनेपण टिकतं.
मोड आलेली महिना दोन महिने
मोड आलेली महिना दोन महिने आरामात टिकेल. पण कोरडी कर फ्रीझ करण्याआधी.
Pages